Maharashtra

Kolhapur

CC/16/299

Suvarna Sarjerao Vatkar - Complainant(s)

Versus

Branch Manager,Union Bank Of India - Opp.Party(s)

G.G.Vatkar

19 Jun 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/16/299
 
1. Suvarna Sarjerao Vatkar
Male,Tal.Panhala,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,Union Bank Of India
Kodugle Building,Kodoli,Tal.Panhala,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
Adv.G.G.Vatkar, Present
 
For the Opp. Party:
Adv.M.M.Kurade, Present
 
Dated : 19 Jun 2017
Final Order / Judgement

                                                                       तक्रार दाखल ता.29/09/2016   

तक्रार निकाल ता.19/06/2017

 

न्‍यायनिर्णय

द्वारा:- मा. सदस्‍या - सौ. रुपाली डी. घाटगे.  

 

1            तक्रारदारांना वि.प.यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्‍वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल केलेली आहे. 

2.          प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प.यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प.यांना नोटीस प्राप्‍त होऊन त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले. प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज गुणदोषावर निकाली करणेत येतो. 

 

3.         तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

            तक्रारदार हयां मौजे माले, ता.पन्‍हाळा येथील कायमस्‍वरुपील रहिवाशी असून त्‍या ठिकाणी त्‍या त्‍यांचे पती व मुलांचे समवेत राहतात. तक्रारदार यांनी वि.प. बॅक यांचे बँकेमध्‍ये बचत खाते क्र.577002010007832 या क्रमांकाचे खाते असून सदर खातेवर तक्रारदार नियमीतपणे व्यवहार करीत असतात, तसेच तक्रारदारांनी सदर खातेवरुन पैसे काढणेकरीता वि.प.बॅंकेकडून ए.टी.एम.कार्डसुध्‍दा घेतले असुन त्‍याचा वापरसुध्‍दा तक्रारदार व त्‍यांच्‍या संमतीने त्‍यांचे कुटूंबीय नियमीतपणे करत असतात.  वि.प. ही बँक राष्‍ट्रीयकृत बँक असून उद्देश वेगवेगळया स्‍वरुपाची खाती उघडणे, कर्ज पुरवठा करणे, ठेवी स्विकारणे हा आहे.  सदरची वि.प.बँक ही त्‍यांचे ग्राहकांना रिझर्व्‍ह बँकेच्‍या वेळोवेळी करण्‍यात आलेल्‍या नियमाप्रमाणे व आदेशाप्रमाणे वेगवेगळया प्रकारची सेवा प्रधान करते. सदर बँकेमध्‍ये तक्रारदारांचे बचत खाते असलेमुळे तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये ग्राहक हे नाते प्रस्‍तावित झालेले होते व आहे. तक्रारदार यांचा मुलगा कु.महेश सर्जेराव व्‍हटकर हा त्‍याच्‍या पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे राहणेस असून तो तक्रारदार यांच्‍या संमतीने त्‍यांचे नावे असलेले ए.टी.एम.कार्डचा वापर नियमितपणे करत असतो.  दि.29.02.2016 रोजी तक्रारदारांचे मुलास पैशाची आवश्‍यकता भासलेमुळे त्‍याने वि.प. बँकेचे मुंबई-वाशी येथे स्थित असलेल्‍या ए.टी.एम.शाखेमधून रक्‍कम रु.20,000/- काढणे‍करीता वि.प.बँकेने दिलेल्‍या ए.टी.एम.कार्डचा वापर केला असता, सदर ए.टी.एम.मशीनमधून रक्‍कम रु.20,000/- तक्रारदार यांचे मुलास मिळाली नाही. परंतु तदनंतर लगेचच सदरची रक्‍कम तक्रारदार यांच्‍या खात्‍यामधून कमी झालेचा संदेश तक्रारदार यांनी वि.प.बँकेकडे नोंदविलेल्‍या मोबाईलवर आला, त्‍यामुळे तक्रारदार यांचे मुलाने लगेचच त्‍याचे मोबाईलवरुन वि.प.बँकेकडे तक्रार नोंदविलेनंतर वि.प.बँकेकडून सदरच्‍या झालेल्‍या चुकीबाबत कोणतेही उत्‍तर तक्रारदार किंवा त्‍यांचे मुलाचे मोबाईलवर मिळाले नाही. तदनंतर त्‍याचदिवशी तक्रारदार यांचे मुलाने पुन्‍हा त्‍याच ए.टी.एम.कार्डच्‍या आधारे त्‍याच ए.टी.एम.मशीनमधून रक्‍कम रु.5,000/- घेतली असून ते त्‍याला मिळाली आहेत. तसेच सदरची रक्‍कम सुध्‍दा तक्रारदार यांचे बचत खातेमधून वजा झाली आहे. दि.31.03.2016 रोजी तक्रारदार यांनी लेखी स्‍वरुपात वि.प.बँकेकड तक्रार दाखल केली असून त्‍यास आजतागायत कोणतेही उत्‍तर मिळाले नाही किंवा चुकीच्‍या पध्‍दतीने वजा झालेली रक्‍कम तक्रारदार यांचे खातेमध्‍ये वि.प.यांचेकडून जमा करणेत आलेली नाही. दि.16.04.2016 रोजी तक्रारदारांनी पुन्‍हा तक्रार नोंदविली असता, सदरच्‍या तक्रारीबाबत चौकशी सुरु असलेचे तक्रारदार यांना समजले.

4.          वास्‍तविक रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडिया यांच्‍या नियमाप्रमाणे ए.टी.एम. मशीनमधून रक्‍कम ग्राहकास न मिळालेस सदर ग्राहकाने तक्रार दाखल केलेपासून सात दिवसांचे आत सदरची रक्‍कम ग्राहकाच्‍या खातेवर जमा करणे बँकांना व ए.टी.एम. मशीनधारक यांना बंधनकारक करण्‍यात आलेले आहे. सदरची रक्‍कम मुदतीत ग्राहकाच्‍या खातेवर जमा न केलेस संबंधीत बँकेस सदरची रक्‍कम ग्राहकास मिळेपावेतो प्रतिदिवस रक्‍कम रु.100/- करणेबाबतचा नियम रिझर्व्‍ह बँकेकडून करणेत आलेला आहे. वि.प.बँकेने रिझर्व्‍ह बँकेच्‍या नियमाचा भंग केला असून सदर वि.प.यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेत भंग केला असून तक्रारदारांना सेवा देणेत टाळाटाळ केली आहे. म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार मे.मंचात दाखल करुन पुढीलप्रमाणे विनंत्‍या केलेल्‍या आहेत. तक्रारदार यांना वि.प.यांचे ए.टी.एम.मशीनमधून न मिळालेली रक्‍कम रु.20,000/-, रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडिया यांचे नियमाप्रमाणे होणारी दंडांची रक्‍कम रु.16,200/-, तक्रारदार यांना कोर्ट खर्च व वकील फी किंमत सदरी दाखल रु.8,000/-, तक्रारदार यांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व या तक्रार अर्जाचा खर्च-टायपिंग, झेरॉक्‍स, इत्‍यादी रु.2,000/- अशी एकूण रक्‍कम रु.51,200/- व त्‍यावर रक्‍कम वसुल होईपर्यंत अर्ज दाखल तारखेपासून सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे.18टक्‍के व्‍याज आकारणी होऊन मिळावी अशी सदरहू मे.मंचास विनंती केलेली आहे.

5.         तक्रारदार यांच्‍या बचत खातेची प्रत, वि.प.यांना दिलेले तक्रार अर्ज, वि.प.यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, आर.बी.आय.च्‍या आदेशाची प्रत, तसेच तक्रारीसोबतची 3 कागदपत्रे असून ती पुढीलप्रमाणे- दि.27.01.2017 रोजी तक्रारदार तर्फे भारतीय रिझर्व्‍हे बँकेकडे देणेत आलेला तक्रार अर्ज, दि.27.01.2017 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र, तक्रारदार तर्फे महेश व्‍हटकर यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

6.          दि.05.01.2017 रोजी वि.प.यांनी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प.यांना तक्रार अर्जातील मजकूर मान्‍य व कबूल नाही. तक्रारदाराचे मुलाचे संमतीने वि.प.बँकेच्‍या वाशी येथे स्थित असलेल्‍या ए.टी. एम.मधून दि.29.02.2016 रोजी रक्‍कम रु.20,000/- काढले हे वि.प.यांस मान्‍य व कबूल नाही. वि.प.यांचे बँकेच्‍या क्रारदार यांनी सदरच्‍या रक्‍कमा तक्रारदार यांचे मुलाला काढणेस संमती दिली अगर त्‍यांचे मुलाने सदरची रक्‍कम त्‍यांचे खातेवरुन ए.टी.एम.द्वारे काढली याबाबत वि.प.यांस माहित नाही. परंतु सदरच्‍या रक्‍कमा तक्रारदार अथवा त्‍यांचा मुलगा यांचे बचत खात्‍यावरुन कमी झालेल्‍या आहेत. तक्रारदार हे ज्‍यावेळी या तक्रारीबाबत वि.प.शाखेकडे ज्‍यावेळी येत त्‍यावेळी त्‍यांचे सदरच्‍या व्यवहाराबाबत शंकेचे निराकरण वि.प.ने केलेले आहे. ते सदरबाबत वि.प.कडे असलेल्‍या संगणकावरील माहिती तक्रारदारांना दाखविलेली आहे व त्‍यांचे शंकेचे निराकरण केलेले आहे व सदरची रक्‍कम तक्रारदारांच्‍या खात्‍यामधुन वजा झालेली आहे याची पूर्ण माहिती असताना तक्रारदार हिने जाणूनबुजून वि.प.यांस त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने खोटी तक्रार केलेली आहे. तक्रारदारांचे सेव्‍हींग्‍ज खात्‍यावरुन वि.प.चे बँकेतील रक्‍कम नेमकी कोणी काढली हे तक्रारदार व त्‍याने हजर केलेल्‍या कागदपत्रांवरुन अगर तक्रारीवरुन दिसून येत नाही. सदरच्‍या रक्‍कमा तक्रारदाराचे ए.टी.एम.कार्डवरुन काढल्‍या गेल्‍या आहेत हे वि.प.कडील कागदपत्रांवरुन दिसून येते. वि.प.यांनी तक्रारदाराला जाणुनबुजून त्रास दिलेला नाही. वि.प.यांचे ए.टी.एम. मशीनवरुन झालेले सर्व व्‍यवहार सुरळीत झालेले आहेत. सदरचे दिवशी ए.टी.एम.कार्डवरुन झालेल्‍या व्यवहाराचे रुपये ए.टी.एम.मशीनवरुन वजा झालेले आहेत तसा रिपोर्ट आलेला आहे. त्‍याप्रमाणे ई.जे.प्रिंट अहवाल हजर केलेला आहे. तसेच ए.टी.एम.स्विच रिपोर्ट हजर केलेला आहे. तसेच वाशी येथील वि.प.बँकेच्‍या वि.प.ने केलेल्‍या चौकशीचा अहवाल हजर केलेला आहे. त्‍यामध्‍ये देखील वि.प.कडे जादाची रक्‍कम असलेबाबतची नोंद नाही. ि वि.प.यांनी सदरहू मे.मंचास पुढीलप्रमाणे विनंती केलेली आहे. तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा तसेच वि.प.यांना जाणूनबुजून त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने तक्रारदाराने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे

 

7.          वि.प.यांनी तक्रारदार तर्फे भारतीय रिझर्व्‍ह बँकेकडे देणेत आलेला तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तसेच वि.प.यांनी दि.05.01.2017 रोजी 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वाशी ब्रँच यांचेकडून मिळालेला ई-मेलची प्रत, ए.टी.एम.स्विच (Switch) अहवाल, ई.जे.प्रिंट, ए.टी.एम.चे जनरल रुलस, आर.बी.आय.चे ए.टी.एम.व डेबीट कार्डसाठीचे रुल, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  दि.09.02.2017 रोजीचे वि.प.यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

8.          तक्रारदारांच तक्रार वि.प.यांचे म्‍हणणे दाखल, कागदपत्रे व पुराव्‍याचे शपथपत्र यांचा विचार करता, निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

 

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

वि.प.यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ?

होय

2

तक्रारदार हे रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय

3

तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय

4

अंतिम आदेश काय ?

अंशत: मंजूर

 

कारणमिमांसा :-

9. मुद्दा क्र.1 :-  तक्रारदार यांचे वि.प.यांचे बँकेकडे बचत खाते क्र. क्र.577002010007832 सदर खातेवर तक्रारदार नियमीत व्यवहार करीत होते.  सदर बँकेकडून तक्रारदार यांनी खातेवरुन पैसे काढणेकरीता ए.टी.एम.कार्ड घेतलेले असून तक्रारदार व त्‍यांचे कुंटूंबिय नियमितपणे त्‍याचा वापर करीत होते.  दि.29.02.2016 रोजी तक्रारदार यांचे मुलास पैशाची आवश्‍यकता असलेमुळे वि.प.बँकेचे मुंबई (वाशी) ये‍थील ए.टी.एम.शाखेमधून रक्‍कम रु.20,000/- काढणेकरीता ए.टी.एम.कार्डचा वापर केला असता, सदर मशिनमधून रक्‍कम रु.20,000/- तक्रारदारांचे मुलास प्राप्‍त झाली नाही. तसेच लगेचच तक्रारदार यांचे सदरचे खातेवरुन सदरची रक्‍कम कमी झालेचा संदेश वि.प.बँकेकडे नोंदविलेल्‍या मोबाईलवर तक्रार नोंदविली तसेच पत्राद्वारे सदरच्‍या तक्रारीसोबत चौकशी केली, तथापि वि.प.यांचेकडून दि.31.03.2016 रोजी लेखी स्‍वरुपात वि.प.बँकेने तक्रार दाखल केली असता, तक्रारदार यांचे खातेवर त्‍यांना न मिळालेली रक्‍कम रु.20,000/- जमा केली किंवा नाही याबाबत वि.प.यांचेकडून आजतागायत कोणतीही माहिती देणेत आलेली नाही.  सबब, सदरचे खात्‍यावरची रक्‍कम रु.20,000/- तक्रारदार यांचे खातेवर परत जमा न करुन वि.प.यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्‍या अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांचे नावचे बचतखातेची प्रत दाखल असुन त्‍याचे खाते उता-याचे अवलोकन केले असता, दि.29.02.2016 रोजी रक्‍कम रु.20,000/- तक्रारदारांचे खात्‍यावरुन debit (खर्ची) झालेची दिसून येते. तसेच त्‍याच दिवशी रक्‍कम रु.5,000/- पण डेबीट झालेचे दिसून येते. सदरची रक्‍कम रु.5,000/- तक्रारदारांना मिळालेचे तक्रारदारांनी तक्रारीत मान्‍य केलेले आहे. दि.31.03.2016 रोजी तक्रारदारांनी वि.प.बँकेचे मॅनेजर यांना लेखी तक्रार दिलेची प्रत दाखल आहे.  सदरचे लेखी तक्रारीचे अवलोकन केले असता, सदरचे रक्‍कम रु.20,000/- निघाले नाहीत यानंतर तक्रारदारांनी तात्‍काळ वि.प.यांचेकडे ऑनलाईन (Online) तक्रार क्र.14832390 दिलेचे नमुद आहे. तसेच वि.प.यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस दाखल केलेली आहे.  वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे वि.प. बँकेत बचत खाते होते व सदरचे खात्‍यावरील रक्‍कम रु.20,000/- तक्रारदारांना न मिळताच त्‍याचे खातेवरुन डेबीट झालेचे दिसून येते.  त्‍यानुसार तक्रारदारांनी सदरची तक्रार तात्‍काळ वि.प.यांना ऑनलाईन तक्रार क्र.143832390 ने कळविलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  तथापि वि.प.यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे तक्रारदारांचे वि.प.शाखेकडे वैयक्तिक बचत खाते आहे. सदरचे खात्‍याचा व्यवहार तक्रारदार यांनी वैयक्तिकरित्‍या करणेचा नियम असताना सदरचे कार्डचा गैरवापर झालेला आहे असे वि.प.यांनी कथन केले आहे. त्‍या अनुषंगाने तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता, सदरचे ए.टी.एम.कार्डचा वापर मी व माझ्या संमतीने माझे कुटूंबीय निय‍मीतपणे करीत असतात असे नमुद आहे.  तसेच तक्रारदार तर्फे महेश व्‍हटकर यांचे पुराव्‍याचे शपथपत्रमध्‍ये माझ्या शिक्षणाकरता व दैनंदिन खर्चाकरीता पैशाची आवश्‍यकता भासत असल्‍यामुळे मी माझी आई हिच्‍या संमतीने वि.प.बँकेचे ए.टी.एम.कार्ड वापर करत असलेचे नमुद आहे.  वरील कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे संमतीने सदरचे कार्डचा वापर झालेचा दिसून येतो. तक्रारदारांनी त्‍यांचे कार्डचा गैरवापर झालेची कोणतीही तक्रार वि.प.यांचेकडे अद्याप नोंदविलेली नसलेने वि.प.यांची सदरची कथने पुराव्‍याअभावी आहेत असे या मंचाचे मत आहे.  

