Maharashtra

Gadchiroli

CC/7/2014

Smt. Chandraprabha Dinkar Balapure - Complainant(s)

Versus

The New India Insurance Co. Ltd. Mumbai Through Divisional Manager Shri. Mahan Digambar Limaye & 2 O - Opp.Party(s)

Adv. Uday Kshirsagar

27 Nov 2014

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli, M.I.D.C. Road, T - Point, Navegaon, Tah. Dist. Gadchiroli, Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/7/2014
 
1. Smt. Chandraprabha Dinkar Balapure
Age- 46 yr., Occu.- Housewife, At.Po. Palasgaon, Tah. Kurkheda
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Insurance Co. Ltd. Mumbai Through Divisional Manager Shri. Mahan Digambar Limaye & 2 Ohers
Divisional Office No. 130800, New India Center, 7th Floor, 17-A, Cooprej Road, Mumbai-400001
Mumbai
Maharashtra
2. The New India Insurance Co. Ltd through The Zonal Manager Shri. Gurunath Reddi Patil
M.E.C.L. Complex, Seminary Hills, Nagpur-440018
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krushi Adhikari
At.Po.Tah. Kurkheda
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 27 नोव्‍हेंबर 2014)

                                      

                  अर्जदार हीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदार हिचा पती दिनकर रामजी बाळापुरे यांच्‍या मालकीचे पो.पळसगांव, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली येथे भुमापन क्र.35 ही शेतजमीन असून अर्जदाराचा पती शेतीचा व्‍यवसाय करीत होते.  शेतीतील उत्‍पन्‍नावर अर्जदाराचा पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. अर्जदार हीचा पती शेतीच्‍या कामानिमीत्‍त आपल्‍या मोटारसायकलने जात असतांना दुस-या महिंद्रा पीकअप जीपने निष्‍काळजीने चालवून धडक दिल्‍याने दि.2.7.2013 रोजी मृत्‍यु झाला. गैरअर्जदार क्र.1 व 2 विमा कंपनी असून शासनाचे वतीने गैरअर्जदार क्र.3 हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्विकारतात.  शासनाच्‍या वतीने गैरअर्जदार क्र.3 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत अर्जदाराचे पतीचा रुपये 1,00,000/- चा विमा शासनाच्‍या वतीने उतरविला होता. अर्जदाराचे पतीचा अपघातात मृत्‍यु झाल्‍याने अर्जदार गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- घेण्‍यास पाञ होती. अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.3 कडे दि.2.9.2013 रोजी रीतसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेले दस्‍ताऐवजाची पुर्तता केली. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदार हिच्‍या पतीच्‍या दाव्‍याबाबत सहा म‍हीने ऊलटूनही मंजूर अथवा नामंजूर न कळवल्‍याने, अर्जदार हीने वकीलामार्फत दि.11.3.2014 ला कायदेशिर नोटी गैरअर्जदार क्र.1 ला पाठविली. सदर नोटीसला गैरअर्जदार क्र.1 ने उत्‍तर दिले नाही. गैरअर्जदार हे सेवेमध्‍ये ञुटी देत आहे. त्‍यामुळे अर्जदारास मानसीक ञास झाला.  त्‍यामुळे, गैरअर्जदारांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- दि. 2.9.2013 पासून द.सा.द.शे. 18 % व्‍याजाने मिळण्‍याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्‍याचे आदेश व्‍हावे, अशी प्रार्थना केली. 

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 13 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.11 नुसार लेखी उत्‍तर व नि.क्र.13 नुसार 4 दस्‍ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.18 नुसार गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले लेखीउत्‍तर हे गैरअर्जदार क्र.2 चे समजण्‍यात यावे अशी परसीस दाखल केली.  गैरअर्जदार क्र.3 ला नि.क्र.7-अ नुसार नोटीस मिळून सुध्‍दा हजर झाले नाही व लेखी उत्‍तर दाखल केले नाही, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.3 विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश नि.क्र.1 वर दि.24.9.2014 ला पारीत करण्‍यात आला.

 

3.          गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 वर त्‍याचे लेखी बयाण दाखल केले.  गैरअर्जदार क्र.1 ने त्‍याचे लेखी बयाणात असे कथन केले आहे की, अर्जदाराने लावलेले सर्व आरोप खोटे असून त्‍यांना नाकबूल आहे.  गैरअर्जदाराने हे मान्‍य केले आहे की, महाराष्‍ट्र शासनाने गैरअर्जदाराचे कंपनीला ग्रुप जनता अपघात व्‍यक्‍तीगत विमा योजने अंतर्गत सन 2011 ते 2013 पर्यंत नियुक्‍ती केली होती.  गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे की, अर्जदाराचे मय्यत पती मोटारवर शेतीच्‍या कामाकरीता जात असतांना अपघातामध्‍ये मरण पावले.  गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे की, मय्यत जवळ ड्रायव्‍हींग लायसन्‍स नसल्‍यामुळे तो स्‍वतः मोटार सायकल अपघाताचे वेळी चालवीत असून, मोटार वाहन कायद्याचे उल्‍लंघन केले आहे.  महाराष्‍ट्र शासन व इतर पक्ष व गैरअर्जदार यांचे ञिपक्षीय करारानुसार मय्यतने मोटार वाहन कायद्याचे उल्‍लंघन केले आहे.  त्‍यामुळे अर्जदाराचा विमा क्‍लेम रद्द होण्‍यास पाञ आहे.  तसेच, दाखल दस्‍ताऐवजाचे कारणाने अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली आहे.  

 

4.          अर्जदाराने नि.क्र.20 नुसार शपथपञ व नि.क्र.21 नुसार लेखी युक्‍तीवाद, व नि.क्र.25 नुसार 6 केस लॉ दाखल केले.  गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.23  नुसार शपथपञ व नि.क्र.24 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 विरुध्‍द नि.क्र.1 वर दि. 24.9.2014  ला एकतर्फा आदेश पारीत केला. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                   :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?           :  होय

 

2)    गैरअर्जदार क्र.1 व 2  ने लाभार्थ्‍याप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण :  होय

व्‍यवहार केला आहे काय ?

 

3)    अर्जदाराचा दावा मंजूर होण्‍यास पाञ आहे काय ?          : अंतिम आदेशाप्रमाणे

 

                                                      

- कारण मिमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-  

 

5.          अर्जदार हिचा पती दिनकर रामजी बाळापुरे यांच्‍या मालकीचे पो.पळसगांव, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली येथे भुमापन क्र.35 ही शेतजमीन असून अर्जदाराचा पती शेतीचा व्‍यवसाय करीत होते.  शेतीतील उत्‍पन्‍नावर अर्जदाराचा पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते.  अर्जदाराचे पतीचा रुपये 1,00,000/- चा विमा शासनाच्‍या वतीने गैरअर्जदार क्र.3 चे मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून उतरविला होता.  ही बाब, गैरअर्जदार क्र.1 व 2 ला मान्‍य असून, अर्जदार ही मय्यताची वारसदार आहे ही बाब सुध्‍दा गैरअर्जदार क्र.1 व 2 ला मान्‍य असून अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 व 2 ची ग्राहक आहे, असे सिध्‍द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.  

 

मुद्दा क्रमांक 2 बाबत :-  

 

6.          अर्जदाराने नियमाप्रमाणे गैरअर्जदाराकडे त्‍याचे मय्यत पतीचे शेतकरी अपघात विम्‍याचा दावा दस्‍ताऐवजासोबत गैरअर्जदारांकडे दाखल केला व गैरअर्जदार क्र.1 व 2 नी सदर प्रकरण दाखल करे पर्यंत अर्जदाराचा विमा क्‍लेम मंजुर केला नाही, ही बाब गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना मान्‍य आहे. 

 

मा.सर्वोच्‍च न्‍यायालयानी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयानुसार :

 

           1)   II(2010) CPJ 9 (SC)

 

AMALENDU SAHOO V/S.ORIENTAL INSURANCE CO. LTD.

Decided on 25.3.2010

 

Insurance- Non-Standard Settlement- Terms of Policy violated-Vehicle insured for personal use, used on hire- Claim repudiated by insurer- Complaint dismissed by Consumer Forum- Order upheld in appeal- Revision against order dismissed- Civil appeal filed- Repudiation of claim toto unjustified- Settlement of claim on non-standard basis directed.

Para No14- In this connection reference may be made to a decision of National Commission in the Case of New India Assurance Company Ltd V. Narayan Prasad Apparasad Pathak, reported in II (2006) CPJ144(NC), In that case also the question was, whether the insurance company can repudiate the claims in a case where the vehicle carrying passengers and the driver did not have a proper driving license and met with an accident. While granting claim on on-standard basis the National Commission set out in tis judgment the guidelines issued by the insurance Company about setting all such non-Standard claims.

 

 

 

 

 

मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयानुसार :

 

        1)  I(2005) CPJ 81(NC)

 

NEW INDIA ASSURANCE CO. LTD. V/S. KISHAN BHAI

Decided on 1.12.2004

 

Repudiation of Clam- Driver not having valid driving license at accident time-Complaint allowed by Forum-Appeal against order dismissed by State Commission- On basis of observation made by Supreme Court in Swaran Singh’s Case-Insurer failed to prove negligence or failure to exercise reasonable care on part of insured- No interference required in revision- Observations of Supreme Court applicable in claims by insured and third parties, both.

Para No.6 In the Judgment of the Hon’ble Supreme Court in National Insurance Co. Ltd V. Swaransingh and others, I (2004) SLT345+ 1 (2004) ACC 1 9SC0 2004 acj 1 (SC) and particularly referring in Para 105(iii) of the judgment rejected in contention of the Insurance Company, Para 105(iii) reads as under:

“The breach of policy condition e.g., disqualification of driver or invalid draving license of the driver, as contained in Sub-section (2)(a)(ii) of Section 149, have to be proved to have been committed by the insured for avoiding liability by the insurer. Mere absence, fake or invalid driving license or disqualification of the driver for driving at the relevant time, are not in themselves defense available to the insurer against either the insured or the third Parties. To avoid its liability towards insured, the insurer has to prove that the insured was guilty of negligence and failed to exercise reasonable care in the matter of fulfilling the conditions of the policy regarding use of vehicles by duly licensed driver or one who was not disqualified to drive at the relevant time.”

 

 

            सदर प्रकरणात सुध्‍दा गैरअर्जदार कंपनीने घेतलेला बचाव की, मय्यत अपघाताचे वेळी मोटार सायकल चालवितांना त्‍यांचेकडे लर्नींग लायसन्‍स होते, ही बाब वरील नमूद असलेल्‍या न्‍यायनिवाडयानुसार ग्राह्य धरण्‍यासारखी नाही.  गैरअर्जदार क्र.1 व 2 नी अर्जदाराचे पतीचे शेतकरी अपघात विम्‍याचा क्‍लेम न देवून अर्जदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शविली आहे, असे सिध्‍द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

                       

मुद्दा क्रमांक 3 बाबत :-  

 

7.          गैरअर्जदार क्र. 3 ने अर्जदाराचे मय्यत पतीचे शेतकरी अपघात विमा काढतांना कोणताही मोबदला घेतला नसल्‍यामुळे अर्जदार ही गैरअर्जदार क्र.3 ची ग्राहक आहे हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2 मध्‍ये नमूद असलेले ग्राहक ची संज्ञा मध्‍ये बसत नाही. सबब, गैरअर्जदार क्र.3 चे विरुध्‍द कोणतेही आदेश पारीत करण्‍यात येत नाही. वरील मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.      

                 

अंतिम आदेश  -

 

                        (1)   अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

(2)   गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आंत द्यावी.

 

(3)   गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराला मानसीक व शारिरीक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आंत द्यावी.

 

(4)   गैरअर्जदार क्र. 3 चे विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

 

(5)   उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी. 

 

     

गडचिरोली.

दिनांक :- 27/11/2014

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.