Maharashtra

Kolhapur

CC/17/233

Avinash Sanjay Gondhali - Complainant(s)

Versus

Star Union Daichi Life Insu.co.Ltd. Through Manager - Opp.Party(s)

Mangave

18 Aug 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/17/233
( Date of Filing : 22 Jun 2017 )
 
1. Avinash Sanjay Gondhali
Bachani,Tal.Karveer,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Star Union Daichi Life Insu.co.Ltd. Through Manager
11th floor,Vishwarup IT park,Sector 30A,Vashi,
New Mumbai
2. Star Union Daichi Life Insu.co.Ltd. Through Manager
R.D.Vichare Complex,517/2,Shahupuri,
Kolhapur
3. Bank Of India
Sadoli Khalasa,Tal.Karveer,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 18 Aug 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्‍या

 

1.    तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रारदार यांची आई शोभा अविनाश गोंधळी ही दि. 29/09/2016 रोजी मयत झालेनंतर तक्रारदार यांनी वारसदार या नात्‍याने यातील वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडे प्रधानमंत्री जीवनज्‍योती विमा योजने अंतर्गत क्‍लेमची मागणी केली असता वि.प. यांनी खोटया व चुकीच्‍या कारणावरुन तक्रारदार यांचा बोनाफाईड व व्‍हॅलीड क्‍लेम नाकारलेला आहे.  तक्रारदार यांनी वारंवार मागणी करुनही वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांचे क्‍लेमची रक्‍कम नाकारलेली आहे. सबब, वि.प. यांचेकडून झाले नुकसानीची भरपाई मिळणेकरिता सदरचा अर्ज तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.

 

2.    क्रारदाराची तक्रार थोडक्‍यात पुढीलप्रमाणे

 

      वि.प.क्र.1 ही इन्‍शुरन्‍स कंपनी असून ग्राहकांना विमा संरक्षण देणे हा त्‍यांचा मुख्‍य उद्देश आहे. वि.प.क्र.1 ही प्रधानमंत्री जीवनज्‍योती विमा योजनेअंतर्गत ग्राहकांना विमा संरक्षण देते. वि.प.क्र. 2 ही वि.प.क्र.1 ची कोल्‍हापूर येथील शाखा आहे.  वि.प. क्र.3 ही बँक असून तक्रारदार हे सदर बँकेचे सभासद आहेत. 

 

तक्रारदार यांच्‍या आई सौ शोभा संजय गोंधळी यांचा दि. 29/9/2016 रोजी ह्दयविकाराने मृत्‍यू झालेला आहे. व तक्रारदार यांच्‍या आईचे वि.प.क्र.3 बँकेमध्‍ये बचत खाते असून त्‍याचा नं. 093410110003941 हा आहे.  तक्रारदार यांच्‍या आईने सदर वि.प.क्र.1 ते 3 यांचेमार्फत प्रधानमंत्री जीवनज्‍योती विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता व त्‍यास वारसदार म्‍हणून तक्रारदार यांचे नांव आहे.  सदर विमा उतरविलेनंतर दि.17/12/2015 रोजी वि.प.क्र.3 बँकेकडील तक्रारदार यांचे आईचे खातेवरुन रक्‍कम रु.12/- व रक्‍कम रु.330/- अशी विम्‍यापोटी रक्‍कम वजा झालेली आहे.  तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 कंपनीकडे त्‍यांची आई मयत झालेने विम्‍याची रक्‍कम मागणी करता दि.10/2/2017 रोजी अर्ज केलेला होता.  तसेच वि.प.क्र.1 कडे देखील क्‍लेम फॉर्म दिलेला होता व आहे.  मात्र असे असूनही वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांची कोणतीही दाद घेतलेली नाही.  तक्रारदार यांनी वि.प.क्र.3 बँकेकडे विम्‍याची रक्‍कम मागणी केली असता दि. 20/2/2017 रोजी खोटया मजकुराचे पत्र तक्रारदार यांना देवून तक्रारदार यांचा विमा दावा नाकारलेला आहे.  वि.प.क्र.2 यांचे पॉलिसी प्रमाणे, तक्रारदार यांचे आईने, दि. 17/12/2015 रोजी पॉलिसीचा प्रिमियम देवूनही वि.प. यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम कोणत्‍याही सबळ कारणाशिवाय नाकारलेला आहे.  सदरची वि.प. यांची कृती पूर्णतः बेकायदेशीर व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी असलेने सदरचे क्‍लेमची रक्‍कम रु. 2 लाख व तक्रारदार यांचे झाले नुकसानीची भरपाई वसुल होवून मिळणेकरिता व तक्रारदार यांना झाले मानसिक व शारिरिक त्रासाची रक्‍कम रु.50,000/- वि.प. कडून वसुल करुन मिळणेकरिता सदरचा तक्रारअर्ज तक्रारदारास दाखल करणे भाग पडले आहे.  तसेच तक्रारदार यांनी तक्रारअर्जाचे खर्चाची रक्‍कम रु.10,000/- चीही मागणी केलेली आहे. 

 

3.    तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत क्‍लेम फॉर्म, वि.प. यांना  पाठविलेला अर्ज, वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारांना पाठविलेले पत्र, बँक पासबुक झेरॉक्‍स, आधार कार्ड, मृत्‍यू प्रमाणपत्र, तक्रारदार यांचे आधारकार्ड, परवानगी मिळणेबाबतचा अर्ज इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 

 

4.    वि.प.क्र.1 व 2 यांना आयोगाची नोटीस लागू झालेनंतर त्‍यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्‍हणणे दाखल केले. तसेच म्‍हणण्‍यासोबत काही कागदपत्रेही दाखल केलेली आहेत.    त्‍यांचे कथनानुसार प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक तक्रार नसल्‍याने या आयोगास तक्रार चालविणेचे अधिकार क्षेत्र नाही.  वि.प.क्र.1 व 2 यांना तक्रारदाराकडून क्‍लेम इंटीमेशन मिळालेली नाही, त्‍यामुळे वि.प. यांनी सेवा देणेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.  तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही.  प्रथमतः तक्रारदाराचे आईस दि. 17/12/2015 ते 31/05/2016 या कालावधीसाठी पॉलिसी देण्‍यात आली होती.  सदरची पॉलिसी नूतनीकरण करण्‍यासाठी दि. 1/06/2016 रोजी वि.प. यांना तक्रारदाराकडून प्रिमियम मिळणे आवश्‍यक होते परंतु तसा प्रिमियम वि.प. यांना मिळाला नसल्‍याने सदरची पॉलिसी ही दि. 29/09/2016 रोजी व्‍यपगत झाली आहे.  त्‍यामुळे पॉलिसीचे कोणतेही लाभ मिळण्‍यास तक्रारदाराची आई पात्र नव्‍हती.  सबब, तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे कथन वि.प.क्र.1 व 2 यांनी केले आहे.

 

