तक्रार क्र. 261/2015.
तक्रार दाखल दि. 29-10-2015.
तक्रार निकाली दि. 6-4-2016.
श्री.सुरेश नरहर देशपांडे,
रा.शिवाजी चौक, रिंगरोड, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्रीमंत मालोजीराजे गृहतारण सह.संस्था मर्या.
फलटणतर्फे व्यवस्थापक व अध्यक्ष-
2. संस्थापक- श्री.दुर्योधन दत्तात्रय रणनवरे.
3. चेअरमन- श्री.शंतनु दुर्योधन रणनवरे.
4. संचालक- सौ.शारदादेवी दुर्योधन रणनवरे.
क्र.2 ते 4 रा.दत्तकृपा, गोळीबार मैदान, लक्ष्मीनगर,
फलटण, जि.सातारा.
5. व्हा.चेअरमन- श्री.देवराज विश्वासराव जाधव.
रा.प्रसाद व्हिला, संजीवराजे नगर, फलटण.
6. संचालक- श्री.प्रकाश प्रतापराव जाधव.
रा.संजीवराजे नगर, फलटण.
7. संचालक- श्री.पुरुषोत्तम लक्ष्मण बक्षी.
रा.गोळीबार मैदान,फलटण, जि.सातारा.
8. संचालक- श्री.जोतीराम महादेव गोरे.
रा.आयोध्या ऑफसेट, फलटण, जि.सातारा.
9. संचालक- श्री.राजेंद्र रामचंद्र झामरे पाटील.
रा.गोळीबार मैदान, फलटण, जि.सातारा.
10. संचालक- श्री.पोपट आण्णा जाधव.
रा.मारवाड पेठ, फलटण, जि.सातारा.
11. संचालक- श्री.सदाशिव पांडुरंग घोलप.
रा.ठाकुरकी, फलटण, जि.सातारा.
12. संचालक- श्री.बबन भिकू चव्हाण.
रा.ठाकुरकी, फलटण, जि.सातारा.
13. संचालक- श्री.यशवंत गजानन कांबळे.
रा.हडको कॉलनी, फलटण, जि.सातारा.
14. संचालक- सौ.कांचनमाला शंकरराव जाधव.
रा.गोळीबार मैदान, फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.पी.जे.फौजदार.
जाबदार क्र.1 ते 14 – एकतर्फा.
- न्यायनिर्णय -
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे,सदस्या यानी पारित केला)
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे तो खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे सेवानिवृत्त असून त्यानी आपल्या नोकरी व संसारातून साठवलेले व बचत करुन जमा झालेले तसेच फंड, ग्रॅच्युईटी मधून मिळालेले पैसे अडीअडचणीचे काळात, आजारपणात व वृध्दापकाळात उपयोगी पडावेत म्हणून 4 ठेवपावत्यांद्वारे आपल्या स्वतःचे नावावर पतसंस्थेत गुंतवले आहेत त्यामुळे ते जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. जाबदार क्र.1 श्रीमंत मालोजीराजे गृहतारण सह.संस्था मर्या.फलटण ही सहकार अधिनियम 1960 अंतर्गत स्थापन झालेली पतसंस्था असून संस्थेचा व्यवसाय ठेवी गोळा करणे, कर्जवाटप व कर्जवसुली करणे व त्यातून नफा कमावणे असा आहे. जाबदार क्र.2 हे या संस्थेचे संस्थापक तर जाबदार क्र.3 हे संस्थेचे चेअरमन व जाबदार क्र.4 या संस्थेच्या संचालिका तर क्र.5 हे संस्थेचे व्हा.चेअरमन आहेत व संस्थेचे सर्व दैनंदिन कामकाज प्रशासक मंडळ, अध्यक्ष व व्यवस्थापकांमार्फत चालते म्हणूनच ग्राहकांना योग्य ती सेवा पुरवणेची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 14 यां सर्वांची आहे. तक्रारदारांनी आपले साठवलेले व बचत केलेले सर्व पैसे ठेवपावत्याद्वारे जाबदार संस्थेत गुंतवले आहेत ते खालीलप्रमाणे-
अ.क्र. | ठेवीदाराचे नाव | पावती क्र. | ठेव दिनांक | रक्कम रु. | देय दिनांक |
1 | सुरेश नरहर देशपांडे | 026427 | 22-8-07 | 1,00,000/- | 22-8-08 |
2 | सुरेश नरहर देशपांडे | 026428 | 22-8-07 | 1,00,000/- | 22-8-08 |
3 | सुरेश नरहर देशपांडे | 026429 | 22-8-07 | 1,00,000/- | 22-8-08 |
4 | सुरेश नरहर देशपांडे | 024768 | 30-5-07 | 2,00,000/- | 30-6-08 |
तक्रारदारांस रकमेची गरज असलेने व वरील ठेवपावत्यांच्या मुदती संपलेने ते जाबदार संस्थेत आपली सव्याज रक्कम मागणेस गेले असता संस्थेच्या व्यवस्थापकाने संस्था आर्थिक अडचणीत असलेचे सांगत पैसे देणेस नकार दिला त्यामुळे तक्रारदारास धक्का बसला. तक्रारदारानी वारंवार त्यांचेकडे रकमेची मागणी केली. सध्या तक्रारदाराना वरील रकमेची अत्यंत गरज आहे. सदर रक्कम मिळणेसाठी त्यांनी सन 2008 पासून ते आजतागायत जाबदारांकडे वारंवार हेलपाटे मारले, पैशांची वारंवार मागणी केली. तक्रारदारांनी वारंवार जाबदारांकडे वरील पैसे मिळणेसाठी तोंडी मागणी केली मात्र जाबदारांनी अद्याप त्यांचे पैसे परत केले नाहीत. जाबदारांचे या वर्तनामुळे तक्रारदारांस मोठी चिंता उत्पन्न झाली असून त्यामुळे त्यांचे मनःस्वास्थ बिघडले आहे. तसेच तक्रारदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक असूनही जाबदार म्हणून पुरवावयाचे सेवेत जाबदार तक्रारदारांची देय असणारी रक्कम परत न करता कमतरता व त्रुटी निर्माण करीत आहेत व अनुचित व्यापारी प्रथेचा पायंडा पाडीत आहेत. जाबदारांच्या या वर्तनामुळे तक्रारदारांना मोठी चिंता निर्माण झाली असून त्यामुळे त्यांचे मनस्वास्थ बिघडले आहे. तक्रारदारांनी दि.13-8-2015 रोजी जाबदार क्र.1 ते 3 यांना वकीलांतर्फे कायदेशीर नोटीस काढून त्यांना आपण जर 5 दिवसात माझी देय रक्कम परत केली नाही तर आम्ही आपलेवर कोर्ट कारवाई करु असे बजावले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या तक्रारअर्जाशिवाय तक्रारदारानी इतर कोणतेही कोर्टप्रकरण जाबदारांविरुध्द सध्या दाखल केलेले नाही. दि.13-8-2015 रोजी तक्रारदारानी जाबदारांना रक्कम मागणीची नोटीस पाठवलेवर त्यांनी सदर नोटीसची इंटिमेशन मिळूनही नोटीस स्विकारली नाही. नोटीस मुदतीनंतर 5 दिवसात म्हणजेच दि.18-8-2015 पर्यंत रक्कम दिली नाही तेव्हा प्रथमतः कारण घडले व आजतागायत घडतच आहे. जाबदार मे.मंचाचे स्थळसीमेतच रहातात व तक्रारअर्जास कारणही याच मे.मंचाचे स्थळसीमेत घडलेने तक्रारअर्ज चालवणेचा अधिकार या मंचास आहे. सबब तक्रारदारानी मे.मंचास खालीलप्रमाणे विनंती केली आहे- मंचाने जाबदार क्र.1 ते 14 यांस ग्राहक म्हणून तक्रारदारास पुरवणेचे सेवेत त्रुटी केलेबाबत दोषी मानून जाबदारांनी तक्रारदारांस देय असणारी सर्व रक्कम म्हणजेच रु.9,08,000/- तक्रारदारास परत करणेचा आदेश जाबदारांस करावा. तक्रारदारास वरील रक्कम मिळेपर्यंत या रकमेवर द.सा.द.शे.13 टक्के दराने व्याज देणेचा आदेश जाबदारांस मे.मंचाने करावा. तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रासाबाबत नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.पाच लाख देणेचा आदेश मंचाने करावा. तक्रारअर्जासाठी आलेला सर्व खर्च जाबदारानी परत करणेचा आदेश जाबदाराना मंचाने करावा. येणेप्रमाणे तक्रारअर्ज असे.
2. दि.3-3-2016 रोजी मे.मंचाने जाबदार क्र.1 ते 14 यांना नोटीसा लागू होऊनही जाबदार मंचात गैरहजर आहेत म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारित करणेत आले आहेत. म्हणून जाबदारांतर्फे म्हणणे दाखल नाही.
3. नि.5 कडे तक्रारदाराचा तक्रारअर्ज दाखल करुन घेणेचा व जाबदाराना नोटीसा काढणेबाबतचा अर्ज दाखल, अर्ज मंजूर. नि.3 कडे सदर कामी अँड.फौजदार याना नियुक्तीसाठीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे अँड.फौजदार यांचे वकीलपत्र, नि.5 कडे तक्रारदारातर्फे कागदयादीने कागद दाखल, नि.5/1 ते 5/4 कडे तक्रारदारांच्या मुदतठेव पावतीच्या सत्यप्रती दाखल, नि.5/5 कडे जाबदारांचे वकीलांतर्फे तक्रारदाराना पाठविलेली नोटीस, नि.5/6 कडे जाबदार क्र.1, नि.5/7 कडे जाबदार क्र.2 व नि.5/8 कडे जाबदार क्र.3 यांची अनक्लेम्ड शे-याने परत आलेली पाकिटे, नि.5/9 कडे संचालक मंडळाची यादी, नि.6 कडे पत्तापुरसीस, नि.8 कडे जाबदाराना पाठवलेल्या नोटीसा, नि.9 कडे जाबदार क्र.12, नि.10 कडे जाबदार क्र.6, नि.11 कडे जाबदार क्र.1, नि.12 कडे जाबदार क्र.8, नि.13 कडे जाबदार क्र.3, नि.14 कडे जाबदार क्र.4, नि.15 कडे जाबदार क्र.10, नि.16 कडे जाबदार क्र.11, नि.17 कडे जाबदार क्र.2 यांच्या नोटीसच्या पोचपावत्या, नि.18 कडे जाबदार क्र.13 यांचे अपु-या पत्त्याने परत आलेले पाकिट, नि.19 कडे जाबदार क्र.14 चे नॉट नोन शे-याने परत आलेले पाकिट, नि.19/ए कडे जाबदार क्र.9 चे परत आलेले पाकिट, नि.20 कडे नॉट नोन शे-याने जाबदार क्र.5 चे परत आलेले पाकिट, नि.21 कडे जाबदार क्र.7ची पोचपावती, नि.22 कडे जाबदार क्र.5,9,14 याना नोटीसांसाठीचा तक्रारदारांचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.23 कडे जाबदार क्र.14, नि.24 कडे जाबदार क्र.9, नि.25 कडे जाबदार क्र.5 यांची लेफट शे-याने परत आलेली पाकिटे, नि.26 कडे तक्रारदाराचा जाबदार क्र.5,9,14 याना जाहीर नोटीसीसाठी अर्ज, अर्ज मंजूर. नि.27 कडे प्रतिज्ञापत्र, नि.28 कडे जाहीर नोटीस मसुदा, मसुदा मंजूर. नि.29 कडे जाहीर नोटीस मसुदा. मसुदा मंजूर. नि.30 कडे मंचातर्फे संपादकांस जाहीर समन्ससाठी दिलेले पत्र, नि.31 कडे तक्रारदाराचे कागदपत्र दाखल करुन घेणेस परवानगी अर्ज, अर्ज मंजूर. नि.32 कडे कागदयादीने कागद दाखल, नि.32/1 कडे जाहीर नोटीसीची मूळ प्रत, नि.32/2 कडे जाहीर नोटीसीत झालेल्या चुकीची दुरुस्ती केलेला अंक, नि.34 कडे तक्रारदारातर्फे पुरावा संपलेची पुरसीस, नि.35 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद याप्रमाणे तक्रारअर्ज आहे.
. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, दाखल केलेले पुरावे, तक्रारदारांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
विवेचन- मुद्दा क्र.1-
5. तक्रारदार क्र.1 हे वर नमूद पत्त्यावर रहात असून त्यांनी स्वतःचे नावावर जाबदार पतसंस्थेमध्ये मुदतठेवी ठेवलेल्या होत्या. सदर रकमांचा व्यवहार हा जाबदार पतसंस्थेत झालेला आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त असून त्यानी नोकरी व संसारातून साठवलेले तसेच बचत करुन जमा केलेले फंड, ग्रॅच्युईटी इ.तून मिळालेले पैसे एकत्र करुन अडीअडचणीत, आजारपणात तसेच वृध्दापकाळात उपयोगी पडावेत म्हणून जाबदार पतसंस्थेत ठेवपावत्यांद्वारे गुंतवलेले आहेत त्यामुळे ते जाबदार संस्थेचे ग्राहक बनतात.
जाबदार पतसंस्था ही लोकांकडून ठेवी ठेवून घेते, त्यावर त्यांना व्याज देते, लोकांना कर्जे देते व त्यावर व्याज घेते अशा प्रकारे जाबदार क्र.1 पतसंस्थेचा व्यवहार आहे व या स्वरुपात ती लोकांना सेवा देते. त्यामुळे लोकांमध्ये व जाबदार क्र.1 पतसंस्थेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते निर्माण होते. तक्रारदारानी जाबदार पतसंस्थेत मुदतठेवी ठेवलेने तक्रारदार हे ग्राहक ठरतात व जाबदार पतसंस्थेने त्या ठेवून घेतलेने व त्यावर व्याज दयावयाचे ठरविलेने जाबदार पतसंस्था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्था ठरते. म्हणून मुद्दा क्र.1चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6. विवेचन मुद्दा क्र.2- तक्रारदारांना पैशाची गरज भासलेने व ठेवपावत्यांच्या मुदती संपूनही ते जाबदार पतसंस्थेत गेले असता त्यांना संस्थेच्या व्यवस्थापकानी संस्था आर्थिक अडचणीत असलेचे सांगत पैसे देणेस नकार दिला. त्यानी जाबदार क्र.2 ते 5 यांची वेळोवेळी भेट घेऊन याबाबत जाब विचारला. परंतु सर्वानीच तक्रारदारांचे बोलण्याकडे दुर्लक्ष केलेने त्याना मानसिक धक्का बसून त्यांचे मनस्वास्थ बिघडले. तक्रारदारानी वारंवार जाबदार पतसंस्थेतील ठेवींच्या रकमेची जाबदारांकडे मागणी केली. तक्रारदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक असूनही जाबदारानी त्याना त्यांच्या ठेवपावत्यांच्या मुदती संपूनही व तक्रारदारानी वारंवार सव्याज रकमेची मागणी करुनही आजपर्यंत त्यांना सव्याज रकमा परत दिलेल्या नाहीत. तक्रारदारांच्या मुदतठेवीच्या मुदती संपलेल्या आहेत. जाबदारानी तक्रारदारांच्या रकमा परत केल्या नसल्यामुळेच जाबदारांच्या कर्तव्यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्यांचेकडून दयावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे. म्हणून मुद्दा क्र.2चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7 विवेचन मुद्दा क्र.3- जाबदार क्र.1 पतसंस्था ही सहकार कायद्याप्रमाणे स्थापन झालेली आहे. ग्राहकाकडून ठेवीस्वरुपात रकमा स्विकारुन ग्राहकानी रक्कम मागितलेस त्यांच्या रकमा त्यांना सव्याज परत देणे या हेतूने स्थापन झालेली आहे. तक्रारदारांनी जाबदार संस्थेकडे मुदतठेवी ठेवलेल्या आहेत. तक्रारदारांची मुदतठेवीची रक्कम जाबदारांनी ठेवून घेतली. परंतु तक्रारदारांनी त्यांची रक्कम परत मागितलेवर ती परत करणे ही जाबदारांची जबाबदारी असूनही जाबदारानी तक्रारदाराना त्यांच्या रकमा परत दिलेल्या नाहीत व अनुचित व्यापारी प्रथेचा पायंडा पाडत आहेत. जाबदार पतसंस्था साता-यातील असल्याने मे.मंचाचे अधिकारक्षेत्रात व स्थळसीमेतच कारण घडले आहे. जाबदारांनी आजपावेतो तक्रारदारांच्या रकमा परत दिल्या नाहीत व यास जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 14 हे वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदारानी तक्रारदारांच्या रकमा वेळेत सव्याज परत करावयास हव्या होत्या परंतु आजपावेतो रकमा परत न केलेने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांना मानसिक त्रासही झालेला आहे. या सर्वांस जाबदारच जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. जाबदार क्र.1 ते 3 याना तक्रारदारानी दि.13-8-2015 रोजी वकीलांतर्फे नोटीस देऊन जाबदाराना रकमेची मागणी केली. त्याबाबत सूचना मिळूनही जाबदारानी नोटीस स्विकारली नाही. नोटीसीप्रमाणे पाच दिवसात म्हणजेच 18-8-15 पर्यंत जाबदारानी तक्रारदारांचे पैसे दिले नाहीत तेव्हाच तक्रारअर्जास प्रथम कारण घडले व आजपर्यंत घडतच आहे. जाबदार मे.मंचाचे स्थळसीमेत रहात असलेने या मंचास सदर तक्रार चालवणेचा अधिकार आहे. तक्रारदारानी जाबदाराना नोटीसीत 5 दिवसांची मुदत दिली होती तरीही जाबदारानी तक्रारदाराना मुदत ठेवीच्या रकमा सव्याज अदा केल्या नाहीत. तेव्हाच नव्हे तर आजपावेतोही जाबदारानी रकमा तक्रारदारास परत केल्या नाहीत. म्हणूनच जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात. म्हणून मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
8. सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 14 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहे. सदर बाबतीत आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
9. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
- आदेश –
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
अ.क्र. | ठेवीदाराचे नाव | पावती क्र. | ठेव दिनांक | रक्कम रु. | देय दिनांक |
1 | सुरेश नरहर देशपांडे | 026427 | 22-8-07 | 1,00,000/- | 22-8-08 |
2 | सुरेश नरहर देशपांडे | 026428 | 22-8-07 | 1,00,000/- | 22-8-08 |
3 | सुरेश नरहर देशपांडे | 026429 | 22-8-07 | 1,00,000/- | 22-8-08 |
4 | सुरेश नरहर देशपांडे | 024768 | 30-5-07 | 2,00,000/- | 30-6-08 |
2. अ.क्र.1 मधील पावती क्र.026427 मधील रकमेवर रक्कम ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे पावतीवरील नमूद व्याजदराप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांस अदा करावी.
3. अ.क्र.2 मधील पावती क्र.026428 मधील रकमेवर रक्कम ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे पावतीवरील नमूद व्याजदराप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांस अदा करावी.
3. अ.क्र.3 मधील पावती क्र.026429 मधील रकमेवर रक्कम ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे पावतीवरील नमूद व्याजदराप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांस अदा करावी.
4. अ.क्र.4 मधील पावती क्र.024768 मधील रकमेवर रक्कम ठेवलेल्या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे पावतीवरील नमूद व्याजदराप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांस अदा करावी.
5. तक्रारदारास झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांस अदा करावी.
6. वरील आदेशाचे पालन जाबदारांनी आदेश प्राप्त तारखेपासून 45 दिवसांचे आत करावयाचे आहे तसे न केलेस आदेश पारित तारखेपर्यंत होणा-या एकूण सव्याज रकमेवर तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज अदा करावे लागेल.
7. वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 60 दिवसाचे आत जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या करावयाचे आहे. तसे न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 6-4-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.