Maharashtra

Gondia

CC/15/135

KAUTIKA LAXMICHAND RAHANGDALE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD., THROUGH THE MANAGER - Opp.Party(s)

MR.C.J.GAJBHIYE

27 Apr 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/15/135
 
1. KAUTIKA LAXMICHAND RAHANGDALE
R/O.BRAMANI, TAH.GOREGAON
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD., THROUGH THE MANAGER
R/O.D.O.NO.130800, NEW INDIA CENTRE, 7 TH FLOOR, 17-A, CO-OPERAAGE ROAD, MUMBAI-400039, THROUGH ITS THE MANAGER THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD., GONDIA BRANCH, JAISTAMB CHOWK, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M. G. CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. H. M. PATERIYA MEMBER
 
For the Complainant:MR.C.J.GAJBHIYE, Advocate
For the Opp. Party: MS. INDIRA R. BAGHELE, Advocate
Dated : 27 Apr 2017
Final Order / Judgement

आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले

      तक्रारकर्तीचे पती लक्ष्मीचंद भोजराज रहांगडाले यांच्या अपघाती मृत्यूबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई रू.1,00,000/- विरूध्‍द पक्ष यांनी नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 चे कलम 12 अन्वये सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.    तक्रारकर्ती श्रीमती कौतिका रहांगडाले हिचे पती मृतक लक्ष्मीचंद भोजराज रहांगडाले हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा ब्राम्हणी, तालुका गोरेगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 144 क्षेत्रफळ 1.43 हे.आर. या वर्णनाची शेतजमीन होती. 

3.    महाराष्ट्र शासनाने नागपूर विभागातील सर्व शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विरूध्द पक्ष टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे विमा उतरविलेला होता व तक्रारकर्तीचे मृतक पती लक्ष्मीचंद भोजराज रहांगडाले हे शेतकरी असल्याचे सदर विमा योजनेचे लाभार्थी होते. 

4.    तक्रारकर्तीचे पती लक्ष्मीचंद भोजराज रहांगडाले यांचा दिनांक 22/04/2012 रोजी शेतात कीटकनाशक औषधी फवारणी करतांना बेशुध्द होऊन उपचारादरम्यान दिनांक 04/05/2012 रोजी अपघाती मृत्यू झाला. त्याबाबत पोलीस स्टेशन, गोरेगांव येथे दिनांक 05/05/2012 रोजी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 174 अन्वये मर्ग क्रमांक 5/12 नोंदण्यात आला.  तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्यूबद्दल शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- मिळावी म्हणून सर्व कागदपत्रांसह विमा दावा प्रस्ताव दिनांक 26/06/2013 रोजी रितसर सादर केला.  परंतु विरूध्द पक्षाने दिनांक 19/07/2013 रोजी दावा उशीराने दाखल केल्याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला.  विरूध्द पक्षाची विमा दावा नामंजुरीची सदरची कृती सेवेतील न्यूनता असल्याने तक्रारकर्तीने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

      (1)   शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- मृतकाचे मृत्यू दिनांकापासून म्हणजेच दिनांक 04/05/2012 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 24% व्याजासह मिळावी.

      (2)   विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केल्याने नुकसानभरपाई रू.20,000/- मिळावी.

      (3)   शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.10,000/- मिळावी. 

      (4)   तक्रारीचा खर्च रू.5,000/- मिळावा.  

5.    तक्रारकर्तीने तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ क्लेम फॉर्म, शेतीचा 7/12 उतारा, मर्ग खबरी, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, मृतकाचे आधार कार्ड इत्‍यादी दस्तावेज दाखल केले आहेत.   

6.    सदर प्रकरणात विरूध्‍द पक्ष न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी दिनांक 28/03/2016 रोजी त्‍यांचा लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे.  तक्रारकर्तीचे पती लक्ष्मीचंद रहांगडाले हे नोंदणीकृत शेतकरी होते व महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते हे नाकबूल केले आहे.  तक्रारकर्तीचे पती लक्ष्मीचंद रहांगडाले शेतात कीटकनाशकाची फवारणी करीत असतांना बेशुध्द पडले व त्यांचा तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे अपघाती मृत्यू झाल्याचे विरूध्द पक्षाने नाकबूल केले आहे.   त्यांचे म्हणणे असे की, मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवाल तसेच व्हिसेरा अहवाल आवश्यक आहे.  व्हिसेरा अहवालाअभावी मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने तक्रारकर्तीची तक्रार अकाली (Pre-mature) असल्याने खारीज होण्यास पात्र आहे.  त्यांचे पुढे म्हणणे असे की, मृतक लक्ष्मीचंदच्या शवविच्छेदन अहवालावरून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे सिध्द होत नसल्याने आणि व्हिसेरा अहवाल दाखल केला नसल्याने तसेच विमा दावा मुदतीनंतर दाखल केला असल्याने दिनांक 19/07/2013 रोजी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुरीची कृती विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरून असल्याने त्याद्वारे विरूध्द पक्षाकडून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार झाल्याचे नाकबूल केले आहे. तसेच लक्ष्मीचंद रहांगडाले यांचा मृत्यू अपघाती मृत्यू नसल्याने तक्रारकर्ती विमा लाभ मिळण्यास पात्र नसल्याचे म्हटले आहे.    

7.    तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले.  त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः- 

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय?

नाही

2.

तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र आहे काय?

नाही

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

अंतिम आदेशाप्रमाणे

- कारणमिमांसा

8.    मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणांत तक्रारकर्तीने तिचे पती लक्ष्मीचंद रहांगडाले यांच्या नांवाने मौजा ब्राम्हणी, त. सा. क्रमांक 15, तालुका गोरेगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन  क्रमांक 144/1-अ क्षेत्रफळ 1.43 हे.आर. ही शेतजमीन असल्याबाबत 7/12 चा उतारा दस्त क्रमांक 2 वर दाखल केला आहे.  यावरून हे स्पष्ट होते की, मयत लक्ष्मीचंद भोजराज रहांगडाले यांच्या मालकीची तक्रारीत नमूद शेतजमीन होती व ते विमित शेतकरी होते. 

      सदरहू प्रकरणात दस्त क्रमांक 5 वर पोलीस स्टेशन, गोरेगांव येथे नोंदविलेली मर्ग खबरी क्रमांक 5/12 दाखल आहे.  सदर मर्ग हा डॉ. जीगर पारेख, गोंदीया केअर हॉस्पिटल तर्फे श्रीकांत भगवंत राऊत, टेक्निशियन यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून दाखल केला आहे.  त्यांत मृतकाचे नांव लक्ष्मीचंद भोजराज रहांगडाले असून घटनास्थळ गोंदीया केअर हॉस्पिटल, घटना तारीख 04/05/2012 चे 16.45 वाजता, मरणाचे कारण विष प्राशन केल्याने असे नमूद आहे.  त्यांत पुढे नमूद आहे की, मृतक लक्ष्मीचंद रहांगडाले याने दिनांक 22/04/2012 ला मौजा बाम्हणी येथे विष प्राशन केल्याने औषधोपचाराकरिता केअर हॉस्पिटल, गोंदीया येथे दिनांक 22/04/2012 ला भरती केले होते.  औषधोपचारादरम्यान दिनांक 04/05/2012 रोजी 16.45 वाजता मरण पावल्याने डॉक्टरी मेमो वरून पोलीस स्टेशन, गोंदीया येथे मर्ग क्रमांक 0/12 चा दाखल आहे.  सदरचे घटनास्थळ पोलीस स्टेशन, गोरेगांवचे हद्दीत असल्याने नंबरी मर्ग दाखल करण्यांत आला आहे.

      लक्ष्मीचंदने विष प्राशन केल्यावर त्यास उपचारासाठी दिनांक 22/04/2012 रोजी गोंदीया केअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यांत आले होते.  त्याचे चौकशीसंबंधी कागदपत्र पोलीस स्टेशन, गोंदीया कडून पोलीस स्टेशन, गोरेगांव येथे आवक क्रमांक 449/12 दिनांक 26/04/2012 रोजी प्राप्त झाल्यावर गोरेगांव पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा तयार केला तो दस्त क्रमांक 6 वर आहे.  त्यांत नमूद आहे की, सदरचे घटनास्थळ मौजा बाम्हणी येथील शेत शिवारातील रूग्णाचे घरामागील श्री. भुपेश पुरूषोत्तम ठाकूर याचे शेतबांधीतील शिवधु-यावरील आहे.  प्रत्यक्षदर्शीने दाखविले व सांगितल्याप्रमाणे रूग्ण जेथे बसला होता तेथे शिवधु-यावर 10 फुटाचे पळसाचे झाड आहे.  याच झाडाचे बुंध्यापाशी येऊन बसून रूग्ण लक्ष्मीचंद याने विष प्राशन केल्याचे सांगत आहे.  घटनास्थळावर तपकिरी रंगाची प्लॅस्टिक बॉटल ज्यावर SULTAN (किटकनाशक) असे लिहिलेले आहे, सदर बॉटल पुराव्याकामी स्वतंत्र पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यांत आली आहे.

      सदरचे घटनास्थळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सेवकराम धाडू चौधरी याने दाखविले असे नमूद आहे.

      मयत लक्ष्मीचंद याचा शवविच्छेदन अहवाल दस्त क्रमांक 7 वर आहे.  त्यांत मृत्यूचे कारण “Probable cause of death may be organophosphorus poisoning.  To confirm Viscera sent for Chemical Analysis.  Report awaited”. असे नमूद आहे.

       विरूध्द पक्षाच्या अधिवक्ता श्रीमती इंदिरा बघेले यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, लक्ष्मीचंदचा मृत्यू किटकनाशकाने झाला हे तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले आहे.  तसेच त्याने विष (किटकनाशक) प्राशन केले होते म्हणून त्यास औषधोपचारासाठी गोंदीया केअर हॉस्पिटलमध्ये दिनांक 22/04/2012 रोजी भरती केले होते व उपचारादरम्यान दिनांक 04/05/2012 रोजी त्याचा मृत्यू झाल्याबाबत उपचारकर्त्या डॉक्टरांनी पोलीसांना कळविल्याचे मर्ग खबरीत नमूद आहे.  तसेच लक्ष्मीचंदने जेथे किटकनाशक प्राशन केले ते घटनास्थळ श्री. भुपेश पुरूषोत्तम ठाकूर यांच्या शेताचा शिवधुरा असून तेथे लक्ष्मीचंदने प्राशन केलेल्या किटकनाशकाची बाटली मिळून आल्याचे व ती पुराव्याकामी जप्त केल्याचे घटनास्थळ पंचनाम्यात नमूद केले आहे.  या सर्व बाबींवरून लक्ष्मीचंद याने स्वतः विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला हे सिध्द होत असून सदरचा मृत्यू हा अपघात नसून आत्महत्या असल्याने अशा मृत्यूस शेतकरी जनता अपघात विम्याच्या संरक्षणातून वगळण्यांत आले आहे.     

      पॉलीसी शेड्यूलच्या Part B: GENERAL EXCLUSIONS मध्ये खालीलप्रमाणे नमूद आहेः-

            Part B: GENERAL EXCLUSIONS

            This entire Policy does not provide benefits for any loss resulting in whole or in part from, or expenses incurred, directly or indirectly in respect of;

            1.         …….

            2.         suicide, attempted suicide (whether sane or insane) or intentionally self-inflicted Injury or illness, or sexually transmitted conditions, mental or nervous disorder, anxiety, stress or depression, Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS), Human Immune-deficiency Virus (HIV)  infection; or         

            तक्रारकर्तीने लक्ष्मीचंद शेतात किटकनाशकाची फवारणी करतांना तो बेशुध्द झाला व उपचारादरम्यान मरण पावला असे तक्रारीत खोटे कथन केले असून त्यासाठी कोणताही पुष्टीकारक पुरावा नाही. मृतक लक्ष्मीचंदचा मृत्यू त्याने स्वतः विष (किटकनाशक) प्राशन करून आत्महत्या केल्याने झाला असून अशा मृत्यूस विमा संरक्षण देण्यांत आले नसल्याने सदर विमा दावा नामंजूर करण्याची कृती सेवेतील न्यूनता ठरत नाही.

            तक्रारकर्तीचे अधिवक्ता सी. जे. गजभिये यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारतांना केवळ विमा दावा उशीरा दाखल केल्याने नामंजूर करण्यांत आल्याचे कळविले होते व मयताने आत्महत्या केल्याने विमा दावा नामंजूर करण्यांत आल्याचे कळविले नव्हते, केवळ विमा दावा दाखल करण्यास थोडा उशीर झाला म्हणून गुणवत्तेचा विचार न करता विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता आहे.  मृतकाने किटकनाशक प्राशन केल्याबाबत कोणताही पुरावा नसतांना आत्महत्येचा बचाव घेऊन विमा दावा देण्याची जबाबदारी टाळण्याचा विरूध्द पक्षाचा प्रयत्न देखील विमा लाभार्थ्याप्रती सेवेतील न्यूनता आहे.

      सदर प्रकरणातील घटनास्थळ पंचनामा, मर्ग खबरी, शव विच्छेदन अहवाल या सर्व दस्तावेजांवरून लक्ष्मीचंद याने विषारी किटकनाशक प्राशन केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट होते.

      तक्रारकर्तीने जरी लक्ष्मीचंद शेतात किटकनाशक फवारणी करीत असतांना बेशुध्द पडला असे तक्रारीत कथन केले असले तरी घटनेच्या वेळी लक्ष्मीचंदच्या शेतात पीक होते व तो पिकावर किटकनाशक फवारणी करीत असतांना बेशुध्द झाला या तक्रारकर्तीच्या म्हणण्याला दुजोरा देणारा कोणताही पुष्टीकारक पुरावा उपलब्ध नसल्याने यासंबंधाने केवळ तिच्या स्वतःच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येत नाही.

      एकंदरीत उपलब्ध पुराव्यावरून लक्ष्मीचंदने स्वतः विषारी किटकनाशक प्राशन केल्यामुळे झालेला त्याचा मृत्यू हा ‘अपघात’ या सदरात मोडत नसून ती आत्महत्या आहे आणि वर नमूद पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे आत्महत्येस विमा संरक्षणातून वगळण्यांत आले असल्याने पतीच्या आत्महत्येबद्दल विमा दावा मिळण्यास तक्रारकर्ती पात्र नाही.  म्हणून सदर कारणामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता ठरत नाही.  वरील कारणामुळे मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.  

9.    मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाची तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्याची कृती पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरून असल्याने तक्रारकर्ती मागणीप्रमाणे कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही.  म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत. 

      वरील निष्कर्षास अनुसरून खालील आदेश पारित करण्यांत येत आहे.

-// अंतिम आदेश //-

            1.     तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल करण्यांत आलेली तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.    तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.

3.    आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.

4.    प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीस परत करावी. 

 
 
[HON'BLE MR. M. G. CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. H. M. PATERIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.