5.    वि.प.क्र.3 यांनी हजर होवून आपले म्‍हणणे दाखल केले.  वि.प.क्र.3 यांचे कथनानुसार तक्रारदार यांची अर्जातील कथने ही खोटी व लबाडीची असून वि.प. क्र.3 यांना मान्‍य व कबूल नाहीत.  प्रधानमंत्री जीवनज्‍योती विमा योजना ही एक वर्षाचे विमा संरक्षण योजनेबाबत शासनाद्वारे दै. वृत्‍तपत्रातून माहितीसाठी एक सूचना प्रसिध्‍द केली जाते.  सदरचे विमा संरक्षण हे शासन पुरस्‍कृत असून वि.प. क्र.3  व वि.प.क्र. 1 व 2 यांच्‍या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाते.   वर नमूद पॉलिसीचा कालावधी दरवर्षी दि.1 जून ते 31 मे असा असतो व विमा हप्‍ता विमेदाराचे बँक खाते वरुन परस्‍पर (अॅटो ट्रान्‍स्‍फर) नावे टाकला जातो.  विमेदाराने पुढील वर्षाच्‍या नूतनीकरणाचा अर्ज दि.31 मे पर्यंत देणे व विमा हप्‍ता रक्‍कम त्‍याचे बचत खाती शिल्‍लक असणे आवश्‍यक असते.  नमूद योजनेअंतर्गत वार्षिक विमा हप्‍ता रक्‍कम रु.330/- द्यावा लागतो व विमा धारकाचे वय 55 वर्षे पूर्ण झालेस बँकेचे बचत खात्‍यात विमा हप्‍ता नावे टाकण्‍यास पुरेशी शिल्‍लक नसेल तर बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्‍टात येते.  तक्रारदार यांचे आईचे वि.प.क्र.3 बँकेमध्‍ये खाते आहे.  सदरचा खाते क्र. 093410110003941 आहे.  सदरचे योजनेअंतर्गत विमा शर्ती व अटी व नियम मान्‍य करुनच तसेच एनरोलमेंट फॉर्म, अॅटो डेबीट ऑथोरायझेशन, कनसेंट कम डिक्‍लेरेशन असे कागद लिहून देवून वि.प.क्र.3 बँकेमार्फत वि.प. क्र. 1 व 2 इन्‍शुरन्‍स कंपनीकडून तक्रारदार यांनी विमा घेतला.  नमूद विमा योजनेचा शर्ती व अटीचा भाग म्‍हणून तक्रारदार यांच्‍या आई शोभा गोंधळी यांचे नमूद बचत खाती दि.25 मे ते 1 जून 2016 या कालावधीमध्‍ये विमा हप्‍तेसाठी वि.प.क्र.1 व 2 इन्‍शुरन्‍स कंपनीस द्यावी लागणारी विमा हप्‍त्‍याची रक्‍कम जमा नसलेने व तशी रक्‍कम त्‍यांनी जमा न केल्याने सदरचे तक्रारदार यांची आई शोभा गोंधळी यांची पॉलिसी रद्दबातल झालेली आहे व त्‍यास सर्वस्‍वी तेच जबाबदार होते व आहेत.  तक्रारदार यांच्‍या आई दि. 29/9/2016 रोजी मयत झाल्‍याचे तक्रारदार यांनी वि.प.बॅकेस कळवून विमा रकमेची मागणी केली.  तथापि, विमेदार यांनी नूतनीकरणासाठी हप्‍त्‍याची रक्‍कम जमा न केल्‍याने त्‍यांच्‍या पॉलिसीचे नूतनीकरण झाले नाही असे वि.प. बँकेने तक्रारदार यांना दि. 20/02/2017 रोजी कळविले व ते योग्‍य व बरोबर आहे असे वि.प. बँकेचे कथन आहे.  तक्रारदार यांना सेवा व सुविधा पुरविण्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारची हयगय अगर निष्‍काळजीपणा वि.प. बँकेने केलेला नाही.  तक्रारदार यांचे आईचे बचत खातेमध्‍ये दि.1 जून 2016 या कालावधीमध्‍ये हप्‍ते दाखलची रक्‍कम जमा नसलेने सदरचे नुकसानीस वि.प. बँक जबाबदार नसून तक्रारदार हेच जबाबदार आहेत असे वि.प. बँकेचे कथन आहे.  तसेच सदरचा अर्ज दाखल केलेनंतर तक्रारदार यांनी वस्‍तुस्थिती मान्‍य करुन कोर्ट मजकुरी दखल केलेला अर्ज रद्द करण्‍यास हरकत नसल्‍याचे कथनाचे दि. 24/7/2017 तारखेचे पत्र वि.प. बँकेस दिलेले आहे.  सबब, तक्रारदार यांचा सदरचा विमा दावा नामंजूर होणेशी काहीही संबंध नाही.  तक्रारअर्जात तक्रारदाराने केलेल्‍या मागण्‍या या स्‍वार्थी व आपमतलबीपणाच्‍या असून वि.प. बँक स्‍पष्‍टपणे इन्‍कार करते.  सबब, वि.प. यांना नुकसानीदाखल तक्रारदार यांचेकडूनच रक्‍कम रु.10,000/- मंजूर व्‍हावेत असे वि.प. क्र.3 बँकेचे कथन आहे. 

   

6.    वि.प.क्र.3 बँकेने दि. 24/07/2017 रोजी ग्राहक मंच यांना दिलेला अर्ज दाखल केला आहे.  तथापि तक्रार अर्जाचे रोजनाम्‍याचे अवलोकन करता सदरची तारीख रोजनाम्‍यात दिसून येत नाही.  तसेच तक्रार दाखल तारीख ही दि. 29 जून 2017 असून तदनंतरची तारीख ही दि. 08/08/2017 असलेचे दिसून येते.  सबब, सदरचा अर्ज हा या आयोगासमोर दाखल नसलेने याबाबत हे आयोग काहीही भाष्‍य करीत नाही.

 

7.    वि.प.क्र.3 यांनी या संदर्भात कागदयादीसोबत शोभा गोंधळी यांचा खातेउतारा, दै. सकाळ मधील वृत्‍तांची कात्रणे, तक्रारदारयांनी वि.प.क्र.3 यांना दिलेले पत्र तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. 

 

8.    तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्‍हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.   

 

­अ.क्र.

                मुद्दा

      उत्‍तरे

1

तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे  काय ?     

होय.

3

तक्रारदारांनी केलेल्‍या मागण्‍या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ?     

होय, अंशतः.

4

अंतिम आदेश काय ?

खालीलप्रमाणे

 

 

विवेचन

 

मुद्दा क्र.1

     

9.    यातील वि.प.क्र.1 ही इन्‍शुरन्‍स कंपनी असून ग्राहकांना विमा संरक्षण देणे हा त्‍यांचा मुख्‍य उद्देश आहे. वि.प.क्र.1 ही प्रधानमंत्री जीवनज्‍योती विमा योजनेअंतर्गत ग्राहकांना विमा संरक्षण देते. वि.प.क्र. 2 ही वि.प.क्र.1 ची कोल्‍हापूर येथील शाखा आहे.  वि.प. क्र.3 ही बँक असून तक्रारदार हे सदर बँकेचे सभासद आहेत.  तक्रारदार यांच्‍या आई सौ शोभा संजय गोंधळी यांचे वि.प. क्र.3 बँकेमध्‍ये बचत खाते असून त्‍याचा नंबर 093410110003941 असा आहे व तक्रारदार यांच्‍या आईने सदर वि.प.क्र.1 व 3 यांचेमार्फत प्रधानमंत्री जीवनज्‍योती विमा योजने अंतर्गत विमा उतरविला होता व आहे व त्‍यास वारसदार म्‍हणून तक्रारदार यांचे नांव आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे.  याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.

 

मुद्दा क्र.2 ते 4

 

10.   वि.प.क्र.1 व 3 यांचेमार्फत तक्रारदार यांच्‍या आईंने वर नमूद पॉलिसी उतरविलेली होती व आहे व वर नमूद प्रधानमंत्री जीवनज्‍योती विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेनंतर दि. 17/12/2015 रोजी वि.प.नं. 3 बँकेकडील तक्रारदार यांचे आईचे खातेवरुन रक्‍कम रु. 12/- व रक्‍कम रु. 330/- अशी विम्‍यापोटी रक्‍कम वजा झालेली आहे व सदरचे कागदपत्र तक्रारदार यांनी कागदयादीसोबत अ.क्र.5 वर दाखल केले असून तक्रारदार यांची आई शोभा संजय गोंधळी यांचे सेव्हिंग्‍ज खातेचे पासबुक दाखल केले आहे.  तक्रारदार यांनी त्‍यांचे आईचा मृत्‍यू दि. 29/9/2016 रोजी ह्दयविकाराने झालेला आहे व या संदर्भातील विम्‍याची रक्‍कम मागणी करिता तक्रारदार यांनी दि. 10/2/2017 रोजी वि.प.क्र.2 विमा कंपनीकडे अर्ज दाखल केलेला होता.  मात्र वि.प. नं. 3 यांनी सदरचे विम्‍याची रक्‍कम दि. 20/2/2017 रोजी खोटया मजकुराचे पत्र तक्रारदार यांना देवून तक्रारदार यांचा विमादावा नाकारलेला आहे. 

 

11.   वि.प. क्र.3 यांनी आपले म्‍हणण्‍यामध्‍ये सदरचे विमा योजनेचा कालावधी हा दरवर्षी दि.1 जून ते 31 मे असा असतो व विमा हप्‍ता विमेदाराचे बँक खातेतून परस्‍पर (अॅटो ट्रान्‍स्‍फर) नावे टाकला जातो.  विमेदाराने पुढील वर्षाच्‍या नूतनीकरणाकरिता अर्ज दि.31 मे पर्यंत देणे व विमाहप्‍ता रक्‍कम त्‍याचे बचत खाती शिल्‍लक असणे आवश्‍यक असते असे स्‍पष्‍ट कथन केलेले आहे व त्‍यानुसार वि.प. बँकेने तक्रारदार यांचे खातेवर दि. 25 मे ते दि.1 जून 2016 या कालावधीमध्‍ये विम्‍याची रक्‍कम जमा नव्‍हती असे कथन केलेले आहे.  वि.प. विमा कंपनी यांनी या संदर्भातील विमा पॉलिसी दाखल केलेल्‍या आहेत.  तसेच “”Rules for Pradhanmantri Jeeva Jyoti Vima Yojana “ दाखल केलेल्‍या आहेत. यातील एनरोलमेंट पिरेड यांचा विचार करता Enrolment period : Initially on launch for the cover period 1st June 2015 to 31st May 2016, subscribers will be required to enroll and give their auto-debit consent by 31st May 2015. Late enrolment for prospective cover will be possible upto 31st August, 2015 which may be extended by Govt. of India for another three months, i.e. upto 30th November 2015.  Those joining subsequently may be able to do so with payment of full annual premium for prospective cover, with submission of a self-certificate of good health in the prescribed proforma.

 

तक्रारदाराचा दि.1 जून 2016 ते 31 मे 2017 या कालावधीमधील विम्‍याचा हप्‍ता तक्रारदार यांनी त्‍यांचे आईचे बचत खातेमध्‍ये पुरेशी रक्‍कम नसलेने भरला नसलेचे वि.प.क्र.3 बँकेने नमूद केलेले आहे.  मात्र एनरोलमेंट पिरेडचा विचार करता, सदरची पॉलिसी ही दि. 1st June 2015 to 31st May 2016 अशी आहे व त्‍याचे लेट एनरोलमेंट हे 31st August 2015 असे आहे.  तसेच सदरची ऑगस्‍ट 2015 ची मुदतही 30 नोव्‍हेंबर 2015 पर्यंत वाढविली गेली आहे व सदरची नोव्‍हेंबर 2015 पर्यंत विमा पॉलिसीची वाढविलेली मुदत ही दि.1 जून 2015 ते 31 मे 2016 चे पॉलिसीचे कालावधीकरिता आहे.  तथापि तक्रारदार यांचे खातेमधून विमा पॉलीसीच्‍या रकमा या दि.17 डिसेंबर 2015 रोजी कपात झालेचे दिसून येतात व सदरचा हप्‍ताही रक्‍कम रु. 360/- व रक्‍कम रु. 12/- कपात झालेचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते.  जर मे 2016 पर्यंतचे पॉलिसी कालावधीची हप्‍ता भरणेची मुदत ही दि.30 नोव्‍हेंबर 2015 ही शेवटची वाढविलेली मुदत होती असे एनरोलमेंट पिरेडवरुन दिसून येते. मात्र तक्रारदार यांचे हप्‍ते हे डिसेंबर 2015 मध्‍ये कपात झालेचे आयोगाचे निदर्शनास येते.  म्‍हणजेच सदरचा विमा पॉलिसीचा हप्‍ता हा दि. 1 जून 2015 ते 31 मे 2016 या कालावधीकरिता नमूद नसून तो दि.1 जून 2016 ते 31 मे 2017 या कालावधीकरिताच होता असे या आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.  वि.प.क्र.3 बँकेने देखील आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये विमेदाराने पुढील वर्षाचे नूतनीकरणाचा अर्ज तसेच विमाहप्‍ता हा दि.31 मे पर्यंत देणे आवश्‍यक असते असे कथन केलेले आहे.  जर सदरचा हप्‍ता हा वि.प. बँकेने डिसेंबर 2015 मध्‍ये कपात केला आहे तर सदरचा हप्‍ता हा पुढील वर्षाच्‍या पॉलिसी कालावधीकरिताच कपात केला आहे असे या आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.  कारण मे 2016 पर्यंतचे पॉलिसीचे कालावधीकरिता हप्‍ता भरणेची वाढीव मुदत ही दि. 30 नोव्‍हेंबर 2015 ही शेवटची मुदत होती तर डिसेंबर 2016 मध्‍ये कपात झालेली तक्रारदार यांचे विमा हप्‍त्‍याची रक्‍कम ही निश्चितच 1 जून 2016 ते मे 2017 चे कालावधीकरिताच असली पाहिजे यावर हे आयोग ठाम आहे.  जरी वि.प.क्र.1 व 2 यांनी आपल्‍या म्‍हणणयाचे कलम 9 मध्‍ये कथन केलेप्रमाणे तक्रारदार यांचे आईची पॉलिसी ही केवळ दि. 17/12/2015 ते 31/5/2016 पर्यंतच वैध होती असे कथन केले असले तरी मे 2016 पर्यंत वैध पॉलिसी राहणेसाठीचा हप्‍ता भरणेचा कालावधी हा 30 नोव्‍हेंबर 2015 पर्यंतच होता व आहे.    सबब, वि.प. बँकेने तक्रारदार यांचे खाती रक्‍कम शिल्‍लक नसलेने तक्रारदार यांचा विमादावा नामंजूर केल्‍याचे आरोप हे आयेाग फेटाळून लावत आहे.  वि.प.क्र.1 व 2 यांनी या संदर्भातील दि.7/1/2020 रोजी विनंती अर्ज देवून सदरकामी आपण युक्तिवाद करत नसलेचे आदेश पारीत करुन काम निकाली काढणेत यावे अशी विनंती आयोगास केलेली आहे व सदरचे अर्जाचे कामी वि.प.क्र. 1 व 2 यांनी तोंडी युक्तिवाद केलेला नाही.  या कारणास्‍तव वि.प.क्र.1 व 2 यांचे म्‍हणणे व पुरावा तसेच वि.प. क्र.3 यांचा युक्तिवाद व दाखल केले पुरावे तसेच तक्रारदार यांनीही दाखल केलले पुरावे यांचा विचार करता सदरचा तक्रारदार यांनी मागितलेला विमादावा मंजूर करणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे व अशी रक्‍कम न देवून वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्‍ये त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.  सबब, वि.प.क्र.3 यांचेकडून तक्रारदार यांचे आईचे विम्‍याचे हप्‍तेपोटी कपात होणारी रक्‍कम ही विमा कंपनीस प्राप्‍त झालेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे व सदरची विम्‍याची रक्‍कम ही रु.2 लाख वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या देणेचे आदेश वि.प.क्र.1 व 2 यांना करण्‍यात येतात.  तसेच तक्रारदार यांना झाले मानसिक व शारिरिक त्रासाची रक्‍कम रु.50,000/- ही तक्रारदार यांनी सदरचे तक्रारअर्जाद्वारे मागितली आहे.  वि.प.क्र.3 बँकेने तक्रारदार यांचे दि.17 डिसेंबर 2015 रोजी कपात झालेले विम्‍याचे हप्‍त्‍यापोटीची रक्‍कम ही कोणत्‍या सालाकरिता आहे याचे कोणतेही स्‍पष्‍ट कथन आपल्‍या लेखी अगर तोंडी युक्तिवादामध्‍ये केलेचे या आयेागास समजून येत नाही व याबाबतचा संपूर्ण ऊहापोह आयोगाने केलेला आहे.  सबब, तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक त्रासास वि.प. क्र.3 हे सुध्‍दा तितकेच जबाबदार आहेत असे या आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.  याकरिता तक्रारदार यांनी मागितलेली मानसिक व शारिरिक त्रासापोटीची रक्‍कम रु.50,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने त्‍यापोटी रक्‍कम रु.10,000/- वि.प.क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या देणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  तसेच तक्रारदार यांनी मागितलेला अर्जाचा खर्च रु.30,000/- या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे निष्‍कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.  सदरचा खर्चही वि.प.क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या देणेचा आहे.  सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.

 

 

आदेश

 

1.    तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2.    वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना विम्‍यापोटीची रक्‍कम रु.2,00,000/- देणेचे आदेश करणेत येतात.  तसेच सदरचे रकमेवर विमा दावा नाकारलेपासून संपूर्ण रक्‍कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज देणेचे आदेश करणेत येतात.

 

3.    वि.प.क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.

 

4.    वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 ते 3 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी. 

 

5.    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6.    जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्‍कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्‍याची वजावट करण्‍याची वि.प. यांना मुभा राहील.

 

7.    सदर आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.