(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या टिटवाला वसाहतीतील LTG या योजने अंतर्गत Code no. 022 प्रकल्पाचा जाहीरीतीनुसार मोकळा विकसित भुखंड घेण्यासाठी अर्ज केला होता.
2. तक्रारदार यांची लॉटरीच्या सोडतीमध्ये (Lottery Draw) निवड झाल्यानंतर सामनेवाले यांचे कडे आवश्यक त्या कागपत्रांची पुर्तता तक्रारदार यांनी केली. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करुन ता. 30/03/2015 रोजी सदर मोकळ्या विकसित निवासी भुखंडाचा भाडेपट्टा करार दुय्यम निबंधक कल्याण येथे नोंदणीकृत केला. तथापी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना भुखंडाचे ताबापत्र अद्यापपर्यंत दिले नाही.
3. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर भुखंडाच्या ताब्याबाबत वेळोवेळी प्रत्यक्ष भेटुन, लेखी पत्राद्वारे चौकशी केली. तसेच तक्रारदार यांनी ता. 07/01/2016 रोजी सामनेवाले यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटिस पाठवली असुन सामनेवाले यांनी सदर नोटिशीचे उत्तर दिले नाही अथवा नोटिसीप्रमाणे कार्यवाही केली नाही. सबब प्रस्तुत तक्रार सामनेवाले यांचे विरुध्द दाखल केली आहे अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
4. सामनेवाले 1 व 2 यांना मंचाची नोटिस प्राप्त होवुनही गैरहजर आहेत. तसेच त्यांचे तर्फे लेखी कैफियत दाखल नाही. सबब सामनेवाले यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबतचा आदेश मंचाने पारित केला आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचे सखोल वाचन केले. तक्रारदार यांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला. यावरुन मंच खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष काढत आहे.
मुद्दे-
अनु.क्र | मुद्दे | निष्कर्ष |
1. | सामनेवाले यांनी मौ. टिटवाला ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. 221, हिस्सा नं. 1 या मिळकतीतील मोकळा विकसित निवासी भुखंड क्र. 43 चा नोंदणीकृत भाडेपट्टा करार ता. 30/03/2015 रोजी तक्रारदार यांच्या लाभात करुनही अद्याप पर्यंत भुखंडाचे ताबापत्र न देवुन तक्रारदार यांना त्रृटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदार यांनी सिध्द केली आहे काय? | होय |
2 | तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत का? | होय |
3 | अंतीम आदेश | निकालाप्रमाणे |
6. कारण मिमांसा
अ) तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे मौ. टिटवाला मांडे, ता. जि. ठाणे येथील भुखंडासाठी केलेला अर्ज 1174 (कोड नं. 022 सर्व साधारण जनता आरक्षित गटाचे नाव) प्राप्त झाल्याबाबतची संबंधित प्राधिकृत अधिका-यांची पोच पावतीची प्रत मंचात दाखल आहे.
ब) कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, मुंबई यांनी ता. 17/01/2003 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अंतर्गत 35.85 चौ.मि क्षेत्रफळाचा एक विकसित भुखंड तक्रारदार यांना वितरित करण्याचे कळवले असुन सदर पत्राची प्रत मंचात दाखल आहे. सदर पत्रातील अटी व शर्तीची पुर्तता सामनेवाले यांचे निर्देशाप्रमाणे करणे तक्रारदार यांचेवर बंधनकारक असल्याचे पत्रावरुन दिसुन येते.
क) तक्रारदार यांनी ता. 21/02/2003 रोजी सामनेवाले यांचेकडे वरील पत्रातील निर्देशाप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे व भुखंड विक्रीची रु. 10,360/- ता. 21/02/2003 रोजी व रु. 28,477 ता. 29/08/2003 रोजी सामनेवाले यांचेकडे भरणा केल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहेत.
ड) सामनेवाले यांनी ता. 16/03/2005 रोजी तक्रारदार यांना सामनेवाले यांच्या “LIG” योजने अंतर्गत मौ. टिटवाला ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. 221, हिस्सा नं. 1 मिळकतीत भुखंड क्र. 43, क्षेत्रफळ 35.85 असलेला अलॉट केला असुन तक्रारदार यांनी कार्यालयीन आदेश क्र. 362 ता. 17/01/2003 नुसार भुखंडाची रक्कम भरणा केल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले आहे. सदर प्रमाणपत्राची प्रत मंचात दाखल आहे. सदर पत्रान्वये सामनेवाले नं. 2 यांनी अधिक्षक (मुद्रांक) यांना पुढील कार्यवाही बाबतचे मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे (शहर) यांची या संदर्भात मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे अंतर्गत कलम 31 प्रमाणे ता. 27/06/2014 रोजी आदेश दिला असुन सदर अधिनियमांच्या परिशिष्ठ 1 मधील अ.नु.36 अन्वये रु. 2,100/- मुद्रांक शुल्क निश्चित केला असल्याचे दिसुन येते.
ई) वरील प्रमाणे मुद्रांक शुल्क निश्चित झाल्यानंतर तक्रारदार यांना सामनेवाले यांनी ता. 30/03/015 रोजी दस्त क्र. 2951/15 अन्वये भाडेपट्टा करार (Agreement to lease) दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदणीकृत करुन दिल्याबाबतची भाडेपट्टी कराराची नोंदणीकृत प्रत मचात दाखल आहे.
उ) तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या निर्देशानुसार भुखंडाच्या वितरणाबाबतची संपुर्ण कार्यवाही पुर्ण केल्याचे तक्रारीतील पुराव्यावरुन स्पष्ट होते. सामनेवाले यांनी ता. 30/03/2015 रोजी भुखंड क्र. 43 (टिटवाळा, कोड नं. 22, योजनेअंतर्गत) चा भाडेपट्टा करार नोंदणीकृत करुनही संबंधित भुखंडाचा ताबा तक्रारदार यांना प्राप्त झालेला नसल्याने तक्रारदार यांनी ता. 05/05/2015, दि. 21/05/2015, दि. 16/06/2015 रोजी सामनेवाले यांना स्मरणपत्रे पाठवली असुन ता. 07/01/2016 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटिस पाठवल्याबाबतची कागदपत्रे मंचात दाखल आहेत.
ऊ) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी स्मरणपत्रे व कायदेशिर नोटिस प्राप्त होवुनही कोणताही प्रतिसाद दिला नाही अथवा योग्य कार्यवाही करुन भुखंडाचा ताबा दिला नाही. सामनेवाले तर्फे आक्षेप दाखल नाही. तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे.
ए. वरील परिस्थितीनुसार तक्रारदारांचा पुरावा मान्य करण्यास कोणतीही कायदेशिर अडचण दिसुन येत नाही. तक्रारदारांनी सदनिकेच्या ताब्याची मागणी केलेली असल्यामुळे तक्रार मुदतबाह्य ठरत नाही.
ऐ) तक्रारदारांनी भुखंडाची संपुर्ण किंमत सामनेवाले यांना अदा करुनही ता. 30/03/2015 रोजीच्या Agreement to lease प्रमाणे त्यांनी भुखंडाचा ताबा तक्रारदार यांना न देवुन सामनेवाले यांनी त्रृटीची सेवा दिल्याचे तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन स्पष्ट होते. सामनेवाले यांनी दिलेल्या त्रृटींच्या सेवेमुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला, आर्थिक नुकसान झाले आहे तसेच प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवाले यांनी ता. 30/03/2015 रोजीच्या करांमध्ये नमुद केल्यानुसार भुखंडाचा प्रत्यक्ष व कायदेशिर ताबा, ताबा पत्रासहीत देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे. सामनेवाले सदर भुखंडाचा ताबा तक्रारदार यांना देण्यास असमर्थ असतील तर तक्रारदार यांनी तक्रारीच्या प्रार्थना कलम b मध्ये नमुद केल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यात इतर ठिकाणी ठाणे कल्याण व बदलापुर येथील परिसरातील भुखंड घेण्याची तयारी दर्शवली आहे. सबब तक्रारदार यांना करारातील भुखंडाचा ताबा अथवा ठाणे जिल्ह्यातील परिसरातील तितक्याच क्षेत्रफळाच्या विकसित निवासी मोकळ्या भुखंडाचा प्रत्यक्ष व कायदेशिर ताबा ताबापत्रासहीत सामनेवाले यांनी देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
7. उपरोक्त चर्चेवरून तसेच निष्कर्षानुसार, खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 402/2016 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले 1 व 2 यांनी संयूक्तिरित्या व वैयक्तिकरित्या तक्रारदार यांना ता. 30/03/2015 रोजीच्या भाडेपट्टा करारानुसार भुखंडाचे ताबापत्र व प्रत्यक्ष ताबा न देवुन त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तकरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मौ. टिटवाला मांडे, ता. जि. ठाणे येथील सर्वे नं. 221, हिस्सा नं. 1 मिळकतीतील मोकळा विकसित भुखंड क्र. 43 क्षेत्रफळ 35.85 चौ.मि चा ताबा ता. 30/03/2015 रोजीच्या करारातील सोयी सुविधांसह ता. 01/08/2017 पर्यंत द्यावा तसे न केल्यास ता. 02/08/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत प्रत्येक महिन्याकरीता रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावे.
अथवा
3. सामनेवाले यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तकरित्या आदेश देण्यात येतो की,
सामनेवाले यांनी ता. 30/03/2015 मध्ये नमुद केलेल्या वरील भुखंड क्र. 43
चा ताबा तक्रारदार यांना देण्यास असमर्थ असल्यास ठाणे जिल्ह्यातील परिसरातील तितक्याच क्षेत्रफळाच्या मोकळया विकसित भुखंडाचा ताबा सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता. 01/08/2017 पर्यंत द्यावा तसे न केल्यास ता. 02/08/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत प्रत्येक महिन्याकरीता रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावे.
4) सामनेवाले यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तकरित्या आदेश देण्यात येतो की, नुकसान भरपार्इची रक्कम रु. 20,000/- (अक्षरी रु. वीस हजार फक्त) व तक्रारीचा खर्चाची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) ता. 01/08/2017 पर्यंत द्यावी. सदर रकमा विहित मुदतीत अदा न केल्यास दि. 02/08/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदरासह द्याव्यात.
5) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
6) संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.