Maharashtra

Kolhapur

CC/20/24

Om Industries Prop. Dipak Sudhamamal Mulchandhani - Complainant(s)

Versus

The New India Assurance Co.LTD Br, Manager Kolhapur - Opp.Party(s)

Ashish Bumkar

09 Jun 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/20/24
( Date of Filing : 14 Jan 2020 )
 
1. Om Industries Prop. Dipak Sudhamamal Mulchandhani
At.Ghandinagar, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Co.LTD Br, Manager Kolhapur
Rajaram Road, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 09 Jun 2022
Final Order / Judgement

 

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे स्‍टँडर्ड फायर अॅन्‍ड स्‍पेशल पेरील्‍स पॉलिसी अंतर्गत दि. 26/8/2018 ते 25/8/2019 या कालावधीकरिता विमा उतरविला होता.  सदर पॉलिसीचा नंबर 151100111180100000310 असा होता.  तक्रारदार यांचा पाणी फिल्‍टरींग व पॅकेजिंगचा व्‍यवसाय असलेने दि.10/3/2019 रोजी नियमितपणे व्‍यवसायाचे कामकाज चालू असताना अचानकपणे कारखान्‍यातील पाणी शुध्‍द करण्‍याचे यंत्राचे कॉम्‍प्रेसरला आग लागल्‍याने सदर मशिनरी व कॉम्‍प्रेसर जळून निकामी झाले.  तक्रारदार यांनी सदर बाबीची कल्‍पना वि.प यांना त्‍याच दिवशी दिली. परंतु वि.प. यांनी सर्व्‍हेअर यांना तात्‍काळ न पाठविता मुद्दामपणे विंलबाने पाठविले.  त्‍याप्रमाणे वि.प. यांनी दि. 12/3/2019 रोजी जयंत काबडे यांना सर्व्‍हेअर म्‍हणून तपासणीसाठी पाठविले.  त्‍यांनी सदर मशिनरीस नवीन स्‍टॅबिलायझर लावला असता मशीन परत सुरु होईल असे सांगितले.  त्‍यानंतर वि.प. यांनी दि. 09/05/2019 रोजी सदर घटनेत मशिनरीला लागलेली आग ही कॉम्‍प्रेसर व इतर ठिकाणी पसरली नसून फक्‍त स्‍टॅबिलायझर खराब झाला आहे या कारणास्‍तव पॉलिसी लाभ नाकारला आहे.  सदर घटनेत तक्रारदारांचे मशिनरी, कॉम्‍प्रेसर आणि स्‍टॅबिलायझर पूर्णपणे निकामी झाले असून हे पंचनामा केल्‍यानंतर पंचनाम्‍यात दिसून आले आहे.  अशा प्रकारे वि.प. यांनी चुकीचे कारण देवून तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केला आहे.  सबब, वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्‍याने तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदारास विमा कंपनीकडून रक्‍कम रु. 62,540/- मिळावी, सदर रकमेवर 18 टक्‍केप्रमाणे व्‍याज मिळावे, तसेच व्‍यवसायाचे नुकसानीपोटी रक्‍कम रु. 1,00,000/- मिळावी, शारिरिक, मानसिक  त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.1,25,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत क्‍लेम नामंजूरीचे पत्र, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेली पॉलिसी कागदपत्रे इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. यांनी याकामी दि.02/03/20 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे.  वि.प. यांचे कथनानुसार, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.  वि.प. यांचे सूचनेनुसार सर्व्‍हेअर श्री कबाडे यांनी दि. 11/3/2019 रोजी घटनेची पाहणी करुन तक्रारदारास कागदपत्रे देण्‍याच्‍या सूचना दिल्‍या.  परंतु तक्रारदार यांनी कोणतीही कागदपत्रे वेळेत दिली नाहीत तसेच सर्व्‍हेअर यांना सहकार्य केले नाही.  तसेच जळालेल्‍या स्‍टॅबिलायझरचे कोटेशन, बिल अथवा तो दुरुस्‍त करुन घेतला आहे किंवा कसे, याबाबतची माहिती तसेच कागदपत्रे वारंवार विनंती करुन ही सर्व्‍हेअर यांना दिलेली नाहीत.  सबब, वि.प. यांनी योग्‍य ती सबळ कारणे देवून तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे.  वि.प. यांचे हक्‍कास कोणतीही बाधा न येता जर वि.प. यांना कोणतेही देणे द्यावे लागल्‍यास ते पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार असेल.  सदरची नुकसानभरपाई ही सर्व्‍हेअर यांनी अंति‍मरित्‍या निश्चित केलेल्‍या रकमेपेक्षा जास्‍त असणार नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प. यांनी याकामी सर्व्‍हेअर यांचा रिपोर्ट, सर्व्‍हेअरचे शपथपत्र, कागदयादीसोबत विमा पॉलिसी, तक्रारदाराचे पत्र, क्‍लेम फॉर्म, पंचनामा, अर्जदाराचे वीज बिल, मायक्रोटेक कंपनीचे पत्र, मायक्रोटेक कंपनीचे टॅक्‍स इनव्‍हॉईस, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे विमा रक्‍कम व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

6.    वि.प. ही विमा कंपनी असून वि.प.विमा कंपनी इमारतीचे, इतर मालमत्‍तेचे सशुल्‍क विमा उतरवून त्‍याप्रमाणे पॉलिसी अंतर्गत मालमत्‍तेचे नुकसान झालेस त्‍याबद्दल भरपाई देणेचा व्‍यवसाय करते.  सदरचे पॉलिसी अंतर्गत तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे ता. 26/8/2018 ते 25/08/2019 कालावधीसाठी विमा उतरविलेला होता.  विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही.  तसेच तक्रारदार हे सदर इंडस्‍ट्रीज या फर्मचे चालक व मालक असून सदरची फर्मही त्‍यांचे उपजिविकेचे साधन असलेचे पुराव्‍याचे शपथपत्रावर तक्रारदार यांनी कथन केले आहे.  तक्रारदार यांनी वि.प. यांचे स्‍टँडर्ड फायर अॅन्‍ड स्‍पेशल पेरील्‍स पॉलिसी अंतर्गत पॉलिसी क्र. 151100111180100000310 उतरविलली होती.  सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

7.    उपरोक्‍त मुद्दा क्र.2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  तक्रारदार सदर पॉलिसी अंतर्गत तक्रारदारांचे विमा उतरविलेल्‍या मालमत्‍तेचे, मशिनरीचे कोणत्‍याही प्रकारचे नुकसान झालेस किंवा मशिनवरील पार्टस, भाग, संलग्‍न भागात हानी पोहोचलेस त्‍यासाठीची नुकसान भरपाई वि.प. मार्फत वि.प. कंपनीद्वारे केली जाईल असे आश्‍वासन वि.प. यांनी तक्रारदार यांना दिले हाते.  तक्रारदारांचा पाणी फिल्‍टरींग व पॅकेजिंगचा व्‍यवसाय असलेने ता. 10/3/2019 रोजी व्‍यवसायाचे कामकाज चालू असताना अचानकपणे कारखान्‍यातील पाणी शुध्‍द करण्‍याचे यंत्राचे कॉम्‍प्रेसरला आग लागल्‍याने सदर मशिनरी व कॉम्‍प्रेसर जळून निकामी झाले.  तक्रारदारांनी वि.प. विमा कंपनीस दि. 10/3/19 रोजी सदरचे घटनेची माहिती दिली.  तथापि वि.प. कंपनीने दि. 09/05/2019 रोजी सदर घटनेत मशिनरीला लागलेली आग ही कॉम्‍प्रेसर व इतरत्र ठिकाणी परसली नसून फक्‍त स्‍टॅबिलायझर खराब झाला आहे या कारणास्‍तव तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला.  सबब, वि.प. यांनी तक्रारदारांकडून सदरचे मशिनरीपोटी विमा हप्‍ता स्‍वीकारुन देखील सदर कारणास्‍तव विमाक्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता अ.क्र.1 ला तक्रारदारांनी ता. 9/5/2019 रोजी वि.प. विमा कंपनीचे तक्रारदारांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र दाखल केले आहे.  अ.क्र.2 ला विमा पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे.  सदरचे पॉलिसीचे प्रतीचे अवलोकन करता Plant, Machinery and Accessories, Sum Insured – Rs.35,00,000/-  नमूद आहे.  वि.प. यांनी म्‍हणणे दाखल कलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदारांना कागदपत्रे देण्‍यासाठी सूचना केली.  तक्रारदार यांनी कोणतीही कागदपत्रे वेळीच दिली नाहीत तसेच सर्व्‍हेअर यांना सहकार्य केलेले नाही.  जळालेल्‍या स्‍टॅबिलायझरचे कोणतेही बिल अथवा तो दुरुस्‍त करुन घेतला आहे किंवा कसे, याबाबतची माहिती तसेच कागदपत्रे वारंवार विनंती करुनही सर्व्‍हेअर यांना दिलेली नाहीत.  त्‍याकारणाने वि.प.  यांनी सबळ कारणे दाखवून तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे.

 

8.    प्रस्‍तुतकामी तक्रारदारांनी ता. 25/3/2021 रोजी कागदपत्रे मागणीचा अर्ज आयोगात दिलेला होता.  सदरचे अर्जामध्‍ये तक्रारदार यांनी सर्व्‍हे रिपोर्ट, वि.प. आणि तक्रारदार यांचेमध्‍ये झालेला पत्रव्‍यवहार, पोहोच, पॉलिसी अटी व शर्ती, पॉलिसी घेण्‍यापूर्वी तक्रारदार यांनी भरुन दिलेला फॉर्म 5, 6 इ. कागदपत्रांची मागणी केली.  सदरचे तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे वि.प. यांनी ता. 25/4/2019 रोजी कबाडे यांचा सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केलेला आहे.  वि.प. यांनी तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे 4, 5 व 6 कागदपत्रे दाखल केलेली नाही.  त्‍याकरिता वि.प. यांचेविरुध्‍द Adverse inference काढणेत यावा असा अर्ज तक्रारदार यांनी दिला.  सदरचा तक्रारदारांचा अर्ज ता. 3/11/2021 रोजी दफ्तरी दाखल करणेत आला.  वि.प. यांनी दि. 24/5/22 रोजीचे तक्रारदारांचे मागणीप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.   याव्‍यतिरिक्‍त कोणतीही कागदपत्रे सादर करावयाची राहिलेली नाहीत याबाबतची पुरसीस दिली.  सदरची पुरसीस आयोगाने दाखल करुन घेतली आहे.

 

9.    प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी दाखल केलेल्‍या ता. 25/4/2019 रोजीचे कबाडे सर्व्‍हेअर यांचे सर्व्‍हे रिपोर्टचे अवलोकन करता,

            Some of these papers and the information has been received only recently. 

           

                                                Cause

            This is a case of an electric fire. A stabilizer is part of the compressor (word appear in panchanama) and there was an internal fire in the said stabilizer and flame therefore, appeared therefrom fire could be doused by throwing cloth over it and it did not spread either to compressor or elsewhere. Copy of panchanama attached.

 

                                                 Loss

            Insured has not submitted any quote/bill for either repair or replacement to the said stabilizer as their claim.  But has merely put up their claim at Rs.62,450/- which is the present day replacement cost of the said type of stabilizer.  The loss therefore, would work out to Rs.45,905/- after taking into account, depreciation 25% Rs.15,635/- and salvage value at Rs.1,000/-

 

सदरचे अहवालाचे अनुषंगाने वि.प. यांनी सदरचे सर्व्‍हेअरचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे.  सदरचे सर्व्‍हेअरचे पुराव्‍याचे शपथपत्र तक्रारदारांनी नाकारलेले नाही.  सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता जळालेल्‍या स्‍टॅबिलायझरचे बिल अथवा तो दुरुस्‍त करुन घेतला किंवा कसे, याबाबतची माहिती तसेच कागदपत्रे वि.प. यांनी मागणी करुन देखील तक्रारदार यांनी दिलेली नाहीत असे सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये नमूद आहे.  सबब, सर्व्‍हेअर हा त्‍याचे क्षेत्रातील एक सक्षम तांत्रिक व्‍यक्‍ती आहे.  सदरचे अहवालामध्‍ये वादातील मशिनची Depreciation 25 टक्‍के धरुन एकूण रक्‍कम रु. 45,905/- स्‍पष्‍टपणे नमूद केलेली आहे.

            Surveyor is a competent technical person in his field.  His report has got evidentiary value.  His Report cannot be ignored without giving cogent reasons.

 

10.   सबब, सदरची दुर्घटना कोणत्‍याही बाहेरील अपघाताचे घटकामुळे जरी झालेली नसली तरी सदरचे वादातील मशिनचा विमा वि.प यांचेकडे उतरविलेला आहे व सदरचे मशिनचे सदरचे दुर्घटनेमुळे नुकसान झालेची बाब दाखल कागदपत्रांवरुन नाकारता येत नाही.  वि.प. यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणेमध्‍ये वादातील मशिनचे स्‍टॅबिलायझर जळालेची बाब मान्‍य केली आहे. त्‍या कारणाने केवळ तक्रारदारांनी कागदपत्रे वेळेत दिली नाहीत अथवा तक्रारदारांनी सदर सर्व्‍हेअर यांना सहकार्य केले नाही या कारणास्‍तव सदरचे घटनमुळे मशिनची झालेची नुकसानीची बाब वि.प. यांना नाकारता येणार नाही.  सबब, वरील सर्व बाबींचा बारकाईने विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3     

 

11.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व्‍हेअरचे रिपोर्टवरुन सदरचे मशिनरीची Depreciation 25 टक्‍के रु. 15,635/- आणि सॅल्‍वेज रु. 1,000/- वजा जाता वि.प. यांनी रक्‍कम रु.45,905/- इतकी रक्‍कम सदरचे मशिनची नमूद केली आहे.  या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे सदरचे पॉलिसीअतर्गत वादातील मशिनचे नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु.45,905/- मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 17/1/2020 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.

 

12.   तक्रारदारांची विनंतीमध्‍ये रु.1,00,000/- मशिन थांबलेने त्‍यास व्‍यवसायामध्‍ये झालेल्‍या नुकसानीपोटी मागणी केली आहे.  तथापि त्‍याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.  परंतु सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराचे नुकसान झाले आहे तसेच तक्रारदार यास मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे.  या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.8,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार क्र.1 यांना पॉलिसी क्र. 151100111180100000310 अंतर्गत वादातील मशिनरीची नुकसान भरपाई रक्‍कम रु. 45,905/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 17/1/20 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कमम रु.8,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.