न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. प्रस्तुतची तक्रार स्वीकृत होवून जाबदार यांना नोटीस आदेश झाले. जाबदार यांनी आयोगासमोर हजर होवून आपले म्हणणे दाखल केले. तक्रारदार यांचे स्वतःचे बजाज पल्सर 150 या मॉडेलचे दुचाकी वाहन क्र. एम.एच.-09-सीडी-4474 असून या दुचाकीचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला आहे. विमा पॉलिसीचा क्र. 162800311P113275386 असा असून पॉलिसीचा कालावधी दि. 02/02/2016 ते 01/02/2017 असा आहे. दि. 15/05/2016 रोजी तक्रारदाराचा मुलगा कामावर जात असताना सदर वाहनाची टायमिंग चेन तुटल्यामुळे त्याने सदर वाहन पोर्ले गावातील त्यांचे पाहुणे श्री विष्णू शंकर घाटगे यांचे घराचे दारात लावले. दि. 20/5/2016 रोजी संध्याकाळी तक्रारदार हे सदर वाहन टेम्पोत घालून घरी घेवून येणेकरिता पोर्ले येथील पाहुण्यांच्या घरी गेले असता सदर दुचाकी वाहन दारातून कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले असे तक्रारदाराचे पाहुण्यांनी तक्रारदारास सांगितले. म्हणून तक्रारदाराने दि. 28/05/2016 रोजी पोलिस स्टेशनकडे जावून सदर वाहनाच्या चोरीबाबत फिर्याद नोंदविली. तदनंतर तक्रारदाराने संपूर्ण कागदपत्रांसहीत जाबदार यांचेकडे क्लेम फॉर्म दाखल केला. परंतु जाबदार यांनी तक्रारदाराचा क्लेम, तक्रारदाराने विमा कंपनीस तीन महिना उशिरा चोरीच्या घटनेची माहिती दिली तसेच चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना घटना घडल्यानंतर आठ दिवसांनी दिली, वाहनाची योग्य ती सुरक्षा तक्रारदाराकडून घेतली गेली नाही अशी चुकीची कारणे देवून नाकारला आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास गंभीर सेवात्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे स्वतःचे बजाज पल्सर 150 या मॉडेलचे दुचाकी वाहन क्र. एम.एच.-09-सीडी-4474 असून तिचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला आहे. विमा पॉलिसीचा क्र. 162800311P113275386 असा असून पॉलिसीचा कालावधी दि. 02/02/2016 ते 01/02/2017 असा आहे. सदरचे वाहन हे तक्रारदार यांचा मुलगा वापरत होता. दि. 15/05/2016 रोजी तक्रारदाराचा मुलगा कामावर जात असताना सदर वाहनाची टायमिंग चेन तुटल्यामुळे त्याने सदर वाहन पोर्ले गावातील त्यांचे पाहुणे श्री विष्णू शंकर घाटगे यांचे घराचे दारात लवली. दि. 20/5/2016 रोजी संध्याकाळी तक्रारदार हे सदर वाहन टेम्पोत घालून घरी घेवून येणेकरिता पोर्ले येथील पाहुण्यांच्या घरी गेले असता सदर दुचाकी वाहन दारातून कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले असे तक्रारदाराचे पाहुण्यांनी तक्रारदारास सांगितले. म्हणून तक्रारदाराने तातडीने पोलिस स्टेशन गाठून फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. पोलिसांच्या सूचनेनुसार तक्रारदारांनी सदर वाहनाची आपल्या परीने खूप शोधाशोध केली तथापि वाहन मिळून आले नाही. म्हणून तक्रारदाराने दि. 28/05/2016 रोजी पोलिस स्टेशनकडे जावून सदर वाहनाच्या चोरीबाबत फिर्याद नोंदविली. तदनंतर तक्रारदाराने संपूर्ण कागदपत्रांसहीत जाबदार यांचेकडे क्लेम फॉर्म दाखल केला. परंतु जाबदार यांनी तक्रारदाराचा क्लेम, तक्रारदाराने विमा कंपनीस तीन महिना उशिरा चोरीच्या घटनेची माहिती दिली तसेच चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना घटना घडल्यानंतर आठ दिवसांनी दिली, वाहनाची योग्य ती सुरक्षा तक्रारदाराकडून घेतली गेली नाही अशी चुकीची कारणे देवून नाकारला आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास गंभीर सेवात्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदारास विमाक्लेमची रक्कम रु. 36,000/-, व सदर रकमेवर दि. 