Maharashtra

Kolhapur

CC/20/373

Suvarna Madhukar Berakal - Complainant(s)

Versus

The Oriantal Insu.Co.Ltd - Opp.Party(s)

R.G.Shelake

07 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/20/373
( Date of Filing : 05 Nov 2020 )
 
1. Suvarna Madhukar Berakal
At.Talegaon, Tal.Radhanagri
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriantal Insu.Co.Ltd
204 Station Road, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 07 Mar 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35  प्रमाणे दाखल केला आहे.  

 

      तक्रार अर्जातील कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे— तक्रारदार या तक्रारीत नमुद गावच्‍या रहिवाशी असून तक्रारदार यांचा मुख्‍य व्‍यवसाय शेती आहे. तक्रारदार यांचे पतीचे नावे 7/12 असून त्‍यांचे जमिनीचा खाते क्र.391 असा आहे. तक्रारदार यांचे पतीचा वि प कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. त्‍याचा विमा पॉलीसी नं.163500/47/2017/65 असा होता. सदर पॉलीसीचा हप्‍ता वि प कंपनीकडे शासनामार्फत अदा केलेला आहे. दि.25/04/2018 रोजी तक्रारदार यांचे पती त्‍यांचे स्‍वत:चे बोंडगी नावचे शेतातील बाधावरील फणसाचे झाडाचा बेना करत असताना अपघाताने पाय घसरुन पडून बेशुध्‍द झाले. त्‍यावेळी त्‍यांना औषधोपचाराकरिता कसबा तारळे येथील ग्रामीण रुग्‍णालयात घेऊन जात असताना वाटेतच मयत झाले. तक्रारदार यांचे घरातील लोक अशिक्षीत व अज्ञानी असलेने व तक्रारदार अत्‍यंत दुर्गम भागात रहात असलेने तक्रारदाराचे पतीचे प्रेताचे शवविच्‍छेदन करणे तसेच घटनेबाबत पोलिसांत वर्दी देणे नजरचुकीने व समजुन न आलेने राहून गेले. परंतु तक्रारदाराचे पती अपघाताने फणसाचे झाडावरुन पडून मयत झालेबाबतची वस्तुस्थिती खरी असलेबद्दलचा पंचनामा व दाखला गावकामगार पोलीस पाटील मौजे तळगांव ता. राधानगरी यांनी दिलेला आहे. तक्रारदार यांनी विमा प्रस्‍तावासाठी लागणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तालुका कृषी अधिकारी, राधानगरी श्री एस.डी. बरकाळे यांची भेट घेऊन विमा प्रस्‍ताव दाखल करुन घेणेबाबत विनंती केली असता प्रस्‍ताव दाखल करणेस विलंब झाला आहे असे सांगून विमा प्रस्‍ताव दाखल करुन घेतला नाही म्‍हणून तक्रारदाराने सदर विमा प्रस्‍ताव रजि.पोष्‍टाने वि प कंपनीस व जिल्‍हा कृषी अधिकारी यांना पाठविला होता. परंतु जिल्‍हा कृषी अधिकारी कोल्‍हापूर यांनी दि.24/02/2020 रोजीचे पत्राने तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा मुदतीत दाखल नाही त्‍यामुळे विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी स्विकारला नाही असे कळविले व वि प कंपनीने दि.14/01/2020 रोजीचे पत्राने तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचे माध्‍यमातून न आलेचे कारणावरुन परत दिलेला आहे. परंतु तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव विलंबाचे कारणास्‍तव वि प कंपनीस नाकारता येणार नाही. तक्रारदार ही मौजे तळगांव पैकी बेरकळवाडी या अतीदूर्गम भागातील असून ती अशिक्षीत व कायदयाचे ज्ञान नसलेली अबला स्‍त्री आहे. तिचे कुटूंबाचे शेतीशिवाय अन्‍य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. वि प यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सेवा देण्‍यास कसूर केला असलेने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.

 

2.    प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने वि.प. कंपनीकडून तक्रारदाराचे पतीचे अपघाती मृत्‍यूपश्‍चात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमाक्‍लेमची रक्‍कम रु.2,00,000/- व सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे.18 दराने व्‍याजसह मिळावी. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/-, व तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 19 कडे अनुक्रमे विमा प्रस्‍तावासोबत दिलेले पत्र, विमा क्‍लेम फॉर्म भाग-1, व सहप्रपत्र, मिळकतीचा 8-अ व 7/12 उतारा, जुनी डायरी उतारा, नवीन डायरी उतारा, घोषणापत्र अ व  ब, विमा प्रस्‍तावासोबतचे प्रतिज्ञापत्र, गाव कामगार पो.पाटील यांनी केलेला घटनास्‍थळाचा पंचनामा, दाखला, मधुकर सत्‍याप्‍पा बेरकळ यांचा मृत्‍यूदाखला, तक्रारदाराचे रेशनकार्ड,आधारकार्ड, तक्रारदाराचे पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक, वि प कंपनीने विमा प्रस्‍ताव नाकारलेचे पत्र, व जिल्‍हा कृषी अधिकारी यांनी प्रस्‍ताव स्विकारला नसलेबाबतचे दिलेले पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, तसेच अॅफिडेव्‍हीट हेच लेखी युक्‍तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली.

 

4.    वि.प. यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट, तसेच पुरावा शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, तसेच अॅफिडेव्‍हीट हेच लेखी युक्‍तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली.

 

.  वि.प. ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    वि.प. यांनी कोणत्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही.  वि.प. यांचे म्‍हणणेप्रमाणे तक्रारदार यांनी सदर विमाप्रस्‍ताव वि प कंपनीस व जिल्‍हा कृषी अधिकारी यांना रजिस्‍टर पोष्‍टाने पाठविला. तथापि, जिल्‍हा कृषी अधिकारी यांनीही दि.24/02/2020 चे पत्राने तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा मुदतीत दाखल केलेला नसलेने विमा कंपनीने स्विकारलेला नाही असे कळविले आहे. सबब तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा मुतदीत नसलेने तालुका कृषी अधिकारी राधानगरी तसेच जिल्‍हा कृषी अधिकारी यांनी स्विकारणेस नकार दिलेवर तक्रारदार यांनी त्‍यांचे सदर आदेशाविरुध्‍द मा. जिल्‍हाधिकारी यांचेकडे तक्रार / अपिल दाखल करुन विलंब माफीचे अर्ज कारणासह देऊन अपिल दाखल करणे जरुरीचे होते. तथापि, तक्रारदारांनी सदरील कायदेशीर मार्गाचा वापर न करता सदर आयोगात तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार ही मुदतपूर्व (Premature) दाखल आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा. 

 

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय.

2

वि.प. क्र.1विमा कंपनीने तक्रारदाराचा विमाक्‍लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमाक्‍लेमची रक्‍कम व्‍याजासह व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदाराचे मयत पतीचा वि.प विमा कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा उतरविलेला होता. सदर पॉलिसीचा क्र.163500/47/2017/65 असा आहे.  सदरची बाब वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्‍यू झालेनंतर तक्रारदार हे पत्‍नी या नात्‍याने मयत यांचे सरळ व कायदेशीर वारस आहेत.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

7.    दि.25/04/2018 रोजी तक्रारदार यांचे पती त्‍यांचे स्‍वत:चे बोंडगी नावचे शेतातील बाधावरील फणसाचे झाडाचा बेना करत असताना अपघाताने पाय घसरुन पडून बेशुध्‍द झाले. त्‍यावेळी त्‍यांना औषधोपचाराकरिता कसबा तारळे येथील ग्रामीण रुग्‍णालयात घेऊन जात असताना वाटेतच मयत झाले. तक्रारदार व त्‍यांचे नातेवाईक अशिक्षीत व अज्ञानी असलेने व तक्रारदार अत्‍यंत दुर्गम भागात रहात असलेने तक्रारदाराचे पतीचे प्रेताचे शवविच्‍छेदन करणे तसेच घटनेबाबत पोलिसांत वर्दी देणे नजरचुकीने व समजुन न आलेने राहून गेले. परंतु तक्रारदाराचे पती अपघाताने फणसाचे झाडावरुन पडून मयत झालेबाबतची वस्तुस्थिती खरी असलेबद्दलचा पंचनामा व दाखला गावकामगार पोलीस पाटील मौजे तळगांव ता. राधानगरी यांनी दिलेला आहे. तक्रारदार यांनी विमा प्रस्‍तावासाठी लागणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचेकडे विमा प्रस्‍तावा दाखल करुन घेणेबाबत विनंती केली असता प्रस्‍ताव दाखल करणेस विलंब झाला आहे असे सांगून विमा प्रस्‍ताव दाखल करुन घेतला नाही म्‍हणून तक्रारदाराने सदर विमा प्रस्‍ताव रजि.पोष्‍टाने वि प कंपनीस व जिल्‍हा कृषी अधिकारी यांना पाठविला होता. परंतु जिल्‍हा कृषी अधिकारी कोल्‍हापूर यांनी दि.24/02/2020 रोजीचे पत्राने तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा मुदतीत दाखल नाही त्‍यामुळे विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी स्विकारला नाही असे कळविले व वि प कंपनीने दि.14/01/2020 रोजीचे पत्राने तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचे माध्‍यमातून न आलेचे कारणावरुन परत दिलेला आहे. तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव विलंबाचे कारणास्‍तव वि प कंपनीस नाकारता येणार नाही.

 

      वि प यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी सदर विमाप्रस्‍ताव वि प कंपनीस व जिल्‍हा कृषी अधिकारी यांना रजिस्‍टर पोष्‍टाने पाठविला. तथापि, जिल्‍हा कृषी अधिकारी यांनीही दि.24/02/2020 चे पत्राने तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा मुदतीत दाखल केलेला नसलेने विमा कंपनीने स्विकारलेला नाही असे कळविले आहे. सबब तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा मुतदीत नसलेने तालुका कृषी अधिकारी राधानगरी तसेच जिल्‍हा कृषी अधिकारी यासंनी स्विकारणेस नकार दिलेवर तक्रारदार यांनी त्‍यांचे सदर आदेशाविरुध्‍द मा. जिल्‍हाधिकारी यांचेकडे तक्रार / अपिल दाखल करुन विलंब माफीचे अर्ज कारणासह देऊन अपिल दाखल करणे जरुरीचे होते. तथापि, तक्रारदारांनी सदरील कायदेशीर मार्गाचा वापर न करता सदर आयोगात तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार ही मुदतपूर्व (Premature) दाखल आहे.

 

      सदरकामी विमा प्रस्‍ताव उशीराचे कारण देऊन कृषी अधिकारी यांनी स्विकारला नाही. तसेच वि प यांनी विमा क्‍लेम हा कृषी अधिका-यांमार्फत आला नसलेचे कारण देऊन नाकारला आहे. पण कृषी अधिकारी यांनी उशिराचे कारण देऊन विमाप्रस्‍ताव स्विकारला नाही, त्‍यामुळे तक्रारदाराने वि प कंपनीकडे सदर विमा प्रस्‍ताव पाठविला आहे. मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांनी त्‍यांच्‍या वेगवेगळया न्‍यायनिवाडयात नमुद केले आहे की, उशिराचे कारण देऊन विमा क्‍लेम नाकारता येणार नाही. सबब तक्रारदाराचा विमा क्‍लेम वि प यांनी नाकारुन सेवा त्रुटी केली आहे. याकामी तक्रारदाराने गावकामगार पोलीस पाटील यांचा घटनास्‍थळाचा पंचनामा दाखल केला आहे. तसेच तक्रारदाराचे पती झाडावरुन पडून जखमी झाले व उपचारासाठी नेत असताना मयत झालेबाबतचा दाखला दिला आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदाराचे पती कै.मधुकर सत्‍यापा बेरकळ हे शेतातील बांध्‍यावरील फणसाचे झाडाचे बेना करत असताना अपघाताने पाय घसरुन पडून जखमी होऊन बेशुध्‍द झाले व औषधोपचारासाठी नेत असताना वाटेतच मयत झाले ही वस्‍तुस्थिती आहे असे कथन केले आहे. यावरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा फणसाच्‍या झाडाचे बेना करत असताना पाय घसरुन पडला व मयत झाला ही बाब स्‍पष्‍ट होते. यासाठी हे आयोग खालील न्‍यायनिवाडयाचा आधार घेत आहे.

 

1(2009) CPJ 156 – Oriental Insurance Co. Ltd. Vs Manjit Kaur –

 

Consumer Protection Act, 1986 –Sec.2(1) (g) – Insurance –Accidental death – Insured died of accidental death by fall from roof – claim repudiated –Accidental  death of insured proved by certificate of Sarpanch, SHO and Investigator’s report – Death by accidental fall not excluded by terms and conditions of policy – claim wrongly disallowed – Insured liable under policy.   

 

            सबब वि प यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा देऊन सेवेत त्रुटी केलेच्‍या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. घरातील कर्ता पुरुष आकस्मिक अपघाताने मयत झाल्‍यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशा प्रसंगी विमाक्‍लेम लवकरात लवकर मंजूर करणे ही वि.प. यांची कायदेशीर जबाबदारी होती.  परंतु तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन सदरची जबाबदारी वि.प. यांनी पार पाडलेली नाही.  सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम रु.2,00,000/- व त्‍यावर सदर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.14/01/2020 पासून तक्रारदाराचे हाती प्रत्‍यक्ष पडले तारखेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी  रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

आदेश

 

 

1)    तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना, विमाक्‍लेमची रक्‍कम रु.2,00,000/- अदा करावी व सदर रक्‍कमेवर विमा क्‍लेम नाकारलेपासून म्‍हणजे दि.14/01/2020 पासून तक्रारदाराचे हाती पडले तारखेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्‍वये वि प विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.