न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार हे टीव्हीएस ज्युपिटर मोटार सायकल नं. एम.एच.09-ईबी-2779 चे मालक असून त्यांनी दि. 15/3/2020 रोजी पॉलिसी नं. 15110031190100008695 ने दि. 15/3/2020 ते 14/3/2021 या कालावधीकरिता सदर मोटार सायकलचा रक्कम रु. 1,524/- इतका हप्ता भरुन वि.प. विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. दि. 25/7/2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता सदरचे वाहनाचे चालक लखन शिवाजी हेगडे हे श्री शिवाजी शंकर हेगडे यांना घेवून कागल कडे जात असताना वाहनावरील ताबा सुटून समोरच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली व या अपघातामुळे सदर वाहनाचे अपरिमित नुकसान झाले. सदर वाहनाच्या डागडुजीचा खर्च टीव्हीएस मोटर्सचे अधिकृत वितरक माय टीव्हीएस यांनी काढलेली किंमत अंदाजे रक्कम रु.14,776/- इतकी आहे. सदर वाहनाचे अपघातामध्ये नुकसान किती झाले, याचेकरिता विमा कंपनीचे अधिकत इसम श्री काईंगडे यांनी सर्व्हे करुन वि.प. विमा कंपनीकडे अहवाल दिलेला आहे व सदर वाहनाचा सर्व्हे अहवाल, एस्टिमेट व फायनल बिल इ. सर्व कागदपत्रे वि.प. विमा कंपनीकडे माय टीव्हीएस शोरुमने जमा केलेली आहेत. मात्र तक्रारदाराने विमा कंपनीकडे नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी केली असता विमा कंपनीने काही कागदपत्रांची मागणी केली होती. सदरची कागदपत्रे देवूनही वि.प. विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम आजपर्यंत तक्रारदारास दिलेली नाही. अशा प्रकारे वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना सेवा देणेमध्ये गंभीर त्रुटी केलली आहे या कारणास्तव सदरचा तक्रारअर्ज तक्रारदाराने दाखल केलेला आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे टीव्हीएस ज्युपिटर मोटार सायकल नं. एम.एच.09-ईबी-2779 चे मालक असून त्यांनी दि. 15/3/2020 रोजी पॉलिसी नं. 15110031190100008695 ने दि. 15/3/2020 ते 14/3/2021 या कालावधीकरिता सदर मोटार सायकलचा रक्कम रु. 1,524/- इतका हप्ता भरुन वि.प. विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. दि. 25/7/2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता सदरचे वाहनाचे चालक लखन शिवाजी हेगडे हे श्री शिवाजी शंकर हेगडे यांना घेवून कागल कडे जात असताना वाहनावरील ताबा सुटून समोरच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली व या अपघातामुळे सदर वाहनाचे अपरिमित नुकसान झाले. सदर वाहनाच्या डागडुजीचा खर्च टीव्हीएस मोटर्सचे अधिकृत वितरक “माय टीव्हीएस” यांनी काढलेली किंमत अंदाजे रक्कम रु.14,776/- इतकी आहे. सदरचा अपघात हा कागल हायवे रस्त्याला असलेल्या शुभम अॅटोमोबाईल या इंजिन ऑईलचे दुकानासमोर घडला. सदर वाहनाचे अपघातामध्ये नुकसान किती झाले, याचेकरिता विमा कंपनीचे अधिकृत इसम श्री काईंगडे यांनी सर्व्हे करुन वि.प. विमा कंपनीकडे अहवाल दिलेला आहे व सदर वाहनाचा सर्व्हे अहवाल, एस्टिमेट व फायनल बिल इ. सर्व कागदपत्रे वि.प. विमा कंपनीकडे माय टीव्हीएस शोरुमने जमा केलेली आहेत. मात्र विमा कंपनीकडे जावून नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी केली असता विमा कंपनीने काही कागदपत्रेही मागविली होती. सदरची कागदपत्रे देवूनही वि.प. विमा कंपनीने सदरची रक्कम आजपर्यंत तक्रारदारास दिलेली नाही. अशा प्रकारे वि.प विमा कंपनीने तक्रारदार यांना सेवा देणेमध्ये गंभीर त्रुटी केलेली आहे. याकरिता वि.प. यांचेविरुध्द तक्रारदार यास रक्कम रु.14,776/- इतकी रक्कम सदर वाहनाचे दुरुस्तीकरिता वाहनाच्या अपघाताच्या तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यंतचा सर्व खर्च त्यावरील होणा-या व्याजासहीत द्यावा असे कथन तक्रारदाराने केले आहे. या कारणास्तव सदरचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेले पत्र, विमा पॉलिस वाहनाचे आर.सी., तक्रारदार यांचे आधारकार्ड इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. विमा कंपनीस आयोगाची नोटीस लागू होवून त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दखल केले. वि.प. यांचे कथनानुसार तक्रारदाराचा तक्रारअर्ज खोटा चुकीचा व बेकायदेशीर आहे व तो नामंजूर होणेस पात्र आहे. तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीस त्रास देत असलेमुळे तक्रारदाराकडून वि.प. यास कॉम्पेन्सेटरी कॉस्ट म्हणून रु.10,000/- मंजूर करणेत यावेत. तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक नाहीत. तसेच सदरचा अपघात हा जिल्हा मंचाच्या स्थलसीमेत घडलेला नसलेमुळे सदरची तक्रार दाखल करुन घेणेचा व ती चालविणेचा अधिकार या आयोगास नाही. वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देताना त्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही व अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जात नमूद केलले वाहन हे अपघाताचे वेळी श्री लखन शिवाजी हेगडे हे चालवित होते व श्री नितीन कानीटकर चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एमएच 09-बीडी-8824 या वाहनांची समोरासमार धडक होवून अपघात दि. 25/7/2020 रोजी झालेला आहे. तक्रारदार यांनी क्लेम फॉर्ममध्ये “समोरासमोर धडक झाली व कोणीतरी जखमी झाल्याने एफआयआर केला आहे” अशी संदिग्ध माहिती दिल्याने वि.प. यांनी तक्रारदारास सर्व पोलिस पेपर्स दाखल करणेस वारंवार सांगितले. मात्र असे असताना तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक पोलिस पेपर्स दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे व सदर अपघाताचा तपास अधिका-यांमार्फत तपास केल्यानंतर असे आढळून आले की, तक्रारदार यांचे वाहनावर मागील सीटवर असणारे श्री शिवाजी शंकर हेगडे हे अपघातमध्ये मयत झाले असून दुस-या गाडीचा चालक जखमी झालेला आहे. तक्रारदार यांनी खरी माहिती देण्यास तसेच वि.प. विमा कंपनीस क्लेम मंजूर करणेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे. यामुळे वि.प. विमा कंपनीकडून क्लेम छाननी करणेस विलंब अथवा तक्रारदारास सेवा देताना कोणतीही त्रुटी झालेली नाही. सदर कामी आयआरडीए मान्यताप्राप्त सर्व्हेअरने नुकसानग्रस्त वाहनाचा सर्व्हे केलेला असून पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तसेच सर्व घसारा वजा जाता नुकसान भरपाईची रक्कम रु.5,212/- अंतिमरित्या निश्चित केलेली आहे. तेवढीच रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्यामुळे वि.प. पुढे असे नमूद करु इच्छितात की, वि.प. विमा कंपनीचे हक्कास कोणतही बाधा न येता (without prejudice to its rights and without admitting the liability) जर वि.प. विमा कंपनीस कोणते देणे द्यावे लागल्यास ते पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार असेल. सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा व वि.प. यांना नुकसान भरपाईपोटी म्हणून तक्रारदाराकडून रक्कम रु.10,000/- मिळणेचे आदेश व्हावेत असे कथन केलेले आहे.
