तक्रारदार : वकीलामार्फत हजर.
सामनेवाले : ..............
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारदार यांनी सेानी रिक्सन कंपनीचा U100i(YARI)(BLACK)moddle चा दि. 26.01.10 रोजी जयकिसन ब्रदर्स या दुकानातून 14,300/-,रू. देऊन खरेदी केला.
3. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सदर मोबार्इलमध्ये दोन तीन महिण्यातच पुढीलप्रमाणे दोष निर्माण झाले.
1. म्युजिक प्लेअर नीट चालत नव्हते.
2. स्पीकरमधून स्पष्ट आवाज येत नव्हता.
या तक्रारीबाबत तक्रारदार यांनी सेवा केंद्रास भेट दिली. परंतू त्यांचेकडुन धिम्यागतीने प्रतिसाद मिळाल्याने तक्रारदारांना मोबाईल फोन नादुरूस्त अवस्थेतच परत स्विकारावे लागले. परंतू जानेवारी 2011 मध्ये मोबाईल फोन पूर्णपणे बंद झाला. तेव्हा तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 1 यांचे अंधेरी येथील सेवा केंद्र मोबाईल टेक्नॉलॉजी म्हणजेच सा.वाले क्र. 2 यांचेकडे दि.20 जानेवारी 2011 मध्ये दुरूस्तीसाठी जमा केले. सा.वाले क्र. 2 यांनी 15 दिवसात मोबाईल दुरूस्त करून देतो असे आश्वासन दिले.
4. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, तक्रारदारांनी सा.वाले क्र. 2 यांचेकडे वारंवार संपर्क साधला व प्रत्यक्षात भेटी दिल्या परंतू सा.वाले क्र. 2 यांनी तक्रार दाखल करेपर्यंतही तक्रारदारांना मोबाईल फोन दुरूस्त करून दिलेला नाही. तक्रारदार स्वतः मर्चंटनेवीचे विद्यार्थी असल्या कारणाने नियमानूसार परवानगी शिवाय त्यांना कॅम्प बाहेर जाता येत नाही. त्यामूळे मोबाईल नसल्या कारणाने त्यांची अंत्यत गैरसोय झाली.
5. म्हणून तक्रारदारांनी ग्राहक मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करून तक्रारदारांनी मोबाईलची किंमर रू. 14,300/-,सा.वाले यांनी परत करावी व झालेल्या मानसिक त्रासापोटी रू. 30,000/-,नुकसान भरपाई सा.वाले यांनी तक्रारदारांना द्यावे अशी मागणी केली.
6. तक्रार अर्ज, शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रांसह दाखल केले आहेत.
7. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी मंचाकडून नोटीस पाठविण्यात आली. सा.वाले क्र. 1 यांना दोन वेळा पाठविलेली नोटीस ‘जगह छोड गया’ म्हणून दोनही वेळा परत आली. त्यांनतर तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांचे विरूध्द कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून सा.वाले क्र. 1 यांना वगळण्यात आले. सा.वाले क्र. 2 यांना पाठविलेली नोटीसीची पोचपावती अभिलेखावर दाखल आहे नोटीस मिळवूनही सा.वाले क्र. 2 गैरहजर राहिले. म्हणून सा.वाले क्र. 2 यांचे विरूध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
8. तक्रार अर्ज, शपथपत्र, व त्या सोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रांचे यांची पडताळणी करुन पाहीले असता तक्रार निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्जात नमुद केलेल्या मागण्या मागण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
9. तक्रारदार यांनी सोनी रिक्सन मोबाईल सेट सा.वाले यांचेकडे तक्रारदार यांनी सेानी रिक्सन कंपनीचा U100i(YARI)(BLACK)moddle चा दि. 26.01.10 रोजी जयकिसन ब्रदर्स या दुकानातून 14,300/-रू. देऊन खरेदी केला. त्याची पोचपावती तक्रार अर्जासोबत पृष्ट क्र 7 वर दाखल आहे.
10. तक्रारदरांच्या म्हणण्यानूसार जानेवारी महिण्यामध्ये मोबाईल फोन संपूर्णपणे बंद पडला तो सुरू होत नव्हता शेवटी तक्रारदारंनी 20 जानेवारी 2011 मध्ये तो दुरूस्तीसाठी सा.वाले क्रं 2 यांचेकडे जमा केला. त्याबाबतचे जॉबशिट अभिलेखात तक्रार अर्जासोबत पृष्ट क्रं 8 वर दाखल आहे. त्यामध्ये phone is dead असे नमूद केले आहे.
11. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी वारंवार संपर्क साधूनही व प्रत्यक्ष भेटी देवूनही तक्रार दाखल करेपर्यंत फोन दुरूस्त करून दिलेला नाही अजूनही फोन सा.वाले क्र 2 यांच्या ताब्यात आहे.
12. सा.वाले हजर राहून तक्रारदारांचे म्हणणे नाकारले नाही तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून तक्रारदारांच्या म्हणण्यास पुष्टी मिळते तक्रार शपथपत्रासह दाखल केलेले आहे म्हणून तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते.
13. सा.वाले यांनी तक्रारदारांना सांगीतलेल्या कालावधीत व तसेच योग्य त्या कालावधीत मोबाईल फोन दुरूस्त करून दिला नाही. यामध्येच सा.वाले क्र 2 यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे सिध्द होते.
14. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडुन जमा केलेल्या फोनची किंमत द्यावी अशी मागणी केली आहे. तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांचे विरूध्द कार्यवाही केली नाही म्हणून सा.वाले क्रं 1 यांना वगळण्यात आले. सा.वाले क्र. 2 यांचेकडे मोबार्इल फक्त दुरूस्तीसाठी दिलेला होता. तक्रारदारांची तक्रार सा.वाले क्र. 2 यांनी मोबाईल फोन ठरलेल्या वेळेत व योग्य वेळेमध्ये दुरूस्त करून दिला नाही एवढीच तक्रार आहे. मोबाईल फोन सा.वाले क्र. 2 यांचेकडे जमा आहे. सा.वाले क्र. 2 हे सा.वाले क्र. 1 चे सेवाकेंद्र आहे. म्हणून अशा परिस्थीतीत सा.वाले क्र. 2 यांनी तक्रारदारांचा जमा केलेला मोबाईल फोन दुरूस्त करून तक्रारदारांना परत द्यावे असा आदेश देणे योग्य राहील.
15. तक्रारदार हे मर्चंटनेवीचे विद्यार्थी आहेत. त्यांना नियमानूसार परवानगी घेतल्याशिवाय कॅम्पसच्या बाहेर जाता येत नाही. त्यामूळे तक्रारदारांची गैरसोय झाली. हे म्हणणे अमान्य करता येणार नाही. परंतू तक्रारदारांने त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल नुकसान भरपाई म्हणून 30,000/-,रू. सा.वाले यांनी द्यावे अशी मागणी केली आहे. परंतू ही मागणी व्यवहाराचे स्वरूप पाहता अवास्तव वाटते. तरीही सा.वाले यांनी दुरूस्तीसाठी आलेला मोबाईल फोन हा दुरूस्त न करता तीन ते चार महिणे ठेवून घेणे हे योग्य नाही. प्रस्तुत प्रकरणात सा.वाले यांनी तक्रारदारांचा मोबार्इल फोन तीन ते चार महिने ठेवून घेतला. त्यामूळे तक्रारदारांची अंत्यत गैरसोय झाली. गैरसोयीबद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.5,000/-,देणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचास वाटते.
16. वरील परिस्थितीत खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 223/2011 अंशतः मान्य करण्यातयेते.
2. सा.वाले यांनी तक्रारदारांचा जमा केलेला मोबाईल फोन आदेशाची प्रमाणीत प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत दुरूस्त करून द्यावा
3. सा.वाले यांनी तक्रारदारांना झालेल्या गैरसोयीबद्दल रू. 5,000/-, नुकसान भरपाई द्यावी.
4 सा.वाले यांनी आदेशाची प्रमाणीत प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत आदेशाची पुर्तता करावी. अन्यथा विलंबापोटी रू. 500/-,दरमहा दंडात्मक रक्कम तक्रारदारांना द्यावी.4
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.