::: नि का ल प ञ:::
:(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 13/01/2020)
अर्जदार ह्यांनी ग्राहक संरक्षणकायद्याच्या कलम 12 अन्वय तक्रार दाखल केली आहे.
1. अर्जदार तक्रारीत नमूद करतो की गैरअर्जदार संस्था महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या अंतर्गत पंजीबद्ध झालेली संस्था आहे व अर्जदार हा गैरअर्जदार संस्थेचा सभासद आहेत अर्जदाराने त्याचे अज्ञान मुलगी कु. रिद्धी मनोज मोंढे,वय दहा वर्ष हिचे नावाने गैरअर्जदार संस्थेमध्ये आवर्त ठेव खाते क्रमांक 281 दिनांक 23. 9. 2008 रोजी उघडले होते त्यामध्ये अर्जदार दरमहा 1000/- रुपये याप्रमाणे केले सदर आवर्ती ठेव खात्याची मुदत 23. 7. 2018 रोजी संपलेली आहे अर्जदाराने दिनांक 23 .7. 2018 पर्यंत दरमहा 1000/- याप्रमाणे एकूण रुपये 1,08,000 या संस्थेत जमा केलेले आहे त्यामुळे या संस्थेचा ग्राहक आहे त्याप्रमाणे अर्जदाराने त्यांचा अज्ञान मुलगा चरित्र मनोज मोंढे यांच्या नावाने गैरअर्जदार संस्थेत आवर्ती ठेव खाते क्रमांक 782 दिनांक 12.1.2013 पासून उघडले होते त्यात सुद्धा अर्जदाराने दरमहा 1000/- रुपये भरले सदर आवर्ती ठेव खात्याची मुदत 10 वर्षे होती त्या खात्यामध्ये अर्जदाराने एकूण 56,000/- रुपये दिनांक 29. 8. 2017 पर्यंत जमा केलेले आहे अर्जदाराने शेवटचा हप्ता खाते क्रमांक 281 मध्ये सुद्धा रुपये 1000/- दिनाक 29. 8. 2017 पर्यंत संबंधित व्यक्तीने त्याची नोंद सदर खात्यामध्ये घेतली नाही त्यामुळे अर्जदारास संस्थेकडून खालील प्रमाणे नमूद रक्कम घेणे आहे खाते क्रमांक 281 मधील 1,09,000/- व खाते क्रमांक 782 मधील 56,000/-अशी आहे. अर्जदाराने तसा अर्ज गैरअर्जदार संस्थेकडे 30. 10. 2018 रोजी अर्ज करून आवर्ती ठेव खात्याची मुदत दिनांक 27. 9 ।2018 रोजी पूर्ण झाल्यामुळे रक्कम 1,08,000/- परत द्यावी असा अर्ज केला परंतु गैरअर्जदार संस्थेने त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही व रक्कम सुद्धा परत केली नाही त्यामुळे अर्जदाराने दिनांक 11.05.19 रोजी आपले वकिलामार्फत नोटीस देऊन गैरअर्जदार संस्थेचे सदर आवर्त ठेव खात्याची रक्कम नोटीस मिळताच सात दिवसात अर्जदारास द्यावी अशी मागणी केली त्यावर गैर अर्जदाराने दिनांक 12. 6. 2019 रोजी त्यांचे वकिलामार्फत खोटे उत्तर देऊन गैरअर्जदार संस्थेचा सदर दोन्ही आवडता खाते विषयी काही संबंध नसल्याचे नमूद केले अर्जदाराने संस्थेने अर्जदाराचे आवर्त ठेव खाते 281 मधील रक्कम रुपये 1,09,000/-अर्जदारास मुदत पूर्ण होईल होऊन सुद्धा परत दिली नाही तसेच खाते क्रमांक 780 मधील 56,000/- परत केली नाही त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराला न्युनता पुर्ण सेवा दिलेली असुन अनुचित व्यापारपध्दती अवलंबलेली आहे. सदर तक्रार अर्जदाराने गैरअर्जदाराविरुद्ध दाखल केलेली आहे.
२. अर्जदारांची मागणी अशी आहे की गैरअर्जदाराच्या संस्थेमध्ये आवर्त ठेव खाते क्रमांक 281 मध्ये जमा असलेली रक्कम रुपये 1,09,000/- व आवर्त ठेव खाते क्रमांक 782 मध्ये जमा असलेली रक्कम रुपये 56000, द.शा.स.से 9.5 टक्के व्याजासह जमा केलेल्या तारखेपासून रक्कम देण्याचा आदेश गैरअर्जदार यांना देण्यात यावा तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी 20,000/- व तक्रारखर्च रुपये 10,000/-रक्कम देण्याचा आदेश देण्यात यावा.
3. सदर तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले परंतु यांना दिनांक 16/ 9/ 2019 रोजी नोटीस प्राप्त होऊन सुद्धा तक्रारीत उपस्थित न झाल्यामुळे दिनांक 7/11/2019 रोजी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सदर तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश करण्यात आला.
4. अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, तोंडी युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
- अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
- अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? होय
4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने दि. 23/9/2008 पासून दि. 23/7/18 पर्यंत गैरअर्जदार यांच्या संस्थेत आवर्ती खाते क्रं. 281 मध्ये एकूण रक्कम 1,09,000/- व तसेच आवर्ती खाते क्रमाक 782 मध्ये दि.12/1/2013 पासून दि.29/8/17 पर्यंत.एकूण रक्कम 56,000/ गैरअर्जदाराच्या पतसंस्थेत जमा केली आहे सदर रक्कम आवर्ती खाते क्रमाक 281 मधील 23/7/2018 नंतर देय होती तर आवर्ती खाते क्रमाक 782 मधील रक्कम 29/8/2017 पर्यंत देय होती. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि. क्रं. 4 वर दस्त क्रं. अ-1व 2 वरील पासबुक वरुन सिध्द होत आहे, सबब अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब सिध्द होत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वरील नेमलेली अवधी करीता त्याच्या दोन्ही खात्यात अज्ञान मुलांच्या नावाने खात्यात रक्कम जमा केली होती व त्यानंतर अर्जदाराने ती रक्कम गैरअर्जदाराला मुदतीनंतर परत करण्याची मागणी केली. अर्जदाराची रक्कम गैरअर्जदाराच्या संस्थेत जमा आहे याबाबत अर्जदाराने तक्रारीत नि. क्रं. 4 दस्त क्रं.1 व 2 वर संबंधित पासबुक दाखल केलेले आहेत. मंचातर्फे गैरअर्जदाराला नोटीस मिळून सुध्दा ते मंचासमक्ष हजर न राहून त्यांनी अर्जदारचे तक्रारीतील म्हणणे खोडून काढले नाही,सबब गैरअर्जदाराविरुध्द प्रकरणात एकतर्फा आदेश दिनांक 7/11/2019 रोजी करण्यात आला. याउलट अर्जदाराने त्याची तक्रार सिद्ध करण्यासाठी शपथपत्रावार त्यांचे म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारीतील निशाणी क्रमाक 4 वर दस्त क्रमक 1 व 2 वर दोन्ही मुलाच्या खात्यातील पासबूक चे अवलोकन करून मंच या निष्कर्षास येत आहे की गैर अर्जदाराने अर्जदारच्या अज्ञान मुलाच्या आवर्ती खात्यातील रक्कम अनुक्रमे खाते क्रं.281 मध्ये जमा असलेली रक्कम रु. 1,09,000/- व खाते क्रमाक 782 मधील रक्कम रु.56,000/- मुदत पूर्ण होऊन सुद्धा नियमांनुसार परत न करून अर्जदारला सेवेत न्यूनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. गैरअर्जदारानी अर्जदाराप्रति सेवेत न्युनता करुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे.ही बाब वरील मुदयावरुन सिध्द झाल्यामुळे अर्जदाराने हा तक्रारीत केलेल्या मागणी प्रमाणे पाञ आहे. म्हणून मुद्दा क्रं. 3 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
//अंतीम आदेश//
- अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- अर्जदार याचे अनुक्रमे खाते क्रं.281 मध्ये जमा असलेली रक्कम रु. 1,09,000/- व खाते क्रमाक 782 मधील रक्कम रु.56,000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला दयावी.
- अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रक्कम रु 5,000/- व तक्रारीचा खर्च 5,०००/- रु. गैरअर्जदाराने अर्जदाराला दयावे .
4. आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी..
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती.किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.