| Complaint Case No. CC/67/2019 | | ( Date of Filing : 19 Jan 2019 ) |
| | | | 1. MALA MUKHARJI | | GREEN FIELD SOCIETY, AASHIRWAD SCHOOL, GODHNI ROAD, NAGPUR 440030 | | NAGPUR | | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. VIDYUT BHATTACHARYA | | C/O SMT GEETA BHATTACHARYA PLOT NO 37, NEW LAXMI NAGAR, GODHNI ROAD, NAGPUR 440020 | | NAGPUR | | MAHARASHTRA | | 2. PARASRAM SHRIRAM MANDVAGDE | | NEAR BUDHVIHAR , ZINGABAI TALI, NAGPUR 440030 | | NAGPUR | | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | (आदेश पारित व्दारा - श्री एस.आर.आजने, मा. सदस्य ) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
- तक्रारकर्तीने आपल्या निवासी घराचे बांधकामाचे काम विरुध्द पक्ष क्रमांक 1 चे माध्यमातुन विरुध्द पक्ष क्रमांक 2 ला ठेका पद्धतीवर दिले होते. घराचे बांधकामाचा करारनामा तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांच्या मध्ये दिनांक 22/1/2017 रोजी 500/- रुपयाचे स्टॅम्प पेपर वर विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांचे मध्यस्थी मध्ये करण्यात आला. करारामध्ये तक्रारकर्तीने आपल्या निवासी घरात केल्या जाणा-या कामाचा संपूर्ण तपशिल दिला होता. त्या करारनाम्यात विरुध्द पक्ष क्रमांक 2 व तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्रमांक 1 चे समक्ष स्वाक्ष-या केल्या व त्याची प्रत विरुध्द पक्षाला देण्यात आली. करारनामानूसार विरुध्द पक्षाला करारात नमुद केल्याप्रमाणे घराचे बांधकाम करार तारखेपासून 1 महिण्याच्या आत करावयाचे होते. तक्रारकर्तीने संपूर्ण घराचे बांधकाम कराराप्रमाणे विरुध्द पक्षाला 1,10,000/- रुपयात दिले होते व करारानूसार बांधकामाला लागणारे संपूर्ण मटेरिअल लोहा, रेती, गिट्टी, सिमेंट, विटा इत्यादी तक्रारकर्ती घेऊन देणार होती.
- करारानूसार विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी घराचे बांधकाम दिनांक 27/1/2017 ला सुरु केले व करारानूसार विरुध्द पक्षाने केलेल्या कामानूसार तक्रारकर्तीने नियमितपणे कामाचे पैसे दिले. करार तयार करण्यापूर्वी तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना स्पष्ट सांगितले होते की, तक्रारकर्तीला कोर्ट कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. त्याकरीता विरुध्द पक्षाने काम बंद ठेवू नये परंतू तक्रारकर्ती जेव्हा जेव्हा बाहेर गावी गेली त्या त्या वेळी विरुध्द पक्षाने काम बंद ठेवुन दुसरीकडे कामे केले. ज्यामुळे तक्रारकर्तीच्या घराचे बांधकाम 3-4 महिणे लोटुनही पूर्ण झाले नाही. तक्रारकर्ती कोर्टाला जाण्यापूर्वी नियमीतपणे मटेरीअल विरुध्द पक्षाला पुरवूनच कोर्टाच्या कामाला जात होती व कोर्टातुन परत आल्यावर मजुरी देत होती. करारात नमुद केल्याप्रमाणे विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे काम पूर्ण केले नाही व बरेचसे काम अपूर्ण अवस्थेत सोडले व कामाची गुणवत्ता सुद्धा बरोबर नाही. बरेच ठिकाणी भिंतीला भेगा आहे. भिंतीला पॅल्स्टर केले नाही व ब-याच ठिकाणी पाणी ठपकत आहे. एकंदरीत विरुध्द पक्षाने कराराप्रमाणे काम न करता काम अपूर्ण केले आहे व काम गुणवत्ता पूर्ण केले नाही. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी केलेले तक्रारकर्तीच्या घराचे बांधकाम वास्तु निरीक्षक यांना दाखविले व वास्तु निरीक्षक यांनी दिलेला तपासणी अहवाल तक्रारकर्तीने मंचाचे अभिलेखावर दाखल केला. वास्तु निरीक्षकाचे अहवालानूसार बांधकाम कमी दर्जाचे व अशिक्षीत कामगार यांचा वापर करुन बांधकाम केल्याचे अहवालात म्हटले आहे तसेच विटाचे बांधकाम बरोबर नाही. कॉलम ची बांधनी बरोबर करण्यात आली नाही. इत्यादी ब-याच बांधकाम उणीवा निरीक्षण अहवालात नमुद आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचे लाखो रुपयाचे मटेरीअल चे नुकसान झाले असे नमुद केले आहे.
- तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला घराचे बांधकामपोटी रुपये 94,000/- दिले आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 2 ला अपूर्ण बांधकाम पूर्ण करुन देण्याबाबत विनंती केली परंतू विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे बांधकाम अपूर्ण ठेवुन सोडुन गेला व परत बांधकामाचे ठिकाणी आला नाही. विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे ही विरुध्द पक्षाची तक्रारकर्ती प्रती दोषपूर्ण सेवा आहे. तक्रारकर्तीला घराचे बांधकामाकरीता रुपये 1,52,000/- रुपयाचे मटेरीअल लागले.
- तक्रारकर्तीने वारंवार सुचना देऊन व प्रत्यक्ष भेटुनही विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे घराचे बांधकाम कराराप्रमाणे केले नाही करीता तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना दिनांक 20/7/2018 ला कायदेशिर नोटीस पाठवून तक्रारकर्तीचे बांधकाम पूर्ण करुन, निम्न दर्जाचे काम सुधारुन पूर्ण करण्याबाबत सुचित केले परंतू विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीने पाठविलेल्या नोटीस ची दखल घेतली नाही. तक्रारकर्तीने नोटीस द्वारे विरुध्द पक्षाला कमी दर्जाचे बांधकाम व कराराप्रमाणे बांधकाम न केल्यामुळे तिचे मटेरीअल खरेदीपोटी झालेले नुकसान रुपये 1,52,000/- व दिलेली मजुरी रुपये 94,000/- च्या नुकसानास आपण जबाबदार राहाल असे कळविले होते परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे नोटीस ची दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्तीला मा. मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली व तक्रारकर्तीने तक्रारीत खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना व्यक्तीशः व संयुक्तपणे घोषित करावे की, विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 तक्रारकर्तीला दिलेल्या सेवेतील कमतरतेस कारणीभुत आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेशित करावे की, त्यांनी व्यक्तीशः व संयुक्तपणे निकृष्ट दर्जाचे काम, कामात दिरंगाई व सेवेतील कमतरते करीता मटेरियलचा खर्च रुपये 1,52,000/- आणि रुपये 94,000/- पेमेंट जे विरुध्द पक्ष क्रमांक 2 ला देण्यात आले ते तक्रारकर्तीला परत करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश द्यावे की, त्यांनी तक्रारकर्तीला निकृष्ट दर्जाचे काम तोडण्याकरीता रुपये 25,000/- अदा करावे.
- मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये 1,00,000/- अदा करावे व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस प्राप्त होऊनही ते मंचात हजर झाले नाही. म्हणून दिनांक 14/05/2019 रोजी नि. क्र. 1 वर विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
- तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल दस्तावेज, लेखी युक्तीवाद तसेच तोंडी युक्तीवाद ऐकल्यावर मंचाने खालिल मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील निष्कर्ष खालिलप्रमाणे नोंदविले आहे.
अ.क्र. मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
- तक्रारकर्तीने आपल्या निवासी घराचे बांधकामाचे काम विरुध्द पक्ष क्रमांक 1 चे माध्यमातुन विरुध्द पक्ष क्रमांक 2 ला ठेका पद्धतीवर दिले होते. घराचे बांधकामाचा करारनामा तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांच्या मध्ये दिनांक 22/1/2017 रोजी 500/- रुपयाचे स्टॅम्प पेपर वर विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांचे मध्यस्थी मध्ये करण्यात आला व त्याची प्रत विरुध्द पक्षाला देण्यात आली होती. तक्रारकर्तीने संपूर्ण घराचे बांधकाम कराराप्रमाणे विरुध्द पक्षाला दिले होते. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्रमांक 2(1,2,3,4) वर दाखल दस्तऐवजाचे अवलोकन केल्यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्तीचे घराचे बांधकाम दिनांक 27/1/2017 ला सुरु केले व करारानूसार तक्रारकर्तीने कामानूसार नियमितपणे कामाचे पैसे दिले. बांधकामाला लागणारे संपूर्ण मटेरीअल, लोहा, रेती, गिट्टी, सिमेंट, विटा इत्यादी तक्रारकर्तीला खरेदी करुन द्यावयाचे होते. त्याप्रमाणे तक्रारकर्तीने नियमीतपणे विरुध्द पक्षाला मटेरिअल पुरविले परंतू विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे घराचे बांधकाम करारानूसार एक महिण्यांत पूर्ण न करता बांधकामास 3 ते 4 महीणे लोटुनही पूर्ण केले नाही. बरेचशे काम अपूर्ण अवस्थेत सोडले व कामाची गुणवत्ता सुद्धा बरोबर नव्हती. ब-याच ठिकाणी भिंतीला भेगा, भिंतीला प्लॅस्टर केले नाही व ब-याच ठिकाणी पाणी ठपकत होते. एकंदरीत विरुध्द पक्षाने कराराप्रमाणे काम न करता काम अपूर्ण केले आहे व काम गुणवत्तापूर्ण केले नाही. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्तीच्या घराचे केलेले बांधकाम वास्तु निरीक्षक यांना दाखविले व वास्तु निरीक्षक यांनी तक्रारकर्तीचे घराचे बांधकामाचा तपासणी अहवाल तयार केला व तो तक्रारकर्तीने मंचाचे अभिलेखावर दाखल केला. वास्तुनिरीक्षकाचे अहवालानूसार बांधकाम कमी दर्जाचे व अशिक्षीत कामगार यांचा वापर करुन बांधकाम केल्याचे म्हटले आहे. विटाचे बांधकाम बरोबर नाही. कॉलम ची बांधनी बरोबर नाही. इत्यादी ब-याच बांधकाम उणीवा निरीक्षण अहवालात नमुद केले आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे मटेरिअल चे नुकसान झाले असे नमुद केले आहे. तक्रारकर्तीला घराचे बांधकाम करीता रुपये 1,52,000/- इतक्या रकमेचे मटेरीअल लागले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे घराचे बांधकाम करारानूसार पूर्ण केले नसून ते निम्ण दर्जाचे आहे यावरुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याचे सिद्ध होते. त्यामुळे विरुध्द पक्ष हा तक्रारकर्तीला तिचे मटेरीअल खरेदीपोटी झालेले नुकसान व तिने विरुध्द पक्षाला बांधकामापोटी दिलेली मजुरीच्या नुकसानीचे भरपाईस पाञ आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे व मंच खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना निर्देश देण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारकर्तीला बांधकामाचे मटेरीयल खरेदी पोटी केलेला खर्च रुपये 1,52,000/- व बांधकाम मजुरी रुपये 94,000/-, असे एकुण रक्कम रुपये 2,46,000/- द.सा.द.शे 8 टक्के व्याजासह दिनांक 27/1/2017 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना निर्देश देण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारकर्तीला शारीरीक व मानसिक ञासाकरीता रुपये 30,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रुपये 10,000/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |