तक्रारदार करिता ः स्वतः
सामनेवाले ः
आदेश- श्री.एम.वाय.मानकर, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
तक्रार दाखल कामी आदेश
तक्रारदार यांना तक्रार दाखल कामी ऐकण्यात आले.
2. तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदार हे सामनेवाले यांचे कर्मचारी आहेत. त्या मास्को (रशिया) येथे सन,2004 -2006 या कालावधीमध्ये कार्यरत असतांना, त्या देशाच्या आयकरा पोटी तक्रारदार यांच्या वेतनातून रु.4,23,040/- एवढी रक्कम सामनेवाले यांनी राखुन ठेवली. तक्रारदार हे सन, 2007 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांना राखुन ठेवलेल्या रक्कमे पैकी रु.68,891/- परत करण्यात आले, परंतु इतर रक्कमेचा हिशेब किंवा त्याकरिता पावत्या देण्यात आल्या नाहीत. पावत्या देण्यात न आल्यामुळे तक्रारदारानुसार ती रक्कम आयकर म्हणून भरलेली नाही. सबब, ती त्यांना परत करण्यात यावी. अशी मागणी तक्रारीच्या परिच्छेद क्र.5 मध्ये स्पष्टपणे नमुद आहे.
3. मंचापुढे प्रश्न निर्माण होतो की, ही तक्रार या मंचात चालु शकते का ? तक्रारदार हे कर्मचारी असल्यामुळे ते सामनेवाले यांचे ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना काहीही मोबदला दिलेला नाही. तक्रारदार यांची तक्रार ही त्यांच्या वेतनाच्या रक्कमेबाबत आहे. आमच्यामते हा ग्राहकवाद असु शकत नाही. तक्रारदार आपल्या अधिकाराबाबत योग्य त्या अधिका-याकडे /प्राधिकरणाकडे/न्यायालयाकडे दाद मागू शकतो. सबब,खालील प्रमाणेः-
आदेश
1. तक्रार क्र.383/2015 ही ग्रा.सं.कायदयाच्या कलम 12(3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभयतांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
4. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदारांना परत करण्यात यावे.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 19/01/2016
db/-