(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 27 जुन 2011)
अर्जदार यांनी, सदर दरखास्त, ग्राहक संरक्षण कयद्याचे कलम 27 अन्वये गैरअर्जदारांचे विरुध्द योग्य कारवाई करण्यात यावी व गै.अ.ने शारीरीक, आर्थिक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- ची नुकसान भरपाई द्यावी व आदेशाचा अवमान केल्याने कारवाई करावी, याकरीता दाखल केली.
सदर दरखास्त नोंदणी करुन, गैरअर्जदाराविरुध्द समन्स काढण्यात आला. दरखास्त, न्यायप्रविष्ठ असतांना, गै.अ. यांनी नि.7 दाखल करुन तक्रार क्र.21/2010 आदेश दि.23..6.2010 च्या आदेशातील नुकसान भरपाईची रक्कम रुपये 5000/- धनादेश क्र.205146 दि.9.3.2011 अन्वये अर्जदार श्री मुखरु लुल्या पुराम यांना दोन साक्षदारा समक्ष देण्यात आले आहे असा अर्ज दाखल केला व सोबत पावती दाखल केली. यानंतर, दरखास्त अर्जदाराचे हजेरी करीता दि. 8.4.2011 रोजी ठेवण्यात आले. परंतु, अर्जदार आजपर्यंत हजर
... 2 ... (चौ.अ.क्र.2/2011)
झाला नाही. दरखास्त अर्जदाराचे हजेरी करीता दि.28.4.11, 30.4.11, 18.5.11, 24.5.11 व 27.5.11 रोजी दरखास्त ठेवण्यात आले, तरी अर्जदार हजर झाला नाही.
सदर दरखास्त अर्जदाराचे हजेरीकरीता प्रलंबित आहे. अर्जदार संधी देऊन सुध्दा हजर झाले नाही. गै.अ. यांनी आदेशाचे पालन केले असल्यामुळे, अर्जदाराला दरखास्त पुढे चालवायचे नाही, असे दिसून येत असल्याने व अर्जदार सतत गैरहजर असल्याने, दरखास्त फौजदारी प्रक्रियेच्या कलम 258 नुसार प्रोसीडींग बंद (Stop of proceeding) करुन दरखास्त काढून टाकण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
अर्जदाराची दरखास्त काढून टाकण्यात येत आहे.
(for want of non-prosecution)
गडचिरोली.
दिनांक :- 27/06/2011.