Maharashtra

Kolhapur

CC/12/108

Aparna Balaso Pawar-Medhe - Complainant(s)

Versus

Shri.Sonya Maruti Nagri Sahakari Patsanstha Ltd Kolhapur. - Opp.Party(s)

P.B.Jadhav

15 Jul 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/12/108
 
1. Aparna Balaso Pawar-Medhe
1842 C ward,Somwar Peth,Kolhapur.
2. Dhairshil Balaso Pawar-Medhe
1842 C ward,Somwar Peth,Kolhapur.
3. Yuvraj Ramrao Pimple
1842 C ward,Somwar Peth,Kolhapur.
4. Dhanashri Ramrao Pimple
1842 C ward,Somwar Peth,Kolhapur.
5. Shrutika Shrirang Pawar-Medhe
1842 C ward,Somwar Peth,Kolhapur.
...........Complainant(s)
Versus
1. Shri.Sonya Maruti Nagri Sahakari Patsanstha Ltd Kolhapur.
2949 C ward,Shaniwar Peth,Kolhapur.
2. Sunil Aanandrao Patil,Chairman
2559 C ward Sonya Maruti chowk,Kolhapur.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

व्‍दाराः- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष  
 
निकालपत्र
 
तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्‍थेत ठेव पावती स्‍वरुपात गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
 
2         तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी रक्‍कमा हयां सामनेवाले क्र.1- श्री. सोन्‍या मारुती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. कोल्‍हापूर (यापुढे संक्षिप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल). तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍या पुर्वाश्रीच्‍या  कै.नारायणराव पवार-मेढे सहकारी पतसंस्‍था मध्‍ये शै‍क्षणिक कल्‍याणाकरिता ठेवल्‍या होत्‍या. कै.नारायणराव पवार-मेढे पतसंस्‍थेचे सामनेवाले क्र.1 संस्‍थेमध्‍ये विलिनीकरण झालेले असुन सामनेवाले क्र.1 संस्‍थेने कै.नारायणराव पवार-मेढे संस्‍थेच्‍या ठेवीदारांच्‍या जबाबदारीसह संस्‍थेची स्‍थावर मिळकतही सामनेवाले क्र.1 आपले नांवे करुन घेतली आहे. तक्रारदारांनी या पतसंस्‍थेत विविध ठेवपावती स्‍वरुपात रक्‍कमा गुंतविल्‍या होत्‍या त्‍याचा तपशील खालीलप्रमाणेः-
1)   अर्पणा बाळासो पवार-मेढे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
दामदुप्‍पट ठेव
11000
1590
18
44000
2
दामदुप्‍पट ठेव
15000
1653
18
60000
3
दामदुप्‍पट ठेव
1501
1745
18
6000
4
मुदतबंद ठेव  
20000
1850
10
55000
5
आकर्षक ठेव
22100
771
 
100000
6
आकर्षक ठेव
16575
772
 
75000
7
आकर्षक ठेव
11000
317
 
100000
8
आकर्षक ठेव
22100
1119
 
100000
9
आकर्षक ठेव
22718
40
 
32259

 
2)   धैर्यशील बाळासो पवार-मेढे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
दामदुप्‍पट ठेव
11000
1499
18
44000
2
दामदुप्‍पट ठेव
15000
1654
18
60000
3
मुदतबंद ठेव
20000
1849
10
55000
4
आकर्षक ठेव
22100
665
 
100000
5
आकर्षक ठेव
22718
41
 
32259
6
आकर्षक ठेव
11000
1085
 
100000
7
दामदुप्‍पट ठेव
10000
1757
 
20000

 
3)   युवराज रामराव पिंपळे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
आकर्षक ठेव
20971
46   
 
29778

 
4)   धनश्री रामराव पिंपळे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
आकर्षक ठेव
20971
47   
 
29778

 
5)   श्रृतिका श्रीरंग पवार-मेढे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
आकर्षक ठेव
15043
99   
 
29778

 

 एकूण अक्षरी रक्‍कम अकरा लाख अठरा हजार आठशे बावन्‍न फक्‍त
1118852

 
3           तक्रारदार यांनी उर्वरित ठेवपावती स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमेसाठी सामनेवाले क्र.1-पतसंस्‍थेकडे मुदतपुर्ती नंतर रक्‍कमेची मागणी व्‍याजासह केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम दिली नाही तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणुक केली. तक्रारदारांनी वृध्‍दापकाळात उपयोगी पडण्‍याकरिता सामनेवाले संस्‍थेत ठेवल्‍या होत्‍या. तक्रारदार यांना औषधोपचार तसेच उपजिविकेकरिता सदर रक्‍कमांची मागणी केली असता त्‍यांनी देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांना उच्‍च शिक्षणाकरिता पैशाची निकडीची गरज असलेने ठेव रक्‍कमेची नितांत गरज असतानाही सामनेवाले यांनी ठेव रक्‍कम देणेस टाळाटाळ केलेमुळे तक्रारदारांना अतिशय मानसिक व शारिरीक त्रास सामनेवाले यांचेकडून झालेला आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास एकूण ठेव पावत्‍यांची रक्‍कम रु.11,18,852/- त्‍यावरील व्‍याजास‍ह तक्रारदारांना येणे असेलली रक्‍कम व तक्रारदारांना हेलपाटे मारावे लागलेमुळे तक्रारदारांना झालेला प्रवास खर्च रु.3,000/-, सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाचे भरपाईची रक्‍कम रु.2,50,000/-  तसेच प्रस्‍तुत तक्रारीचा टायपिंग, झेरॉक्‍स, पोस्‍टेज व फि स्‍टँम्‍प, वकील फीसह खर्चाची रक्‍कम रु.12,500/-  अशी एकूण रक्‍कम रु.13,84,352/- वर द.सा.द.शे.15% प्रमाणे पुढील व्‍याज सामनेवाले यांचेकडून मिळावेत अशी तक्रारदारांची विनंती आहे.  
 
4           सामनेवाले क्र.1 ते 2 यांचेवर नोटीसची बजावणी झालेवर, सामनेवाले क्र.1 व 2 यांनी त्‍यांना अंतिम संधी देऊन आजअखेर म्‍हणणे दाखल केलेले नाही, त्‍यामुळे सामनेवाले क्र.1 व 2 यांचेविरुध्‍द मंचाने दि.10.06.2013 रोजी नो से (No Say) आदेश पारीत केला. सामनेवाले यांनी दि.16.03.2013 रोजी अर्ज देऊन विनंती केली की, तक्रारदार यांची तक्रार या पूर्वी ग्राहक केस क्र.58/2009 प्रमाणे निकाली झालेली असल्‍याने सदरचे काम काढून टाकणेचे आदेश व्‍हावेत. सदरच्‍या अर्जास तक्रारदारांनी म्‍हणणे दिले आहे की, तक्रारदार हे पूर्वीच्‍या तक्रारीमध्‍ये अज्ञान असल्‍यामुळे तक्रारदारांची मागणी विचारात घेतली नव्‍हती. पण मागणी गुणदोषावर फेटाळण्‍यात आलेली नाही. सदरचा अर्ज नामंजूर व्‍हावा. या अर्जावर सदरचा मुद्दा अंतिम चौकशीच्‍या वेळी विचारात घेण्‍यात येतो असा आदेश पारीत करण्‍यात आला.
 
5           तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांच्या कैफियती/म्‍हणणे, तसेच अनुषांगिक कागदपत्रे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद यांचा विचार होता, तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
 

अ.क्र.
मुद्दे
    उत्‍तर
1
तक्रारदार हे ग्राहक आहे‍त काय ?
होय
2
प्रस्‍तुतची तक्रार या मे.मंचात चालणेस पात्र आहे का ?
होय
3
सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?
होय
4
तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्‍यास पात्र आहेत काय ?
अंतिम आदेशाप्रमाणे
5
आदेश काय ?
तक्रार अंशतः मंजूर

 
कारणमिमांसाः-
6           मुद्दा क्र.1 -   तक्रारदार यांनी उर्वरित ठेव पावती स्‍वरुपातगुंतविलेल्‍या रक्‍कमांच्‍या पावत्‍यांच्‍या छायांकित प्रतीं सादर केलेल्‍या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या ठेवपावती स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमा सामनेवाले यांनी नाकारलेल्‍या नाहीत. तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रक्‍कमांचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्‍हणुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.
7           मुद्दा क्र.2 - सदर कामी सामनेवाले क्र.2 यांनी दि.16.03.2013 रोजी अर्ज दाखल करुन सदरची तक्रार या पूर्वीच ग्राहक केस क्र.58/2009 प्रमाणे निकाली झाली असल्‍याने प्रस्‍तुतची तक्रार पुन्‍हा चालणेस पात्र नाही. सबब, तक्रारदारांचा प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज काढून टाकणेत यावा अशी मागणी केली आहे. त्‍या अनुषंगाने मे.मंचाने ग्राहक तक्रार क्र.58/2009 चे निकालपत्र बाराईने वाचन केले असता, सदर निकालपत्रांमधील मुद्दा क्र.3 मधील तक्रारदार क्र.2 ते 6 हे अज्ञान असलेबाबत वयाचा पुरावा तक्रारदारांनी समोर आणलेला नाही. तसेच सामनेवाले यांनी लेखी म्‍हणणेमध्‍ये नमुद तक्रारदार सज्ञान असल्‍याचा तक्रारदारानपे रिजॉंईडर दाखल करुन खोडून काढलेले नाही. यांचा विचार करता, सदर तक्रारदार हे सज्ञान असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे, असे विवेचन नमुद केले आहे.  त्‍यामध्‍ये तक्रारदार क्र.2 ते 6 यांची तक्रार विचारात घेतली नाही. तथापि, प्रस्‍तुतची तक्रार ही तक्रारदार यांनी यांच्‍या ठेवपावत्‍या सामनेवाले –संस्‍थेत ठेवल्‍या होत्‍या व सदर ठेवपावत्‍यांच्‍या रक्‍कमा आजअखेर मिळाली नाही, म्‍हणून दाखल केलेली आहे व सदरची रक्‍कम सामनेवाले संस्‍थेकडून परत घेण्‍याचा, सदर तक्रारदारांना हक्‍क आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहे.
 
8          मुद्दा क्र.3 -  प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, त्‍यांनी ठेव पावती स्‍वरुपात रक्‍कमा गुंतविलेल्‍या होत्‍या ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे ठेव पावती स्‍वरुपात रक्‍कमा गुंतविलेल्‍या परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे, म्‍हणुन मुद्दा क्र.3 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.
 
9           मुद्दा क्र.4 – तक्रारदार यांनी दाखल केलेली ठेव पावती स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमांवर व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले क्र.1 ते सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे.  या संदर्भात मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढीलप्रमाणे मत व्‍यस्‍त केले आहे.
“As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies”.
 
वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सामनेवाले क्र.1 ते 2 यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1- श्री. सोन्‍या मारुती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. कोल्‍हापूर यांच्‍याकडून वर नमुद ठेवपावत्‍यां स्‍वरुपात रक्‍कमा गुंतविलेल्‍या मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच रक्‍कम परत देण्‍यास सामनेवाले क्र.1- श्री. सोन्‍या मारुती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. कोल्‍हापूरहे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे,  म्‍हणुन मुद्दा क्र.4 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.
 
 
10          तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी ठेव पावत्‍यांची रक्‍कम न दिल्‍याने सेवेत त्रुटी केली आहे, त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्‍यामुळे सामनेवाले क्र.1- श्री. सोन्‍या मारुती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. कोल्‍हापूर यांच्‍याकडून मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
 
11          मुद्दा क्र.5 -   सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
 
1        तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येते आहे.
 
2        सामनेवाले क्र.1- श्री. सोन्‍या मारुती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. कोल्‍हापूर यांनी  तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्‍या ठेव पावत्‍यांमधील मुदत अंती देय रक्‍कम ठरलेल्‍या व्‍याज दरानुसार व त्‍यावर देय तारखेपासुन संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.6% प्रमाणे व्‍याज या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आत अदा करावेत.   ठेवपावती स्‍वरुपात गुंतविलेल्‍या अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती त्‍याचा तपशील खालीलप्रमाणेः-
 
 
1)   अर्पणा बाळासो पवार-मेढे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
दामदुप्‍पट ठेव
11000
1590
18
44000
2
दामदुप्‍पट ठेव
15000
1653
18
60000
3
दामदुप्‍पट ठेव
1501
1745
18
6000
4
मुदतबंद ठेव  
20000
1850
10
55000
5
आकर्षक ठेव
22100
771
 
100000
6
आकर्षक ठेव
16575
772
 
75000
7
आकर्षक ठेव
11000
317
 
100000
8
आकर्षक ठेव
22100
1119
 
100000
9
आकर्षक ठेव
22718
40
 
32259

 
2)   धैर्यशील बाळासो पवार-मेढे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
दामदुप्‍पट ठेव
11000
1499
18
44000
2
दामदुप्‍पट ठेव
15000
1654
18
60000
3
मुदतबंद ठेव
20000
1849
10
55000
4
आकर्षक ठेव
22100
665
 
100000
5
आकर्षक ठेव
22718
41
 
32259
6
आकर्षक ठेव
11000
1085
 
100000
7
दामदुप्‍पट ठेव
10000
1757
 
20000

 
3)   युवराज रामराव पिंपळे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
आकर्षक ठेव
20971
46   
 
29778

 
4)   धनश्री रामराव पिंपळे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
आकर्षक ठेव
20971
47   
 
29778

 
5)   श्रृतिका श्रीरंग पवार-मेढे यांचे नांवे गुतविलेल्‍या रक्‍कमांचा तपशील पुढीलप्रमाणेः-

अ.क्र.
ठेव प्रकार
रक्‍कम
खाते क्रमांक
व्‍याज दर
आज अखेर येणे रक्‍कम
1
आकर्षक ठेव
15043
99   
 
29778

 

 एकूण अक्षरी रक्‍कम अकरा लाख अठरा हजार आठशे बावन्‍न फक्‍त
1118852

 
3     सामनेवाले क्र.1- श्री. सोन्‍या मारुती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. कोल्‍हापूर यांनी   
 तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/- तसेच या अर्जाचा खर्च रक्‍कम रु.1,000/-    
 या आदेशाची प्रत मिळालेपासुन 30 दिवसांचे आत अदा करावेत.
 
4      वर नमुद आदेश क्र.2 मधील रक्‍कमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास अगर  
त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.
 
5     आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.