Maharashtra

Kolhapur

CC/10/196

Vinayak Vijay Bagade - Complainant(s)

Versus

Tapovan Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit - Opp.Party(s)

M.M.Patil

23 Mar 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/196
1. Vinayak Vijay BagadeR/o.637/A Opp. Old Kalamba Jakat Naka, Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Tapovan Nagari Sahakari Pat Sanstha MaryaditOpp. Sambhaji Nagar S.T.Stand, Kolhapur2. Shri Dilip Ganpatrao MagdumOld More Colony, Sambhajinagar, Kolhapur3. Shri Chandrakant Dadoba DesaiR/o.Plot No.8, Old More Colony, Kolhapur4. Shri Dr.Gopal Ramchandra ChavanR/o.C.S.No.760, Nale Colony, Sambhajinagar, Kolhapur5. Shri Mahadeo Bapusaheb PatilR/o.Plot No.53, Tatyaso Mohite Colony, Sambhajinagar, Kolhapur6. Shri Shoukat Mahamad MullaR/o.760/11, Old More Colony, Sambhajinagar, Kolhapur7. Shri Satish Anandrao PatilR/o.328, A Ward, Harale Galli, Shivaji Peth, Kolhapur8. Shri Pratapsinh Purushottam JoshiR/o.334, A Ward, Margai Galli, Shivaji Peth, Kolhapur9. Shri Dhondiram Bapuso SalokheR/o.850/1, Bapuram Nagar, Kalamba, Kolhapur.10. Shri Shrikant Parshuram DesaiR/o.16, Sambhajinagar, Old More Colony, Kolhapur.11. Shri Tanaji Ratnappa PatilR/o. Sambhajinagar, Old More Colony, Kolhapur.12. Shri Dilip Nana JadhavR/o. Plot No.25, Sambhajinagar, Old More Colony, Kolhapur.13. Sou.Ashalata Mohan PatilR/o. 732/10, Ashadip, Vidhya Vihar Colony, Kolhapur.14. Sou.Radhika Rajendra PatilR/o. 234/6, Gurukripa, Pachgaon, Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :

Dated : 23 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.23.03.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले.  सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंचे पक्षकार तसेच त्‍यांचे वकिल गैरहजर. सबब, उपलब्‍ध कागदपत्रांच्‍या आधारे हे मंच प्रस्‍तुतची तक्रार निकाली काढीत आहे.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           सामनेवाला पतसंस्‍था ही महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960 खाली नोंदणीकृत पतसंस्‍था आहे. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे बचत खाते क्र.2895 मध्‍ये रक्‍कम रुपये 1,26,299/- ठेवलेली आहे.  सदर रक्‍कमेची तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्‍कमेची कौटुंबिक गरजा व मुलांचे उच्‍च शिक्षणाकरिता आवश्‍यकता आहे. तथापि, सामनेवाला यांची वैयक्तिक व संयुक्तिक कायदेशीर जबाबदारी असतानाही सामनेवाला यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(4)        सामनेवाला 1 ते 14 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सभासद व संस्‍था यांचे दरम्‍यान झाले वादाचे निराकरण करणेकरिता सहकार न्‍यायालय स्‍थापन झाले असल्‍याने प्रस्‍तुतचा अर्ज या मंचात चालणेस पात्र नाही. तसेच, प्रस्‍तुत अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाला संस्‍थेचे लेखापरिक्षण होवून त्‍यामध्‍ये सामनेवाला संस्‍थेच्‍या संचालकांनी संस्‍थेमध्‍ये कोणताही अपहार केला नसलेचे सिध्‍द झालेले नाही. त्‍यामुळे महाराष्‍ट्र सहकारी कायदा कलम 88 प्रमाणे देय रक्‍कमेची कोणतीही जबाबदारी प्रस्‍तुत सामनेवाला यांचेवर सहकार खात्‍याने ठेवलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही. इत्‍यादी कथने करुन सामनेवाला यांनी तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(5)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने सामनेवाला संस्‍थेमध्‍ये बचत खाते क्र.2895 मध्‍ये रक्‍कम रुपये 1,26,299/- इतकी रक्‍कम ठेवली आहे व त्‍याची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्‍कमा व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला यांनी सदर रक्‍कमा देणेची कायद्याने कोणतीही जबाबदारी त्‍यांचेवर येत नसल्‍याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे बचत खात्‍यामध्‍ये रक्‍कम ठेवली आहे व सदर रक्‍कमेची वारंवार मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्‍कम सामनेवाला संस्‍थेने दिलेली नाही. त्‍यामुळे सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 14 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्‍कम देणेबाबत आहे असे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत कथन केले आहे. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्‍थेच्‍या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्‍तुत सामनेवाला यांची त्‍याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 ते 14 यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचे तक्रारदारांचे कथन हे मंच फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून मा.ना.उच्‍च न्‍यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्‍त्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
 
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
 
(6)        तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपात रक्‍कम ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 2895 वर दि.31.03.2008 रोजीअखेर रुपये 1,26,299/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.2895 वरील रक्‍कम रुपये 1,26,299/- (रुपये एक लाख सव्‍वीस हजार दोनशी नव्‍व्‍याण्‍णव फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.01.04.2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
(3)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT