न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. रुपाली धै.घाटगे, सदस्या (दि.08/04/2022)
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी स्वत:चे व कुटूंबाचे उदरनिर्वाहकरिता तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोट तुकडी तहसिल करवीर मौजे सरनोबतवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रि स नं.25/1 पैकी हिस्सा नं.1 चे एकूण क्षेत्र हे 0 82 आर पो ख 0 16 आर आकार रु.1.41 पैसे मध्ये मंजूर लेआऊट पैकी बिगर शेती निवासी प्लॉट नं.9 चे क्षेत्र 604.1 चौ.मी. मध्ये उभारणेत आलेल्या अपार्टमेंट मधील पश्चिम बाजूकडील दुकान गाळा नं.1 चे क्षेत्रफळ 182.7 चौ.मी. बिल्टअप यांसी चतु:सिमा पूर्वेस-दुकान गाळा क्र.2 ची मिळकत पश्चिमेस-कॉलनी रस्ता दक्षिणेस-याच मिळकतीमधील उर्वरित बांधकाम उत्तरेस-रस्ता येणेप्रमाणे असलेली सदर दुकानगाळा मिळकत वि प यांचेकडून रक्कम रु.7,50,000/- या बाजारभावाने खरेदी घेण्याचे ठरवून सदर रक्कमेपैकी वि प यांनी तक्रारदार यांचेकडून संचकारादाखल स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोल्हापूर वरील चेक क्र.391342 ने रक्कम रु.2,00,000/- स्विकारुन ठरलेल्या अटींचा करार दि.04/06/2018 रोजीने वि प यांनी तक्रारदारास लिहून दिला.खरेदीची उर्वरित रक्कम रु.5,50,000/- खरेदीपत्राचे वेळी देणेचे कराराने ठरलेले होते. तक्रारदाराने खरेदीची कमाल रक्कम भागवूनदेखील वि प यांनी नमुद मिळकतीचे विकसन कर्ता व वितरक या नात्याने लिहून दिलेल्या दि.04/06/2018 रोजीच्या करारपत्रातील मुदतीत अगर आजतागायत सदर मिळकतीचे नोंद खरेदीपत्र तक्रारदाराचे लाभात अदयाप लिहून दिलेले नाही. वि प यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. आयोगात दाखल केला आहे.
सबब तक्रारदार यांना वि प यांचेकडून करारपत्राने वि प यांना दिलेली रक्कम रु.2,00,000/- त्यावर आजअखेर 18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.87,000/- नुकसान भरपाईची रक्कम रु.2,00,000/- मानसिक त्रासापोटीची रक्कम रु.50,000/- व त्तक्रार अर्जाचा खर्च रु.30,000/- असे एकूण रक्कम रु.5,67,000/- वि प यांचेकडून तक्रार अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे.18 % व्याजाने परत करणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 5 कडे वि प यांचेकडून तक्रारदारास लिहून दिलेले दि.04/06/18 रोजीचे करारपत्र, वकीलांमार्फत वि प यांना दिलेली नोटीस, सदर नोटीस पाठवलेली पोष्टाची रिसीट, नोटीसीचा परत आलेला लखोटा, वाद मिळकतीचे फोटो इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले असून तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
4. प्रस्तुत प्रकरणी वि प यांना सदर आयोगामार्फत नोटीस पाठवली असता नोटीस लागू होऊनही वि प गैरहजर असलेने वि प यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि प हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार वि प यांचेकडून वाद मिळकतीचे खरेदीपत्र करुन मिळणेस अथवा संचकार करारपत्राची रक्कम व्याजासह मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
मुद्दा क्र.1 :- वि प हे भुखंड विकसित करणे व तयावर बहुमजली निवासी व व्यापारी संकुलाचे बांधकाम करुन त्याची विक्री करणे अशा स्वरुपाचा व्यवसाय करतात. तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोट तुकडी तहसिल करवीर मौजे सरनोबतवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रि स नं.25/1 पैकी हिस्सा नं.1 चे एकूण क्षेत्र हे 0 82 आर पो ख 0 16 आर आकार रु.1.41 पैसे मध्ये मंजूर लेआऊट पैकी बिगर शेती निवासी प्लॉट नं.9 चे क्षेत्र 604.1 चौ.मी. मध्ये उभारणेत आलेल्या अपार्टमेंट मधील पश्चिम बाजूकडील दुकान गाळा नं.1 चे क्षेत्रफळ 182.7 चौ.मी. बिल्टअप यांसी चतु:सिमा पूर्वेस-दुकान गाळा क्र.2 ची मिळकत पश्चिमेस-कॉलनी रस्तादक्षिणेस-याच मिळकतीमधील उर्वरित बांधकाम उत्तरेस-रस्ता येणेप्रमाणे असलेली सदर दुकानगाळा मिळकत तक्रारदार यांनी वि प यांचेकडून रक्कम रु.7,50,000/- या बाजारभावाने खरेदी घेण्याचे ठरवून सदरचे रक्कमेपैकी संचकारदाखल स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोल्हापूर वरील चेक क्र.391342 ने रक्कम रु.2,00,000/- दि.04/06/2018 रोजी करारपत्रातील अटीनुसार अदा केलेले आहे. त्याअनुषंगाने तक्रारदारांचे तक्रारीतील सदर संचकारपत्राची प्रत दाखल केलेली आहे. सदरचे संचकारपत्राचे अवलोकन करता सदरचे संचकारपत्र रक्कम रु.100/- चे मुद्रांकावर नोटरी केलेले असून सदरचे संचकारपत्राचे करार मोबदला तपशिलात तक्रारदार यांनी रक्कम रु.2,000,00/- वि प यांना चेकने अदा केलेचे दिसून येते. प्रस्तुतची मिळकत तक्रारदारांनी स्वत:चे व कुटूंबाचे उदरनिर्वाहकरिता खरेदी केलेली असलेचे पुराव्याचे शपथपत्रात कथन केले आहे. वि प यांनी सदरची रक्कम आयोगात हजर होऊन नाकारलेली नाही. सबब तक्रारदार यांनी वि प यांना अदा केलेल्या रक्कमेचा विचार करता तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 :- उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक आहेत. मुद्दा क्र.1 मधील वाद मिळकत वि प यांनी तक्रारदार यांना दि.04/06/2018 रोजी रक्कम रु.7,50,000/- या बाजारभावाने योग्य किंमतीस खरेदी देण्याचे ठरवून सदर खरेदीच्या रक्कमेपैकी वि प यांनी तक्रारदार यांचेकडून संचकारपोटी रक्कम रु.2,00,000/- स्विकारुन उर्वरित रक्कम रु.5,50,000/- खरेदीपत्रावेळी अदा करणेचे ठरले होते. तथापि, दि.04/06/2018 रोजीचे करारपत्रातील मुदतीप्रमाणे सदर वाद मिळकतीचे नोंद खरेदीपत्र वि प यांनी तक्रारदार यांना अदयाप न करुन देऊन तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली का? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुत कामी तक्रारदारांनी तक्रारीतील दि.04/06/2018 रोजी तक्रारदार व वि प यांचे दरम्यान झालेले नोटरी करारपत्र दाखल केलेले आहे. सदरचे करारपत्र रक्कम रु.100/- चे स्टॅम्प पेपर वर केलेले असून सदरचे करारपत्रातील अटीचे अवलोकन करता
कलम -5) सदर मिळकतीचा प्रत्यक्ष व खुला कब्जा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना रजिस्टर खरेदीपत्रावेळी देणेचा आहे. सदर गाळयाचे बांधकाम लिहून घेणार यांनी दाखवलेल्या नकाशाप्रमाणे करणेचे आहे.
कलम -9) सदर मिळकतीचे रजिस्टर खरेदीपत्र लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना उर्वरित रक्कम देवून प्रसतुत अॅग्रीमेंट टु सेलच्या तारखेपासून चार महिन्याचे आत लिहून व रजिस्टर करुन घेणेचे आहे.
सबब सदरचे करारपत्रावर तक्रारदार यांची लिहून घेणार सही असून लिहून देणार म्हणून वि प यांची सही आहे. सदरचे करारपत्रावर साक्षीदार म्हणून 1)अमोल अरुण विचारे 2) विशाल जयवंतराव भोसले यांच्या सहया आहेत. सदरचे नोटरी करारपत्र वि प यांनी आजतागायत आयोगात हजर राहून नाकारलेले नाही. सबब सदरचे करारापत्रातील अटी शर्तीं तक्रारदार व वि प यांचेवर कायदयाने बंधनकारक आहेत. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी वि प यांना वकीलामार्फत दि.15/11/2021 रोजी नोटीस पाठविलेली असून सदरचे नोटीसची पोष्टाची पावती व सदरचे नोटीसचा परत आलेला लखोटयाची प्रत दाखल केलेली आहे. तसेच वाद मिळकतीचे फोटो दाखल केलेले आहेत. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी वि प यांना पाठविलेली नोटीस लागू झालेचा पोष्टाचा ट्रॅक रिपोर्ट दाखल केलेला असून दि.09/02/2022 रोजी वि प यांचा स्थानिक पत्ता बरोबर असलेचे ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे 65(3) प्रमाणे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सबब सदर कामी वि प यांनी हजर राहून तक्रारदाराची कथने नाकारलेली नाहीत. वि प यांचेविरुध्द दि.09/02/022 रोजी एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. प्रस्तुत कामाचे दि.03/12/2021रोजी तक्रारदाराचा अंतरिम अर्ज मंजूर झालेला असून वि प यांनी आयोगाचे पुढील आदेशापर्यंत वादातील मिळकत दुकानगाळा वि प यांनी विक्री, हस्तांतर, कर्जबोजा अथवा अन्य इसमास ताबा वा तबदिल करु नये अशी तुर्तातुर्त मनाई ताकीदीचे आदेश झालेले आहेत.
सबब वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता वि प यांनी तक्रारदारांना सदरचे वाद मिळकतीचा ताबा अदयाप दिलेला नाही अथवा रजिस्टर खरेदीपत्रदेखील तक्रारदाराचे लाभातन केलेने सदरे तक्रारीस सततचे (Continue Cause of Action ) कारण घडलेले आहे. सबब दि.04/06/2018 रोजीचे नोटरी करारपत्रातील अटी व शर्तीप्रमाणे वि प यांनी वाद मिळकतीची रक्कम रु.7,50,000/- पैकी रक्कम रु.2,00,000/- मोबदला स्विकारुनदेखील अदयाप नोंद खरेदीपत्र तक्रारदाराचे लाभात करुन न देवून तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 :- उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि प यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब वि प यांनी तक्रारदार यांना वाद मिळकतीतील दुकानगाळा कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तक्रारदार यांचेकडून वादमिळकतीचे उर्वरित खरेदीचा मोबदला रक्कम रु.5,50,000/- स्विकारुन तक्रारदारास सदर वादातील मिळकतीचा ताबा व खरेदीपत्र करुन दयावे. अथवा तांत्रिक कारणामुळे सदरचे मिळकतीचे खरेदीपत्र पूर्ण करुन देण्यास वि प असमर्थ असतील तर वि प यांनी तक्रारदारांना वादातील मिळकतीच्या करारापोटी स्विकारलेली रक्कम रु.2,00,000/- अदा करावी. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्हणजे दि.03/12/2021 पासून सदरची रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 % प्रमाणे व्याज अदा करावे. तसेच वि प यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.4 :- सबब, प्रस्तुतकामी हे आयोग खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.यांनी तक्रारदारास तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोट तुकडी तहसिल करवीर मौजे सरनोबतवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रि स नं.25/1 पैकी हिस्सा नं.1 चे एकूण क्षेत्र हे 0 82 आर पो ख 0 16 आर आकार रु.1.41 पैसे मध्ये मंजूर लेआऊट पैकी बिगर शेती निवासी प्लॉट नं.9 चे क्षेत्र 604.1 चौ.मी. मध्ये उभारणेत आलेल्या अपार्टमेंट मधील पश्चिम बाजूकडील दुकान गाळा नं.1 चे क्षेत्रफळ 182.7 चौ.मी. बिल्टअप यांसी चतु:सिमा पूर्वेस-दुकान गाळा क्र.2 ची मिळकत पश्चिमेस-कॉलनी रस्ता दक्षिणेस- याच मिळकतीमधील उर्वरित बांधकाम उत्तरेस-रस्ता येणेप्रमाणे असलेली सदर दुकानगाळा मिळकतीची कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तक्रारदार यांचेकडून वादमिळकतीचा उर्वरित खरेदीचा मोबदला रक्कम रु.5,50,000/-स्विकारुन तक्रारदारास सदर वाद मिळकतीचा ताब व नोंद खरेदीपत्र करुन दयावे.
अथवा
तांत्रिक कारणांमुळे सदरचे वाद मिळकतीचे खरेदीपत्र पूर्ण करुन देण्यास वि प असमर्थ असतील तर वि प यांनी तक्रारदारांना संचकार करारपत्रापोटी स्विकारलेली रक्कम रु.2,00,000/- अदा करावी व सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्हणजे दि.03/12/2022 पासून तक्रारदाराचे हाती संपूर्ण रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज अदा करावे.
3) वि प यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- (रु.आठ हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.