निकालपत्र :- (दि.18.05.2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.7 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला क्र.7 उपस्थित. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 संस्था ही महाराष्ट्र सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी पतसंस्था आहे. सामनेवाला क्र.2 ते 12 हे सामनेवाला संस्थेचे संचालक आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 13201 | 40000/- | 01.12.2008 | 66133/- | 2. | 13202 | 21000/- | 11.12.2008 | 33862/- | 3. | 9300 | 40000/- | 01.12.2008 | 66133/- |
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि,सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. सबब, सदरच्या रक्कमा व्याजासह सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होवून मिळाव्यात तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.7 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. तथापि, दि.26.04.2011 रोजीच्या तक्रारदारांच्या विनंतीवरुन प्रस्तुत सामनेवाला यांना प्रस्तुत तक्रारीतून वगळणेबाबत स्वतंत्र आदेश पारीत करणेत आले व तदनुसार तक्रार दुरुस्ती करणेत आली. (6) या मंचाने तक्रारदारांची तक्रार व उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेमध्ये मुदतबंद ठेव ठेवली आहे व त्याची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्कमा व्याजासह दिलेल्या नाहीत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे मुदतबंद ठेव रक्कम ठेवली आहे व तक्रारदारांनी सदर रक्कमांची मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्कम सामनेवाला संस्थेने दिलेली नाही. त्यामुळे सदर ठेव रक्कमा व्याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्थेची येत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 12 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्कम देणेबाबत आहे असा युक्तिवाद तक्रारदारांच्या वकिलांनी केलेला आहे. परंतु, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्थेच्या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्तुत सामनेवाला यांची त्याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.2 ते 12 यांची ठेव रक्कम व्याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचा तक्रारदारांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्कमा व्याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्हणून मा.ना.उच्च न्यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्त्वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :- “The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.” (7) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 13201 | 40000/- | 2. | 13202 | 21000/- | 3. | 9300 | 40000/- |
(3) सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |