Maharashtra

Kolhapur

CC/18/140

Pramod Mahadev Kajje - Complainant(s)

Versus

Tata Moters Ltd. - Opp.Party(s)

S.S.Mujavar

15 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/18/140
( Date of Filing : 18 Apr 2018 )
 
1. Pramod Mahadev Kajje
1587/A,Purgrast Vasahat, Udgaon, Tal.Shirol Dist.Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Tata Moters Ltd.
Pimpri Pune
2. Chetan Moters
Uchgaon, Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Dec 2021
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील  कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      वि.प.क्र.1 ही वाहन उत्‍पादन करणारी कंपनी असून वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत डिलर आहेत.  तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांनी उत्‍पादित केलेले एम.एच.09-सीयू-4847 हे वाहन वि.प.क्र.2 यांचेकडून रक्‍कम रु.4,54,000/- या रकमेस दि. 09/07/2015 रोजी खरेदी केले आहे.  सदरचे वाहन सुरुवातीपासून म्‍हणजेच वॉरंटी काळापासूनच व्‍यवस्थित चालत नव्‍हते.  सदर वाहनामध्‍ये ऑईल कन्‍झम्‍शन, इंजिनमध्‍ये बिघाड वगैरे प्रकारचे उत्‍पादित दोष होते.  प्रत्‍येक वेळी तक्रारदार हे वि.प.क्र.2 यांचेकडे वाहन घेवून जात होते.  त्‍यावेळी वि.प.क्र.2 हे वाहनामधील दोष शोधून दुरुस्‍त केले आहेत असे सांगून वाहन तक्रारदार यांना पाठवून देत होते.  प्रत्‍येकवेळी कोणत्‍याही प्रकारे इंजिनमधील बिघाड, ऑईल इ. दोष वि.प. यांना काढता आलेले नाहीत.  तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांच्‍या टोल फ्री नंबरवर वारंवार तक्रार नोंदविली आहे.  परंतु वि.प. यांनी वाहनातील उत्‍पादित दोष काढून दिेलेले नाहीत.  वि.प. यांचे सदरचे कृत्‍य हे अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब करणारे आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु. 5,55,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याज मिळावे, प्रस्‍तुतचे वाहन परत घेवून वाहनाची रक्‍कम रु.4,54,000/- व त्‍यावरचे 10 टक्‍के व्‍याज वाहन खरेदीपासून ते रक्‍कम प्रत्‍यक्ष मिळेपर्यंत तक्रारदारास मिळावे अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 17 कडे अनुक्रमे वाहनाचे आर.बी.बुक, वाहन दुरुस्‍तीचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, पार्ट खरेदीचे इन्‍व्‍हॉईस, गाडी बाहेर सोडणेबाबतचे मेमो, कॅश मेमो, वि.प यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोस्‍टाची पावती व पोहोच पावती वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने कागदयादीसोबत वाहन दुरुस्‍तीचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, पार्ट खरेदीचे इन्‍व्‍हॉईस, गाडी बाहेर सोडणेबाबतचे मेमो, कॅश मेमो, वि.प यांना पाठविलेली नोटीस, वाहनाचे पिस्‍टन क्रॅक दाखविणारे फोटो, इंजिन ऑईल बदललेबाबतची बिले तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    वि.प.क्र.1 यांना प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही वि.प.क्र.1 हे याकामी हजर झाले नाहीत व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, वि.प.क्र.1 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला. 

 

5.    वि.प.क्र.2 यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट, कागदयादीसोबत जॉब कार्डच्‍या प्रती तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  वि.प. क्र.2 ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प. क्र.2 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    तक्रारदाराने खरेदी केलेले वाहन हे व्‍यावसायिक कारणासाठी घेतले असलेने सदरची तक्रार या आयोगासमोर चालणेस पात्र नाही.

 

iii)    वि.प.क्र.2 हे डिलर असून त्‍यांचा वाहन उत्‍पादन करणेशी संबंध नाही.

 

iv)    तक्रारदार यांनी वाहनास किती वर्षाची वॉरंटी होती याचा उल्‍लेख जाणूनबुजून केलेला नाही.

 

v)    सदर वाहनाने किती प्रवास केला याचा उल्‍लेख तक्रारअर्जात नाही.

 

vi)    वाहनाचे प्रवासाचे परिस्थितीवर वाहनास ऑईल तसेच अनुषंगिक देखभाल करणे आवश्‍यक आहे व अशा देखभालीकरिता गाडी दुरुस्‍तीस सोडलेस सदरची बाब ही उत्‍पादित दोषांमध्‍ये येत नाही.  वि.प.क्र.2 यांनी आवश्‍यक त्‍या सेवा तक्रारदारास दिलेल्‍या आहेत.

 

vii)   वाहन घेतलेपासून त्‍याचा वापर केल्‍यानंतर तब्‍बल सहा महिन्‍यांच्‍या अंतराने ऑईल बदलीसाठी वाहन वि.प.कडे दिले होते.  जर वाहनामध्‍ये उत्‍पादित दोष असता तर ते चालूच शकले नसते.

 

viii)   वाहनात उत्‍पादित दोष असल्‍याबाबत कोणताही संयुक्तिक पुरावा या कामी तक्रारदाराने दाखल केलेला नाही.

 

ix)        वाहनाचे कोणते भाग खरेदीसाठी वि.प यांनी सांगितले, याचा उल्‍लेख तक्रारअर्जात नाही.

 

x)         तक्रारदाराने याबाबत केवळ मोघम कथने केली आहेत.  सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

6.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

नाही.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईची रक्‍कम व वाहनाची रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

नाही.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

 

वि वे च न

 

7.    वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांनी उत्‍पादित केलेले एम.एच.09-सीयू-4847 हे वाहन वि.प.क्र.2 यांचेकडून रक्‍कम रु.4,54,000/- या रकमेस दि. 09/07/2015 रोजी खरेदी केले आहे.  सदरची बाब वि.प.क्र.2 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये मान्‍य केली आहे. तक्रारदाराने याकामी वाहनाचे आर.बी.बुक दाखल केले आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

8.    प्रस्‍तुतकामी तक्रारदारांचे तक्रारअर्जाचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी वाहनाच्‍या दोषांबाबत केवळ मोघम कथने केली आहेत.  वाहनाचे वॉरंटी कालावधीबाबत तक्रारदारांनी काहीही नमूद केलेले नाही.  तसेच सदरचे वॉरंटी कार्डही याकामी दाखल केलेले नाही.  वाहनाचे रनिंग किती किलोमीटर झाले, वाहनामध्‍ये नेमके कोणते दोष निर्माण झाले, कोणते पार्ट बदलण्‍यात आले, याबाबत कोणताही नेमका व सविस्‍तर तपशील तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केलेला नाही.  वाहनामध्‍ये उत्‍पादित दोष आहेत असे तक्रारदाराचे कथन आहे.  परंतु सदर कथन शाबीत करण्‍याची जबाबदारी ही तक्रारदाराची होती.  परंतु तक्रारदारांनी आपले कथनांचे पुष्‍ठयर्थ कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही.  वास्‍तविक पाहता, तक्रारदाराने वाहनात उत्‍पादित दोष असलेबाबत वाहन क्षेत्रातील तज्ञाचा अहवाल दाखल करणे आवश्‍यक होते.  तसा कोणताही अहवाल तक्रारदाराने दाखल केलेला नाही.  तसेच प्रस्‍तुतकामी सदरचा अहवाल मागविणेबाबत या आयोगासमोर तक्रारदाराने कोणताही अर्ज दाखल केलेला नाही.  तक्रारदाराने तक्रारअर्जात वाहनात उत्‍पादित दोष असलेबाबत केवळ मोघम कथने केलेली आहेत.  सबब, कोणत्‍याही पुराव्‍याअभावी तक्रारदारांचे कथनांवर विश्‍वास ठेवणे या आयोगास संयुक्तिक वाटत नाही. सबब, तक्रारदारांनी आपली तक्रार शाबीत केलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

     

9.    वि.प.क्र.2 यांनी याकामी वरिष्‍ठ न्‍यायालयाचा खालील न्‍यायनिवाडा दाखल केलेला आहे.

 

     Sukhvinder Singh    Vs.  Classic Automobile & Anr. decided by Hon’ble National Commission on 6th November 2012.

 

          It is held that the report of expert was essential or some other evidence showing manufacturing defect should have been adduced.  The mere fact that the vehicle was taken to the service station for one or two times does not ipso facto prove the manufacturing defect.  Due to lack of evidence, the value of the petitioners case evanesces. 

 

             सदरचा निवाडा प्रस्‍तुत प्रकरणास तंतोतंत लागू पडतो असे या आयोगाचे मत आहे.  सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर होण्‍यास पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिले आहे.

 

10.   तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात आल्‍याने तक्रारदार हे नुकसान भरपाई पोटी कोणतीही रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाहीत अथवा वाहनाची किंमतही परत मिळण्‍यास पात्र नाहीत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिले आहे.

 

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

 

 

 

 

 

आदेश

 

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.

 

2)    खर्चाबाबत आदेश नाहीत.

 

3)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.