तक्रारकर्तीतर्फे वकील ः- श्री. उदय क्षिरसागर
विरूध्द पक्ष क्र. 1,2 व 3 तर्फे वकील ः- श्रीमती. इंदिरा बघेले
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 26/02/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 विरूध्द पक्षाने शेतकरी विमा अपघात, विम्याची रक्कम दिली नसल्याने हि तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा आहे की, तक्रारकर्तीची आई श्रीमती. अनुबाई उर्फे यशोदा भरतलाल हरीणखेडे यांच्या मालकीची मौजा. हिरडामाली, ता. गोरेगांव जि. गोंदिया येथे भुमापन क्रमांक 23/9 ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीची आई हि शेतीचा व्यवसाय करीत होती. तक्रारकर्तीच्या आईचा मृत्यु दि. 17/10/2013 रोजी पतीसोबत मोटर सायकलवरून मागे बसून जात असतांना मोटर सायकल घसरून पडल्याने जखमी होऊन झाला. तक्रारकर्तीच्या आईचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने विरूध्द पक्ष क्र 3 कडे रितसर अर्ज केला तसेच विरूध्द पक्षाने ज्या–ज्या वेळी दस्ताऐवज मागीतले त्याची पूर्तता केली. विरूध्द पक्ष क्र 1 ते 3 यांच्याकडे रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक ते दस्ताऐवज दिल्यानंतरही त्यांनी दाखल केलेल्या दाव्याबाबत, दावा मंजूर अथवा नामंजूर केला का याबाबत काहीही कळविले नसल्याने तक्रारकर्ती यांनी विरूध्द पक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली परंतू विरूध्द पक्षाने कोणतेही उत्तर न दिल्याने तक्रारकर्तीनी सदर तक्रार दाखल करून मा. न्यायमंचाने विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/-,तसेच मानसिक आणि शारिरिक त्रासापोटी रू.30,000/-,व तक्रारीचा खर्च रू. 10,000/-,द्यावे अशी मागणी केली आहे.
3. विरूध्द पक्षाने या मंचाचा आदेश मिळाल्यानंतर आपली लेखीकैफियत या मंचात सादर करून प्रथम आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्ती मयत श्रीमती. अनुबाई उर्फे यशोदा भरतलाल हरीणखेडे यांची मुलगी नाही. तसेच श्रीमती. यशोदा हरीणखेडे यांचे पती जिवंत असून खेडेगांव चोलाड मध्ये राहत आहे. तसेच यशोदाबाईचे पती श्री. भरतलाल हरीणखेडे यांचेवर भारतीय दंड संहिता कलम 279 आणि 304(A) नूसार फौजदारी गुन्हा दाखल आहे. तक्रारकर्ती यांनी हा बोगस, बनावटी व खोटी तक्रार या मंचात दाखल केली आहे. तसेच तक्रारकर्ती यांनी वारस प्रमाणपत्र सुध्दा दाखल केलेले नाही. तसेच त्यांनी कलम 6 (ड) नूसार फेरफार उतारा दाखल केलेला नाही. म्हणून हि तक्रार खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना केली आहे.
4. दोन्ही पक्षाने आपआपले शपथपत्रावर पुरावा व लेखीयुक्तीवाद या मंचात सादर केलेला आहे. या मंचाने तक्रारकर्तीचे विद्वान वकील श्री. उदय क्षिरसागर तसेच विरूध्द पक्ष क्र 1 करीता विद्वान वकील श्रीमती. इंदिरा बघेले यांचे युक्तीवाद दि. 24/09/2018 रोजी अंशतः ऐकण्यात आले होते. युक्तीवादाच्या वेळी तक्रारकर्ती हि श्रीमती. अनुबाई ऊर्फे यशोदा भरतलाल हरीणखेडे हिला आपली आई दाखवून तिच्या वतीने शेतकरी जनता अपघात विमा योजनअंतर्गत मिळणारे रू. 1,00,000/-,विमा रक्कम मिळण्याकरीता या मंचात दाखल केली आहे. परंतू तक्रारकर्ती हि दत्तक मुलगी असल्याने विवाहित स्त्री मरण पावल्यानंतर तिच्या जवळची नातेवाईक म्हणजे तिच्या पतीने (तक्रारकर्तीचे दत्तक वडिल) हि तक्रार दाखल करायला पाहिजे होते. म्हणजे श्रीमती. अनुबाई ऊर्फे यशोदा भरतलाल हरीणखेडे यांचे पती हयात असतांना त्यांचे नाहरकत किंवा शपथपत्र या मंचात दाखल करणे कायदेशीर बंधनकारक आहे. म्हणून तक्रारकर्तीचे विद्वान वकील यांनी दत्तक वडिलांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणेकरीता वेळ मागीतली. त्यानूसार या मंचाने वेळोवेळी चार संधी दिली असून आज रोजी तक्रारकर्तीचे विद्वान वकील श्री. उदय क्षिरसागर यांनी कायदयानूसार तक्रारकर्तीला पत्र पाठविले तो पत्र पोस्ट ऑफिसकडून “Refused by Addressee Return to Sender” या शे-यासह परत आले ते पुरसीस सोबत दाखल केले आहे. तक्रारकर्तीचे वकीलांनी पाठविलेले पत्र दि. 14/02/2019 यामध्ये असे नमूद आहे की,
‘आपण उपरोक्त तक्रार दाखल करण्यासाठी मला वकीलपत्र दिले होते. सदर तक्रार आता तुम्हच्या वडिलांच्या तक्रारीवर नाव चालविण्यासाठी मंचासमक्ष प्रलंबीत आहे. सदर प्रकरणात आपणांस वारंवार आपल्या वडिलांना मंचासमक्ष हजर करण्यासंबधी सूचना दिल्या. परंतू आपण सदर सूचनेवर अंमल करीत नाही. करिता हे शेवटचे सूचनापत्र आपणास पाठवित आहे. आपली तक्रार दि. 25/02/2019 (सुनावणी तारीख 26/02/2019) ला सकाळी 11.00 वाजता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा माळा येथे हजर करावे अन्यथा माझे वकीलपत्र मागे घ्यावे लागेल’
या अनुषंगाने आज सुनावणी दरम्यान विद्वान वकील श्री. उदय क्षिरसागर यांनी आपले वकीलपत्र तक्रारकर्तीला संपर्क करूनही ती प्रतिसाद देत नसल्याने पुरसीस दाखल करून मागे घेत आहे असे सूचविले. तसेच विरूध्द पक्ष यांचे विद्वान वकील श्रीमती. इंदिरा बघेले यांनी सुध्दा या मंचात हि तक्रार खारीज करण्याचा आदेश व्हावा याकरीता या मंचात अर्ज दाखल केला आहे.
5. तक्रारकर्तीला वारंवार संधी देऊनही त्यांनी आपले वारस प्रमाणपत्र या मंचात दाखल केले नाही. तसेच मयत श्रीमती. अनुबाई ऊर्फे यशोदा भरतलाल हरीणखेडे यांचे पती हयात असतांना त्यांचे नाहरकत किंवा शपथपत्र या मंचात दाखल केले नाही.
वरील चर्चेनूसार तक्रारकर्ती हि शेतकरी जनता अपघात विमा योजना सन 2012 - 2013 च्या तरतुदींनूसार वारस – मुलगी म्हणून सक्षम कार्यालयातुन वारस प्रमाणपत्र घेऊन या मंचात दाखल केले नाही. म्हणून त्यांना या विमा दाव्याची रक्कम कायदयानूसार देता येणार नाही. म्हणून हि तक्रार खारीज करण्यात यावी असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून हा मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभयपक्षांना विनामुल्या पाठविण्यात याव्यात.
- अतिरीक्त संच असल्यास तक्रारकर्तीला परत करण्यात यावे.