| Complaint Case No. CC/21/221 | | ( Date of Filing : 06 Dec 2021 ) |
| | | | 1. Smt.Sangita Devidas Dhone | | Wadhona post bhishi, tah.Chimur,Dist.Chandrapur | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. Universal Sampo General Insurance Co.Ltd Through Divisional Manager | | Plot no.EAL 994/KLC Tower MIDC Mahapay Navi Mumbai | | Mumbai | | MAHARASHTRA | | 2. M/s Jayaka Insurance Brokers Pvt Ltd Through Manager | | Dusara majala,jayaka building commercial road,civil line Nagpur | | Nagpur | | MAHARASHTRA | | 3. Taluka krushi Adhikari, Chimur | | Chimur, Tah.Chimur,Dist.Chandrapur | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या) (पारित दिनांक ०३/०५/२०२१ ) - तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ती ही वाढोणा, पोस्ट भिसी, तहसील चिमुर येथे राहत असून तिचे पती श्री देवीदास शिवाजी ढोणे यांच्या मालकीची मौजा वाढोणा, तहसील चिमूर येथे भुमापन क्रमांक ७३/१ ही शेतजमीन आहे. त्या शेतीच्या उत्पन्नावर तक्रारकर्तीचे पती कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. विरुध्द पक्ष क्रमांक १ ही विमा कंपनी असून विरुध्द पक्ष क्रमांक २ ही विमा सल्लागार कंपनी आहे व विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात. तक्रारकर्तीच्या पतीचा रुपये २,००,०००/- चा विमा योजनेअंतर्गत विमा शासनाच्या वतीने उतरविण्यात आला. सदर विमा जरी शासनाच्या वतीने उतरविण्यात आला तरी तक्रारकर्ती ही मयत देवीदास ढोणे यांची पत्नी असल्यामुळे सदर विम्याची लाभधारक आहे. तक्रारकतीच्या पतीचा प्रथम अपघात दिनांक १२/०२/२०१९ रोजी शेतातील झाडावरुन पडून झाला. त्यात ते ७० टक्के अपंग झाले व त्यानंतर सदर अपघाताने जखमी झाल्यावर त्यांचा दिनांक १६/०४/२०२१ रोजी मृत्यु झाला. तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी अपघात व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तिने विरुध्द पक्ष क्रमांक ३ कडे दिनांक ३१/८/२०२० रोजी तिच्या पतीचा अपघातात अपंगत्व आल्याने रिसर अर्ज केला व वेळोवेळी दस्तऐवजाची पुर्तता केली. सदर दावा प्रलंबित असतांनाच दिनांक १६/०४/२०२१ रोजी पतीचा मृत्यु झाला. त्यामुळे तिने वारसदार म्हणून विमा दावा रक्कम रुपये २,००,०००/-मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. रितसर अर्ज व दस्तऐवज दाखल करुन वर्षे उलटून गेल्यावरही विरुध्द पक्ष यांनी दावा मंजूर अथवा नामंजूर न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केली. शासनाने ज्या उद्देशाने सदर योजना चालू केली त्या उद्देशालाच विरुध्द पक्ष हे तडा देत आहे. विरुध्द पक्ष यांनी काहीही उत्तर न दिल्याने तक्रारकर्तीला मानसिक ञास झाला असून मिळणा-या रकमेचा व्याजालाही मुकावे लागले असून आर्थिक ञासही सहन करावा लागला असल्यामुळे सदर तक्रार तक्रारकर्तीने आयोासमोर दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्तीने तक्रारीत मागणी केली आहे की, विमा दाव्याची रक्कम रुपये २,००,०००/- विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे प्रस्ताव दाखल झाल्यामपासून म्हणजे दिनांक ३१/०८/२०२० पासून द.सा.द.शे. १८ टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत तसेच तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक, शारीरिक ञासापोटी रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- देण्यात यावा.
- आयोगामार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस काढण्यात आले.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना आयोगामार्फत नोटीस प्राप्व्त होऊनही प्रकरणात उपस्थित न झालयामुळे त्याच्या विरुध्द दिनांक २/११/२०२२ रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी प्रकरणात हजर राहून त्याचे उत्तर दाखल करीत नमूद केले की, सदर योजना ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कृषी विभागामार्फत शेतक-याच्या कल्याणाकरिता व त्याच्या हितार्थ राबविण्यात येत आहे. मयत श्री देवीदास यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा हा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे काढला असून शासनाच्या वतीने तक्रारदार आणि शासना यांच्यातील एक मध्यस्थी म्हणून विरुध्द पक्ष क्रमांक २ हे विमा सल्लागार म्हणून काम करतात. सदर योजनेव्दारे दावे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केल्यावर ते त्या दाव्याची पडताळणी करुन काही ञुटी असल्यास त्याची मागणी करुन सर्व कागदपञासह असे दावे विरुध्द पक्ष क्रमांक २ कडे पाठवितात. असे दावे विरुध्द पक्ष क्रमांक २ यांना प्राप्त झाल्यावर त्याची पडताळणी करुन तसेच काही ञुटी असल्यास त्याची मागणी करुन कागदपञ तक्रारकर्त्याकडून जिल्हा कृषी अधिकारी मार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे मंजूरीसाठी पाठविले जातात. प्रत्येक दाव्याची शहानिशा करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ हे दावे निकाली काढतात. दावा मंजूर अथवा नामंजूर करणे हे विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या अखत्यारीत आहे. विरुध्द पक्ष क्रमांक २ याचा त्यात काही सहभाग नसतो. तक्रारकर्तीचा दावा सन २०१९-२०२० या कालावधीत दिनांक १०/१२/२०१९ ते ९/१२/२०२० असून मयत शेतकरी श्री देवीदास ढोणे, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर दिनांक १२/१२/२०१९ असून सदर दावा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिनांक १/९/२०२० रोजी प्राप्त झाला असून जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे दिनांक २/११/२०२० रोजी प्राप्त झाला तसेच विरुध्द पक्ष क्रमांक २ कडे दिनांक २२/११/२०२० रोजी प्राप्त झाला. सदर दाव्याची छाननी करुन दिनांक ६/११/२०२१ रोजी पुढील निर्णयाकरिता विमा कंपनीकडे पाठविला. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दिनांक ११/२/२०२१ रोजी दावा नामंजूर केला. पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार क्लेम अपाञ ठरणारे कारण सुपूर्द केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपञानुसार विमाधारक यांना लोकोमोटर अपंगत्व आहे म्हणजे त्यांना कायम स्वरुपी अपंगत्व नाही, या आधारावर नामंजूर केला. सदर दावा विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी नामंजूर केला नाही. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्रमांक २ मुळे कोणताही प्रकारचा मानसिक ञास झाला नसून त्यांनी त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली असल्यामुळे सदर तक्रार विरुध्द पक्ष क्रमांक २ विरुध्द खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी त्याचे उत्तर प्रकरणात दाखल करीत नमूद केले की, शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन परिपञक क्रमांक शेअवि-२०१८/प्र.क्र. १९३/११ ऐ. मंञालय विस्तार, मुंबई ४०००३२, दिनांक १९/०१/२०१९ अन्वये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला प्रसिध्दी देऊन अपघात झालेल्या शेतक-याचे वारसान योग्य मार्गदर्शन करुन सविस्तर प्रस्ताव मा. जिल्हा कृषी अधिक्षक, कृषी अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्फत विमा कंपनीस सादर करण्यात येतात. विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार विरुध्द पक्ष क्रमांक १ ला आहे. तक्रारकर्तीचा सदर दावा विरुध्द पक्षाकडून विमा कंपनीस सादर करण्यात आला. सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयायकडून “Reject due to temporary disability’या कारणास्तव रद्द केला गेला.
- तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपञ, युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ चे उत्तर तसेच लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यावरुन निकालीकामी खालिल कारणमीमांसा नोंदविण्यात आले.
कारणमीमांसा - तक्रारककर्ती हिचे पती श्री देवीदास शिवाजी ढोणे हे शेतकरी होते व त्याचे नावे मौजा वाढोणा, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक ७३/१ ही शेतजमीन होती, याबाबत सातबारा उतारा प्रकरणात दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने खातेधारक शेतक-याचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता, ही बाब विरुध्द पक्ष यांनी मान्य केलेली आहे. मयत देवीदास शिवाजी ढोणेची तक्रारकर्ती ही पत्नी असल्यामुळे ती विमा योजनेची लाभधारक आहे, यावरुन तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष यांची ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. तक्रारकर्ती हिचे पती शेतकरी होते व महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्रातील खातेदार शेतकरी यांचा गोपीनाथ मुंडे शतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता त्यानुसार विरुध्द पक्ष यांच्या मार्फत तक्रारकर्तीच्या पतीचा विमा उतरविलेला होता. तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले की तिचे पती दिनांक १२/१२/२०१९ रोजी शेतातील झाडावरुन पडून त्यात ते ७० टक्के अपंग झाले व त्यानंतर त्या अपघाताने जखमी झाल्यावर उपचार चालू असतांनाच त्यांचा मृत्यु दिनांक १६/४/२०२१ रोजी झाला. तक्रारकर्ती हिने तक्रारकर्तीच्या मयत पती शेतातील आंब्याचे झाडावरुन पडल्याने त्यांना अपंगत्व आले, याबद्दलचा गुन्ह्याच्या तपशीलचा नमुना, घटनास्थळ पंचनामा तक्रारीत दाखल आहे तसेच तक्रारकर्तीचे पती मयत देवीदास ढोणे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपञ सुध्दा प्रकरणात दाखल असून सदर अपंगत्व प्रमाणपञाचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीच्या पतीला ७० टक्के अपंगत्व आले होते ही बाब दिसून येत आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघात होऊन अपंगत्व आल्यामुळे तिने विरुध्द पक्ष यांच्याकडे नियमानुसार दस्तऐवजासह विमा रक्कम मिळण्याकरिता दावा दाख केला परंतु विरुध्द पक्ष यांनी त्यावर काहीही उत्तर दिलेले नसल्यामुळे तक्रारकर्तीप्रति विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी सेवेत न्युनता दिली ही बाब सिध्द होते. तक्रारकर्तीच्या पतीला अपघाती अपंगत्व आल्यावर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यु दिनांक १६/४/२०२१ रोजी झाला, त्याबद्दलचे मृत्यु प्रमाणपञ तक्रारीत दाखल आहे. सबब तक्रारकर्ती हिने आधी तिच्या पतीचा ७० टक्के अपंगत्व आल्यामुळे रुपये १,००,०००/- चा विमा दावा विरुध्द पक्षाकडे दाखल केला आहे. सदर दावा विरुध्द पक्ष यांच्याकडे प्रलंबित असतांनाच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्याने तिने रुपये २,००,०००/- नुकसान भरपाईचा दावा मिळण्याची विरुध्द पक्ष यांच्याकडे दावा दाखल केला परंतु त्यावरही वर्षे उलटून गेल्यावर सुध्दा विरुध्द पक्ष यांनी उत्तर दिले नाही. तक्रारकर्तीने आयोगासमोर सदर तक्रार दाखल केली असता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना आयोगामार्फत नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष क्रमांक १ प्रकरणात हजर न झाल्यामुळे प्रकरण विरुध्द पक्ष क्रमांक १ विरुध्द एकतर्फा चालविण्यात आले तर विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी प्रकरणात उपस्थित राहून नमूद केले की कंपनीने ‘Reject due to temporary disability’या कारणास्तव तक्रारकर्तीचा दावा रद्द केला होता. विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी सुध्दा त्यांनी त्याचे काम चोखपणे पूर्ण केले आहे असे त्याच्या उत्तरात नमूद केलेले आहे परंतु आयोगाच्या मते तक्रारकर्तीने तिचा पतीचा दावा प्रलंबित असतांनाच पहिला दावा अपंगत्वाबद्दल नुकसान भरपाईचा दाव्या बद्दल काहीही न कळविणे तसेच त्या आजारपणातच उपचारादरम्यान तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने पुन्हा रुपये २,००,०००/- साठी अपघाती मृत्यु संदर्भात विमा रकमेची मागणी दस्तऐवजाची पुर्तता करुन सुध्दा काहीही तक्रारकर्तीला न कळवून तक्रारकर्तीप्रति सेवेत न्युनता दिली आहे असे आयोगाचे मत आहे. तक्रारकर्तीचा पतीचा दावा तात्पुरते अपंगत्व आलेले असल्याने रद्द केला असे विरुध्द पक्ष क्रमांक २ चे उत्तर आहे पंरतु त्याबाबतचे तसे दावा नाकारण्याचे पञ विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला पाठविले नाही किंवा सदर प्रकरणातही येऊन त्यांनी त्याबद्दलचे काही खुलासा केला नाही. मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली यांचा Revision No. 1664 of 2011, dated 10/03/2011, Reliance General Insurance Co. Ltd. Vs. Smt. Sakorba Jadeja या न्यायनिवाड्यात विमा धारकाच्या फायद्यासाठी विमा पॉलिसी करार आहे. त्यामुळे विमा धारकांच्या हितासाठी प्राधान्य दिले पाहिजे हे विवेचनाचे स्थीर तत्व आहे. सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीचा अपघाती विमा दावा प्रकरण दस्तऐवजाची पूर्ण पुर्तता करुनही प्रलंबित ठेवून सेवेमध्ये ञुटी दिली आहे. तक्रारकर्ती हिने तिच्या तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ सह विरुध्द पक्ष क्रामंक ३ कडे सादर केलेला दावा तसेच सातबारा व इतर शेतीचे कागदपञ तसेच तिच्या पतीच्या अपघाताबाबत ग्रामपंचायत चिंचोली याचे प्रमाणपञ तसेच अपघाताबाबत पोलीस पाटील यांचे प्रमाणपञ व पतीचे मृत्यु प्रमाणपञ व पतीच्या अपघाताबाबत जनरल पोलीस स्टेशन डायरी व इतर पोलीस दस्तऐवज यावरुन ही बाब स्पष्ट होत आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाडावरुन पडून अपंगत्व आले व त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला परंतु तिच्या पतीचा अपघाती विमा दाव्याची रक्कम रुपये २,००,०००/- नाकारुन तक्रारकर्तीला सेवा देण्यास ञुटी केलेली आहे. सबब आयोगाच्या मते तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक ञास सहन करुन आयोगात तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे सदरच्या खर्चापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी असे आयोगाचे मत असल्यामुळे आयोग खालील आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार क्रमांक CC/२२१/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रुपये २,००,०००/- व त्यावर तक्रार आदेशाच्या तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. ७ टक्के व्याजासह द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |