Maharashtra

Nagpur

CC/635/2022

SHRI. NISHANT KESHAVRAO JOGI - Complainant(s)

Versus

SHRI. ROSHAN DINESH TARALE, PROP. OF DEORAJ BUILDERS PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. MAHENDRA R. SHENDE

20 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/635/2022
( Date of Filing : 13 Sep 2022 )
 
1. SHRI. NISHANT KESHAVRAO JOGI
R/O. FLAT NO.104, ANIMESH APARTMENTS, NEAR NIT GARDEN, SARASWATI NAGAR, MANEWADA RING ROAD, NAGPUR 440034
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRI. ROSHAN DINESH TARALE, PROP. OF DEORAJ BUILDERS PVT. LTD.
R/O. OFF.AT, 33, VASANT NAGAR, OLD BABULKHEDA, NAGPUR-440027
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MAHENDRA R. SHENDE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 20 Apr 2023
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून चिकली (खुर्द) वार्ड, नं. 20, एन.आय.टी.गार्डन जवळ, सरस्‍वती नगर, मानेवाडा रिंग रोड, नागपूर येथील प्‍लॉट क्रं. 41 –आर-3, खसरा क्रं. 13/1, सिटी सर्व्‍हे नं. 41 येथील अनिमेष अपार्टमेंट मधील पहिल्‍या मजल्‍यावरील सदनिका क्रं. 104 ही एकूण रक्‍कम रुपये 20,44,000/- मध्‍ये खरेदी करुन दिनांक 04.07.2017 रोजी  सहा. निबंधक, वर्ग-2 यांच्‍याकडे दस्‍त  क्रं. 4141/2017 द्वारे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्‍यात आला होता. विरुध्‍द पक्षाने  सदरच्‍या सदनिकेचे मंजूर नकाशाप्रमाणे संपूर्ण बांधकाम करुन दिले नाही, तसेच  नागपूर महानगर पालिकाचे भोगवटा प्रमाणपत्र (occupation certificate) व इमारतीचे पूर्णत्‍व प्रमाणपत्र (completion certificate) सुध्‍दा दिले नाही. तसेच सदरच्‍या फ्लॅटचे भूमी अभिलेख कार्यालयीन अभिलेखावर तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे म्‍यूटेशन (नामातांरण) होण्‍यास अडचणी येत आहेत.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने अनिमेष अपार्टमेंटच्‍या मंजूर नकाशात नमूद अनिमेष अपार्टमेंट मधील सर्व सदस्‍यांकरिता सार्वजनिक असलेली सुविधा जसे की, मीटर रुम, चौकीदाराची खोली प्रसाधन गृहसहित श्री. रुपेश राजेशराव चोपडे यांच्‍याकडून रक्‍कम रुपये 11,00,000/- स्‍वीकारुन दि. 05.03.2019 रोजी सहा.निबंधक, नागपूर यांच्‍याकडे दस्‍त क्रं. 1337/2019 द्वारे विक्रीपत्र करुन दिले आहे.
  3.      अनिमेष अपार्टमेंटच्‍या सर्व फ्लॅट धारकांनी एकत्रित येऊन अनिमेष अपार्टमेंट हाऊसिंग सोसायटी दि. 12.08.2021 रोजी उप-निबंधक, सहकारी संस्‍थे अंतर्गत नोंदणीकृत केली असून त्‍याचा क्रं. NGP/CTY-2/ HSG/ TC / 1622 असा आहे.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने अनिमेष अपार्टमेंटच्‍या सदनिका क्रं. 104 वर आपले नांव नोंदविण्‍याची प्रक्रिया सुरु केली असता Deputy Superintendent Land records, Nagpur Order Revenue Appeal No. 217/2015-16 & Appeal S.R.No.83/2015-16 Dated 23/05/2017 and City Survey Office No. 2 Order Dated 12/04/2018 नुसार तक्रारकर्त्‍याचे नांव काढले असल्‍याचे कळले. तक्रारकर्त्‍याने सदनिका खरेदीकरिता रुपये 20,44,000/- इतकी मोठी रक्‍कम गुंतवणूक करुन देखील सदरची सदनिका तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे हस्‍तांतरण होऊ शकत नसल्‍याने व प्रस्‍तुत जागा ही वादग्रस्‍त असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली असता विरुध्‍द पक्षाने अनिमेष अपार्टमेंटच्‍या अपूर्ण बांधकामा संबंधीची सर्व जबाबदारी नाकारल्‍यामुळे सदनिका धारकांना दहशत बसली.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून सदनिका क्रं. 104 पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 20,44,000/- द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह तीन महिन्‍यात देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच तक्रारकर्त्‍याला सदरची सदनिका नोंदविण्‍याकरिता, विकसन शुल्‍क व इतर आलेला  खर्च असे एकूण रुपये 5,00,000/- देण्‍याचा सुध्‍दा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.       विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 02.12.2022 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?            होय
  3. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून चिकली (खुर्द) वार्ड, नं. 20, एन.आय.टी.गार्डन जवळ, सरस्‍वती नगर, मानेवाडा रिंग रोड, नागपूर येथील प्‍लॉट क्रं. 41 –आर-3, खसरा क्रं. 13/1, सिटी सर्व्‍हे नं. 41 येथील अनिमेष अपार्टमेंट मधील पहिल्‍या मजल्‍यावरील सदनिका क्रं. 104 ही एकूण रक्‍कम रुपये 20,44,000/- मध्‍ये खरेदी करुन दिनांक 04.07.2017 रोजी  सहा. निबंधक, वर्ग-2 यांच्‍याकडे दस्‍तावेज क्रं. 4141/2017 द्वारे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले असल्‍याचे नि.क्रं. 2 वर दाखल विक्रीपत्रावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
  2.             नि.क्रं. 2 वर दाखल मंजूर नकाशाप्रमाणे संपूर्ण बांधकाम करुन दिले नाही, तसेच  नागपूर महानगर पालिकाचे भोगवटा प्रमाणपत्र (occupation certificate) व इमारतीचे पूर्णत्‍व प्रमाणपत्र (completion certificate) सुध्‍दा दिले नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे सदरचा फ्लॅट क्रं. 104 चे भूमी अभिलेखाच्‍या अभिलेखावर तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे म्‍यूटेशन (नामातांरण) होण्‍यास अडचणी येत आहेत आणि या सर्व बाबी सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  
  3.      विरुध्‍द पक्षाने अनिमेष अपार्टमेंटच्‍या मंजूर नकाशात नमूद अनिमेष अपार्टमेंट मधील सर्व सदस्‍यांकरिता सार्वजनिक असलेली मीटर रुम, चौकीदाराची खोली प्रसाधन गृहसहित इत्‍यादी अनिमेष अपार्टमेंटच्‍या सोसायटीला हस्‍तांतरण करणे आवश्‍यक होते, परंतु विरुध्‍द पक्षाने सदरची जागा ही रुपेश राजेशराव चोपडे यांच्‍याकडून  रुपये 11,00,000/- स्‍वीकारुन दि. 05.03.2019 रोजी सहा.निबंधक, नागपूर यांच्‍याकडे विक्रीपत्र करुन दिले आहे  ही दोषपूर्ण सेवा असून अनुचित  व्‍यापारी  प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे दिसून येते.
  4.      अनिमेष अपार्टमेंटच्‍या सर्व फ्लॅट धारकांनी एकत्रित येऊन अनिमेष अपार्टमेंट हाऊसिंग सोसायटी दि. 12.08.2021 रोजी उप-निबंधक, सहकारी संस्‍थे अंतर्गत नोंदणीकृत केली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने अनिमेष अपार्टमेंटच्‍या सदनिका क्रं. 104 वर आपले नांव नोंदविण्‍याची प्रक्रिया सुरु केली असता Deputy Superintendent Land records, Nagpur Order Revenue Appeal No. 217/2015-16 & Appeal S.R.No.83/2015-16 Dated 23/05/2017 and City Survey Office No. 2 Order Dated 12/04/2018 नुसार तक्रारकर्त्‍याचे नांव काढले असल्‍याचे दाखल दस्‍तावेज नि.क्रं. 2 वरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने सदनिका खरेदीकरिता रुपये 20,44,000/- इतकी मोठी रक्‍कम गुंतवणूक करुन देखील सदरची सदनिका तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे हस्‍तांतरण होऊ शकत नसल्‍याने व प्रस्‍तुत जागा ही वादग्रस्‍त असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या सदनिका खरेदीपोटी गुंतविलेली रक्‍कम रुपये 20,44,000/- मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. 

     सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला उपरोक्‍त  पहिल्‍या मजल्‍यावरील सदनिका क्रं.   104 च्‍या  खरेदीपोटी गुंतविलेली रक्‍कम रुपये 20,44,000/- व त्‍यावर तक्रार दाखल दिनांक म्‍हणजेच दि.22.09.2022 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या प्रत्‍यक्ष ताब्‍यात असलेली सदरची सदनिका विरुध्‍द पक्षाला हस्‍तांतरित करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 30,000/- द्यावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.