Maharashtra

Jalna

CC/64/2011

Smindrabai A.Kharat - Complainant(s)

Versus

The Manager,Cabal Insurance Broking Servises Pvt.Ltd - Opp.Party(s)

R.V.Jadhav

23 Jun 2011

ORDER


REPORTSSurvey No.488 Opp. Krida Bhavan bypass road Jalna
CONSUMER CASE NO. 64 of 2011
1. Smindrabai A.Kharat Asangaio,Tq.Partur,Dist,JalnaJalnaMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. The Manager,Cabal Insurance Broking Servises Pvt.Ltd Shap No1,Disha Alankar Conplex Town CenteraurangabadMaharashtra2. The Manager Reliance Gen.Insurance co Ltd 19,Reliance Center Waldhand Hirachand Belar,jMumbaiMumbaiMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :R.V.Jadhav, Advocate for
For the Respondent :

Dated : 23 Jun 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(दिनांक 23.06.2011 द्वारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
            विमा कंपनीच्‍या सेवेत त्रुटी असल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      थोडक्‍यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती आश्रूबा खरात हे शेतकरी होते आणि त्‍यांचे दिनांक 30.03.2008 रोजी अपघाती निधन झाले. महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसी कालावधीमध्‍येच तिच्‍या पतीचे अपघाती निधन झाल्‍यामुळे तिने विमा पॉलीसी मधील तरतुदीनुसार नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून दिनांक 22.05.2008 रोजी तालूका कृषी अधिकारी, परतूर यांच्‍या मार्फत गैरअर्जदारांकडे विमा दावा सादर केला होता. परंतू गैरअर्जदारांनी तिचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवला आणि त्रुटीची सेवा दिली. म्‍हणून तिने गैरअर्जदारांकडून विमा रक्‍कम मिळावी अशी मागणी केली आहे.
      तक्रारदाराची तक्रार पाहता सदर तक्रार मुदतीत आहे काय ? असा मुद्दा आमच्‍या समोर उपस्थित झालेला आहे.
      तक्रारदाराचे वतीने अड.आर.व्‍ही.जाधव यांनी युक्‍तीवाद केला.
      तक्रारदाराच्‍या पतीचे निधन दिनांक 30.03.2008 रोजी झालेले आहे. मा.सर्वोच्‍च न्‍यायालय, नवी दिल्‍ली यांनी कंदीमल्‍ला रघुवय्या & कंपनी विरुध्‍द नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी व इतर (2009) 7 एस.सी.सी. 768 या प्रकरणातील निवाडयाद्वारे हे स्‍पष्‍ट केलेले आहे की, घटना ज्‍या दिवशी घडली त्‍याच दिवशी तक्रार दाखल करण्‍याचे कारण घडलेले असते. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने नमूद केलेल्‍या सदर तत्‍वाचा विचार केला तर तक्रारदारास ही तक्रार दाखल करण्‍याचे कारण दिनांक 30.03.2008 रोजी घडलेले आहे. म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 24 (अ) नुसार ही तक्रार दोन वर्षाच्‍या आत म्‍हणजेच दिनांक 29.03.2010 पुर्वी दाखल करणे आवश्‍यक होते. परंतू ही तक्रार 392 दिवसाच्‍या विलंबाने दाखल केलेली असुन, विलंबाबाबत तक्रारदाराने कोणताही खुलासा केलेला नाही आणि विलंब माफीचा अर्ज देखील दिलेला नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केलेल्‍या विमा दाव्‍या बाबत विमा कंपनीने कोणताही निर्णय न घेता तिचा विमा दावा प्रलंबित ठेवला म्‍हणून तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्‍याचे कारण सतत घडत आहे, हे तक्रारदाराचे म्‍हणणे योग्‍य नाही. तक्रारदाराची प्रस्‍तुत तक्रार मुदतबाह्य आहे. म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.   
 
आदेश
 
  1. तक्रारदाराची तक्रार मुदतबाह्य असल्‍यामुळे सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.
  2. तक्रारदारास आदेश कळविण्‍यात यावा.         
 

HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBERHONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT ,