(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 1 यांचे कडुन सामनेवाले नं. 3 कंपनीने उत्पादित केलेला “X peria C4” मोबाईल ता. 26/01/2016 रोजी रक्कम रु. 19,500/- रोख देवुन विकत घेतला. सदर मोबाईल करीता 12 महीन्याचा वॉंरंटी कालावधी असल्याचे कॅशमेमो / इनव्हाईसवर नमुद केले आहे.
2. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी एवढया मोठया प्रमाणावर पैसे खर्च करुन अद्यावत सुविधा असलेला हॅडसेंट विकत घेतल्यानंतर केवळ 65 दिवसातच सदर मोबाईलमध्ये दोष असल्याचे लक्षात आले.
3. तक्रारदार यांनी या संदर्भात सामनेवाले नं. 3 यांच्याकडे तक्रार केली असता. सामनेवाले नं. 2 कस्टमर सर्विस सेंटर यांचेकडे संपर्क करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 2 यांचेकडे सदर मोबाईल वारंवार दुरूस्ती साठी देवुनही मोबाईलची दुरूस्ती झाली नाही.
4. तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 2 यांचेकडे ता. 21/06/2016 रोजी मोबाईल हॅडसेट बदलुन नविन मिळण्यासाठी त्यांचे कडे दिला. सामनेवाले नं. 2 यांनी या संदर्भात तक्रार यांना job sheet दिले आहे.
5. तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 2 यांचे कडे नविन मोबाईल हॅण्डसेंटर साठी वारंवार ई-मेल द्वारे, लेखी पत्रद्वारे व तोंडी विनंती केली तथापी सामनेवाले नं. 3 कंपनीचा मोबाईल बदलुन देण्यास तयार नसल्याने सामनेवाले नं. 2 यांनी सांगितले. सबब तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.
6. सामनेवाले 1 ते 3 यांना मंचाची नोटिस प्राप्त होवुनही गैरहजर असल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे. पुरावा शपथपत्र हाच लेखी व तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरर्शिस दिली. यावरुन मंच खालील निष्कर्ष काढत आहे.
7. कारण मिमांसा
अ) तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 1 यांचे कडुन सामनेवाले नं. 3 कपंनीने उत्पादित केलेला “Sony C4” या मॉडेलचा मोबाईल रककम रु. 19,500/- एवढया किमतीचा ता. 26/01/2016 रोजी विकत घेतल्याबाबतचे “Tax invoice” ची प्रत मंचात दाखल आहे.
ब) तक्रारदार यांचा मोबाईल ता. 11/05/2016 रोजी तसेच ता. 21/06/2016 रोजी नादुरूस्त झाल्याने सामनेवाले नं. 2 यांचे कडे दुरूस्तीला दिल्याबाबतचे “Service Job Sheet” ची प्रत प्रस्तुत तक्रारीतील कागदपत्रांच्या निशानी “B” वर दाखल आहे.
क) तक्रारदार यांनी सामनेवाले नं. 2 यांना सदर मोबाईल ता. 31/03/2016 पासून सातत्याने नादुरूस्त होत असल्याने सदर मोबाईल बदलुन नवा मोबाईल देण्याची मागणी केल्याच्या पत्राची प्रत मंचात निशानी “C” वर दाखल आहे.
ड) सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदार यांना ता. 22/10/2016 रोजी पाठवलेल्या ई-मेलची प्रत मंचात दाखल आहे. सदर ईमेलमध्ये नमुद केल्यानुसार तक्रारदार यांच्या मोबाईलमध्ये ‘Heating, Speaker problem, out going, incoming voice is low, Auto clock is off’ अशा तक्रारी असल्याचे नमुद केले आहे. तसेच तक्रारदार यांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत नादुरूस्त झाल्याने सामनेवाले यांनी त्यांच्या इंजिनिअर मार्फत मोबाईलची तपासणी करुन दुरूस्ती केल्याचे नमुद आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले नं. 2 यांच्याकडे वॉरंटीकालावधीत सदर मोबाईल सातत्याने दुरूस्तीसाठी दिला तथापी मोबाईलची दुरूस्ती होवु शेकली नाही. सामनेवाले नं. 2 यांनी सातत्याने तक्रारदार यांना सदर नादुरूस्त मोबाईल परत घेण्याची विनंती केली. तथापी तक्रारदार यांनी सदर मोबाइल मध्ये उत्पादकीय दोष असल्याचे कारणास्तव घेण्यास नाकारले आहे. सामनेवाले तर्फे आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे.
इ) तक्रारदार यांचा मोबईल वॉरटी कालावधीतच नादुरुस्त झाला असुन सामनेवाले नं. 2 यांचेकडे सातत्याने दुरूस्तीसाठी देवुनही त्याची दुरूस्ती होवु शेकत नसल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन ग्राह्य धरणे योग्य आहे असे मंचाला वाटते. तक्रारदार यांच्या मोबाईल मध्ये उत्पादकिय दोष असल्याचे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मोबाईल दुरुस्तीच्या जॉबशीटवरुन व सामनेवाले नं. 2 यांच्या ता. 22/10/2016 रोजीच्या ई-मेल वरुन दिसुन येते यावरुन स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
8. उपरोक्त चर्चेवरुन व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 798/2016 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोष मोबाईल विक्री करुन त्रृटीची सेवा दिल्याचे
जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले 1 ते 3 यांना संयुक्तिकरित्या व वैयक्तिकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना जुना दोषयुक्त मोबाईल बदलुन नवीन सिलबंद मोबाईल “Soni C4 dual ” हा नवीन वॉरंटी सहीत ता. 30/06/2017 पर्यंत द्यावा. विहीत मुदतीत अदा न केल्यास ता. 01/07/2017 पासून प्रत्येक महिन्यास आदेशाच्या पुर्ततपर्यंत रु. 500/- (अक्षरी रु. पाचशे फक्त) प्रमाणे होणारी दंडाची रक्कम तकारदार यांना द्यावी.
अथवा
3) सामनेवाले 1 ते 3 यांना संयुक्तिकरित्या व वैयक्तिकरित्या आदेश देण्यात येतो की, यांनी तक्रारदारांना मोबाईलची किंमत रु. 19,500/-(रु. एकोणीस हजार पाचशे फक्त) ता.26/01/2016 पासुन ता. 30/06/2017 पर्यंत 6% व्याजदराने द्यावी. तसे न केल्यास ता.01/07/2017 पासुन आदेशाच्या पुर्ततेपर्यंत 9% व्याजदराने द्यावी.
4) तक्रारदारांना आदेश ठेवणत येतो की, त्यांनी सामनेवाले 1 ते 3 यांनी आदेश क. 3 प्रमाणे आदेशपुर्ती केल्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांना जुना मोबाईल 30 दिवसात परत द्यावा.
5) सामनेवाले 1 ते 3 यांना संयुक्तिकरित्या व वैयक्तिकरित्या आदेश देण्यात येतो की, यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्क्म रु. 2,500/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 2,500/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) ता. 30/06/2017 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास ता. 01/07/2017 पासून सदर रकमा 9% व्याजदरासहीत द्याव्यात.
6) आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विनाशुल्क, विनाविलंब पाठविण्यात याव्यात.
7) संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.