 

10.         वि.प.यांनी त्‍यांचे लेखी कथनामध्‍ये, ए.टी.एम.मशिनवरुन झालेले सर्व व्‍यवहार सुरक्षित झालेले आहेत.  सदर कार्डवरुन झालेल्‍या व्‍यवहाराचे रुपये ए.टी.एम. मशिनवरुन वजा झालेले आहेत.  त्‍यानुसार, ई.जे.प्रिंटचा अहवाल मा.मंचात दाखल केलेला आहे.  तसचे ए.टी.एम. स्विच रिपोर्ट दाखल केलेला आहे. वि.प.यांचे कथनानुसार वि.प.बँकेने वि.प.ने केलेल्‍या चौकशांचा अहवालानुसार वि.प.यांचेकडे जादाची रक्‍कम असलेबाबतची नोंद नाही असे कथने केले आहे.  तथापि तक्रारदार तर्फे महेश व्‍हटकर तक्रारदारांचा मुलगा यांनी सदरचे बचत खातेवर सदरची रक्‍कम रु.20,000/- मशिनमधून मिळाले नसलेने कथन केलेले आहे. सबब, सदरची रक्‍कम तक्रारदारांचे मुलाला मिळाली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  प्रस्‍तुत कामी तक्रारदार तर्फे वकीलांनी तोंडी युक्‍तीवादावेळी वि.प.यांचेकडे सी.सी.टी.व्‍ही. (C.C.T.V.) फुटेजची मागणी केलेली होती असे कथन केले आहे. त्‍याची न्‍यायिक नोंद (Judicial Note) हे मंच घेत आहे.  सदरची बाब वि.प.यांनी नाकारलेली नाही. सदरचे सी.सी.टी.व्‍ही.फुटेजद्वारे तक्रारदारांना सदर खात्‍यावरुन किती वेळा पैसे काढले व किती पैसे मिळाले हे स्‍पष्‍टपणे समजले असते.  तथापि वि.प.यांनी सदरचे फुटेजची मागणी करुन देखील वि.प.यांनी दिलेला नाही.  सदर मुद्दयांचे अनुषंगाने हे मंच प्रस्‍तुत न्‍यायानिवाडयाचा आधार घेत आहे. 

 

     Case No.1387/2010, District Redressal Forum, Delhi.

 

     Sunita Sharma Versus State Bank of India-  No fitness report has been  produced, neither CCTV Footage has been provided to Complainant.  Statement of Complainant show deduction of Rs.20,000/- against transaction in question.  It is clear from the fact and circumstance of case that none has gone into details or had carried out any inspection of the equipment installed for the proper of giving proper service to customer.  We, therefore, find both the Opponents deficient in services and hold liable to refund the deficient amount. 

 

वरील न्‍यायनिवाडयातील तत्‍व सदर तक्रारीस लागु होते.  वि.प.यांनी केवळ दाखल रिपोर्टद्वारे वि.प.यांचेकडे जादा रक्‍कम असलेाबाबत नोंद नसलेचे कारणावरुन तक्रारदारांची सदरची रक्‍कम खर्ची-डेबीटस् झालेचे निष्‍कर्षास आलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. तथापि सदरचे ए.टी.एम.मशिनची चाचणी (inspection) करणेची जबाबदारी वि.प.यांची असतानादेखील ज्‍या उद्देशाने सदरचे ए.टी.एम. मशीनची सेवा वि.प.यांनी तक्रारदारांस दिलेली आहे.  त्‍याची पडताळणी वि.प.यांनी केलेली नाही.  वरील सर्व बाबींचा विचार करता, सदरची सी.सी.टी.व्‍ही. फुटेज देणेची जबाबदारी वि.प.यांची आहे.  वि.प.यांनी त्‍यांची कथने पुराव्‍यानिशी शाबीत केलेली नाही या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदारांने तात्‍काळ ऑनलाईन तक्रार देऊनदेखील वि.प.बँकेचे नियमानुसार, सदरची तक्रार नोंदविलेपासून सात दिवसांचे आत सदरची रक्‍कम तक्रारदार यांचे बचत खातेवर जमा न करता, सदरची रक्‍कम रु.20,000/- बचत खातेवरुन डेबीट-(खर्ची) करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

11.    मुद्दा क्र.2 व 3:-   मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता, वि.प.यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  प्रस्‍तुत कामी तक्रारदरांना दंड क्र. 5.12 of Reserve Bank of India, Master circular on customer service in Banks नुसार  बँकेकडे A.T.M.transaction Fail संबंधीत तक्रारीचे ग्राहक तक्रार दाखल केलेनंतर सात दिवसांचे आत तक्रार निरसन करणे बंधनकारक आहे. अन्‍यथा बँक तक्रारदारास प्रतिदिन रक्‍कम रु.100/- दंड देय असलेने रिझर्व्‍ह बँकेंच्‍या नियमाप्रमाणे दंडाची होणारी रक्‍कम रु.16,200/- ची मागणी मा.मंचात केलेली आहे.  प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने वि.प.यांचेकडे तत्‍काळ ऑनलाईन तक्रार दि.29.02.2016 रोजी दिलेली आहे.  सदरची बाब, वि.प.यांनी नाकारलेली नाही.  सदरचे तक्रारीस वि.प.यांनी सात दिवसांचे आत निरसन केलेचा कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केलेला नाही.  या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार हे वि.प.यांचेकडून Reserve Bank of India, Master Circular on Customer Serivec in Bank नुसार रक्‍कम रु.16,200/- मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. प्रस्‍तुत शाखाधिकारी हे वि.प.बँकेचे कर्मचारी असलेने त्‍यांना वैयक्तिक जबाबदार धरणेत येत नाही. सबब, वि.प. युनियन बँक ऑफ इंडिया यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प.युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडून तक्रारदार यांचे बचत खाते क्र.577002010007832 वरील रक्कम रु.20,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल दि.29.09.2016 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे.6टक्‍के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत. वि.प.यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदाराला मानसिक त्रास झाला व त्‍याकारणाने मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे. 

 

12.   मुद्दा क्र.4:- सबब, आदेश.

 

आदेश

      1     तक्रारदारचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

      2     वि.प.युनियन बँक ऑफ इंडिया यांनी तक्रारदारास बचत खाते क्र.577002010007832 यावरील तक्रारदाराची रक्‍कम रु.20,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये वीस हजार फक्‍त) अदा करावी. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल दि.29.09.2016 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे.6टक्‍के प्रमाणे व्याज अदा करावे.

      3     वि.प.युनियन बँक ऑफ इंडिया यांनी तक्रारदारास रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडिया यांचे नियमाप्रमाणे होणारी दंडाची रक्‍कम रु.16,200/- (अक्षरी रक्‍कम रुपये सोळा हजार दोनशे फक्‍त) अदा करावी.

      4     वि.प.यांनी तक्रारदारांना झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम  रु.3,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दोन हजार फक्‍त) अदा करावेत.

      5    वरील सर्व आदेशांची पुर्तता वि.प.कंपनीने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत                                       

            करावी.

      6     विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना  

      वि.प.विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.

      7     आदेशाच्‍या सत्‍यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.