20/5/16 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळावे तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देणेबाबत जाबदार यांना आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत जाबदार यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, वर्दी रिपोर्ट, गोपाळ शंकर पाटील यांचा जबाब, अ समरी मंजुरीकरिता पत्र, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा पॉलिसी शेडयुल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. जाबदार यांना नोटीस लागू झालेनंतर जाबदार यांनी आयोगासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. जाबदार यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. जाबदार यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी वाहन चोरीची तक्रार पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये नोंदविली आहे. परंतु पन्हाळा पोलिसांनी योग्य तो तपास करुन तक्रारदार यांचे वाहन खरेच चोरीस गेले बाबत तक्रारदार यांचे शपथपत्र घेवून सदर गुन्हयाची अ समरी वर्गात समरी दाखल केले विषयीची कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तक्रारदार यांनी जाबदार विमा कंपनीस चोरीच्या घटनेबाबत तीन महिने उशिरा कळविल्याने विमा पॉलिसीचे अट क्र.1 चे तक्रारदाराने उल्लंघन केले आहे. जाबदार यांनी सदर घटनेबाबत मोमीन सर्व्हेअर यांची नेमणूक केली. त्यांनी केलेल्या तपासा दरम्यान असे आढळून आले की, तक्रारदाराने सदरचे वाहन हे दि.15/5/2016 ते 20/5/16 या कालावधीत श्री विष्णू शंकर घाटगे यांच्या घरासमोरील रोडवर असुरक्षितरित्या व अजअटेंडेडपणे लावली होती. अशा प्रकारे तक्रारदार यांनी विमा पॉलिसीच्या अट क्र.4 चे उल्लंघन केले आहे. तक्रारदार यांनी सदरचे वाहन हे श्री वसंतराव चौगुले पतसंस्था यांचेकडे कर्जाने घेतले होते. सदरचे कर्जाचे हप्ते तक्रारदार यांनी भरले नसलेने सदरचे वाहन हे चोरीस गेलेचा बनाव तक्रारदार करीत आहेत. जरी हे मंच तक्रारदार यांचे वाहन चोरीला गेले या निष्कर्षाप्रत आले तरी सदरचे वाहन हे निव्वळ तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे चोरीस गेल्याने जाबदार यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी न दिलेने तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.
5. जाबदार यांनी याकामी कागदयादीसोबत विमा पॉलिसी, सर्व्हेअर यांचा रिपोर्ट, गोपाळ शंकर पाटील यांचा जबाब, विष्णू शंकर घाटगे यांचा जबाब, श्री प्रमोद गोपाळ पाटील यांचा जबाब, तक्रारदार यांनी आर.टी.ओ. कोल्हापूर यांना दिलेले पत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र, मोमीन सर्व्हेअर यांचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच जाबदार यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांचे स्वतःचे बजाज पल्सर 150 या मॉडेलचे दुचाकी वाहन क्र. एम.एच.-09-सीडी-4474 असून तिचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला आहे. विमा पॉलिसीचा क्र. 162800311P113275386 असा असून पॉलिसीचा कालावधी दि. 02/02/2016 ते 01/02/2017 असा आहे. वि.प. यांनी सदरचे वाहनाची पॉलिसी याकामी दाखल केली आहे. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार जाबदार यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांचे स्वतःचे बजाज पल्सर 150 या मॉडेलचे दुचाकी वाहन क्र. एम.एच.-09-सीडी-4474 असून तिचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला आहे. विमा पॉलिसीचा क्र. 162800311P113275386 असा असून पॉलिसीचा कालावधी दि. 02/02/2016 ते 01/02/2017 असा आहे. दि. 15/05/2016 रोजी तक्रारदाराचा मुलगा कामावर जात असताना सदर वाहनाची टायमिंग चेन तुटल्यामुळे त्याने सदर वाहन पोर्ले गावातील त्यांचे पाहुणे श्री विष्णू शंकर घाटगे यांचे घराचे दारात लावली. दि. 20/5/2016 रोजी संध्याकाळी तक्रारदार हे सदर वाहन टेम्पोत घालून घरी घेवून येणेकरिता पोर्ले येथील पाहुण्यांच्या घरी गेले असता सदर दुचाकी वाहन दारातून कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले असे तक्रारदाराचे पाहुण्यांनी तक्रारदारास सांगितले. म्हणून तक्रारदाराने दि. 28/05/2016 रोजी पोलिस स्टेशनकडे जावून सदर वाहनाच्या चोरीबाबत फिर्याद नोंदविली. तदनंतर तक्रारदाराने संपूर्ण कागदपत्रांसहीत जाबदार यांचेकडे क्लेम फॉर्म दाखल केला. परंतु जाबदार यांनी तक्रारदाराचा क्लेम, तक्रारदाराने विमा कंपनीस तीन महिना उशिरा चोरीच्या घटनेची माहिती दिली तसेच चोरीच्या घटनेची माहिहती पोलिसांना घटना घडल्यानंतर आठ दिवसांनी दिली, वाहनाची योग्य ती सुरक्षा तक्रारदाराकडून घेतली गेली नाही अशी चुकीची कारणे देवून नाकारला आहे.
9. वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचेविरुध्द पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत. ते असे की, तक्रारदार यांचे मतानुसार, त्यांनी वाहन चोरीची तक्रार पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये नोंदविली आहे. परंतु पन्हाळा पोलिसांनी योग्य तो तपास करुन तक्रारदार यांचे वाहन खरेच चोरीस गेले बाबत तक्रारदार यांचे शपथपत्र घेवून सदर गुन्हयाची अ समरी वर्गात समरी दाखल केले विषयीची कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तक्रारदार यांनी जाबदार विमा कंपनीस चोरीच्या घटनेबाबत तीन महिने उशिरा कळविल्याने विमा पॉलिसीचे अट क्र.1 चे तक्रारदाराने उल्लंघन केले आहे. जाबदार यांनी सदर घटनेबाबत मोमीन सर्व्हेअर यांची नेमणूक केली. त्यांनी केलेल्या तपासा दरम्यान असे आढळून आले की, तक्रारदाराने सदरचे वाहन हे दि.15/5/2016 ते 20/5/16 या कालावधीत श्री विष्णू शंकर घाटगे यांच्या घरासमोरील रोडवर असुरक्षितरित्या व अजअटेंडेडपणे लावली होती. अशा प्रकारे तक्रारदार यांनी विमा पॉलिसीच्या अट क्र.4 चे उल्लंघन केले आहे. तक्रारदार यांनी सदरचे वाहन हे श्री वसंतराव चौगुले पतसंस्था यांचेकडून कर्जाने घेतले होते. सदरचे कर्जाचे हप्ते तक्रारदार यांनी भरले नसलेने सदरचे वाहन हे चोरीस गेलेचा बनाव तक्रारदार करीत आहेत.
10. जाबदार विमा कंपनीने घेतलेल्या, सदर गुन्हयाची अ समरी व फायनल वर्गात दाखल केलेविषयीचे कोणतेही कागदपत्रे दाखल नाहीत या आक्षेपाचे अवलोकन करता, तक्रारअर्जाचे कागदयादीसोबत तक्रारदाराने सदरची कागदपत्रे दाखल केली आहेत. सबब, सदरचा आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे. तक्रारदाराने वि.प. कंपनीस दि. 25/8/2016 रोजी म्हणजेच वाहन चोरीस गेल्यापासून तीन महिन्यांनी कळविले असे जरी असले तरी तक्रारदाराने सदरचे वाहन चोरीस गेलेची तोंडी माहिती प्रत्यक्षात जावून लगेचच दिलेली होती असे शपथेवर कथन केले आहे. सबब, क्लेम करणेस अथवा माहिती देणेस तीन महिन्यांचा उशिर ही तांत्रिक बाब असलेने केवळ या कारणास्तव विमा दावा नाकरणे ही बाब या मंचास संयुक्तिक वाटत नाही. इतकेच नव्हे तर वि.प. कंपनीने दि. 15/05/2016 ते 20/5/2016 इतके दिवस गाडी ही विष्णू शंकर घाटगे यांच्या घरासमोर होती असे सर्व्हे रिपोर्टमध्ये समजून आलेचे कथन केले आहे. मात्र असे कथन सर्व्हेअर यांनी शपथेवर केलेचे दिसून येत नाही व तसा कोणताच पुरावा या आयोगासमोर नसलेने सदरचा वि.प. कंपनीने घेतलेला हा आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहे. या संदर्भात तक्रारदार व वि.प.विमा कंपनीने काही वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय दाखल केले आहेत. त्याचाही विचार हे आयोग करीत आहे. वि.प. यांनी खालील न्यायनिर्णय दाखल केला आहे.
IV (2019) CPJ 183 (NC)
National Insurance Co.Ltd. Vs. Tarlok Singh
50% of insurance claim allowed – IDV of vehicle as per policy was Rs.4,37,566/- - Insurance company is directed to pay amount of Rs.2,18,783/- to complainant alongwith interest @ 6 p.a.
तक्रारदार यांनी याकामी वरिष्ठ न्यायालयाचा खालील न्यायनिर्णय दाखल केला आहे.
Revision petition No. 2937/2015 decided by National Commission
on 19th June 2019.
National Insurance Co.Ltd. Vs. Tarlok Singh
Hon’ble Supreme Court in Amalendu Sahoo Vs. Oriental Insurance Co.Ltd. II (2010) CPJ 9 (SC) has opined that even in cases where there is any breach of warranty/conditions of policy, an amount upto 75% of the admissible claim can be agreed to.
सदर निवाडयाचा विचार करता, तक्रारदार हे नॉन-स्टँडर्ड बेसीसवर विमा रक्कम रु.36,000/- च्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रक्कम रु.27,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तक्रारदार यांनी मागितलेली मानसिक त्रासापोटीची व खर्चापोटीची रक्कम अनुक्रमे रु.25,000/- व रु.5,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने त्यापोटी अनुक्रमे रक्कम रु.5,000/- व रु.3,000/- देणेचे आदेश जाबदार यांना करणेत येतात. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु.27,000/- तक्रारदार यांना अदा करावी. सदरचे रकमेवर जाबदार यांनी तक्रारदार यांना विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश जाबदार यांना करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी जाबदार यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची जाबदार यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.