Maharashtra

Kolhapur

CC/20/305

Tulsabai Ananda Patil - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.Ltd. - Opp.Party(s)

R.G.Shelake

30 Aug 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/20/305
( Date of Filing : 25 Sep 2020 )
 
1. Tulsabai Ananda Patil
At, DurgManwad Santupatilwadi, Tal. Radhanagari
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co.Ltd.
204/ E Station Road, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Aug 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील  कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      तक्रारदार यांचे पतीचा विमा श्री भैरवनाथ सहकारी दुध व्‍यावसायिक संस्‍था मर्या. दुर्गमानवाडी पैकी संतुपाटीलवाडी यांचे माध्‍यमातून वि.प. यांचेकडे जनता व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविलेला होता व आहे.  सदर विमा पॉलिसीचा नंबर 151200/47/18/23/11 असा असून कालावधी दि. 11/6/2018 ते दि. 10/06/2019 असा होता.  तक्रारदार यांचे पती कै. आनंदा ज्ञानू पाटील हे पॉलिसीचे कालावधीत त्‍यांचे स्‍वतःचे शेतात दि. 14/04/2019 रोजी सायंकाळी 5.00 वाजणेचे सुमारास पिंपरीचा माळ येथे आंब्‍याचे झाडावर चढून आंब्‍याच्‍या झाडाचा बेना करत असताना त्‍यांचा अपघाताने तोल जावून व झाडावरुन पडून ते गंभीर जखमी झाले.  त्‍यांना औषधोपचारासाठी सी.पी.आर. हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर येथे दि. 06/05/2019 पर्यंत दाखल केले होते.  त्‍यानंतर त्‍यांना श्री आण्‍णासाहेब शिंदे म्‍हैशाळकर चॅरिटेबल ट्रस्‍ट यांचे हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल केले.  तदनंतर तक्रारदार यांचे नातेवाईकांनी दि. 18/5/2018 रोजी डीस्‍चर्ज घेवून त्‍यांना घरी आणले असता ते दि. 19/5/2019 रोजी मयत झाले.  तदनंतर तक्रारदार यांनी याबाबत वि.प. यांचेकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला.  परंतु वि.प. यांनी याबाबत तक्रारदार यांना अद्याप काहीही कळविलेले नाही. सबब, वि.प. यांनी सेवात्रुटी केल्‍याने तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.15,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 18 कडे अनुक्रमे क्‍लेम फॉर्म, विमा प्रस्‍ताव पाठविलेचे पत्र, तक्रारदाराचे पतीची उपचाराची कागदपत्रे, मृत्‍यू दाखला, वि.प. कंपनीचे पत्र, तक्रारदारचे रेशनकार्ड व आधार कार्ड वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.

 

4.    वि.प. यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट, विमा पॉलिसी, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  वि.प. ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.  तक्रारदाराची तक्रार मुदतीत नाही.  सदरची तक्रार चालविणेचे अधिकार या आयोगास नाहीत.

 

iii)    तक्रारदाराने क्‍लेम दाखल केल्‍यानंतर क्‍लेमसोबत आवश्‍यक असणारी सर्व कागदपत्रे सादर केली नाहीत.  वि.प. यांनी त्‍यांचे दि. 13/3/2020 च्‍या  पत्रानुसार, क्‍लेमची छाननी करण्‍यासाठी तक्रारदारास आवश्‍यक कागदपत्रे सादर करण्‍यास  सांगितली. परंतु तक्रारदारांनी सदरची कागदपत्रे वि.प. यांना न देता या आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे.  त्‍यामुळे वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.

 

iv)    वरील मुद्यास बाधा येवू न येता वि.प. यांचे वैकल्पिकरित्‍या असे कथन आहे की, कोणत्‍याही परिस्थितीत वि.प. यांची जबाबदारी ही पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार निश्चित केलेल्‍या जबाबदारीपेक्षा अधिक होवू शकत नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ.क्र.

                मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे पतीचा विमा श्री भैरवनाथ सहकारी दुध व्‍यावसायिक संस्‍था मर्या. दुर्गमानवाडी पैकी संतुपाटीलवाडी यांचे माध्‍यमातून वि.प. यांचेकडे जनता व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविलेला होता व आहे.  सदर विमा पॉलिसीचा नंबर 151200/47/18/23/11 असा असून कालावधी दि. 11/6/2018 ते दि. 10/06/2019 असा होता.  सदर पॉलिसीची प्रत वि.प. यांनी याकामी दाखल केलेली आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

7.    प्रस्‍तुतकामी वि.प. यांनीही त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये, तक्रारदाराने क्‍लेम दाखल केल्‍यानंतर क्‍लेमसोबत आवश्‍यक असणारी सर्व कागदपत्रे सादर केली नाहीत.  वि.प. यांनी त्‍यांचे दि. 13/3/2020 च्‍या  पत्रानुसार, क्‍लेमची छाननी करण्‍यासाठी तक्रारदारास आवश्‍यक कागदपत्रे सादर करण्‍यास सांगितली परंतु तक्रारदारांनी सदरची कागदपत्रे वि.प. यांना न देता या आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे.  त्‍यामुळे वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही असे कथन केले आहे.  सदरकामी तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी सरपंच ग्रामपंचायम दुर्गमानवाडी यांचा दाखला दाखल केला आहे.  त्‍यामध्‍ये तक्रारदाराचे पती हे झाडावरुन पडून जखमी झाले व त्‍यानंतर उपचारानंतर ते दि. 19/5/2019 रोजी मयत झाले असे नमूद केले आहे.  तसेच तक्रारदारांनी गावकामगार पोलिस पाटील दुर्गमानवाडी यांचा दाखला दाखल केला आहे.  त्‍यामध्‍येही तक्रारदाराचे पती हे झाडावरुन पडले होते असे नमूद केले आहे.  सदरचे दोन्‍ही दाखल्‍यांचा विचार करता तक्रारदाराचे पती हे झाडावरुन पडून जखमी झाले व तदनंतर ते मयत झाले, सबब, त्‍यांचा मृत्‍यू हा अपघाती होता ही बाब शाबीत होते.  तक्रारदाराचे पती हे अपघातामुळे जखमी झाले नव्हते व अपघातामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला नव्‍हता ही बाब वि.प. यांनी याकामी शाबीत केलेली नाही.  सबब, वि.प. यांनी तक्रारदारांचे विमादाव्‍याबाबत निर्णय न घेवून तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

8.    सबब, तक्रारदार हे विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/- वि.प. यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

 

आदेश

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 1,00,000/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.