तक्रारदाराचे वकील - श्री. एस.एल. शहा
आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
तक्रार दाखलकामी आदेश.
1. तक्रारदार यांचे वकील श्री. एस.एल. शहा यांना तक्रार दाखल कामी ऐकण्यात आले.
2. तक्रार व त्यासोबतची कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदारानी सामनेवाले क्र 1 यांनी निर्मीत केलेला सोनी ब्रॉव्हीया एल.इ.डी टि.व्ही. दिनांक 10/05/2010 ला विकत घेतला. सामनेवाले क्र 3 हे सामनेवाले क्र 1 चे अधिकृत विक्रेते आहेत व सामनेवाले क्र 2 व 4 सेवा पुरवठा करणारे अधिकृत प्रतिनीधी आहेत. विकत घेतल्या नंतर अंदाजे 1 वर्षाच्या आत टि.व्ही मध्ये दोष निर्माण झाला. व तो वारंटीच्या मुदतीत असल्यामूळे तेा सामनेवाले यांनी निःशुल्क दुरूस्त करून दिला. त्यानंतर दिनांक 26/11/2012 ला म्हणजेच अंदाजे अडीच वर्षानंतर टि.व्ही. अचानक बंद पडला व त्याच्या व्हिडीओ कार्डमध्ये दोष असल्याचे निष्पन्न झाले व तक्रारदारानी त्याकरीता रू. 1,194/-,व रू. 162 अदा केले. टि.व्ही.मध्ये पुन्हा दि. 15/01/2016 ला चालु बंद होण्याचा दोष निर्माण झाला व पॉवर कार्ड बदलविण्यात आले त्याकरीता तक्रारदारानी रू. 7,122/-, अदा केले त्या पॉवर कार्डमध्ये एप्रिल 2013 मध्ये दोष निर्माण झाल्यामूळे तो निःशुल्क बदलण्यात आला. त्यानंतर, टि.व्ही. मध्ये दोष निर्माण झाला. तो सामनेवाले यांनी त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेला. व टि.व्ही. चे पॅनल बदलण्याची आवश्यकता आहे असे सांगण्यात आले. त्याकरीता अंदाजे रू. 17,000/-, अंदाजे खर्च अपेक्षीत होता व तो तक्रारदारानी देण्यास नाकारले. तो भाग निःशुल्क बदलण्यात आला. पुढे मे 2013 मध्ये टि.व्ही मध्ये चालु बंद होण्याचा दोष निर्माण झाला. तेव्हा सामनेवाले यांनी टि.व्ही. दुरूस्त होऊ शकत नसल्याबद्दल तक्रारदारांना कळविले. कारण सुटे भाग उपलब्ध नव्हते.
3. सामनेवाले क्र 1 यांनी दिनांक 25/01/2013 ला तक्रारदाराना कळविले की, निःशुल्क सेवा मिळणार नाही व टि.व्ही. बदलवून मिळणार नाही. सामनेवाले क्र 1 यांनी मे 2013 मध्ये एल.सी.डी. पॅनल निःशुल्क बदलवून दिला. सामनेवाले यांनी तक्रारदाराना डिस्काऊंटवर नविन टि.व्ही मिळण्याबाबत कळविले होते. निःशुल्क सेवा मिळणार नाही असे नमूद केले.
4. सामनेवाले यांनी दिनांक 15/05/2013 ला निःशुल्क सेवा दिल्यानंतर त्यांना पुढे निःशुल्क सेवा देता येणार नाही असे कळविले व टि.व्ही. बदलवून देता येणार नाही या भूमिकेवर ठाम राहिले. तक्रारदारांनी टि.व्ही विकत घेतांना काय अटी व शर्ती होत्या याबाबत कोणतेही कागदपत्रे दाखल केले नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी किती वर्षाकरीता सुटे भाग पुरविण्यात येतील याबद्दल काही हमी दिल्याचे दिसून येत नाही. पहिल्या दोन वर्षामध्ये टि.व्ही मध्ये एकदाच बिघाड झाल्याचे दिसून येते. जर टि.व्ही मध्ये निर्मीती दोष होता तर आमच्या मते तक्रारदारानी टि.व्ही विकत घेतल्यानंतर दोन वर्षाचे आत किंवा पहिला दोष आढळून आल्यानंतर त्याकामी तक्रार दाखल करणे आवश्यक होते. किंवा सामनेवाले यांनी दि. 15/05/2013 ला तक्रारदार यांना निःशुल्क सेवा दिल्यानंतर त्यापुढे दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करणे आवश्यक होते. परंतू ही तक्रार दि. 09/06/2016 ला दाखल करण्यात आली. तक्रारदारांनी टि.व्ही ची पूर्ण रक्कम व दुरूस्ती करण्याकरीता खर्च केलेली रक्कम परत मागीतली आहे. किंवा त्याच प्रकारचा योग्य टि.व्ही. बदलून मिळण्याबाबत विनंती केली आहे. आमच्या मते या दोन्ही मागण्या प्रस्तुत बाबीवरून कालबाहय असल्याचे नमूद केल्याचे दिसून येते. तक्रार दाखल करण्यास 1 वर्षापेक्षा जास्त विलंब झाल्याचे दिसून येते. तक्रारदारानी तक्रारीच्या परिच्छेद क्र. 19 मध्ये नमूद केले आहे की, त्यांनी दि. 05/01/2016 ला दिलेल्या नोटीस पासून कारण उद्भभवले आहे. आमच्या मते हि चुकीची धारणा आहे. विलंब माफीबाबत कोणताही अर्ज दाखल नाही. सबब, तो क्षमापीत करता येत नाही. सबब, खालील आदेश.
आदेश
1. तक्रार क्रमांक 257/2016 ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(अ) प्रमाणे दाखल करून घेता येत नाही व ती फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. अतिरीक्त संच तक्रारदाराना परत करण्यात यावे.
4 . आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निःशुल्क पाठविण्यात याव्यात .
npk/-