जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक:-434/2015
तक्रार दाखल दिनांक:-01/10/2015
तक्रार आदेश दिनांक:-29/01/2016
निकाल कालावधी:-0वर्षे03म28दि
सादीक अल्लाबक्ष शेख
वय 36 वर्षे,धंदा- नोकरी,
रा-संजीव गांधी नगर, विजापूर रोड,सोलापूर. ...तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) मा.व्यवस्थापक,कंझुमर केअर सोनी इंडिया प्रा.लि.,
ए-31,मोहन को.ऑपरेटीव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट,मथूरा रोड,
न्यू दिल्ली 110 044(सदरची नोटीस व्यवस्थापक यांचेवर
बजावण्यात यावी.)
2)हुमा गिफ्ट अँन्ड मोबाईल शॉपी,दक्षिण सदर बझार,
सात रस्ता, सोलापूर.413 003(सदरची नोटीस शाखा व्यवस्थापक
यांचेवर बजावण्यात यावी.) ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:-श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
सौ.बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-एम.जी.ताजीमतरक
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-प्रतिनिधी
-:निशाणी 1 वरील आदेश:-
(पारीत दिनांक:-29/01/2016)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
उभय पक्षकार हजर, तक्रारकर्ता यांचे मागणी प्रमाणे विरुध्दपक्ष यांनी नवीन मोबाईल हॅंडसेट तक्रारकर्ता यांना दिला, तो तक्रारकर्ता यांनी स्विकारला व उर्वरीत मागणी सोडून दिली. तक्रारकर्ता यांनी पुढे प्रस्तूत तक्रार चालविणेची नाही अशी अर्जदारतर्फे पुरशिस दाखल आहे. म्हणून प्रस्तूत तक्रार तक्रारकर्ताचे पुरशिसप्रमाणे निकाली करणेत येत आहे.
(सौ.बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
शिंस्व029011600