तक्रारदार : स्वतः हजर.
सा.वाले : गैर हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले हे कंपनी कायद्या प्रमाणे निर्माण झालेली कंपनी असून आपला व्यवसाय हॉलीडे रिसॉर्ट या नांवाने चालवितात. त्यांचे कार्यालय तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहे.
2. तक्रारदार हे मुंबई येथील रहीवाशी असून तक्रारीत नमुद केलेल्या पंत्यावर राहातात. सा.वाले यांचेकडून हॉलीडे रिसॉर्टची सोई सुविधा उपलब्ध करुन घेण्याचे उद्देशाने तक्रारदार यांनी सा.वाले यांचेशी संपर्क साधून सा.वाले यांचे कडून टाईम्स शेअर्स विकत घेऊन हॉलीडे रिसॉर्टच्या सोई सुविधा मिळण्यासाठी 99 वर्षाच्या कालावधीसाठी सभासदत्व पत्करले होते. तक्रारदार व सा.वाले यांच्यात टाईम्स शेअर्स वाटपाच्या बाबत व हॉलीडे रिसॉर्टच्या सोई सुविधा उपभोगण्याबाबत करारनामा करण्यात आला होता. त्या प्रमाणे तक्रारदार यांना टाईम्स शेअर्सचे वाटप करण्यात येऊन त्यांचा ग्राहक क्रमांक 48625 असा देण्यात आला होता. तक्रारदार व सा.वाले यांच्यातील करारा प्रमाणे मुन्नार या ठिकाणी दिनांक 20 मे, या तारखेपासून सुरु होणा-या विसाव्या आठवडयापासून उपलब्धतेनुसार हॉलीडे रिसॉर्टची सोय प्रत्येक वर्षी अनुन्येय होती. तक्रारदार यांचे असे कथन आहे की, कारारात नमुद केल्याप्रमाणे मुन्नार येथील हॉलीडे रिसॉर्टच्या उपलब्धते बाबत सा.वाले यांना वारंवार विनंती करुन देखील सा.वाले यांनी त्यांना मुन्नार येथील हॉलीडे रिसॉर्टची उपलब्धता करुन दिली नाही. तसेच पर्यायी उपलब्धता महाबळेश्वर येथे करारामध्ये कबुल करुन देखील करुन दिली नाही. या संबंधी सा.वाले यांचे बरोबर वारंवार पत्र व्यवहार करुन देखील सा.वाले यांनी तक्रारदार यांना हॉलीडे रिसॉर्ट बाबत उपभोग मिळू दिला नाही. महाबळेश्वर येथील पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन न देण्याबाबत महाबळेश्वर येथील विश्रामगृहाचे बांधकाम अपुरे असल्यामुळे तेथे व्यवस्था करता येत नाही असे उत्तर देऊन तक्रारदारांना महाबळेश्वर येथील पर्यायी व्यवस्था नाकारण्यात आली. सा.वाले यांच्या वरील कृतीने तक्रारदार यांना मानसीक त्रास सहन करावा लागला.
3. तक्रारदार यांचे असे देखील म्हणणे आहे की, सा.वाले यांनी तक्रारदार यांचे कडून हॉलीडे रिसॉर्ट मधील मिळणा-या सोई सुविधांच्या वार्षिक देखभालपोटी अवास्तव रक्कमेची मागणी केली. त्या बाबत करारामध्ये कोणताही उल्लेख नसताना देखील तसेच तक्रारदार यांना हॉलीडे रिसॉर्ट बाबत कोणतीही उपलब्धता न करुन देता देखील सा.वाले यांची वरील कृती ही तक्रारदार यांना मानसिक त्रास देणारी तसेच अपमानास्पद आहे. वास्तविक तक्रारदार यांनी टाईम्स शेअर्स विकत घेण्यासाठी खर्च केलेली रक्कम रु.46,000/- हीचे बाजारभावाप्रमाणे वाढलेले मुल्य विचारात घेऊन सा.वाले यांनी तक्रारदार यांना हॉलीडे रिसॉर्ट बाबत सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यास नकार दिल्यामुळे सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या त्रृटीत येते त्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल करुन सा.वाले यांचे कडून नुकसान भरपाइपोटी रु.10,00,000/- येवढया रक्कमेची मागणी केलेली आहे. तसेच सा.वाले यांनी तक्रारदार यांना हॉलीडे रिसॉर्ट बाबत साई सुविधा उपलब्ध करुन देण्या विषयी आदेश देण्या विषयी विनंती केली आहे.
4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे म्हणणे व मागणे तसेच तक्रारीतील कथने नाकारली असून तक्रारदारांनी सदरची तक्रार सा.वाले यांचे कडून पैसे मिळविण्यासाठी व सा.वाले यांना त्रास देण्यासाठी केलेली आहे असे कथन केले आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचे बरोबर हॉलीडे रिसॉर्ट मधील सोई सुविधा मिळविण्याबाबत केलेला करार व त्यासाठी तक्रारदारांनी सा.वाले यांचे कडून विकत घेतलेले टाईम्स शेअर्स सा.वाले नाकारत नाहीत. तसेच सा.वाले यांनी तक्रारदार यांना एक आठवडयापर्यत तक्रारदारांच्या पसंदीचे हॉलीडे रिसॉर्ट देण्या विषयी 1999 साली केलेला वादा सा.वाले नाकारत नाहीत. परंतु सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांना द्यावयाची रीसॉर्ट बाबत पर्यायी व्यवस्था ही उपलब्धतेनुसार अवलंबून आहे. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे सा.वाले यांचे सभासद झाल्यापासून 1998 सालामध्ये तक्रारदार यांना मुन्नार व महाबळेश्वर येथील हॉलीडे रिसॉर्टमध्ये साई सुविधा उपलब्ध न झाल्याबद्दल तक्रारदार यांनी 2005 सालामध्ये दाखल केलेली तक्रार हीला मुदतीची बाधा येते. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, वास्तविक तक्रारदारांनी हॉलीडे रिसॉर्ट बाबत सर्व सोई सुविधांचा उपभोग घेतल्या नंतरही देखील त्यांनी 2005 सालामध्ये सा.वाले यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. तसेच सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांना मुन्नार येथील हॉलीडे रिसॉर्ट मधील उपलब्धतेबाबत सा.वाले यांनी कधीही नकार दिलेला नाही. परंतु महाबळेश्वर येथील हॉलीडे रिसॉर्ट मधील उपलब्धता तेथील बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे सा.वाले देऊ शकले नाही. त्या बाबत करारामध्ये तसा उल्लेख असल्यामुळे सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. सा.वाले यांचे असे देखील म्हणणे आहे की, 2005 सालात तक्रारदार यांना मुन्नार येथील हॉलीडे रिसॉर्ट मधील सोई उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या परंतु त्यांचेकडे हॉलीडे रिसॉर्ट येथील सोई सुविधा बाबत थकीत असलेला वार्षिक देखभाल खर्च त्यांनी दिला नाही. सदर खर्चाबाबत सा.वाले यांनी केलेली मागणी करारातील अटी नुसार असून तशी मागणी करण्यात सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार रद्द करण्यात यावी.
5. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, सोई सुविधांच्या वाटपा बाबतची सूचना, सा.वाले यांचे सोबत झालेल्या पत्र व्यवहाराच्या प्रती, दाखल केल्या आहेत.
6. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र, तसेच तक्रारदार यांचे सोबत झालेल्या कराराची प्रत दाखल केली.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, कागदपत्रे, शपथपत्र यांचे वाचन केले. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. सा.वाले हे तोंडी युक्तीवादासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यानुसार तक्रारीचे निकालाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारींना मुदतीची बाधा येते काय ? | नाही. |
2 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मागणी प्रमाणे हॉलीडे रिसॉर्टच्या सोई सुविधा उपलब्ध न करुन दिल्यामुळे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
3 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | नाही. |
4 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः- तक्ररदार व सा.वाले यांच्यात टाईम्स शेअर्स विकत घेण्या बाबत व तक्रारदार यांच्या मागण्या प्रमाणे हॉलीडे रिसॉर्ट येथील सोई सुविधा उपभोगण्याबाबत 1996 साली 99 वर्षाकरीता करार करण्यात आला होता व सदर करारा प्रमाणे तक्रारदार यांना प्रत्येक वर्षाच्या मे महीन्याच्या 20 तारखेपासूनच्या सुरु होणा-या 20 व्या आठवडयापासून उपलब्धतेनुसार हॉलीडे रिसॉर्टची सोय प्रत्येक वर्षी अनुज्ञेय होती ही बाब उभय पक्षकारांना मान्य आहे. तक्रारदार यांनी रु.46,000/- चे विकत घेतलेले टाइम्स शेअर्स सा.वाले यांना मान्य आहेत. मुन्नार व महाबळेश्वर येथील हॉलीडे रिसॉर्टच्या सोई सुविधांच्या उपलब्धतेबाबत तक्रारदार व सा.वाले यांचे बरोबर झालेला पत्र व्यवहार उभय पक्षकारांना मान्य आहे.
8. सा.वाले यांनी तक्रारदार यांना करारात ठरल्याप्रमाणे नमुद करुनसुध्दा हॉलीडे रिसॉर्ट बाबत सोई सुविधा उपलब्ध करुन न दिल्यामुळे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी आपला पुरावा शपथपत्र व तक्रारीतील कथने यावर भर देऊन प्रमुख्याने तक्रारदारांना मुन्नार व महाबळेश्वर येथील हॉलीडे रिसॉर्ट बाबतची सोयी सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. तसेच त्या बाबत सा.वाले यांचेशी पत्र व्यवहार करुन देखील सा.वाले यांनी त्याची दखल न घेता तक्रारदारांना अपमानास्पद वागणूक दिली व उलटपक्षी सा.वाले यांनी तक्रारदार यांचे कडून हॉलीडे रिसॉर्ट मधील सोई सुविधांच्या वार्षिक देखभाल खर्चापोटी रु. 7,250/- ची मागणी करुन तक्रारदार यांना मानसिक त्रास दिला असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला.
9. सा.वाले हे तोंडी युक्तीवादाचे वेळी गैरहजर असल्यामुळे तक्रारदार यांचेतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद व त्यातील सत्यता पडताळून पहाण्यासाठी अभिलेखात दाखल केलेली कागदपत्रे व उभय पक्षकारांचे पुरावा शपथ पत्र याचे वाचन करण्यात आले. सा.वाले यांनी तक्रारीस आक्षेप घेताना तक्रारीस मुदतीची बाधा येते असा आक्षेप घेतल्यामुळे कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर असे दिसते की, तक्रारदार यांनी प्रामुख्याने 1998 साली त्यांनी मुन्नार येथील हॉलीडे रिसॉट मधील जागे बाबत विचारणा केली असता ती त्यांना न देता तसेच महाबळेश्वर येथील पर्यायी व्यवस्था उपलब्ध न करुन दिल्यामुळे सा.वाले यांचे वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर असा युक्तीवाद केला. वास्तविक 1998 सालातील सा.वाले यांचेकडून निर्माण झालेल्या त्रृटी बाबत ग्राहक तक्रार निवारण कलम 24 प्रमाणे तक्रारदारांनी दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करावयास हवी होती ती न करण्याचे कोणतीही सयुक्तीक कारण तक्रारदारांनी दिलेले नाही. अभिलेखातील कागदपत्रांचे अवलोकन केल्यानं तक्रारदारांनी हॉलीडे रिसॉर्ट मधील वार्षिक देखभाल खर्चाची मागणी जी सा.वाले यांनी केली आहे त्या बाबतसुध्दा तक्रारदार यांची सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर असा आक्षेप घेतला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली 2005 सालातील तक्रार जरी वरील कृतीच्या मुदतीत असली तरी तक्रारदारांनी मुन्नार व महाबळेश्वर येथील 1998 सालातील हॉलीडे रिसॉर्टच्या सोई सुविधा संबंधीची तक्रार निश्चितच उशिरा दाखल केलेली आहे. असे असले तरी सा.वाले यांनी सोई सुविधा संबंधीच्या वार्षिक देखभाल खर्चा संबंधी केलेली मागणी व त्या संबंधी केलेली तक्रार ही दोन वर्षाचे आत केलेली असल्यामुळे तक्रारीस मुदतीची बाधा येत नाही. परंतु तक्रारदार यांनी मुन्नार व महाबळेश्वर येथील 1998 सालातील हॉलीडे रिसॉर्टमध्ये सोई सुविधा मिळणे बाबत केलेली तक्रार निच्छितच बाधीत आहे.
10. तक्रारदार यांनी हॉलीडे रिर्सार्ट मधील सोई सुविधांच्या वार्षिक देखभाल खर्चा बाबत सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर असा आक्षेप घेतला असला तरी सा.वाले यांनी केलेली वरील मागणी ही उभय पक्षकारातील झालेल्या करारा नुसार आहे. असे कराराचे अवलोकन केल्यावर स्पष्ट दिसून येते. उभय पक्षकारातील झालेल्या करारातील कलम 13(सी) चे अवलोकन केल्यावर सा.वाले हे तक्रारदारांकडून वरील रक्कमेची मागणी करु शकतात असे स्पष्ट दिसते. तसेच करारातील कलम 19(सी) चे अवलोकन केले असता पर्यायी हॉलीडी रिसॉर्टची जागा उपलब्ध असल्यासच ती तक्रारदारांना अनुज्ञेय आहे. महाबळेश्वर येथील हॉलीडे रिसॉर्डची जागा उपलब्ध असुनसुध्दा ती तक्रारदारांना देण्यात आली नाही या बाबत तक्रारदारांनी कोणताही समाधानकारक पुरावा दिलेला नाही. या उलट महाबळेश्वर येथील हॉलीडे रिसॉटचे काम बांधकाम सुरु असल्यामुळे देता आले नाही हे सा.वाले यांचे म्हणणे तक्रारदारांनी खोडून काढले नाही. त्यामुळे सा.वाले यांची कृती म्हणजे हॉलीडे रिसॉर्टच्या वार्षिक देखभाल खर्चाची मागणी करण्याची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ठरु शकत नाही. तक्रारदार यांची मुन्नार व महाबळेश्वर येथील 98 सालातील सोई सुविधा बाबत केलेली मागणी मुदतीच्या कायद्याने बाधीत असल्यामुळे सा.वाले यांना त्या बाबत जबाबदार धरता येत नाही.
11. सबब मुद्दा क्र. 2 व 3 नकारार्थी ठरवून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 135/2005 रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 07/05/2015