Maharashtra

Gondia

CC/17/58

HARPASINGH NANAKSINGH HORA - Complainant(s)

Versus

ORIENTAL INSURANCE CO. LTD., THROUGH THE BRANCH MANAGER - Opp.Party(s)

MR. ANANT DIXIT

29 Mar 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/17/58
( Date of Filing : 06 Oct 2017 )
 
1. HARPASINGH NANAKSINGH HORA
R/O. GAUSHALA WARD, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ORIENTAL INSURANCE CO. LTD., THROUGH THE BRANCH MANAGER
R/O. INDUPLAZA BUILDING, GROUND FLOOR, JAISTAMBH CHOWK, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SARITA B. RAIPURE MEMBER
 HON'BLE MR. S.R AJANE MEMBER
 
For the Complainant:MR. ANANT DIXIT, Advocate
For the Opp. Party:
NONE
 
Dated : 29 Mar 2019
Final Order / Judgement

तक्रारकर्त्‍यातर्फे वकील          ः-  श्री.  अनंत दिक्षीत  

विरूध्‍द पक्षातर्फे वकील       ः-   श्री. आय.के.होतचंदानी   

                   (युक्‍तीवादाच्‍या वेळेस)

निकालपत्रः- श्री. भास्‍कर बी.योगी, अध्‍यक्ष   -     ठिकाणः गोंदिया.

 

                                                                                     निकालपत्र

                                                                    (दिनांक  29/03/2019 रोजी घोषीत )     

1.   तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला सेवेत न्‍यूनता दिल्‍यामूळे,  ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.

2.  तक्रारकर्ता आणि विरूध्‍द पक्षकार वरील नमूद पत्‍यावर राहतात आणि त्‍याचे संबधात कामधंदा करतात. तक्रारकर्ता हा वरील नमूद स्‍थायी पत्‍यावरचा रहिवासी आहे आणि तक्रारीचे कारण मंचाचे कार्यक्षेत्रात घडले आहे. करिता प्रकरण या मंचामध्‍ये न्‍यायनिवाडयाकरिता दाखल करण्‍यात आली आहे.  

3. तक्रारकर्ता यांनी तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र 2 मध्‍ये असे नमूद केले आहे की, तो व्‍यापारी माणुस असून त्‍याचा ट्रॉन्‍सपोर्टचा व्‍यापार आहे आणि विरूध्‍द पक्षांचा 25 वर्षापासून ‘ग्राहक’ आहे आणि त्‍याचे सर्व वाहनाचे विरूध्‍द पक्षांच्या कंपनीकडे विमा काढले आहे. विरूध्‍द पक्ष क्र 1 हा गोंदियाला ओरीएंटल इंन्‍शुरंन्‍स कंपनीमध्‍ये ब्रँन्‍च मॅनेजर आहे आणि नेमणुकीच्‍या कायदयानूसार विमा धंदयाच्‍या बाबतीत व्‍यवहार स्‍वाधीन आहेत. नियमामध्‍ये असलेल्‍या तरतुदींनूसार अधिकार, कर्तव्‍य बजावतात. (सदरच्‍या तक्रारीत विरूध्‍द पक्ष क्र. 2 चा Cause Title मध्‍ये कुठेच उल्‍लेख केल्‍याचे दिसून येत नाही. परंतू तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र 2 मध्‍ये विरूध्‍द पक्ष क्र 2 चा उल्‍लेख केल्‍याचे दिसून येते तो ग्राहय धरता येणार नाही.)  

4.  येथे नमूद करण्‍यात येते की, दि. 07/11/2016 ला मुंडीकोटा गावामध्‍ये प्रवेश करतेवेळी वरील नमूद ट्रॅकला अपघात झाला. अपघातामध्‍ये ट्रॅकचा ड्रॉयव्‍हर श्री. सय्यद अली नासर अली मरण पावला आणि ट्रॅक अपघातग्रस्‍त झाला. अपघात झाल्‍याची तक्रार तिरोडा पोलीस स्‍टेशनला दाखल करण्‍यात आली. पोलीसांनी पंचनामा आणि आवश्‍यक कार्यवाही केली.    

5. तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्षाचे कंपनीचे अधिकृत एजंट श्री. नरेश बंग कडून विमा काढला होता. वरील अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर आणि ट्रॅक वाईट प्रकारे अपघातग्रस्‍त झाल्यावर, अपघात झाल्‍याचे अधिकृत एजंट तसेच विरूध्‍द पक्ष क्र 1 ला सांगीतले. ब्रॅन्च मॅनेजर ओरीएंटल इंन्‍शुरंन्‍स कं. गोंदिया ज्‍यांनी वाहनाचा पॉलीसी क्र. 181301/31/2017/10014 दि. 21/10/2016 ते 20/10/2017 या कालावधीकरीता कॉम्‍प्रेसिव्‍ह इंन्‍शुरंन्‍स पॉलीसी विमा प्रिमीयम रक्‍कम  रू. 27,387/-,भरून विमा काढला होता आणि त्‍याचप्रमाणे विरूध्‍द पक्ष ब्रॅन्‍च मॅनेजरला सदर अपघाताबाबत लिहून पत्र पाठविले.     

6.  तक्रारकर्त्‍याकडून पत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्षाने दि. 05/12/2016 चे पत्र जे तक्रारकर्त्‍याला दि. 07/12/2016 ला प्राप्‍त झाले. पॉलीसी क्र. 181301/31/2017/10014 ची मागणी कंपनीने अनुक्रमांक 181301/31/2017/000140 अन्‍वये नोंदविली आणि मागणी कारवाई पूर्ण करण्‍याच्‍या सूचनेसह मागणी फॉर्म भरण्‍याबाबत कळविले. विलंब न लावता, तक्रारकर्त्‍याने दि. 13/12/2016 ला मागणी फॉर्म भरला आणि सोबत संभाव्‍य दुरूस्‍तीचे बिले, स्‍पेअर पार्ट बिले, संबधीत कागदपत्रे उदा. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र इत्‍यादी विरूध्‍द पक्ष क्र 1 ला सादर केले आणि नुकसान प्रस्‍तावित केले. परंतू कंपनीने एकुण नुकसान प्रस्‍ताव नाकारला आणि Offerd the NOS On Net Salvege Basis जो तक्रारकर्त्‍याने स्विकारला.   

7.  सदर वाहन सुप्रतनाम्यावर घेण्‍यात आले आणि त्‍या तारखेपर्यंत ते गॅरेजमध्‍ये निरर्थक उभे होते. या भागात 2 ते 3 दिवसानंतर ओरीएंटल कंपनीने एका सर्व्‍हेअरची अपघात वाहनाची तपासणी आणि तपासणी अहवाल देण्‍याकरीता नेमणुक केली. कोणताही सर्व्‍हे अहवाल किंवा तपासणी अहवाल सर्व्‍हेअरनी तयार केला नाही, तक्रारकर्त्‍याला पुरविला नाही.

8.   येथे नमूद करण्‍यात येते की, मार्च 2017 पर्यंत जेव्‍हा-जेव्‍हा तक्रारकर्ता भेटला आणि मागणीबाबत चौकशी केली. विरूध्‍द पक्ष प्रत्‍येक वेळी म्‍हणाला की, मागणीची प्रक्रिया सुरू आहे व लवकरच ती निकाली लागेल. On net Loss Basis वर ते मागणी निकाली काढण्‍यास तयार आणि इच्‍छुक असल्‍याचे असे नमूद केलेले पत्र तक्रारकर्त्‍याने दि. 06/04/2017 ला दिले. विरूध्‍द पक्षाने NOS प्रस्‍तावाबाबत तक्रारकर्त्‍याला दि. 05/05/2017 चे पत्रान्‍वये कळविले जे प्रत्यक्षात दि. 06/05/2017 ला प्राप्‍त झाले, सांगण्‍यात आले की, काही कागदपत्रे पुरवावे आणि प्रादेशीक परिवहन कार्यालयाकडून (आर.टी.ओ.गोंदिया)  वाहन नोंदणी पत्र रद्द करण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले. NOS आधारावर मागणी निकाली काढण्‍याकरीता तक्रारकर्ता संपूर्ण दस्‍ताऐवजासह विरूध्‍द पक्षाच्‍या कार्यालयाला भेटला आणि संपूर्ण मूळ कागदपत्रे तपासल्‍यानंतर, विरूध्‍द पक्षाने ते सर्व तक्रारकर्त्‍याला परत केले.

9.    येथे नमूद करण्‍यात की, विरूध्‍द पक्षाचे निर्देशानूसार तक्रारकर्त्‍याने आर.सी.बुक रद्द करण्‍याकरीता अर्ज दि. 29/05/2017 अन्‍वये मूळ दस्‍ताऐवजासह (आर. सी बुक)  आवेदन केले. आर.टी.ओ कार्यालयाने आर.सी. बुक रद्द करण्‍याच्‍या अर्जाचे लक्षपूर्ण वाचनानंतर आर.सी बुक रद्द करण्‍याच्‍या अनुषंगाने स्‍थगीत रोड टॅक्‍स रू. 10,000/-,भरण्‍याचे निर्देश दिले.

10.  जून- 2017 च्‍या पहिल्‍या आठवडयात तक्रारकर्त्‍यानी विरूध्‍द पक्ष यांचेशी बोलणी केली की, मागणी निकाली काढण्‍यात उशीर केल्‍यामूळे, त्‍याचे मोठे नुकसान होत आहे. वाहन निरर्थक उभे आणि दुसरे म्हणजे त्‍याला विनाकारण टॅक्‍स भरावे लागत आहे आणि सात महिन्‍यापासून पॉर्कींग शुल्‍क वसुल करण्‍यात येत आहे. पार्कींग शुल्‍क दिवसेंदिवस वाढत आहे. विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगीतले की, आठवडाभर वाट बघा, विषय निकाली निघण्‍याच्‍या मार्गावर आहे. विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मागणी Net Loss Basis वर निकाली काढण्‍यास सांगीतले. परंतू तक्रारकर्ता आश्‍चर्यचकीत झाला जेव्‍हा पत्र दि.07/06/2017 जे तक्रारकर्त्‍याला दि. 09/06/2017 ला प्राप्‍त झाले. त्‍यामध्‍ये नमूद करण्‍यात आले की, विभागीय कार्यालय नागपूर यांचे म्‍हणण्‍यानूसार मागणी Net  Salvage  Basis निकाली निघू शकत नाही तेव्‍हा वाहन पुनः तपासणी करावे आणि अपघातग्रस्‍त वाहनाचे दुरूस्‍ती बिले कार्यालयाला सादर करावी.   

11.  महत्‍वाची बाब ही आहे की, त्‍यानंतर तात्‍काळ दि. 15/06/2017 चे पत्र तक्रारकर्त्‍यास दि. 24/06/2017 बजावण्‍यात आले. विरूध्‍द पक्षाने त्‍या पत्रामध्‍ये नमूद केले की, वरील पत्रानूसार आम्ही आपणांस कळवू इच्छितो की, Net  Salvage  Basis वर परिवहन अधिका-याने प्रकरण विचारात न घेतल्‍यामूळे, आम्ही तुम्‍हाला विनंती करतो की, तुम्ही कृपा करून आमचे पत्र दि. 05/05/2017 विसरून जावे. ज्‍यामध्‍ये वाहनाची नोंदणी परिवहन कार्यालयाकडून रद्द करावी असे नमूद आहे.  आम्‍ही तुम्‍हाला विनंती करतो की, कृपा करून मागणी निकाली काढण्‍याकरीता तुमच्‍या वाहनाचे दुरूस्‍ती बिल सादर करावे..

12. ज्‍या पध्‍दतीने विरूध्‍द पक्ष यांनी कृत्‍य केले हे दुसरे काही नसून तक्रारकर्त्‍याची लबाडीने फसवणुक करणे आहे. विरूध्‍द पक्षांना पूर्ण माहिती आहे की, पॉलीसी निर्गमीत करतांना वाहनाची किंमत रू. 2,10,000/-,काढण्‍यात आली. Net Salvage Basis वर समेट करण्‍याबाबत तक्रारकर्ता आणि विरूध्‍द पक्षकार कबुल होते आणि विरूध्‍द पक्षाला जवळपास रू. 80,000/-,दयायचे होते. संपूर्ण भागामध्‍ये विरूध्‍द पक्षाने या कृत्‍याकडे लक्ष दिले. संभाव्‍य दुरूस्‍ती बिलानूसार, दुरूस्‍ती बिलाची किंमत रू. 2,28,000/-,येते. परंतू काही उद्देश पूर्ण करण्‍याकरीता विरूध्‍द पक्षांनी समेट काढण्‍याकरीता सात महिने खर्ची घातली आणि तक्रारकर्त्‍याला त्रास देण्‍याच्‍या आणि नुकसान करण्‍याच्‍या उद्देशाने समेट प्रकार बदलविला. आधीचे Net  Salvage  Basis वर समेट घडवून आणण्‍याकरीता दुसरे कोणतेही कारण असणार नाही.

13.  येथे महत्‍वाची बाब म्‍हणजे वाहन विकत घेतल्‍यापासून वाहनावर कोणतीही मागणी घेतली नाही. सध्‍या परिस्थितीत वाहनाचा विरूध्‍द पक्षांकडे विमा काढला होता, ज्‍याचा अपघात झाला होता. या कृत्‍याबाबत वाद नाही आहे. पोलीस पंचानामा दस्‍ताऐवज आणि वाहन निरर्थक उभे आहे हे विरूध्‍द पक्षाला माहित आहे. सध्‍याची वस्‍तुस्थिती लक्षात घेता, वाहन अपघातामध्‍ये भरपूर क्षतीग्रस्‍त झाले जसे की-  मोठे भाग, चेसीस, कॅबीन इ. भरपूर क्षतीग्रस्‍त झाले आधी विरूध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याची मागणी NOS Basis वर देण्‍यात कबुल झाला. यापूर्वीच स्‍पष्‍ट करण्‍यात आले की, ट्रॅक दुरूस्‍तीकरीता आणि ट्रॅक रोडवर चालविण्‍याकरीता मालकाला पॉर्कींग शुल्‍काव्‍यतिरीक्त एकुण खर्च रू. 2,28,000/-,येईल. तक्रारकर्त्‍याने NOS Basis वर रू. 80,000/-,घेण्‍यास कबुल झाला. परंतू विरूध्‍द पक्षाने मुद्दामहून आणि माहिती असून प्रकरण लांबविले आणि नोंदणी रद्द करण्‍याकरीता सांगीतले. ज्‍याकरीता त्‍याने आवदेन केले  आणि भरपूर कालावधीनंतर विरूध्‍द पक्षाने आपली बाजू बदलविली. विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याची कायदेशीर मागणी मिळण्‍यापासून फसवणुक केली आहे आणि त्‍यांला मोठा आर्थिक तोटा झाला आहे. विरूध्‍द पक्षाचे वागणे हे अनुचित व्‍यापार पध्‍दत असून मागणी निकाली काढण्‍यात निःष्‍काळजीपणा आणि सेवेतील न्‍यूनता आहे.

14. तक्रारकर्त्‍या तर्फे विद्वान वकील श्री. अनंत दिक्षीत तसेच विरूध्‍द पक्षातर्फे  विद्वान वकील श्री. आय.के. होतचंदानी  यांचा तोंडीयुक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

15. प्रस्‍तुत मंचाने तक्रारकर्त्‍याचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखीयुक्‍तीवाद तसेच विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांची लेखीकैफियत, पुराव्‍याचे शपथपत्र, यांचे मंचानी वाचन केले आहे. त्‍यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्‍यात येतात.

क्र..

            मुद्दे

      उत्‍तर

1

 विरूध्‍द पक्ष यांनी विमा दावा न दिल्‍यामूळे अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला  तसेच सेवा देण्‍यात कसुर केली आहे का ?  

       होय.

2.

तक्रारकर्ता हा दाद मिळण्‍यास पात्र आहे काय?

       होय.

3

अंतीम आदेश

तक्रारकर्त्‍याची  तक्रार  अंशत मंजूर  करण्‍यात येते.

                      

                                        कारण मिमांसा

मुद्दा क्र. 1 व 2ः-   

 

16.     तक्रारकर्त्‍याचा वाहनाचा अपघात दि. 07/11/2016 रोजी झालेला असून विरूध्‍द पक्षाला ते मान्‍य आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने विमा पॉलीसीच्‍या कोणतेही शर्ती व अटीचा भंग केला  नाही हे सुध्‍दा मान्‍य आहे. सदरच्‍चया तक्रारीत मुद्दा एकदम संक्षिप्‍त आहे की, तक्रारकर्त्‍याला Total Loss basis दयायची किंवा Net Salvage basis वरती दयायची?  

ज्यदिवशी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा अपघात झाला त्‍याचदिवशी विरूध्‍द पक्ष यांनी श्री. एन.डि. चोधरी (अॅटोमोबाईल इंजिनिअर) इंन्‍शुरंन्‍स सर्व्‍हेअर अॅण्‍ड लॉस असेसर लॉयसंन्‍स क्रमांक SLA-52710/95 Expiry Date :- 12/10/2020  यांनी घटनास्‍थळ पंचनामा करून त्‍यांचा सर्व्‍हे अहवाल दि. 04/12/2016 राजी विरूध्‍द पक्षाला पुरविले आहे. ज्‍यामध्‍ये डॅमेज्‍ड किती झाला त्‍यांचा आकडेवारी दिलेली नाही. त्‍यांनतर विरूध्‍द पक्ष यांनी श्री. मनिष आर शुक्‍ला सर्व्‍हेअर आणि लॉस असेसर लायसंन्स क्रमांक SLA-61266 Expiry Date :- 12/10/2012 असून आपले अंतिम सर्व्‍हेअरचा अहवाल विरूध्‍द पक्षाला दि. 13/02/2017 रोजी दिलेला आहे. विरूध्‍द पक्ष यांनी दोन्‍ही सर्व्‍हेअरचे शपथपत्रावर पुरावा सादर केलेला नाही.      

17.  विरूध्‍द पक्षाने आपले लेखीजबाबात विशेष कथन ‘ड’ मध्‍ये नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याने दि. 12/12/2016 रोजीच्‍या पत्राद्वारे विमा दावा Net of Salvage basis विमा दावा मंजूर करण्‍याची हमी दिली होती. परंतू त्‍यांच्‍या सर्व्‍हेअरने Total Loss Basis च्‍या आधारे रू. 2,08,500/-,तसेच  Net of Salvage basisवरती रू. 75,500/-, (Salvage & Cancellation of R.C book ) इतकया  दाव्याची रक्‍कम काढली होती. विरूध्‍द पक्षाचे रिजनल ऑफिसर नागपूर आणि डिव्‍हीजनल ऑफिसर नागपूर यांनी विमा पॉलीसीच्‍या Indian Motor Tariff G.R.8 – A vehicle will  be considered to be a total loss/ Constructive total loss (TL/CTL) CTL, where the aggregate cost of retrieval and / or repair of the vehicle subject to terms and conditions of the policy exceeds 75% of the IDV. अनूसार Net Assessment करून  repair basis वर  रू. 86,845/-,जे  IDV  रू. 2,10,000/-, असून 75 टक्‍यावरती जर Repair Cost आला तर, Total Loss ग्राहय धरून विम्‍याची रक्‍कम देता येईल. परंतू सदरच्‍या वाहनाची Repair Cost 75 टक्‍याच्‍या जास्‍त नसल्‍यामूळे रू. 86,845/-, देण्‍यास तयार होते व आहे.

18.   विरूध्‍द पक्षाने नेमलेले श्री. मनिष आर शुक्‍ला यांनी दिलेले अंतिम सर्व्‍हे अहवालामध्‍ये नमूद लायसेंन्‍स क्र. SLA 61266 हा क्रमांक दि. 12/10/2012 रोजी संपलेला असून तसेच त्‍यांचे सर्व्‍हे अहवाल ज्‍याच्‍या पृष्‍ठार्थ साक्षपुरावा शपथपत्रावर दिलेला नाही. म्‍हणून लायसेंन्‍स संपल्‍यानंतर त्‍या सर्व्‍हेअरला सर्व्‍हे करून सर्व्‍हे अहवाल देण्‍याचा कोणताही  कायदेशीर अधिकार नाही आणि त्‍याला मान्‍य करता येत नाही. त्‍याव्‍यतिरीक्‍त त्‍यांनी लावलेली घसारा हा चुकीच्‍या पध्‍दतीने लावलेला आहे जे मा. सर्वोच्‍च न्‍यायालय सिव्‍हील अपील नं. 27695/2018 श्री. सुमित कुमार शहा विरूध्‍द रिलायंस जनरल इंन्‍शुरंन्‍स कं. या न्‍यायनिवाडयानूसार  (No Deduction shall be made for deprecation in respect of Part’s Replaced) घसाराची रक्‍कम (Depreciation Amount) कपात करता येत नाही. कारण विमा पॉलीसीचे नूतनीकरण करतेवेळी घसारा केल्‍यानंतरही IDV Value  ठरवितात. म्‍हणून परत घसारा घेणे हा चुकीचा आहे. तसेच विमा पॉलीसीमध्‍ये  Deductibles under section-I: Compulsory Deductible 500 रूपये असून सर्व्‍हेअरने रू. 1,500/-, Compulsory Deductible दाखविले आहे. तसेच Net Loss Mode मध्‍ये त्‍यांनी Salvage Value रू. 1,33,000/-,दर्शविलेली आहे. परंतू याउलट एक रेखावरती असे नमूद केले आहे की, “After having gone through the Local Market and contacts with the salvage buyers from Balaghat and Gondia the Maximum salvage value (with all papers) of the subject vehicle.  I could obtain worth Rs. 1500/-”म्‍हणजे सर्व्‍हेअर स्‍वतः महणतो की, जेव्‍हा मॉर्केटमध्‍ये विचरपूस केली तेव्‍हा salvage value Rs. 1500/-” भेटतील. परंतू Net Loss Salvage mode मध्‍ये त्‍यांनी salvage value रू. 1,33,000/-,वजा करून त्‍यांनतर Compulsory Deductible रू. 1,500/-,वजा करून फक्‍त रू. 75,500/-,देता येईल असे नमूद केले आहे. या सर्व कारणामूळे सदर सर्व्‍हे अहवाल कायदेशीर नसल्‍यामूळे, ग्राहय धरता येणार नाही आणि विरूध्‍द पक्षाने पाठविलेल्‍या पत्रान्‍वये तक्रारकर्ता यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांना पत्र पाठवून अपघातीत वाहन क्र. MH-35K0087 ची नोंदणी दि. 22/09/2017 पासून रद्द करण्‍यात आलेली  आहे. त्‍याची प्रत या मंचात दाखल केलेली आहे तसेच अपघातीत वाहन दुरूस्‍ती अभावी श्री. साई बॉडी वर्क शॉप यांच्‍याकडे ठेवलेली असून, तक्रारकर्त्‍याने जवळपास रू. 30,000/-,दि. 10/06/2017 ते 12/12/2018 पर्यंत पार्कींग चॉर्जेस भरलेले आहे. अपघातीत वाहनाचा विमा दि. 21/10/2016 ते 20/10/2017 या काळाचा असून अपघात दि. 07/11/2016 म्हणजे विम्‍याच्‍या कालावधीत विमा पॉलीसीचे  नुतनीकरण  केल्‍यानंतर 15 दिवसातच अपघात झालेला असून विरूध्‍द पक्षाला रिपेरींग करतेवेळी कोणताही घसाराची रक्‍कम (Depreciation Amount) परत कपात करता येत नाही. वरील सर्व कारणामुळे विरूध्‍द पक्षाने घेतलेले आक्षेप कायदेशीर नसल्‍यामूळे फेटाळण्‍यात येत आहे व तक्रारकर्त्‍याला IDV Value ची रक्‍कम 2,10,000/- वजा Compulsory Deductible रू. 500/-, म्‍हणजे रू. 2,09,500/-,रक्‍क्‍म तक्रारकर्त्‍याला  दयावी असे या मंचाचे मत आहे. विरूध्‍द पक्ष यांनी  दोन वर्ष उलटूनही तक्रारकर्त्‍याला  विमा दाव्‍याची रक्‍कम न दिल्‍यामूळे, खुप मानसिक त्रास व आर्थिक नुकसान दिलेला आहे हे सिध्‍द होत आहे. तक्रारकर्त्‍याने केलेली पार्कींग चार्जेसची मागणी इंन्‍शुरंन्‍सच्‍या अटी व शर्तीमध्‍ये सम्‍मलित नसल्‍याने ती फेटाळण्‍यात येते. विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या विरूध्‍द अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला तसेच सेवा देण्‍यात कसुर केली आहे हि बाब सिध्‍द होत आहे.

       म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्‍कर्ष होकारार्थी नों‍दवित आहोत.  त्‍यामुळे सदर प्रकरणात मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.     

      वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.                                   

                

                                 -// अंतिम आदेश //-

 

 (01)  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  विरुध्‍दपक्ष यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्ताला विम्याची रक्‍कम रू. 2,09,500/-( रूपये दोन लाख नऊ हजार पाचशे फक्‍त) द.सा.द.शे 6 टक्‍के व्‍याजाने दयावे तसेच, तक्रारकर्त्‍यानी अपघातीत वाहन विरूध्‍द पक्षाकडे सुपूर्द करावे. 

(03) विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची मानसिक त्रासाकरीता रू. 10,000/-,(रूपये दहा हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च म्‍हणून रू. 5,000/-,(रूपये पाच हजार फक्‍त)  अदा करावे.

(04)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 ची 30 दिवसांत पालन न केल्‍यास, द.सा.द.शे 9%  टक्‍के व्‍याज देय राहिल.

(05) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध    करुन देण्‍यात याव्‍यात.

  (06)  तक्रारकर्त्‍याला  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.      

नं.प्र.को/- 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. SARITA B. RAIPURE]
MEMBER
 
[HON'BLE MR. S.R AJANE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.