| Complaint Case No. CC/21/211 | | ( Date of Filing : 22 Nov 2021 ) |
| | | | 1. Shri.Madhukar Godaruji Tekam | | Jawahar nagar Rajura,Tah,Rajura,Dist.Chandrapur | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. Shri.Suyog Traders Proprietor Suyog Sanjay Dhote | | Naka no.3 Gadchandur road,Rajura,Tah.Rajura,Dist.Chandrapur | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA | | 2. Shri.Ashish Dinkar Bhagat | | Naka no.3 Gadchandur road,Rajura,Tah.Rajura,Dist.Chandrapur | | CHANDRAPUR | | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या) (पारीत दिनांक १६/०३/२०२३) - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ सह कलम ३८ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता हे मौजा राजुरा, तहसील राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांनी खास मौजा राजुरा येथे खरेदी केलेल्या जागेवर घराचे बांधकाम सुरु केले असून बांधकामाकरिता लागणारे आवश्यक साहित्य, सिमेंट, लोखंड, गिट्टी, बोल्डर इत्यादी साहित्य खरेदी करण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या संपर्कात तक्रारकर्ता आले. विरुध्द पक्ष क्रमांक १ चे सुयोग ट्रेडर्स या नावाने बांधकाम साहित्य घरपोच सुविधा देण्याचे दुकान असून त्याचे प्रोपरायटर श्री संजय धोटे हे आहे. विरुध्द पक्ष क्रमांक २ हे त्या दुकानामध्ये नोकरी करतात. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या दुकानातून वरील साहित्य विरुध्द पक्ष क्रमांक १ कडून घेऊन तक्रारकर्ता त्याच्या राजुरा मुक्कामी असलेल्या प्लॉटवर दिनांक १८/०५/२०२१ रोजी काम चालू केले. वरील बांधकाम साहित्यासाठी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ ला रुपये १,००,०००/- दिले. त्यानंतर पुनहा तक्रारकर्त्याला बांधकामासाठी साहित्याची गरज असल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या दुकानात गेले असता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सांगितले की, लोखंड, सिमेंट महाग होणार असल्यामुळे अॅडव्हांस बुकींग करुन घ्या व त्यासाठी विरुध्द पक्ष क्रमांक १ हे सदर सामानाचा रेट जुन्या रेटने लावणार होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सांगितले की सदर सामानाच्या रकमेचा चेक त्यांनी विरुध्द पक्ष क्रमांक२ च्या नावाने द्या कारण विरुध्द पक्ष क्रमांक २ चे खाते जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत असल्यामुळे रक्कम काढण्यास सोपे जाईल. विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ ला विरुध्द पक्ष क्रमांक २ च्या नावाने चेक क्रमांक ५२३९९६ हा रुपये १,५०,०००/- चा दिनांक १७/७/२०२१ रोजी दिलाव त्यानुसार तक्रारकर्ता यांनी दिलेला चेकची रक्कम विरुध्द पक्ष क्रमांक २ च्या खात्यात जमा झाली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारकर्ता हे बांधकाम साहित्य घेण्यासाठी गेले असता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी सामान पाठवितो असे म्हटले परंतु पाठविले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याबद्दल विचारणा केल्यास विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी साहित्य देण्यास नकार देऊन कारण सांगितले की, तक्रारकर्ता यांचेकडे काम करणारा ठेकेदार श्री पापाराव यांचेकडे विरुध्द पक्ष क्रमांक १ यांची उधारी होती. त्या उधारीत तक्रारकर्ता यांनी दिलेल्या रुपये १,५०,०००/- कपात करण्यात आली असल्यामुळे तुम्ही त्या ठेकेदाराला पैसे देऊ नका परंतु तक्रारकर्ता यांचेकडे काम करणारा ठेकेदार तक्रारकर्त्याचे घराचे काम फक्त जोत्यापर्यंतच बांधकाम केले व त्यानंतर तो काम सोडून निघून गेला. तक्रारकर्ता व श्री पापाराव यांचे कोणतेही पेमेंट बाकी राहिले नव्हते. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्या नावाने बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी दिला परंतु त्याप्रमाणे साहित्य विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याला दिले नाही व न देण्याचे वरीलप्रकारे खोटे कारण त्यांनी तक्रारकर्त्याला दिले. तक्रारकर्त्याच्या अर्धवट घराच्या बांधकामासाठी विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ जबाबदार असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक २३/०९/२०२१ रोजी त्याचे वकीलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस दिनांक २४/०९/२०२१ रोजी प्राप्त झाली.माञ सदर नोटीसची कोणतीही पूर्तता विरुध्द पक्ष यांनी केली नाही. तक्रारकर्त्याचे सदर कृत्य अनुचित व्यापार सेवेतील ञुटी असल्यामुळे सदर तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द तक्रारकर्त्याने दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत मागणी केली आहे की, दिनांक १७/०७/२०२१ रोजी बांधकाम साहित्यासाठी घेतलेले पैसे व बांधकाम साहित्य दिले नसल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ चे कृत्य सेवेतील ञुटी आहे असा आदेश पारित करावा तसेच विरुध्द पक्ष क्रमांक यांनी तक्रारकर्त्याला रुपये १,५०,०००/- देण्याचा आदेश पारित करुन त्यावर १८ टक्के व्याज द्यावे तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये १,००,०००/- नुकसान भरपाई देण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना आयोगामार्फत नोटीस पाठविण्यात आली.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी प्रकरणात उपस्थित राहून तक्रारकर्ता यांनी केलेले म्हणणे खोडून काढीत पुढे नमूद केले की, तक्रारकर्ता यांचा अर्ज खोटा व बनावटी असून त्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ चा विरुध्द पक्ष क्रमांक २ शी कोणताही व्यावसायिक संबंध नाही. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या दुकानातून बांधकामासाठी आवश्यक असलेले बांधकाम सामान दिले नाही. त्यामुळे बील किंवा डिलीव्हरी मेमोवर सह्या केल्या नाही. यावरुन स्पष्ट होत आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या दुकानातून तथाकथीत बांधकामासाठी साहित्य नेले नव्हते. विरुध्द पक्ष क्रमांक १ ने कधीही त्याच्या वैयक्तिक खात्यात किंवा दुकानाच्या व्यवहारातील कोणत्याही खात्यात तक्रारकर्त्याकडून चेक हा घेतला नव्हता तसेच तक्रारकर्त्याने ही विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या खात्यात कोणतीही रक्कम जमा केली नाही. विरुध्द पक्ष क्रमांक १ चा विरुध्द पक्ष क्रमांक २ शी कोणताही संबंध नाही. तक्रारकर्त्याने अशी खोटी व बनावटी केस दाखल केलेली असल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना मानसिक ञास झालेला आहे. विरुध्द पक्ष क्रमांक २ हे विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या दुकानात कधीही दिवानजी किंवा नौकर नव्हता त्यामुळे आयोगाने तक्रारकर्त्यावर नुकसान भरपाई म्हणून रुपये २५,०००/- दंड रक्कम आकारुन सदर तक्रार विरुध्द पक्ष क्रमांक १ विरुध्द खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी सदर तक्रारीत त्याचे उत्तर दाखल करुन तक्रारकर्ता यांचे म्हणणे खोडून काढीत विशेष कथनात नमूद केले की, सदर तक्रार तक्रारकर्त्याने खोट्या वस्तुस्थितीवर दाखल केली असून विरुध्द पक्ष क्रमांक २ चा विरुध्द पक्ष क्रमांक १ शी कोणताही संबंध नाही. विरुध्द पक्ष क्रमांक २ हे विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे बांधकाम साहित्य खरेदीसाठी आला नव्हता. विरुध्द पक्ष क्रमांक २ चे तक्रारदारासोबत मिञत्वाचे संबंध होते. सन २०२१ मध्ये तक्रारकर्त्याला त्याचा आर्थिक अडचणीमुळे मदतीची आवश्यकता होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रमांक २ कडे त्याच्या राहत्या घरी येऊन पैशाची अडचण सांगितल्यामुळे मिञत्वाचे संबंध असल्यामुळे रुपये १,५०,०००/- ची मागणी केली. त्यावर विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्याला रुपये १,५०,०००/- दिनांक २०/२/२०२१ मध्ये दिले. रक्कम देतेवेळी श्री फैज अहमद कुरेशी हे हजर होते. या व्यवहाराच्या वेळेस विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी कोणतेही दस्त बनविले नाही. सदर रक्कम तक्रारकर्ता तीन चार महिण्यांत परत करेल अशी हमी त्यांनी दिली. त्यानंतर ३ ते ४ महिण्यानंतर विरुध्द पक्षक्रमांक २ ची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी पैशाची मागणी तक्रारकर्ता यांचेकडे केली असता, तक्रारकर्त्याने दिनांक १७/०७/२०२१ रोजी त्याच्या खात्यातून चेक क्रमांक ५२३९९६, चेक रक्कम १,५०,०००/- चा चेक दिला होता.असे असतांनाही तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक २ हे विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या दुकानात नौकर होते असे खोटे कथन करुन सदर तक्रार विरुध्द पक्ष क्रमांक २ विरुध्द दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी नाहक ञास देण्याच्या उद्देशाने सदर तक्रार आयोगासमोर दाखल केलेली असल्यामुळे तक्रारकर्त्यावर रुपये २०,०००/- तक्रारीचा खर्च लादून सदर तक्रार अर्ज विरुध्द पक्ष क्रमांक २ विरुध्द खारीज करण्यात यावा.
- तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपञ, लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्रमांक १ चे लेखी उत्तर व शपथपञ, विरुध्द पक्षक्रमांक २ चे लेखी उत्तर व शपथपञाबाबत पुरसीस तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रारीच्या निकालीकामी खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्षे आणि कारणमीमांसा खालीलप्रमाणे आहे.
कारणमीमांंसा - तक्रारीत दाखल तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे कथनाचे अवलोकन केले असता ही बाब निदर्शनास येत आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक १ कडून पहिल्यांदा रुपये १,००,०००/-, मौजा राजुरा येथील त्याच्या घराचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम साहित्य विकत घेतले असे कथन केले आहे परंतु त्याबाबतचे साहित्याचे बील किंवा डिलीव्हरी मेमो प्रकरणात दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रमांक १ ह्यांच्यामध्ये व्यवहार झाला ही बाब सिध्द होत नाही तसेच दुस-यांदाही बांधकाम साहित्य कमी पडल्यामुळे रुपये १,५०,०००/- चे सामान विरुध्द पक्ष क्रमांक १ कडून घेतल्याचेही बील किंवा डिलीव्हरी मेमो तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केले नाही, तसेच तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांना रुपये १,५०,०००/- चा चेक दिला हे जरी कागदोपञी दिसून येत असली तरी सदर रक्कम कोणत्या कारणासाठी दिली ही बाब तक्रारकर्ता पुराव्याअभावी सिध्द करु शकला नाही. आयोगाच्या मते तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ ह्यांच्यामध्ये ग्राहक व सेवादाता हा व्यवहार झाला ही बाब तक्रारकर्ता पुराव्या अभावी सिध्द करु शकला नसल्यामुळे तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी कोणतीही अनुचित व्यापार पध्दती तक्रारकर्त्याप्रती दिलेली नाही, हे सिध्द झाल्यामुळे सदर तक्रार विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्द खारीज करण्यात येऊन खालील आदेश आयोग पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्रमांक सी.सी. २११/२०२१ खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
| |