Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/20/179

SHRI BHAGWAT TUKARAM DHOPARE - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE CO. LTD, THRU. DIVISIONAL MANAGER & OTHERS - Opp.Party(s)

ADV. UDAY KSHIRSAGAR

29 Aug 2023

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/20/179
( Date of Filing : 18 Aug 2020 )
 
1. SHRI BHAGWAT TUKARAM DHOPARE
R/O MANGSA, TH.SAONER, DIST.NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE CO. LTD, THRU. DIVISIONAL MANAGER & OTHERS
PLOT NO.321/A-2, OSWAL SAMAJ BUILDING, J.N. ROAD, PUNE-411042
PUNE
MAHARASHTRA
2. THE ORIENTAL INSURANCE CO. LTD, THRU. REGIONAL MANAGER
REG. OFF. PAGALKHANA SQUARE, CHHINDWADA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. M/S JAYKA INSURANCE BROKERS PVT. LTD, THRU. MANAGER
2ND FLOOR, JAYKA BUILDING, COMMERCIAL ROAD, CIVIL LINE, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
4. .
.
.
.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSHI PRESIDENT
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:ADV. UDAY KSHIRSAGAR, Advocate for the Complainant 1
 
विरुध्दप पक्ष क्र.1 व 2 तर्फे : अधि. महेश चौधरी.
विरुध्दप पक्ष क्र.3 तर्फे : अधि. दिपक परांजपे.
विरुध्दप पक्ष क्र.4 तर्फे : दि.22.07.2021 चे आदेशान्व्ये वगळण्यां त आले.
......for the Opp. Party
Dated : 29 Aug 2023
Final Order / Judgement

श्री. अतुल दि. अळशी, मा. प्रभारी अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

      तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35(1) अन्वये विरुध्‍द पक्षांच्‍या सेवेतील त्रुटिबाबत दाखल केलेली असुन तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे...

1.               तक्रारकर्ता हा वरील पत्‍त्‍यावर राहणारा असुन त्‍याची पत्‍नी श्रीमती पुष्‍पा भागवत ढोपरे हिचा दि.31.08.2019 रोजी विजेचा धक्‍का लागून मृत्‍यू झाला. तक्रारकर्ता शेतीचा व्‍यवसाय करीत असुन त्‍याचे मालकीची शेतजमीन मौजा मंगसा, ता. सावनेर, जिल्‍हा नागपूर येथे भुमापन क्र.212 ही आहे. तसेच शेतीचे उत्‍पन्‍नावर तो आपल्‍या कुटूंबाचे पालन पोषण करतो. तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा शेतकरी अपघात विमा काढला असल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.4 कडे रितसर अर्ज सादर केला होता. परंतु अर्ज करुनही त्‍याला आजतागायत विमा दावा न मिळाल्‍याने तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार विरुध्‍द पक्षांनी सेवेत दिलेल्‍या त्रुटीबाबत आयोगासमक्ष दाखल केलेली आहे.

2.               तक्रारकर्त्‍याची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍याचे पत्‍नीचा दि.31.08.2019 रोजी विजेचा धक्‍का लागून झाला असुन शासनाचे वतीने तक्रारकर्त्‍याचा व त्‍याचेवर अवलंबुन असलेल्‍या एका व्‍यक्तिचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनंतर्गत शेतक-यांचा विमा उतरविला होता. तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा अपघाती मृत्यू झाल्‍याने त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.4 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दि.21.11.2019 रोजी रितसर अर्ज केला होता. तक्रारकर्त्‍यातर्फे रितसर अर्ज केल्‍यानंतर आजपर्यंत विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 ने काहीही माहीती न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार दाखल करुन विमा दाव्‍याची रक्‍कम रु.2,00,000/- विरुध्‍द पक्षास प्रस्‍ताव दिल्‍याचे दि.21.11.2019 पासुन द.सा.द.शे.18% व्‍याजासह मिळावी, मानसिक, शारिरीक त्रास व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु.50,000/- व  तक्रारीचा खर्च रु.20,000/- मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. 

3.               सदर प्रकरणाची नोटीस विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 4 यांचेवर बजावली असता विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.4 यांना दि.22.07.2021 रोजीचे आदेशानुसार तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या अर्जानुसार प्रकरणातून वगळण्‍यांत आले. 

4.               विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी आपल्‍या लेखी उत्‍तरामध्‍ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ता व त्‍याचे कुटूंबातील एका व्‍यक्तिचा शासनाचे वतीने विमा काढला होता ही बाब मान्‍य करुन इतर मुद्दे अमान्‍य केले आहे.   विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपल्‍या परिच्‍छेदनिहाय उत्‍तरात विरुध्‍द पक्ष क्र.3 ने मृतकाचे सातबारामध्‍ये नाव नसल्‍याबाबत कळविले होते, परंतु तक्रारकर्त्‍याने मृतकाचे नावाचा सातबारा सादर केलेला नाही. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.3 यांने पाठविलेल्‍या दि.23.12.2019 रोजीच्‍या पत्रात मृतकाचे नावे कोणतीही शेतजमीन नसल्‍याचे नमुद असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्‍याला मृतकाचे नावे असलेला नमुना 7/12 चा उतारा, 6-क दाखला व गांव नमुना 6-ड मृत्‍यू आधीचा जुना फेरफार सादर करण्‍यांस सांगितले. परंतु तक्रारकर्त्‍याने असा कुठलाही दस्‍तावेज सादर केला नाही,  त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 चे सेवेत कोणतीही त्रुटी नसल्‍याचे नमुद करीत विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 हे तक्रारकर्त्‍यास कोणत्‍याही प्रकारच्‍या नुकसान भरपाई देण्‍यांस जबाबदार नाहीत. तसेच तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार खोटे व चुकीचे कथन करुन आयोगाची दिशाभुल केली असल्‍यामुळे ती खर्चासह खारीज करण्‍याची मागणी केली आहे.  

5.               विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांनी लेखी उत्‍तर दाखल करुन असे नमूद केले आहे की, विरुध्‍द पक्ष क्र. 4 यांना प्राप्‍त झालेले विमा दावे ते विरुध्‍द पक्ष क्र. 3 कडे पाठवितात. विरुध्‍द पक्ष क्र. 3 सदर दावे प्रकरणाची शहानिशा करुन विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 कडे मंजूरीकरीता पाठवितात. विमा दाव्‍याची पडताळणी करुन मंजूर अथवा नामंजूर करणे हे विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांच्‍या अखत्‍यारीतील बाब आहे. त्‍यामध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र. 3 फक्‍त विमा कंपनी, अर्जदार आणि शासन यांच्‍यातील मध्‍यस्‍थ म्‍हणून काम करतात. विरुध्‍द पक्ष क्र.3 ने तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा विजेचा धक्‍का लागून अपघाती मृत्‍यू झाला होता ही बाब मान्‍य करुन विरुध्‍द पक्ष क्र.4 मार्फत दि.21.12.2019 रोजी तक्रारकर्त्‍याचा विमा प्रस्‍ताव प्राप्‍त झाला असुन त्‍याची पडताळणी केले असता असे निदर्शनास आले की, दाव्‍यासोबत जोडलेल्‍या कागदपत्रात काही त्रुट्या आहेत. त्‍यामुळे जिल्‍हा कृषी अधिकारी यांचेमार्फत तक्रारकर्त्‍याकडे नवा फेरफार 6-क, जुना फेरफार 6-ड, व 7/12 ची मागणी करुन त्‍वरीत विमा दावा व दस्‍तावेज विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांचेकडे दि.27.12.2019 रोजी पाठविला. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.3 यांचे सेवेत कोणताही कसुन नसल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यांत यावी अशी विनंती केली आहे.

6.          सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर आयोगाने तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला. तसेच उभय पक्षांनी तक्रारीत दाखल केलेले त्‍यांचे कथन व त्‍यापुष्‍ट्यर्थ सादर केलेले दस्‍तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित झाले. त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे. 

अ.क्र.                                                 मुद्दे                                             निष्‍कर्ष

1)         तक्रारकर्त्‍याची तक्रार ग्रा.सं.का.2019 अन्‍वये आयोगासमोर

      चालविण्‍यायोग्‍य आहे काय ?                            होय.

2)         विरुध्‍द पक्षांचे सेवेत त्रुटी आहे काय ?                                    होय.

3)         तक्रारकर्ता कुठली दाद मिळण्‍यास पात्र आहे ?        अंतिम आदेशाप्रमाणे.

                        - // नि ष्‍क र्ष // -  

7.         मुद्दा क्र. 1  -  तक्रारकर्त्‍याची दिवंगत पत्‍नी श्रीमती पुष्‍पा भागवत ढोपरे हिचा दि.31.08.2019 रोजी विजेचा धक्‍का लागून मृत्‍यू झाला होता ही बाब तक्रारीसोबत दस्‍तावेज क्र.7 वर दाखल केलेल्‍या रेशन कार्डवरुन दिसून येते. विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीला गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात योजना 2019-2020 करीता आयुक्‍त (कृषी) महाराष्ट्र शासन यांनी एक ठराविक रक्‍कम देऊन शेतक-यांना विमित केले व विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांनी मध्यस्थ म्हणून काम करण्‍याकरीता त्रिपक्षीय करारांतर्गत ठरविण्‍यात आले. सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्यू दि.31.08.2019 रोजी विजेचा धक्‍का लागून झाला ही बाब तक्रारीसोबत दस्‍तावेज क्र.5 व 6 वर दाखल आकस्‍मीक मृत्‍यू खबर, मरणोत्‍तर पंचनामा, पी.एम. रिपोर्टवरुन सिध्‍द होते. तसेच तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यामुळे तक्रारकर्ता अपघात विमा योजनेचे घोषीत मुल्‍य मिळण्‍यांस लाभार्थी म्‍हणून पात्र असुन प्रस्‍तुत प्रकरण आयोगाचे अधिकार क्षेत्रात येत असल्‍यामुळे तक्रार चालविण्‍यायोग्‍य असल्‍याचे आयोगाचे मत आहे.

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार विमा योजनेची सुलभ अंमलबजावणी, कार्यपद्धती व नियुक्त यंत्रणाची कर्तव्ये आणि जबाबदारी निश्चित करून विमा दावा मंजुरीसाठी सरळ सोपी पद्धत निर्देशित करण्यात आली व संबंधित यंत्रणांना नेमून दिलेल्या कामाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे बंधन टाकण्यात आले. विरुध्‍द पक्षाने सदर विमा पॉलिसीतील अंतर्भूत अटी व त्‍यामध्‍ये त्‍याऐवजी त्‍याला असलेली पर्यायी कागदपत्र दाखल करण्‍याच्या सोयीचा सखोल अभ्‍यास करुनच शेतक-यांच्‍या विमा दाव्‍याचा निर्णय द्यावयास पाहिजे. विरुध्‍द पक्षाच्‍या सदर विमा दावा तांत्रिक कारणावरुन नाकारण्‍याच्‍या कृतीने महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतक-यांच्‍या मृत्यूनंतर त्‍यांच्‍या कुटुंबांना आर्थिक आधार देण्‍याच्‍या मुळ हेतुला तडा गेलेला आहे. सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याचे दिसून येते व तो शेतकरी असल्याने महाराष्ट्र शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत सदर योजनेचा लाभार्थी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता सकृतदर्शनी शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना लाभ मिळण्यास पात्र असल्याचे दिसते. वरील बाबींचा विचार करता विरुध्‍द पक्षाच्या सेवेतील त्रुटिसंबंधी प्रस्तुत तक्रार मंचासमोर चालविण्यायोग्य असल्याचे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविण्‍यांत येतो.

8.          मुद्दा क्र. व 3 -    तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यू हा विजेचा धक्‍का लागून झाला ही बाब मानकापूर पोलिस स्‍टेशन यांचे मरणोत्‍तर पंचनाम्‍यावरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे इतर दस्‍तावेजांची आवश्‍यकता नसल्‍यामुळे सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याचे दिसून येते. तसेच तक्रारकर्ता शेतकरी असल्याने महाराष्ट्र शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत सदर योजनेची लाभार्थी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना लाभ मिळण्यास पात्र असल्याचे दिसते. वरील बाबींचा विचार करता विरुध्‍द पक्षाच्या सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होत असल्याने प्रस्तुत तक्रार आयोगासमोर चालविण्यायोग्य असल्याचे आयोगाचे मत आहे, म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 चे निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविण्‍यात येतो.

9.               उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन आणि दाखल दस्‍तऐवजांवरुन आयोग सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                        - // अंतिम आदेश // -

1)         तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत असून विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याची मृतक पत्‍नी श्रीमती पुष्‍पा भागवत ढोपरे हिच्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम रु.2,00,000/- ही विमा दावा दाखल केल्‍याचा दि.21.11.2019 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्‍याजासह द्यावी.

2)         विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला  मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाच्‍या नुकसान भरपाईबाबत रु.15,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.10,000/- द्यावे.

3)         विरुध्‍द पक्ष क्र. 3 व 4 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

4)    विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 45 दिवसांत करावी.

5)         आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना निःशुल्‍क द्यावी.

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSHI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.