5. वि.प. यांनी या संदर्भात कागदयादीसोबत क्लेम फॉर्म, विमापॉलिसी, सर्व्हे रिपोर्ट, सर्व्हेअरचे शपथपत्र, श्री व्ही.डी.पोतनीस यांचा तपासणी अहवाल तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे त्यांचे मालकीचे टीव्हीएस ज्युपिटर मोटार सायकल नं. एम.एच.09-ईबी-2779 चा विमा दि. 15/3/2020 रोजी पॉलिसी नं. 15110031190100008695 ने दि. 15/3/2020 ते 14/3/2021 या कालावधीकरिता रक्कम रु. 1,524/- भरुन वि.प. विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. याबाबत उभय पक्षांचा कोणताही उजर नाही. तसेच पॉलिसी कागदपत्रेही याकामी दाखल आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांनी अर्जात नमूद पॉलिसी वि.प विमा कंपनीकडून घेतलेली आहे. तक्रारदार यांची ज्युपिटर मोटारसायकल दि. 25/7/2020 रोजी चालक श्री लखन शिवाजी हेगडे हे श्री शिवाजी शंकर हेगडे यांना घेवून कागलकडे जात असताना वाहनावरील ताबा सुटलेमुळे समोरच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली व यामुळे वाहनाचे अपरिमित नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे डागडुगीचा खर्च हा टी.व्ही.एस. मोटर्सचे अधिकृत वितरक “माय टीव्हीएस” यांनी काढलेली रक्कम ही अंदाजे रु.14,776/- इतकी आहे व सदरच्या रकमे संदर्भातील तसेच वाहनाचे नुकसानीच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे ही वि.प. विमा कंपनीकडे दाखल केलेली आहेत व वि.प. विमा कंपनीने जी कागदपत्रे मागविली होती, ही कागदपत्रे सुध्दा दि. 9/9/2020 रोजी तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीस जमा केलेली आहेत. मात्र असे असूनही वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांची विमा पॉलिसीप्रमाणे होणारी नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदारास अदा केलेली नाही. यासंदर्भात तक्रारदार यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच दि. 09/09/2020 रोजी वि.प. विमा कंपनीस वाहनाचा दुरुस्ती खर्च मिळणेबाबतचे पत्रही दिले आहे. सदरचे पत्र अ.क्र.1 ला तक्रारदार यांनी दाखल केलेले आहे.
9. वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांनी क्लेम मंजूर करणेसाठीची आवश्यक असणारी कागदपत्रे देणेस जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे या कारणास्तव सदरची तक्रारदार यांची नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदार यांना दिलेली नाही. तसेच वि.प. विमा कंपनीने या संदर्भात वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक श्री शाहीन कासीम सय्यद यांचे पुरावचे शपथपत्र दाखल केलेले आहे व या शपथपत्रानुसार सर्व घसारा वजा जाता नुकसान भरपाईची रक्कम रु. 5,212/- ही सर्व्हेअरने अंतिमरित्या निश्चित केली आहे व एवढी रक्कम मिळणेसच तक्रारदार पात्र आहेत असे स्पष्ट कथन केलेले आहे. तसेच वि.प. विमा कंपनीने आपले युक्तिवादाबरोबर काही वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय तसेच क्लेम फॉर्म, विमा पॉलिसी, सर्व्हे रिपोर्ट, सर्व्हेअरचे शपथपत्र तसेच तपासणी अहवाल इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वि.प. विमा कंपनीने सर्व्हेअर ओंकार काईंगडे यांचा बिलचेक रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदरचे बिलचेक रिपोर्टचे अवलोकन केले असता तसेच श्री काईंगडे सर्व्हेअर व लॉस असेसर यांचे शपथपत्राचे अवलोकन करता पॉलिसीचे नियमाप्रमाणे घसारा वजा करुन अंतिम नुकसान भरपाई ही रु.5,204/- इतकी निश्चित केलेली आहे. तक्रारदार यांनी जरी टीव्हीएस मोटार्सचे अधिकृत विक्रेते माय टीव्हीएस यांचेकडून होणारा खर्च रक्कम रु.14,776/- इतका नमूद केला असला तरीसुध्दा वि.प. ने दाखल केलेले बिलचेक रिपोर्टचे अवलोकन करता त्यानुसार होणारी रक्कम रु. 5,204/- इतकी असलेचे दिसून येते. सबब, सदरचा सर्व्हे रिपोर्ट हे आयेाग ग्राहय धरणेचे निष्कर्षापत येत असून दाखल केलेले बिलचेक रिपोर्टप्रमाणे होणारी रक्कम रु.5,204/- इतकी रक्कम तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी देणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस करणेत येतात. मात्र सदरची रक्कम ही अपघात झाले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदारांचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने देणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस करणेत येतात तसेच तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.5,204/- देणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर अपघात तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.