| Complaint Case No. CC/349/2017 | | ( Date of Filing : 14 Aug 2017 ) |
| | | | 1. DEVENDRA BHIMRAO BELSARE | | R/O. FLAT NO. 104, JAISHANKAR SAHNIWAS, CHITNAVISPURA, ZENDA CHOWK, MAHAL, NAGPUR. | | Nagpur | | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. SHRI. SAURABH SINGH DIRECTOR, PLANET OF THUMB, THE TRIP INVESTIGATOR | | PLOT NO.5 BLOCK NO. 3, AMIKET COMPLEX, VAKILPETH, KRIDA SQUARE, NAGPUR-440009 | | Nagpur | | Maharashtra | | 2. SHRI. DEVASHISH DHAR, SALES/ BUSINESS MANAGEER, PLANET ON THUMB, THE TRIP INVESTIGATOR | | PLOT NO.5 BLOCK NO. 3, AMIKET COMPLEX, VAKILPETH, KRIDA SQUARE, NAGPUR-440009 | | Nagpur | | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजणे यांच्या आदेशान्वये - तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष Planet on Thumb या नावाने टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतो. तक्रारकर्ता व त्याचे मित्र मंडळी यांनी फेब्रुवारी-2017 ते एप्रिल-2017 या कालावधीत दार्जलिंग, गंगटोक आणि कलकत्ता येथे पर्यटनाकरिता जायचे ठरविले. त्याकरिता तक्रारकर्त्याने प्रत्येक वयस्कर व्यक्तीकरिता रुपये 10,000/- याप्रमाणे 3 कुटुंबाकरिता रुपये 80,000/- (यामध्ये रेल्वे तिकिटचा समावेश नाही) विरुध्द पक्षाकडे जमा केले. यामध्ये 2 night stay at Darjeeling, 2 night stay at Gangtok and 1 night stay at Kolkata inclusive of break-fast, dinner or lunch and taxi arrangement/ complimentary car transfer इत्यादीचा समावेश होता. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नांवे दार्जलिंग येथील हॉटेल जगजीत व गंगटोक येथील हॉटेल तारीका आणि कलकत्ता येथील हॉटेल गीताजंली येथे डिलक्स रुम नोंदविले व त्याबाबतचे कन्फर्मेशन व्हाऊचर तक्रारकर्त्याला दिले व त्यावर तक्रारकर्त्याने हॉटेल कन्फर्मेशन करिता पुन्हा हॉटेलशी संपर्क साधण्याची गरज नाही असे नमूद होते. वरील नमूद हॉटेल दि. 19.05.2017 ते 22.05.2017 या कालावधीकरिता रुपये 9,300/- प्रत्येकी प्रमाणे हॉटेल मधील 3 रुम आरक्षित करण्यात आले होते. सदर कन्फर्मेशन व्हाऊचरवर मेक माय ट्रीप बुकिंग आय डी. नबंर NH2003950210569, Booking Date 07 May 2017 at 9.55.am असे नमूद आहे.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, तो व त्याचे मित्र यांनी दि. 15.05.2017 ते 16.05.2017 च्या मध्यरात्री पुणे एसआरसी स्पेशल ट्रेनने प्रस्तावित प्रवासाला सुरुवात केली. पुणे एस.आर.सी. स्पेशल ट्रेन मध्यरात्री 1.20 a.m वा. नागपूर स्टेशनला पोहचणार होती. त्यामुळे तक्रारकर्ता व त्याचे मित्रमंडळी नागपूर रेल्वे स्टेशनला रात्री 11.30 p.m. वाजता पोहचले. परंतु रेल्वे स्टेशनला पोहचल्यावर तक्रारकर्त्याच्या लक्षात आले की, ट्रेन सुरुवातीपासून 2 तास उशिरा धावत आहे. शेवटी ट्रेन नागपूर स्टेशनला सकाळी 5.30 a.m. वाजता पोहचली. नागपूर हावडा एन.सी.बी. स्पेशल ट्रेन 5 तास उशिराने धावत असल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 ला दि. 16.05.2017 ते 17.05.2017 चे मध्यरात्रीचे रेल्वे आरक्षण रद्द करुन त्याएैवजी पर्यायी रेल्वे आरक्षणाची व्यवस्था करण्यास दूरध्वनीवरुन सांगितले. तक्रारकर्ता दि. 17.05.2017 ला मध्यरात्री 2.00 वाजता सांत्राकाझी रेल्वे स्थानकावर कुटुंबासह पोहचला. दि. 17.05.2017 ची दुपारी 12.00 वाजताची ट्रेन चुकल्यामुळे तक्रारकर्त्याला कुटुंबासमवेत रात्रभर स्टेशनवर थांबावे लागले ( 2 am ते 6 am ). त्यानंतर तक्रारकर्त्याला दि. 17.05.2017 ला सकाळी 6 वाजता स्थानिक लोकल ने पुढच्या स्टेशनला हावडा येथे जावे लागले. तसेच तक्रारकर्त्याला दि. 17.05.2017 ला हॉटेल सीलव्हर लाईन 50/2, लेनिंग सरानी, कलकत्ता येथे रुपये 6,744/- अदा करुन बुक करावे लागले. त्यानंतर तक्रारकर्त्याला संध्याकाळी रुपये 15,000/- चे तिकिट काढून श्यामोली ट्रॅव्हल्स व्हॉल्वो बुक करावी लागली. सदरची ट्रॅव्हल्स दि. 18.05.2017 ला सिलिगुरी येथे सकाळी 9.30 वाजता पोहचली. त्यानंतर तक्रारकर्ता व त्याच्या कुटुंबानी दार्जलिंगकरिता प्रवास सुरु केला.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, विरुध्द पक्षाने कबूल केल्याप्रमाणे दार्जलिंग येथे राहण्याची हॉटेल व्यवस्था न करता विरुध्द पक्षाने दार्जलिंगच्या 40 कि.मी. आधि हॉटेल Mirick येथे व्यवस्था केली. विरुध्द पक्षाने टूर प्रोग्रामप्रमाणे व्यवस्था न केल्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. दि. 19.05.2017 ला सकाळी तक्रारकर्ता व त्याचे कुटुंब दार्जलिंग येथे प्रवासाला निघाले व सायंकाळी 5.00 वाजता पर्यंत साईड सिनेरी बघितले. प्रोग्राम शेडयुल बिघडल्यामुळे तक्रारकर्ता दार्जलिंग येथे जास्त वेळ राहू शकले नाही. त्यानंतर तक्रारकर्ता ठिक संध्याकाळी 5.00 वाजता गंगटोक येथे जाण्यास निघाले व रात्री 11.00 वाजता गंगटोक येथे पोहचले. तक्रारकर्त्याला देण्यात आलेल्या कन्फरमेशन व्हाऊरचप्रमाणे तक्रारकर्ता हॉटले तारीका येथे पोहचला असता त्याच्या नावांची रुम बुक नसल्याचे तेथील मॅनेजरने सांगितल्यावर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला फोन करुन सदरची बाब निदर्शनास आणून दिली, परंतु त्यावर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीस प्रतिसाद दिला नाही.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, हॉटेल तारीका येथील मॅनेजरला रुम करिता विनंती केली, परंतु हॉटेल तारीका मध्ये रुम उपलब्ध नव्हते. शेवटी तक्रारकर्त्याने हॉटेल तारीकाच्या मॅनेजरला इतरत्र व्यवस्था करण्याची विनंती केली असता तेथील मॅनेजरने 10 कि.मी. दूर अंतरावरील हॉटेल कारलो देवराली येथील हॉटेल मध्ये व्यवस्था करुन दिली व त्याकरिता तक्रारकर्त्याला रुपये 3,600/- अदा करावे लागले. दि. 20.05.2017 ला तक्रारकर्त्याने हॉटेल तारीकाला भेट दिली व चौकशी केली त्यावेळी हॉटेल मॅनेजरने सांगितले की, त्यांना हॉटेल बुकिंग करिता संबंधित व्यक्तीकडून रक्कम प्राप्त झाली नाही. तक्रारकर्ता दि. 22.05.2017 ला गंगटोक वरुन जलपैगुरी येथे जाण्याकरिता दुपारी 2.00 वाजता निघाला असता रात्री 8.00 वाजता जलपैगुरी येथे पोहचला व जलपैगुरी वरुन रात्री 10.00 वाजता निघाला असता कलकत्ता येथे दि. 23.05.2017 ला सकाळी 9.30 वाजता पोहचला. तक्रारकर्त्याला दि.24.05.2017 पर्यंत कलकत्ता येथे थांबावयाचे होते कारण दि. 23.05.2017 ला कलकत्तावरुन त.क.ला टूर पॅकेजप्रमाणे आरक्षण देण्यात आले नव्हते. टूर पॅकेजप्रमाणे त.क.ला कलकत्ता रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल गीतांजली बुक केल्याचे सूचित केले होते परंतु त्याबाबत सविस्तर माहिती दिली नव्हती. परंतु टूर पॅकेजप्रमाणे विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याला रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल बुक करुन देण्यास अपयशी ठरला. तक्रारकर्ता व त्याच्या कुटुंबाची व्यवस्था रेल्वे स्टेशन पासून 20 कि.मी. दूर स्लम एरियात करण्यात आली. तक्रारकर्ता 2-3 तास हॉटेल मध्ये थांबल्यानंतर त्याने स्वतःची व्यवस्था रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल शिवम येथे केली व त्याकरिता त्याला रुपये 5750/- व जेवणाचा खर्च म्हणून 2400/- रुपये अदा करावे लागले. कारण हॉटेल गीतांजली येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था ठिक नव्हती.
- तक्रारकर्त्याने संपूर्ण टूर दरम्यान दूरध्वनीवरुन तेथील गैरव्यवस्थेबाबत माहिती दिली परंतु विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही. म्हणून दि. 12.06.2017 ला विरुध्द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली असता सदरच्या नोटीसला विरुध्द पक्षाने उत्तर पाठविले व ते तक्रारकर्त्याला दि.16.06.2017 ला प्राप्त झाले. तक्रारकर्त्याने मंचासमक्ष तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्याचे घोषित करावे. तसेच तक्रारकर्त्याला प्रवासा दरम्यान हॉटेल, जेवण, तिकिट इत्यादीकरिता अतिरिक्त करावा लागलेला खर्च रुपये 50,000/- द.सा.द.शे. 18 टक्के दराने परत देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा ही आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्यात नमूद केले की, त्याने तक्रारकर्त्याचा दार्जलिंग व गंगटोक येथे राहण्याचा कार्यक्रम निश्चित करुन दिला होता त्यामध्ये कलकत्ता येथे राहण्याचे समाविष्ट नव्हते. विरुध्द पक्षाने दिलेल्या कार्यक्रमानुसार दार्जलिंग व गंगटोक येथील हॉटेल जगजीत आणि हॉटेल तारीका येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याचे निश्चित होते. त्या दरम्यान सकाळची न्यायहरी व दुपारचे व रात्रीच्या जेवणाचा समावेश होता, या सर्व गोष्टी उभय पक्षात तोंडी स्वरुपात होत्या. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मेक माय ट्रीप नमूद असलेले दोन confirmation Voucher बुकिंग आय.डी.नं. NH2003950210569 Dated 07.05.2017, 9.55.am हॉटेल तारीका गंगटोक आणि बुकिंग आय.डी.नं. NH2003851039454 हॉटेल जगजीत दार्जलिंग दि. 07.05.2017, 9.30 am याप्रमाणे दिली. परंतु तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने हॉटेल जगजीत आणि हॉटेल तारीका मध्ये करुन दिलेले आरक्षण न आवडल्यामुळे तक्रारकर्त्याने स्वतः हून तेथील हॉटेल मधील आरक्षण रद्द करुन हॉटेल शिवम देवराली येथे राहण्याची व्यवस्था केली, याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार नाही. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत ट्रेन उशिरा आल्यामुळे त्याचा कार्यक्रम विस्कळीत झाला असे नमूद केले व याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार नाही. तक्रारकर्त्याच्या नांवे न्यू जलपैगुरी ते कलकत्ता दि. 22.05.2017 चे असलेले रेल्वे आरक्षण रद्द करण्यात आले व त्यापोटी मिळालेले रेल्वे शुल्क रुपये 1000/- तक्रारकर्त्याला परत करण्यात आले, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षावर लावलेले आरोप निरर्थक आहेत. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कलकत्ता येथे रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल आरक्षित करुन देण्याबाबत ईटनरी मध्ये नमूद नाही. परंतु तक्रारकर्त्याच्या क्षमतेनुसार हॉटेल गीताजंली मध्ये रुम आरक्षित करुन देण्यात आले होते. संपूर्ण प्रवासा दरम्यान तक्रारकर्ता विरुध्द पक्षाच्या फोनवर संपर्कात होता व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला संपूर्ण प्रवासा दरम्यान सेवा पुरविली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद व उभय पक्षांच्या वकिलाचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
1. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ होय 2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ होय 3. काय आदेश ॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमिमांसा - मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष Planet on Thumb या ट्रॅव्हल्स कपंनीला दार्जलिंग व गंगटोक येथे प्रवासाला जाण्याकरिता प्रति व्यक्ती मागे रुपये 10,000/- प्रमाणे 3 कुटुंबाकरिता रुपये 80,000/- (यामध्ये रेल्वे तिकिटचा समावेश नाही)अदा केले. ज्यामध्ये नाश्ता, जेवण व टॅक्सी सेवा इत्यादीचा समावेश होता, हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता व त्याच्या कु्टुंबाची गंगटोक येथील हॉटेल तारिका येथे मेक माय ट्रीप द्वारे 3 रुम एकूण रक्कम रुपये 27,000/- मध्ये दि. 19.05.2017 ते 22.05.2017 या कालावधीकरिता बुक केल्याचे नि.क्रं. 2 वर दाखल conformation voucher बुकिंग आय.डी.नं. NH2003950210569 Dated 07.05.2017,च्या दस्तावेजावरुन दिसून येते. परंतु तक्रारकर्ता रात्री 11.00. वाजता त्याच्या कुटुंबांसह हॉटेल तारीका मध्ये गेला असता त्यांच्या नांवे रुम आरक्षित नसल्याचे तेथील उपस्थिती व्यवस्थापकाने सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याला कुटुंबासह 10 कि.मी. दूर अंतरावर असलेल्या हॉटेल कारलो देवराली येथे स्वखर्चाने व्यवस्था करावी लागली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नांवे रुम आरक्षणाकरिता मेक माय ट्रीप द्वारे हॉटेल तारिका गंगटोक यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याबाबतचा कुठलाही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून गंगटोक येथील हॉटेल तारिकाचे रुम आरक्षणा पोटी रक्कम स्वीकारुन देखील त्याच्या नांवे हॉटेल मधील रुम आरक्षित करुन दिले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून हॉटेल बुकिंग पोटी जमा केलेली रक्कम रुपये 27000/- व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्याला संपूर्ण प्रवासात रेल्वे प्रशासनाचे गलथान कारभारामुळे त्रास झालेला आहे असे मंचाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला त्याच्याकडून हॉटेल बुकिंग पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 27,000/- व त्यावर दि. 24.04.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम द्यावी.
- विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |