तक्रारकर्त्यातर्फे त्यांचे वकील : श्री. के.एम. लिल्हारे हजर.
विरूध्द पक्ष क्र 3 : एकतर्फा.
विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 4 तर्फे वकील : श्री. एस.व्ही. खान्तेड हजर.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- कुमारी. सरीता ब. रायपुरे, सदस्या, -ठिकाणः गोंदिया
-
न्यायनिर्णय
(दिनांक 08/02/2019 रोजी घोषीत)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता श्री. भरतलाल कुवरलाल नागपुरे, रा. माताटोली बिंझली, पो. कावराबांध, ता.सालेकसा, जि. गोंदिया, येथील रहिवाशी आहे. तक्रारकर्त्याने दि. 27/06/2014 रोजी विरूध्द पक्ष क्र 1 कडून जुनी मोटर सायकल एक्सचेंज करून व एक्सचेंज गाडीची किंमत मिळून डाऊन पेमेंट रू. 16,500/-,नगदी दिले आणि उर्वरीत रककम रू. 41,000/-, टि.व्ही.एस क्रेडिट सर्व्हिस लि. फायनांन्स कंपनीद्वारे फायनांन्स करून मोटर सायकल STAR CITY -110 CC ES (MAG) किंमत रू. 55,000/-,विरूध्द पक्ष क्र 1 कडून खरेदी केली. तसेच सदर मोटर सायकल खरेदी करतांना लागणारी अॅसेसरी करिता तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 ला वेगळे पैसे दिले होते. तक्रारकर्त्याने रू.41,000/-,टि.व्ही.एस क्रेडिट सर्व्हिस लि. फायनान्स कंपनीद्वारे फांयनान्स केले होते या फायनांन्स प्रमाणे तक्रारकर्ता हा महिन्याकाठी ई.एम.आय रक्कम रू.2,187/-,नियमीतपणे प्रत्येक महिन्याला सदर फायनांन्स कंपनीला देत होते. तक्रारकर्त्याने सदर वरील वर्णनाची मोटर सायकल विरूध्द पक्ष क्र 1 कडून खरेदी केल्यानंतर मोटर सायकलचे तक्रारकर्त्याने नियमीतपणे दर महिन्याला सर्व्हिसींग विरूध्द पक्ष क्र 2 कडून करून घेतले. परंतू दि. 22/08/2015 रोजी सदर मोटर सायकलचे इंजिनमध्ये तांत्रीक बिघाड आल्याने गाडीचे इंजिन बंद पडले. तेव्हा तक्रारकर्त्याने सदर मोटर सायकल वारंटी कालावधीत असल्यामूळे विरूध्द पक्ष क्र 1 कडे संपर्क केला असता, विरूध्द पक्ष क्र 1 ने सदर मोटर सायकल, विरूध्द पक्ष क्र 2 कडे टि.व्ही.एस क्रेडिट सर्व्हिस सेंटर गोंदिया यांच्याकडे दुरूस्तीकरीता पाठविले. त्यानंतर विरूध्द पक्ष क्र 2 कडून मोटर सायकल 25 दिवसानंतर दुरूस्त होऊन, विरूध्द पक्ष क्र 1 कडे आली. तेव्हा विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी अशी हमी दिली की, यानंतर जर इंजिनमध्ये कोणताही तांत्रीक बिघाड झाल्यास, सदर मोटर सायकल बदलून नविन मोटर सायकल तक्रारकर्त्याला देण्यात येईल. मात्र 20 दिवसानंतर पुन्हा मोटर सायकलच्या इंजिनमध्ये तांत्रीक बिघाड होऊन इंजिन बंद पडले. तेव्हा तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना कळविले. तक्रारकर्त्यानी सदर मोटर सायकल विरूध्द पक्ष क्र 1 कडे दिले. विरूध्द पक्ष क्र 1 ने विरूध्द पक्ष क्र 2 यांचेशी दुरध्वनीवर संपर्क साधून सदर मोटर सायकलच्या तांत्रीक बिघाडाबद्दल सांगीतले आणि सदर मोटर सायकल नागपूर येथील टि.व्ही.एस मोटर सर्व्हिस सेंटर नागपुर (विरूध्द पक्ष क्र 3 ) पाठविण्याचे कळविले आणि तक्रारकर्त्याला म्हटले की, तुम्ही निःश्चित रहा तुम्हाला नविन मोटर सायकल देण्यात येईल. त्यानंतर तक्रारकर्त्याने 25 दिवसानंतर विरूध्द पक्ष क्र 1 कडे मोटर सायकलबाबत विचारणा केली असता, विरूध्द पक्षाने म्हटले की, “सध्या आमचे कंपनीचे हेड ऑफिसचे (अध्यक्ष/एम.डी.) विरूध्द पक्ष क्र 4 सोबत बोलणी सुरू आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच नविन मोटर सायकल देण्यात येईल”. त्यानंतर विरूध्द पक्ष क्र 1 ने 15 दिवसानंतर तक्रारकर्त्याला भ्रमणध्वनीच्या माध्यमाने संपर्क करून सूचविले की, तुम्हची मोटर सायकल आली आहे तुम्ही घेऊन जा. तेव्हा तक्रारकर्ता मोटर सायकल घेण्यास गेला असता तीच मोटर सायकल कोणतीही तांत्रीक बिघाड येणार नाही असे आश्वासन देऊन तीच मोटर सायकल देण्यात आली. त्यानंतर दि. 06/11/2015 रोजी पुन्हा मोटर सायकलमध्ये तांत्रीक बिघाड येऊन मोटर सायकलचे इंजिन बंद पडल्याचे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 ला सूचविले. त्यानंतर विरूध्द पक्ष क्र 1 ने 25 दिवसानंतर सदर मोटर सायकलचे इंजिन दुरूस्त करून दिले. तेव्हा तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 व 4 यांना वारंवार विनंती केली की, मोटर सायकलचे इंजिनमध्ये तांत्रीक बिघाडामूळे खूप त्रास होतो त्यामुळे आपण वारंटी कालावधीनूसार मला दुसरी मोटर सायकल बदलवून दयावे तेव्हा विरूध्द पक्ष क्र 1 व 4 यांनी तक्रारकर्त्याला म्हटले की, आता दुसरी मोटर सायकल बदलवून देत नाही तुला जे वाटते ते तु करून घे. तु आमच काहीच करू शकत नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दि. 13/02/2016 ला सदर मोटर सायकल बदलवून नविन मोटर सायकल देण्यात यावे याविषयी रजिस्ट्रर पोस्टाने नोटीस पाठविली. सदर नोटीसचे विरूध्द पक्ष क्र 4 ने दि. 02/03/2016 ला नोटीसचे उत्तर पाठवून कळविले की, त्यांचे क्षेत्रीय अधिकारी समस्या ऐकून समस्या दूर करतील. परंतू आजपर्यंत कोणतेही अधिकारी तक्रारकर्त्याला भेटले नाही. अशाप्रकारे विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला नविन मोटर सायकल देण्याचे टाळाटाळ केली. तसेच तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडे वारंवार फेरी घातली आणि सदर मोटर सायकल बदलवून देण्याची विनंती केली. तसेच विरूध्द पक्ष क्र 4 यांनी नमूद केलेल्या हेल्पलाईन नं 1800, 427, 3883 वर वारंवार दुरध्वनीद्वारे संपर्क करून समस्या सांगीतली. परंतू विरूध्द पक्षाने केाणतेही लक्ष दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला अतिशय मानसिक, शारिरिक व आार्थिक त्रास सहन करावा लागला. कारण अनेक वेळा स्वखर्चाने गोंदिया ते नागपुर येथे विरूध्द पक्ष क्र 2 व 3 कडे जावे लागले. त्यामुळे रोजगार सुध्दा बुडाला. यासाठी विरूध्द पक्ष क्र 1 ते 4 यांचेद्वारे तक्रारकर्त्याला विकलेली मोटर सायकल त्रृटीपूर्ण व दोषपूर्ण असल्यामूळे तक्रारकर्त्याला त्रास सहन करावे लागत आहे व हा त्रास भविष्यात सुध्दा होणार. त्यामुळे विरूध्द पक्ष क्र 1 ते 4 यांनी मोटर सायकल वारंटी कालावधीत असल्यामूळे तक्रारकर्त्याला सदर मोटर सायकल बदलवून नविन मोटर सायकल देण्याचा, तसेच मानसिक त्रासापोटी रू.75,000/-,व शारिरिक त्रासापोटी व असुविधापोटी व्याजासह रू.75,000/-,तसेच दावा खर्च रू. 20,000/-, विरूध्द पक्षाकडून तक्रारकर्त्याला देण्याचा आदेश व्हावा.
3. विरूध्द पक्ष क्र 1 ते 4 यांना मंचातर्फे नोटीसेस बजावण्यात आल्या त्यांनतर त्यांनी मंचात हजर होऊन आपला लेखीजबाब सादर केला. तसेच विरूध्द पक्ष क्र 3 यांना नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही त्यामुळे त्यांचे विरूध्द दि. 19/04/2017 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 4 यांनी त्यांचा लेखी जबाब मंचात दाखल करून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे संपूर्ण खंडन केले आणि त्यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये विशीष्ट कथन दिले त्यात म्हटले की, तक्रारकर्त्याने दि. 22/08/2015 रोजी जेव्हा मोटर सायकल सर्व्हिसींग करण्यास आणले तेव्हा सदर मोटर सायकलच्या इंजिनवरती कॉर्बन पसरलेले होते आणि मोटर सायकलच्या इंजिनमध्ये तक्रारकर्त्याने केरोसीनचा वापर केल्याने इंजिनच्या भोवती कॉर्बन पसरले. त्यामुळे गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. विरूध्द पक्ष क्र 1 ने मोटर सायकल दुरूस्त करून दिली तेव्हा तक्रारकर्त्याला सांगीतले की, सदर इंजिनमध्ये बिघाड गाडीमध्ये केरोसीनचा वापर केल्यामूळे झाला आहे तरी तुम्ही केरोसीनचा वापर करू नका अशी ताकीद दिली. कारण त्यामुळे गाडीचे इंजिन खराब होईल. कारण मोटर सायकलमध्ये कोणतेही Manufacturing Defect नाही आणि तक्रारकर्त्याने केरोसीनचा वापर केल्यामूळे इंजिनमध्ये जे काही तांत्रीकी बिघाड झाला तो आम्ही दुरूस्त करून दिला. विरूध्द पक्ष क्र 1 टि.व्ही. एस मोटर्स रिजमा आमगांव (Authorized Dealer) आणि सर्व्हिस सेंटर आहे. त्यांनी तक्रारकर्त्याला नेहमीच चांगली सर्व्हिस दिली. मोटर सायकलमध्ये केरोसीनचा वापर केल्यामूळे इंजिनमध्ये तांत्रीकी खराबी आली ती सुध्दा दुरूस्त करून दिली यात विरूध्द पक्षाच्या सेवेतील कोणत्याही प्रकारची त्रृटी नाही. तसेच तक्रारकर्त्याने मोटर सायकलच्या इंजिनीमध्ये बिघाड आल्याचे आरोप केले आहे परंतू तक्रारकर्त्याने इंजिनमध्ये बिघाड आहे याबद्दल कोणत्याही प्रकारचे Expert Report सदर दाव्यामध्ये दाखल केले नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष सदर मोटर सायकल बदलवून नविन देण्यास तसेच नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. तरी सदर तक्रार विरूध्द पक्ष क्र 1,2 व 4 विरूध्द खारीज करण्यात यावी.
4. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्यांने सादर केलेल्या दस्तऐवजाच्या यादीप्रमाणे एकुण 17 दस्ताऐवज दाखल केले आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद सादर केले. विरूध्द पक्ष क्र 3 यांचेविरूध्द एकतर्फा आदेश दि. 19/04/2017 रोजी आदेश पारीत करण्यात आला. तसेच विरूध्द पक्ष क्र 1,2 व 4 यांनी त्यांची लेखीकैफियत, पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद, यांचे मंचानी वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्ष क्र 1 ते 4 यांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय? | नाही. |
3 | अंतीम आदेश | तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
5. तक्रारकर्त्याने दि. 22/08/2015 रोजी ज्यावेळी विरूध्द पक्षाकडे मोटर सायकल सर्व्हिसींग करण्यासाठी नेली तेव्ही गाडीच्या इंजिनमध्ये झालेला तांत्रीक बिघाड हा केरोसीनचा वापर केल्याने निर्माण झाला आहे असे विरूध्द पक्षाने त्यांच्या लेखीजबाबामधील विशीष्ट कथनमध्ये सांगीतले. परंतू तक्रारकर्त्याने मात्र इंजिनमध्ये झालेला तांत्रीक बिघाड हा केरोसीनचा वापर केल्यामूळे झालेला नाही हे दाखविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या Expert इंजिनची तपासणी केली नाही किंवा Expert Report सदर दाव्यामध्ये दाखल केले नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे तक्रारीमध्ये दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने जी मागणी केली की, जुनी मोटर सायकल बदलवून नविन मोटर सायकल देण्यात यावी. हि मागणी तक्रारकर्त्याची योग्य नाही. कारण तक्रारकर्त्याने दाव्यामध्ये असे कोणतेही कागदपत्रे किंवा Expert Opinion दाखल केले नाही की, ज्याद्वारे हे सिध्द होईल की, तक्रारकर्त्याच्या मोटर सायकलमध्ये तांत्रीक बिघाड हा केरोसीनचा वापर केल्याने झाला नाही. त्यामुळे विरूध्द पक्षाच्या सेवेतील कोणतेही त्रृटी नाही. तसेच तक्रारकर्त्याने दिलेले हे कारण मंचास संयुक्तिक वाटत नाही.
सबब, प्रकरणातील वस्तुस्थिती व पुराव्याचा विचार करता, हा मंच मुद्दा क्र 1 चा निःष्कर्ष होकारार्थी व 2 चा निःष्कर्ष नकारार्थी नोंदवित आहोत.
वरील चर्चेवरून व नि:ष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
4. अतिरीक्त संच तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे.