Maharashtra

Nagpur

CC/659/2021

MOHSIN AHMAD MUQEEM AHMAD KHAN - Complainant(s)

Versus

SNAPDEAL PVT. LTD. (ONLINE SHOPPING COMPANY) - Opp.Party(s)

SELF

21 Oct 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/659/2021
( Date of Filing : 23 Nov 2021 )
 
1. MOHSIN AHMAD MUQEEM AHMAD KHAN
GOMTI TRADERS, H.NO.1040, OPP. RAJ-HEIGHTS, NEAR PETROL PUMP, BESIDE MEHANDI CENTRE SHANTINAGAR, NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SNAPDEAL PVT. LTD. (ONLINE SHOPPING COMPANY)
6TH FLOOR, CAPITAL CYBERSCAPE, GOLF COURSE EXTENSION ROAD, SECTOR-59, GURUGRAM, HARYANA-122002
GURUGRAM
HARYANA
2. CAMPUS ACTIVEWEAR PVT. LTD.
KHASRA NO.622,623,624,626/1,632, VILLAGE MUNDKA MAIN ROHTAK ROAD, DELHI METRO PILLAR NO.515. NEW DELHI-110041
DELHI
DELHI
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 
Dated : 21 Oct 2022
Final Order / Judgement

मा. सदस्याश्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये –

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम  35  नुसार दाखल केलेली आहे.
  2. तक्रारदाराने स्नॅपडील प्रा.लि. यांचे संगणकावरील  ऑनलाईन अॅप ऑफ कॅम्पस अॅकटीव्हेअर प्रा.लि. यांचेकडुन दिनांक 3.10.2021 रोजी रुपये 1888/- चे जोडे खरेदी केले होते. परंतु दिनांक 15.10.2021 रोजी तक्रारदाराला जोडे पूरविते वेळी तक्रारदाराने त्याचा व्हिडीओ काढतांना खोक्यात नवीन जोडया ऐवजी वापरलेले व फाटलेले जोडे असल्याचे दिसून आले. तक्रारदाराने स्नॅपडिलचे ग्राहक सेवा क्रमांकावर वारंवार संपर्क साधला व त्यानंतर राष्‍ट्रीय ग्राहक सेवा केंद्रावर तक्रार नोंदविली. परंतु त्यांचा काहीही उपयोग झाला नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.प. ने तक्रारदाराची जोडे खरेदी पोटी स्व‍िकारलेली रक्कम रुपये 1888/- व सदर रक्कमेवर व्याज मिळावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 4,55,411/- मिळावे अशी मागणी केली आहे.
  3. तक्रार दाखल करुन वि.प.1 व 2 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविण्यात आली. सदर नोटीस प्राप्त होऊन सुध्‍दा वि.प. 1 व 2 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 21.6.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारदाराने तक्रारीत दाखल केलेले दस्तावेज, तसेच लेखी व तोंडी युक्तीवादाबाबत दाखल पुरसिसचे अवलोकन करता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

             प्रश्न                                             उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?               होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. काय आदेश                                                                 अंतिम आदेशानुसार

का र  मि मां सा

  1. तक्रारदाराने स्नॅपडील प्रा.लि. यांचेमार्फत कॅम्पस अॅकटीव्हेअर प्रा.लि. या कंपनी कडुन दिनांक 3.10.2021 रोजी रुपये 1,888/- चे जोडे खरेदी केले होते. परंतु दिनांक 15.10.2021 रोजी तक्रारदाराला जोडयांची डिलेवरी घेतेवेळी तक्रारदाराने त्याचा व्हिडीओ काढला असता सदर खोक्यात नवीन जोडया ऐवजी वापरलेले व फाटलेले जोडे असल्याचे दिसले.  याबाबत तक्रारदाराने स्नॅपडिलचे ग्राहक सेवा क्रमांकावर वारंवार संपर्क साधला व त्यानंतर राष्‍ट्रीय ग्राहक सेवा केंद्रावर तक्रार नोंदविली. परंतु त्यांचा काहीही उपयोग झाला नाही म्हणुन तक्रारदाराने तक्रार दाखल करुन वि.प.1 व 2 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली. त्यानंतर वि.प.ने तक्रारदारास जोडे खरेदीपोटी घेतलेली रक्कम रुपये 1,888/- परत केली असे तक्रारदाराने आयोगासमक्ष तोंडी युक्तीवादाचेवेळी नमुद केले. परंतु वि.प.क्रं.1 व 2 यांनी तक्रारदारासोबत फसवणूक केल्याचे स्पष्‍ट होते. वास्तविक वि.प.क्रं.1 व 2 यांनी तक्रारदाराकडुन जोडे खरेदी रक्कम स्व‍िकारुनही वापरेलेले व फाट‍के जोडे पूरविणे ही वि.प.ची सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्‍ट होते.

सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश  

  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. क्रं.1 व 2,यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 3,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 2,000/- तक्रारदारास द्यावे.
  3. विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाचे आत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी.
  4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
  5. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.