Maharashtra

Kolhapur

CC/21/290

Vikram Aappaso Magdum - Complainant(s)

Versus

Shri Veershev Co Op Bank Ltd. & Other - Opp.Party(s)

A.S.Jadhav

19 Aug 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/290
( Date of Filing : 14 Jul 2021 )
 
1. Vikram Aappaso Magdum
At.Shivajinagar, Moje Sangav, Tal.Kagal
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Veershev Co Op Bank Ltd. & Other
Tararani Chock, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 19 Aug 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 व 36 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार यांचे वि.प.क्र.2 बँकेमध्‍ये बचत खाते असून त्‍याचा क्र. 014010500005545 असा आहे.  दि. 09/03/2019 रोजी तक्रारदार यांनी बँक ऑफ इंडिया, शाखा चंदगड या बँकेचा रक्‍कम रु.49,500/- चा चेक नं. 183456 वि.प.क्र.2 यांचेकडे आपले खातेवर जमा केला होता.  सदरचा चेक वटल्‍यानंतर तक्रारदारांना त्‍याबाबतचा मॅसेज मोबाईलवर प्राप्‍त झाला.  म्‍हणून दुसरे दिवशी तक्रारदार यांनी लागवड खरेदी केलेची उधारी रक्‍कम भागविणेसाठी सांगली येथील पार्टीस बँकेत बोलाविले व त्‍यांना बचत खातेतून रक्‍कम रु. 45,000/- काढून घेवून अदा केली.  सदर रक्‍कम काढून घेतलेनंतर वि.प.क्र.2 शाखेतून तक्रारदार यांना फोन आला व त्‍यावेळी संबंधीत अधिका-यांनी काढलेली रक्‍कम रु.45,000/- तात्‍काळ बँकेत भरणेची सूचना केली.  तक्रारदारांनी याबाबत खुलासा मागितला असता संबंधीत कर्मचा-यांनी सदरची रक्‍कम चुकीच्‍या पध्‍दतीने तुमचे खातेवर वर्ग होवून चेक अनादरीत झाला असलेचे कारण सांगून ताबडतोब रक्‍कम जमा करणेबाबत सूचना केल्‍या.  त्‍यावेळी तक्रारदार यांनी अनादरीत झाले मूळ चेकची व रिटर्न मेमेची मागणी केली असता वि.प.क्र.2 चे कर्मचा-यांनी ते देणेस नकार दिला.  त्‍यानंतर वि.प.क्र.2 शाखेचे कर्मचारी वारंवार तक्रारदाराचे घरी व व्‍यवसायाचे ठिकाणी जावून पैसे परत करणेची धमकी देत आहेत.  तसेच वि.प.क्र.2 चे कर्मचा-यांनी सदरची बाब ब-याच गावातील लोकांना सांगितली आहे.  त्‍यामुळे लोकांचा तक्रारदाराकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला आहे.  तसेच दि. 23/3/2021 व 24/3/2021 रोजी वि.प. चे कर्मचारी तक्रारदाराच्‍या घरी आले व त्‍यांनी पैसे भरणेबाबत सूचना केल्‍या.  त्‍यामुळे तक्रारदाराचे आई-वडीलांना प्रचंड मानसिक त्रास झाला. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारांना वकीलामार्फत नोटीस पाठविली.  सदर नोटीसीस तक्रारदार यांनी उत्‍तर पाठविले आहे.  तदनंतर वि.प. बँकेने तक्रारदाराचे बँकेकडील व्‍यवहार बंद केले आहेत.  तसेच ए.टी.एम कार्ड देखील बंद केले आहे.  सबब, वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्‍याने तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदारास शारिरिक, मानसिक  त्रासापोटी रक्‍कम रु. 2,00,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- व नोटीस खर्च रु. 2,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत बचत खातेचा उतारा, वि.प. यांनी तक्रारदारांना पाठविलेली नोटीस, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली उत्‍तरी नोटीस, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेला विनंती अर्ज, वि.प. यांनी तक्रारदारास दिलेले पत्र, वि.प. यांचे पत्राचा लखोटा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. यांनी याकामी दि.27/08/21 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे.  वि.प. यांचे कथनानुसार, वि.प. यांनी तक्रारदारास कोणतीही धमकी दिलेली नाही.  वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.  तक्रारदार यांनी न वटलेल्‍या चेकची रक्‍कम अनाधिकृतपणे वि.प. बँकेतून काढून घेतली असून सदर पब्‍लीक मनीचा स्‍वतःसाठी वापर केलेला आहे.  त्‍याचप्रमाणे तक्रारदार यांना याबाबत कळविले असता तक्रारदार यांनी न वटता परत आलेला चेक व मेमो स्‍वीकारण्‍यास नकार देवून केवळ त्‍यांच्‍या खाते    उता-याची प्रत घेवून निघून गेले आहेत.  तक्रारदार यांनी बेकायदेशीरपणे आपले खातेत रक्‍कम शिल्‍लक नसताना व त्‍यांनी भरलेला चेक अनादरीत होणार याची पूर्वकल्‍पना असताना बँकींग प्रणालीचा गैरफायदा घेवून व वि.प. बँकेच्‍या विश्‍वासाचा घात करुन अनाधिकाराने रक्‍कम रु.45,000/- ची उचल केली आहे.  वि.प.क्र.1 व 2 हे तक्रारदारास कोणतीही रक्‍कम देणे लागत नाहीत.  यालउट तक्रारदार हेच वि.प. बँकेतून अनाधिकृतपणे काढून घेतलेली रक्‍कम रु.45,000/- व त्‍यावर होणारे व्‍याज वि.प. यांना देणे लागतात. वि.प. बँकेने त्‍यांना रिझर्व्‍ह बँकेने घालून दिलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार ज्‍यावेळी खातेदार त्‍यांचे खातेवर चेक जमा केल्‍यानंतर सदरचा चेक हा वटणेसाठी म्‍हणून त्‍यांच्‍या खातेवर क्रेडीट बाजूस त्‍याची आभासी नोंद करुन त्‍यानंतर सदरचा चेक अधिकृत क्लिअरिंग हाऊसकडे पाठविला जातो.  तक्रारदार यांनी त्‍यांचे खातेत भरलेला वर नमूद चेक नियमाप्रमाणे तक्रारदार यांचे खातेस आभासी क्रेडीट दाखवून वटवणेसाठी म्‍हणून क्लिअरिंग हाऊसकडे पाठविला होता.  दरम्‍यानचे काळामध्‍ये राष्‍ट्रीयकृत बँकांनी दि.14/3/2021 व दि. 15/03/2021 रोजी संप पुकारलेमुळे बँकेतर्फे पाठवलल्‍या चेक्‍सचे क्लिअरिंग हाऊसकडून रिटर्न तपशील क्लिअर होवून मिळाले नव्‍हते.  तक्रारदार यांचा चेक वि.प. बँकेने दि. 15/03/2021 रोजी क्लिअरिंग हाऊसकडे वटवणेसाठी पाठविला होता.  सदरचा चेक ज्‍यांनी तक्रारदार यांना दिला होता.  त्‍यांचे खातेत चेक वटणे एवढी पुरेशी रक्‍कम नसलेने संबंधीत क्लिअरिंग हाऊसने वि.प.क्र.1 यांना दि. 16/3/2021  रोजी पहाटे 1.40 वा. ईमेलद्वारे प्रस्‍तुतचा चेक अनादरीत झालेचे कळविले होते.  त्‍यानंतर वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 शाखेस ABB Cheque return झालेचे व सदरचा चेक तक्रारदार यांचे खातेवर दि. 16/03/2021 रोजी डेबीट टाकणे पूर्वीच तक्रारदार यांनी बँकेत येवून आपले खातेवरील रक्‍कम रु. 45,000/- रोख स्‍वरुपात काढून घेतले आहेत.  तक्रारदार यांना त्‍यांनी भरलेला चेक वटणार नाही याची खात्री असताना बँकेच्‍या सिस्‍टीमचा गैरफायदा घेवून अनादरीत झालेल्‍या चेकची रक्‍कम रोख उचल करुन बँकेची फसवणूक केली आहे.  तक्रारदारांचे खातेवर कधीही चेकची रक्‍कम रु.45,000/- शिल्‍लक नव्‍हती. वि.प. बँकेने तक्रारदाराविरुध्‍द सदर रकमेच्‍या वसुलीकरिता मे. दिवाणी न्‍यायाधीश, क.स्‍तर, कागल यांचे कोर्टामध्‍ये रे.क.नं. 119/2021 चा वसुलीचा दावा दाखल केला असून तो प्रलंबित आहे.  त्‍याचप्रमाणे तक्रारदार यांनी केलेल्‍या फसवणूकीबाबत फौजदारी कारवाई प्रलंबित आहे.  सदर कारवाईस बगल देण्‍यासाठी तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.  सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा, रक्‍कम रु. 45,000/- व्‍याजासह वि.प. बँकेकडे जमा करणेचा तक्रारदारांना आदेश करण्‍यात यावा व तक्रारदारास रु. 50,000/- दंड करणेत यावा व नुकसान भरपाईदाखल रु. 25,000/- देणेचा आदेश व्‍हावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत वि.प. बँकेचा ठराव, तक्रारदार यांनी दिलेला चेक, चेक रिटर्न मेमो, वि.प.बँकेचा क्लिअरिंग अॅडजेस्‍टमेंट खाते उतारा, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

नाही.

3

अंतिम आदेश काय ?

नामंजूर.

 

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

6.    वि.प. ही महाराष्‍ट्र सहकार कायद्यानुसार स्‍थापन झालेली बँक आहे.  वि.प.क्र.2 ही तिची शाखा आहे.  तक्रारदार यांचे वि.प.क्र.2 बँकेमध्‍ये सन 2015 पासून बचत खाते असून त्‍याचा नं. 014010500005545 असा आहे. तक्रारदार हे सन 2015 पासून नियमितपणे सदर बँक खातेचा दैनंदिन व्‍यवहारामध्‍ये वापर करतात. त्‍याअनुषंगाने तक्रारदारांनी वि.प.बँकेमध्‍ये असलेले बचत खाते उतारा दाखल केलेला आहे.  सबब, सदरचे बाबीचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

7.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  तक्रारदार यांनी बँक ऑफ इंडिया, शाखा चंदगड या बँकेचा रक्‍कम रु.49,500/- चा चेक नं. 183456 वि.प.क्र.2 यांचेकडील खातेवर जमा केला होता.  सदरचा चेक वटल्‍यानंतर तक्रारदार यांना ता. 15/3/2021 रोजी खातेवर पैसे जमा झालेचा मॅसेज प्राप्‍त झाला.  ता. 16/3/21 रोजी तक्रारदार यांनी लागवड खरेदी केलेची उधारी रक्‍कम भागविणेसाठी सांगली येथील पार्टीस सदरचे बचत खातेतून रक्‍कम रु. 45,000/- काढून अदा केली.  तथापि वि.प. बँकेचे कर्मचारी यांनी सदरची रक्‍कम चुकीच्‍या पध्‍दतीने तुमचे खातेवर वर्ग होवून चेक अनादरीत झाला असे कारण सांगून ताबडतोब रक्‍कम जमा करणेबाबत तक्रारदार यांना सूचना केल्‍या.  तसेच तक्रारदार यांना अनादरीत झाले चेकची व रिटर्न मेमोची मागणी केली असता ती देणेस वि.प.क्र.2 चे कर्मचारी यांनी नकार दिला.  वि.प. बँकेने तक्रारदार यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीररित्‍या बँकेकडील व्‍यवहार बंद/ब्‍लॉक केला.  सबब, वि.प. बँकेने तक्रारदारांना कोणतीही सूचना न देता तक्रारदारांचे बँकेकडील व्‍यवहार बंद/ब्‍लॉक करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी तक्रारीसोबत तक्रारदार यांचा वि.प. बँकेकडील असलेला बचत खातेउतारा दाखल केलेला आहे.  सदरचे खातेउता-याचे अवलोकन करता ता. 15/3/2021 रोजी रक्‍कम रु. 49,500/- क्रेडीट अमाऊंट दिसून येते.  अ.क्र.2 ला ता. 31/3/2021 रोजी वि.प. बँकेने तक्रारदारांना दिलेली नोटीस, ता. 28/5/2021 रोजी तक्रारदार यांनी वि.प. बँकेचे मॅनेजर यांना सेव्हिंग्‍ज खाते चालू करणेबाबत दिलेला अर्ज व सदरचे अर्जानुसार वि.प.बँकेचे शाखाधिकारी यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्‍या पत्राची प्रत दाखल केलेली आहे.

 

8.    प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 व 2 यांनी म्‍हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  तक्रारदार यांनी न वटलेल्‍या चेकची रक्‍कम अनाधिकृतपणे वि.प. बँकतून काढून घेतली. सदरचे पब्‍लीक मनीचा वापर स्‍वतःसाठी केलेला आहे.  तक्रारदार यांचे ता. 28/5/2021 चे पत्राप्रमाणे ता. 7/06/2021 रोजी उत्‍तर पाठवून प्रत्‍यक्ष बँकेत येवून माहिती घेणेबाबत कळविले असता तक्रारदार यांनी त्‍यांनी भरलेला व न वटत परत आलेला चेक व मेमो स्‍वीकारणेस नकार देवून केवळ त्‍याचे खातेउता-याची प्रत घेवून निघून गेले आहेत असे वि.प. यांनी म्‍हणणे दाखल केले आहे.  वि.प यांनी ता. 27/8/2021 रोजी वि.प. बँकेचा ता. 12/08/2021 रोजीचा ठराव दाखल केलेला आहे. तसेच तक्रारदार यांनी वि.प .बँकेच्‍या कागल शाखेतील त्‍यांचे सेव्हिंग्‍ज खातेवर वटणेसाठी भरलेला बँक ऑफ इंडिया, शाखा चंदगड चेक नं. 183456 रक्‍कम रु.49,500/- चा धनादेश दाखल केलेला आहे.  सदरचे चेकचे अवलोकन करता सदरचा चेक दि. 09/03/2021 रोजीचा असून त्‍यावर परमेश्‍वरी दिनकर चौगुले यांची सही आहे.  अ.क्र.3 ला तक्रारदार यांनी दिलेला चेक नं. 183456 न वटता परत आलेबाबतचा चेक रिटर्न मेमो दाखल आहे. सदरचे चेक रिटर्न मेमोचे अवलोकन करता Funds Insufficient या कारणास्‍तव सदरचा चेक वटलेला दिसून येत नाही.

 

9.    प्रस्‍तुकामी वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन करता ता. 15/3/2021 रोजी तक्रारदार यांचे बचत खातेवर चेक नं. 183456 ची रु.49,500/- रक्‍कम आभासी पध्‍दतीने जमा दाखविलेली होती.  नमूद चेक वटणेसाठी क्लिअरिंग हाऊसकडे पाठविला.  तत्‍पूर्वी ता. 14/3/2021 व 15/3/2021 रोजी राष्‍ट्रीयकृत बँकांनी संप पुकारलेमुळे बँकेतर्फे पाठविलेले चेक्‍स क्लिअरिंग हाऊसकडून रिटर्न तपशील मुदतीत क्लिअर होवून मिळाले नव्‍हते. चेक देणा-याच्‍या अकाऊंटवर चेक वटणे इतपत पुरेशी रक्‍कम नसलेने सदरचा चेक अनादरीत करत ता. 16/3/2021 रोजी पहाटे 1.40 वाजता अनादरीत झालेबाबतचा इमेलद्वारे वि.प.क्र.1 कार्यालयास कळविले. त्‍यानंतर वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 शाखेत ABB Cheque Return झालेबाबत सदरचा चेक तक्रारदार यांचे खातेवर डेबीट दाखविलेबाबत कळविले होते.  सबब, वि.प. यांचे सदरचे पुरावा शपथपत्रावरुन सदर वि.प. बँकेने सदरचा चेक वटणेसाठी क्लिअरिंग हाऊसकडे पाठविला होता  तत्‍पूर्वी ता. 14/3/2021 व ता. 15/3/2021 रोजी राष्‍ट्रीयकृत बँकांचा संप असलेने सदर चेकचे क्लिअरिंग हाऊसकडून रिटर्न तपशील मुदतीत क्लिअर होवून मिळाले नाही ही बाब नाकारता येत नाही. सदरचे कथनाचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्‍या अ.क्र.4 चे वि.प. बँकेचे दि. 16/3/2021 चे Clearing Adjustment  खातेउता-याचे अवलोकन करता वि.प. बँकेने क्लिअरिंग हाऊसकडे सदरचा चेक वटणेसाठी पाठविला होता.  तथापि त्‍यांचे राष्‍ट्रीयकृत बँकेचे संपामुळे वटू शकला नाही.  त्‍याबाबतचा मेमो वि.प.क्र.1 बँकेस ता. 16/3/2021 रोजी Reason 84 नुसार Connectivity failure शेरा मारुन परत मिळाला होता ही बाब दिसून येते.  सदरची कथने तक्रारदारानेही नाकारलेली नाहीत.  दाखल कागदपत्रांवरुन वादातील चेक देणा-या व्‍यक्‍तीच्‍या अकाऊंटवर चेक वटणे इतपत पुरेशी रक्‍कम नसलेने सदरचा चेक अनादरीत झाला ही बाब स्‍पष्‍टपणे सिध्‍द होते.  सदरची बाब तक्रारदार यांना देखील मान्‍य आहे.  तक्रादार यांनी तक्रारअर्जामध्‍ये अथवा त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये त्‍यांचे खातेवर ता. 16/3/2021 अखेर पुरेशी रक्‍कम असलेबाबत व वि.प. बँकेने सदर खातेवर पुरेशी रक्‍कम असतानाही तक्रारदार यांचेकडे सदर रकमेची मागणी केली आहे असे कथन तक्रारदार यांनी केलेले नाही.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या बँकेचे पासबुकावरुन सदरचा चेक भरणेपूर्वी रक्‍कम रु. 1,372.07 पैसे इतकीच शिल्‍लक असलेचे दिसून येते.  सबब, तक्रारदार यांनी तक्रारदार यांचे खातेवर पुरेशी रक्‍कम असतानाही वि.प. बँकेने तक्रारदार यांचेकडे रक्‍कम रु. 45,000/- ची मागणी केली असे तक्रारदारांनी तक्रारीस कथन केलेले नाही.  तसेच चेक नं. 183456 रक्‍कम रु. 49,500/- पास होणेइतपत रक्‍कम बँक ऑफ इंडिया, चंदगड शाखा येथे ता. 15/3/2021 रोजी शिल्‍लक होती व चेक पास झाला हे दर्शविणारा कोणताही पुरावा व कागदपत्रे सदरकामी दाखल केलेली नाहीत.  प्रस्‍तुतकामी वि.प. बँकेने तक्रारदार यांनी सदरचे उचल केलेली रक्‍कम रु.45,000/- चे वसुलीसाठी मा. दिवाणी न्‍यायालय, कनिष्‍ठ स्‍तर, कागल यांचे कोर्टात रे.क.नं. 119/2021 चा वसुलीचा दावा दाखल केलेचे निदर्शनास आयोगाचे आणून दिलेले आहे.

 

10.   सबब, वरील सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता तक्रारदारांचे बचत खातेवर चेक भरणेपूर्वी रु.1,372/- इतकीच रक्‍कम शिल्‍लक होती.  तसेच तक्रारदारांचे खातेवर जमा केलेला चेक अनादरीत झालेबाबतची बाब तक्रारदार यांना माहिती असताना देखील तक्रारदरांनी सदरची रक्‍कम वि.प. यांचेकडे जमा केलेली नाही.  या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांची कृती ही अयोग्‍य असलेने वि.प. बँकेने तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग नकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो. 

 

  1. खर्चाबाबत आदेश नाहीत.
  2.  
  3. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.