तक्रारदार : वकील श्री.एफ.आर.मिश्रा हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री. स. व. कलाल , सदस्य, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही खाजगी क्षेत्रातील बँक व्यवसाय करणारी संस्था असून त्यांचे कार्यालय तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहे.
2. तक्रारदार हे प्रतिक्षा नगर, म्हाडा कॉलनी, सायन, मुंबई येथील रहीवासी असून ते सा.वाले यांचे क्रेडीट कार्ड धारक आहेत. त्यांनी सा.वाले यांचे कडून नोव्हेंबर,2012 मध्ये क्रेडीट कार्ड घेतले व त्यासोबत त्यांनी
“ INSTABUY CLASSIC KIT” रु. 4,000/- सा.वाले यांना देऊन खरेदी केले होते. सदर इन्स्टाबाय किटवर ट्रॅव्हल पोर्ट कार्ड, डायनिंग प्लस प्रिव्हीलेज कार्ड, हेल्थ चेकअप, आणि टाटा ए.आय.जी. विमा कंपनीचा पर्सनल एक्सटेंन्डेड प्रोटेक्शन प्लॅन, इत्यादी सुविधा देण्यात आलेल्या होत्या. टाटा एआयजी विमा कंपनीच्या सदर प्लॅन नुसार पैशांचे पाकीट हरवणे, एटीएम बुथवर पैसे काढताना संभाव्य दरोडा वगैरेसाठी विमा कवचाची सुविधा होती. दिनांक 31.12.2012 रोजी तक्रारदाराचे पैशाचे पाकीट व त्या सोबत क्रेडीट कार्ड हरवले व त्या संबंधी त्यांनी तात्काळ अंबोली पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यानंतर दिनांक 2.1.2013 रोजी तक्रारदाराने टाटा एआयजी कंपनीकडे पर्सनल एक्सटेंन्डेड प्रोटेक्शन प्लॅन, अंतर्गत विमा दावा दाखल केला. (दावा क्रमांक 000601842) परंतु सा.वाले यांचेकडून सदर विमा पॉलीसीचे प्रमाणपत्र क्रमांक टाटा एआयजी कंपनीला प्राप्त झाले नाही. तक्रारदाराचे विमा दाव्याचे शोधन टाटा एआयजी कंपनीने केले नाही. म्हणून तक्रारदाराने सा.वाले यांचेकडे अनेक वेळा ई-मेलव्दारे पत्र व्यवहार करुन पॉलीस प्रमाणपत्र क्रमांक टाटा एआयजी कंपनीला कळविण्याबाबत विनंती केली. परंतु सा.वाले यांचेकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही व त्यामुळे तकारदारास सदर विमा पॉलीसी अंतर्गत पैशाचे पाकीट हरविल्या सबंधिचा दावा दाखल करुनसुध्दा त्याचा लाभ तक्रारदारास मिळाला नाही. व त्यासाठी सा. वाले हे सर्वस्वी जहबाबदार आहेत. सा.वाले यांनी तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या सबबीखाली तक्रारदाराने मंचापुढे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने सा.वाले यांचे कडून त्यांचे झालेले आर्थिक नुकसान , तसेच पैशाचे पाकीट हरविल्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार करणे, सा.वाले व टाटा एआयजी विमा कंपनी यांचेकडे वारंवार दूरध्वनी करणे, त्यांच्या कार्यालयास भेटी देणे, वगैरेसाठी रु.50,00 व इतर मानसिक त्रासापोटी, नविन कार्ड खरेदीसाठी रु.1,00,000/- इतक्या रक्कमेची मागणी केली आहे.
3. सा.वाले हे नोटीसची बजावणी होऊन देखील मंचासमोर हजर न राहील्यामुळे सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. त्यामुळे तक्रारदारांनी आपले पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच त्यांनी आपला तोंडी युक्तीवाद केला. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने तसेच पुरावा शपथपत्रातील कथने हे सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आल्यामुळे आबाधीत राहातात. त्यामुळे ते स्विकारण्या वाचून मंचासमोर दुसरा पर्याय नाही. सा.वाले यांनी तक्रारदार यांना
“ INSTABUY CLASSIC KIT” रु. 4,000/- किंमतीस क्रेडीट कार्ड सोबत दिलेले होते. त्या संबंधीचे कागदपत्र तक्रारदाराने पान क्र. 17 वर तक्रारीसोबत जोडले आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यामध्ये टाटा एआयजी विमा कंपनीतर्फे पर्सनल एक्सटेंन्डेड प्रोटेक्शन प्लॅन, यांचे विमा कवच देण्यात आल्याचे दिसून येते. तक्रारदाराने टाटा एआयजी विमा कंपनीकडे त्यांचे पैशाचे पाकीट व क्रेडीट कार्ड हरवल्या संबंधी टाटा एआयजी कंपनीकडे दावा दाखल केला. परंतु सदर दाव्यासाठी मुळ विमा प्रमाणपत्राचा क्रमांक तसेच तक्रारदाराचे क्रेडीट कार्ड ब्लॉक झाल्या संबंधीची माहीती सा.वाले यांनी टाटा एआयजी कंपनीला पुरविली नाही. त्यामुळे तक्रारदारास विमा कंपनीकडून आर्थिक लाभ मिळाला नाही व त्यामुळे तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्ररदार हे सा.वाले यांचे क्रेडीटकार्ड धारक आहेत. त्यामुळे तक्रारदार व सा.वाले यांच्यात ग्राहक व सेवा सुविधा पुरविणार हे नाते स्पष्ट होते. तक्रारदाराने सा.वाले यांचेकडे ई-मेलव्दारे केलेल्या पत्र व्यवहारांच्या प्रती पुरावा दाखल केलेल्या आहेत. एकंदरीत सा.वाले यांनी तक्रारदारारच्या ई-मेलला कोणताही प्रतिसाद दिल्याचे दिसून येत नाही. तसेच टाटा एआयजी विमा कंपनीकडे तक्रारदारंच्या विमा दाव्याचे शोधन होण्याकामी आवश्यक ती माहिती पुरविली नाही. ही बाब सेवा सुवधा पुरविण्यात कसुर या सदरात मोडते असे मंचाचे मत झाले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी मागणी केल्याप्रमाणे मानसिक व शाररिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रु.50,000/- तसेच तक्रारीचा खर्च रु.3000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 29/2014 ही अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले यांनी टाटा एआयजी विमा कंपनीकडे तक्रारदाराच्या
विमा दाव्याचे शोधन करणेकामी आवश्यक ती माहिती न
पुरविल्यामुळे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर
करण्यात येते.
3. सा.वाले यांनी तक्रारदार यांना सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासून
एक महिन्याचे आत तक्रारदार यांना रु.50,000/- तसेच तक्रारीचा
खर्च रु.3000/- अदा करावा तसे न केल्यास सदरहू रक्कम वसुल
होईपावेतो 10 टक्के व्याजासह रक्कम अदा करावी असा आदेश मंच
पारीत करीत आहे.
4. सा.वाले यांनी सदर आदेशाची पुर्तता/नापुर्तता करणेबाबत शपथपत्र दाखल करणेकामी नेमण्यात येते दिनांक 25.04.2015
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 09/03/2015