तक्रारदार यांचे वकील श्रीमती. अपर्णा परेरा हजर.
आदेश- एम.वाय.मानकर अध्यक्ष,
तक्रारदार यांचे वकील श्रीमती. परेरा यांना दाखल सुनावणीकामी ऐकण्यात आले.
तक्रार व त्यासोबत दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदारानी सा.वाले यांच्याकडे एका सदनिकेची नोंदणी केली व त्याबाबत त्यांना दि. 03/08/2012 चे अलॉटमेंट लेटर देण्यात आले. परंतू चार वर्ष झाल्यानंतर सुध्दा तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा न मिळाल्यामूळे तक्रारदारानी ही तक्रार दाखल केली. त्यात विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत. तक्रारदारानी अदा केलेली रक्कम 2,70,000/-, अलॉटमेंट लेटरच्या दिनांकापासून 24 टक्के व्याजानी मागणी केली आहे. मूळ रक्कम व त्यावरील व्याज हे 5,00,000/-,पेक्षा जास्त होते. तक्रारदारानी सन 2012 पासून प्रती दिन 1,000/-,रूपयाप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. चार वर्षाच्या कालावधीकरीता ही रक्कम अंदाजे 14,00,000/-,होते व तक्रारदारानी मानसिक त्रासासाठी रू. 5,00,00/-ची मागणी केलेली आहे. एकुण तक्रारदारानी मागणी केलेली रक्कम ही 20,00,000/-,पेक्षा जास्त आहे यामुळे ही तक्रार या मंचाच्या पिक्युनरी क्षेत्राच्या अधिकाराबाहेर आहे त्यामुळे ही तक्रार या मंचात चालु शकत नाही. सबब खालील आदेश
आदेश
1. तक्रार क्र 502/2016 ही ही मंचाच्या पिक्युनरी अधिकार क्षेत्रात येत नसलमूळे ती तक्रारदारांना परत करण्यात येते.
2. तक्रारदारांनी लिमीटेशनच्या तरतुदींच्या अधीन राहून योग्य त्या मा.मंचात/आयोगात/न्यायालयात तक्रार दाखल करावी.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
4. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे
npk/-