1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचे मालकीची फोर्ड विस्टा कार वाहन क्रमांक एम.एच.34-एम5493 हि असून सदर विमा कंपनी गैरअर्जदार यांच्याकडून सदर वाहनाचा विमा पॉलिसी काढले असून सदर विमा हा दिनांक 03.06.2016 ते 02.06.2017 या कालावधीत करता वैध होता. अर्जदाराने तक्रारीत नमूद केले आहे की 21. 8. 2016 रोजी अर्जदार वणी करून वरून येत असताना वरोरा ते वणी या रस्त्यावर वाहनांच्या खालच्या बाजूस दगड लागून अपघात झाला दुर्घटनेच्या वेळी अर्जदाराचे पती बलराज गांधी हे वाहन चालवत होते. सादर अपघात हा निर्जन रस्त्यावर झाला असून अपघात घटना वेळ हि रात्री साडे दहा मिनिटाची असल्यामुळे कोणतीही मदत मिळणे शक्य नव्हते. सदर घटनास्थळावरून काही अंतरावर गाव दिसत होते म्हणून अर्जदाराच्या पतीने खालील दगड लागल्याचा आवाज आला तेव्हा गाडी थांबवून खाली पाहिले असता त्यांना कोणतेही लिकेज दिसले नाही व गाडीच्या आत डिस्प्लेवर कोणत्याही प्रकारचे संकेत दिसले नाही. त्यामुळे अर्जदाराने गाडी पुढे चालली परंतु काही अंतर गेल्यानंतर गाडी बंद पडली म्हणून मोबाईल वरूनच वाहन बंद पडल्याची माहिती वाहन कंपनीला दिली. कंपनीने जागेवरून टो करून वाहन नेले . अर्जदाराने पुढे नमूद केले आहे की वाहन दुरुस्ती करता वाहन कंपनीच्या अधिकृत दुकानदार पार्श्व मोटर्स यांच्याकडे देण्यात आले .वाहन कंपनीने दुरुस्ती करता १,६६,३८५ चे अंदाज पत्रक काढून दिले व त्याच प्रमाणे अर्जदाराच्या वाहनाला दुरुस्ती करता ९२,२१३ /- खर्च आलेला आहे. दुरुस्तीचा खर्च अर्जदाराने पार्श्वमोटर ह्यांना दिलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे अपघात घटनेची माहिती तात्काळ दिली तसेच अर्जदाराने गैरअर्जदार कडे नुकसान भरपाई क्लेम मागणी करिता आवश्यक सर्व कागदपत्रे जमा केले त्यानंतर गैरअर्जदाराच्या कार्यालयातून रुपये ६५,२७०/- क्लेम मंजूर केला,असा फोन आला सदर फोन वरून श्री अवधूत पाटील व श्री जोशी यांच्यासोबत सोबत बोलणे केली.अर्जदाराने वाद टाळण्यासाठी डिस्चारज व्हौचेरववर सही करून बँकेचे विवरण घेऊन नुकसान भरपाई रक्कम जमा करण्याची विनंती केली होती. परंतु गैरअर्जदाराकडून दिनांक १५/०२/२०१७ रोजी पत्र आले की रुपये ५,६००/- नुकसान भरपाई रक्कम मंजूर केलेली आहे व ती फुल अँड फायनल आहे तेव्हा क्लेम रक्कम स्वीकार करावी .अर्जदाराने दिनांक २८.०२.२०१७ रोजी गैरअर्जदार यांना पत्र लिहून रुपये ५,६००/- रक्कम अमान्य असल्याचे कळविले,व त्याबद्दल स्पष्टीकरण मागितले तेव्हा गैरअर्जदाराने दिनांक १४.०३.२०१७ चे पत्र पाठवून त्याची बाजू मांडण्यास सांगितले व त्यानंतर निर्णय देण्यात येईल असे कळवले. अर्जदाराने दिनांक १७.०४.२०१७ चे रोजी पत्र दिले होते तसेच पार्श्व ऑटोरेझेड प्रा. लि. चंद्रपूर यांचा वाहना बद्दलचा अहवाल विमा कंपनीकडे दिला होता. परंतु विमा कंपनीने अर्जदाराचे म्हणणे विचारात घेतले नाही, आणि 5600/- रक्कम स्वीकारण्याचा आग्रह धरला अर्जदाराने इतर वाहन नुकसानभरपाई न करण्याचे कारण दिले की वाहनास खालील भागातील इंजिनला दगड लागले व त्यामुळे तो भाग क्षतीग्रस्त झाला तसेच काही अंतरापर्यंत वाहन चालवण्यात आले वाहनाच्या इंजिनांचा पुरवठा न झाल्याने इंजिन ब्लॉक झाले व इंजिन गरम झाल्यामुळे ते जास्त क्षतिग्रस्त झाले त्यामुळे सदर नुकसानभरपाईचा हा भाग आंतरिक स्वरूपाचा आहे व तो या प्रकारात असल्याने तो विमा पॉलिसीच्या नुकसान भरपाईच्या मर्यादेत बसत नाही, त्यामुळे इतर नुकसान भरपाई देता येत नाही नमूद केले की सदर वाहन दुरुस्ती करण्यापूर्वी यांची यांनी वाहनाची तपासणी केली होती वाहनाचे ऑइल चेंबरला जोरदार धडक लागल्याने ते डमेज झाले. परंतु त्यातून ओईलची गळती झाली नाहीत व त्या अपघातामुळे ओईल चेबर ट्यूब ओइल्पम्प हे डमेज झाले. व त्या कारणामुळे इंजिन ऑइल सप्लाई झाले नाही असे अहवालाद्वारे स्पष्ट केले आहे तसेच विमा कंपनीचे सर्वेअर के के पोद्दार यांनीसुद्धा दिनांक 29 .8. 2016 पार्श्व ओटोरीझेएड यांना मेल पाठवून वाहनांच्या अपघातात बद्दलची माहिती विचारली व त्यास दि. २९.०८.२०१६ रोजी कंपनीने उत्तर दिले की कंपनीचे टेक्निकल स्पेसिफिकेशन नाही व वाहनात झालेल्या अपघातात प्रमाणे गाडीचे भिन्नभिन्न परिस्थिती असू शकते अर्जदार व गैरअर्जदारा मधेय ग्राहकाचे नाते आहे. गैरअर्जदार याची प्रमाणित जबाबदारी आहे की ग्राहकांना योग्य तत्पर व चांगली सेवा देणे अर्जदाराला क्लेम रु. 5600/-देऊ पाहत आहे. व उर्वरित रक्कम चुकीच्या कारणाने नाकारत आहे त्यामुळे दिनांक 17. 4. 2017 रोजी गैरअर्जदाराला पत्र पाठूवून विमा क्लेम रु.९२,२१३/- मंजूर करण्याबाबत मागणी केली केली परंतु दिनांक 22. 6 .2017 रोजी पत्र पाठवून रक्कम त्यांनी अमान्य केली, 5600/- रक्कम स्वीकारण्याचा आग्रह करीत होते. शेवटी दिनांक 3. 8 .2017 रोजी गैर अर्जदाराने डिस्चार्ज वौचर वर सही करून दिली नाही म्हणून अर्जदाराचा विमा दावा बंद केला. अर्जदाराची पूर्वीपासून वाहन नुकसानभरपाईची मागणी ही ९२,२१३/-ची होती परंतु गैरअर्जदार याने दिली नाही. सदर सेवा न्युन्तापूर्ण सेवा अर्जदाराने गैरअर्जदार ला दिलेली आहे दिलेली असल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मंच या समक्ष दाखल केलेली आहे अर्जदारांची मागणी अशी आहे की गैर अर्जदाराने अर्जदाराला न्युन्तापूर्ण सेवा दिली आहे असे घोषित करावे गैर अर्जदाराने अर्जदाराचे वाहन चे नुकसान भरपाई क्लेम रुपये ९२,२१३/-मंजूर करून अर्जदारास त्यावर बारा टक्के प्रमाणे व्याज देण्यात यावे तसेच अर्जदाराला झालेल्या त्रासाबद्दल रुपये ५०,०००/- गैरअर्जदार कडून अर्जदाराला तसेच केस खर्च रुपये १०,०००/- अर्जदाराला देण्याचे आदेश व्हावे. २. अर्जदाराची तक्रार करून गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार यांनी तक्रारीला उत्तर दाखल करून तक्रारीतील कथन खोडून काढत पुढे नमूद केले की अर्जदाराने पूर्णपणे खोटे तक्रार मंचा समक्ष दाखल केलेली आहे. अर्जदाराकडून माहिती कळल्यानंतर अपघातग्रस्त गाडी चे निरीक्षण केले असता असे आढळले की सदर घटना फक्त गाडीच्या ड्रायव्हरच्या निश्काळजीपणामुळे घडलेले आहे. कारण एकदा गाडीला अपघात झाल्यावर पुढील अपघात टाळण्यासाठी गाडी समोर चालवणे योग्य नाव्ह्ते अर्जदाराचे तक्रारीमध्ये अर्जदाराने म्हटले आहे की गाडीचे खालच्या बाजूने वाकून पाहिले असता कोणतेही लिकेज दिसले नाही तसेच गाडीचे डिस्प्लेवर काही संकेत नसल्यामुळे गाडी अर्जदाराने चालवत समोर नेली. यावरून असे दिसून येते की अर्जदाराने निष्काळजीपणे गाडी चालवली. त्यामुळे इंजिन सीझ झाले व गाडीला अपघातात काही विशेष क्षती पोचली नसली तरी ओईल स्टार्व्हेशनमुळे इंजीन व परिणामतः वाहन क्षतीग्रस्त झाले हा कॉन्सीक्वेंशीयल स्वरूपाचा नुकसानाचा भाग पोलिसीअंतर्गत येत नाही. सदर अटी व शर्ती सगळ्यांना बंधनकारक आहे. त्याबद्दल सबब गैरअर्जदाराने सर्वे रिपोट नुसार योग्य रक्कम अर्जदाराला देऊ केलेली आहे व त्याशिवाय गैरअर्जदार अर्जदाराला कोणतेही देणे लागत नाही. सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. ३. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून प्रस्तूत प्रकरणात केवळ विमादाव्याच्या रकमेबद्दल विवाद हा एकच मुद्दा विचारार्थ आहे. अर्जदाराने तक्रारीच्या समर्थनार्थ पार्श्व मोटर्स यांच्यासोबत झालेले ईमेलवरील संभाषण तसेच क्षतीग्रस्त गाडीचे दुरूस्ती बिल, पार्श्व मोटर्स यांचा टेक्नीकल रिपोर्ट दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे कथन सिध्द करण्याकरीता गैरअर्जदार सर्व्हेयरचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला. त्याप्रमाणे अर्जदाराच्या गाडीची नुकसान भरपाई कॉन्सीक्वेंशीयल डॅमेजेस या प्रकारात मोडत असल्याने रू.5600/- ही नुकसान भरपाई योग्य आहे असे नमूद केले. तसेच गैरअर्जदाराच्या वकिलाने युक्तिवादात कथन केले की ड्रायव्हरच्या निश्काळजीपणामुळे सदर वाहनाला खालून दगडाचा मार बसून ते थोडे क्षतीग्रस्त झाले परंतु वाहन क्षतीग्रस्त झाल्यानंतरदेखील अर्जदाराने ते मुद्दाम पुढे चालवीत नेल्यामुळे गाडीचे इंजिनला ऑईलचा पुरवठा न झाल्याने इंजिन गरम होवून ते क्षतीग्रस्त झाले. हा नुकसानीचा भाग कॉन्सीक्वेंशीयल स्वरूपाचा असून विमा पॉलिसीच्या नुकसान भरपाई प्रकारात बसत नाही. याविरूध्द अर्जदाराने त्यांच्या युक्तिवादात, अर्जदार वाहन चालवीत असतांना वाहनाच्या ऑईल संपला दगडामुळे क्षती पोहचून ऑईल सांडीत आहे हे तक्रारकर्त्याच्या लक्षात न आल्यामुळे त्याने वाहन पुढे चालवीत नेले. मात्र काही अंतर चालून वाहन बंद पडले. त्यामुळे वरील घटनाक्रमात वाहनाला क्षती पोचल्यांस त्यासाठी तक्रारकर्त्याचा कोणताही निष्काळजीपणा कारणीभूत नसल्यामुळे सदर बाब ही कॉन्सीक्वेंशीयल डॅमेज या सदरांतर्गत मोडत नाही. सबब विरूध्द पक्ष विमा कंपनी ही संपूर्ण क्षतीपुर्ती देण्यांस जबाबदार आहे. यासंदर्भात, वाहनाला खालील बाजूने दगड लागल्यामुळे त्याचा ऑईल संप क्षतीग्रस्त होवून ऑईल सांडले हे वाहनाच्या मालकाला निदर्शनांस आल्यानंतर तसेच ऑईल नसतांना वाहन चालविल्यांस त्याचे इंजीन क्षतीग्रस्त होवू शकते हे माहीती असूनदेखील वाहनाचा मालक निश्काळजीपणे ते चालवीत राहील हे सर्वसाधारण परिस्थितीत ग्राहय धरण्यायोग्य नाही. त्यामुळे एकतर वाहन चालक असलेल्या मालकाला ऑईल संप फुटून ऑईल लिकेज होत असल्याचे निदर्शनांस आले नाही किंवा ऑईल सांडीत असूनही वाहन चालवीत नेल्यांस इंजीनचे मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते ही तांत्रीक बाब त्यांस समजली नाही हे अर्जदाराचे म्हणणे मंचास संयुक्तीक वाटते. अर्जदाराने सदर वाहनाच्या अधिकृत डिलर तसेच सर्व्हीस सेंटर असलेल्या पार्श्व फोर्ड वर्कशॉप यांचेकडून वाहनाची दुरूस्ती करवून त्यावर रू.92,213/- खर्च केलेला आहे याबाबत पावती प्रकरणात दाखल केलेली आहे. अशा परिस्थितीत विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमादावा केवळ रू.5,600/- इतकाच मंजूर करून अर्जदाराप्रती सेवेत न्युनता केलेली आहे या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे. सबब अर्जदार संपूर्ण दुरूस्तीखर्चाची रक्कम विमादाव्यापोटी मिळण्यांस तसेच शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई व प्रकरणाचा खर्च मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मंच वरील निष्कर्ष वरून खालील आदेश पारित करीत आहे. आदेश |