सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.46/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 14/05/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि.30/07/2010
1) श्री चंद्रकांत वामन गवस
वय सु.55 वर्षे, धंदा – शेती
2) सौ.रुक्मीणी चंद्रकांत गवस
वय सु.50 वर्षे, धंदा – घरकाम,
3) पूजा चंद्रकांत गवस
वय सु.25, धंदा – घरकाम
सर्व राहणार उसप, बोकारवाडी,
ता.दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
श्री सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
साटेली - भेडशी, ता.दोडामार्ग करीता,
1) जनरल मॅनेजर,
श्री लक्ष्मण पांडूरंग मोरजकर
वय – सज्ञान, व्यवसाय – नोकरी,
रा.झरेबांबर (विमानतळ), ता.दोडामार्ग,
जिल्हा सिंधुदुर्ग
2) शाखा व्यवस्थापक,
श्री सुनिल प्रभाकर गवस
वय – सज्ञान, व्यवसाय – नोकरी,
रा.मोर्ले, ता. दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग
3) चेअरमन
श्री नामदेव फटी धर्णे
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
संचालक
4) श्री शांताराम सिताराम धर्णे
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
5) श्री शिवाजी निळू धर्णे
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
6) श्रीमती बिंदिया बाबी देसाई
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
7) श्री भिकाजी द्वारकानाथ गणपत्ये
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
अ.क्र.3 ते 7 सर्व राहणार साटेली – भेडशी,
ता.दोडामार्ग , जिल्हा सिंधुदुर्ग
8) श्री सुरेश यशवंत दळवी
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
9) श्री नामदेव शंकर ठाकूर
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
10) श्री पांडूरंग धोंडू लोंढे
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
अ.क्र.8 ते 10 सर्व राहणार कोनाळकट्टा
ता.दोडामार्ग , जिल्हा सिंधुदुर्ग
11) श्री ज्ञानेश्वर आत्माराम शेटये
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
12) श्री गंगाराम जानू कोळेकर
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
अ.क्र 11व 12 रा.खानयाळे,
ता.दोडामार्ग , जिल्हा सिंधुदुर्ग
13) श्री मनोहर व्यंकू कदम
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.पाळये, ता. दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग
14) श्री कृष्णा पांडूरंग मोरजकर
वय – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.भेडशी, ता. दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग
15) श्री शिवदास वसंत मणेरकर
वय – सज्ञान रा.भेडशी,
ता. दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फे - विधिज्ञ श्री बी. व्ही. नाईक
विरुद्धपक्षातर्फे प्रतिनिधी - श्री लक्ष्मण पांडूरंग मोरजकर
(मंचाच्या निर्णयाद्वारे सौ.वफा जमशीद खान, सदस्या)
नि का ल प त्र
(दि.30/07/2010)
1) प्रस्तुत प्रकरणात विरुध्द पक्ष यांचे नावे अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाच्या श्री सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित साटेली - भेडशी या पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेव योजना व मुदत ठेव योजना या अंतर्गत गुंतवणूक केलेली होती. सदर ठेवींचा परतावा विहित मुदतीत न मिळाल्याने सदर तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र, मुदत ठेवींच्या पावत्या, विरुध्द पक्ष पतसंस्थेस दि.25/03/2010 रोजी पाठविलेल्या नोटीसींच्या ऑफिस कॉपीज, नोटीसा पोच झाल्याबाबत रजिस्टर ए.डी.च्या पोस्टाच्या पोहोच पावत्या इत्यादी कागदपत्र दाखल केलेले आहेत.
2) सदरहू तक्रारीची नोटीस विरुध्द पक्षास पाठविणेत आली. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 करीता सदर पतसंस्थेचे सरव्यवस्थापक श्री लक्ष्मण पांडूरंग मोरजकर हे हजर झाले असून त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.24 वर दाखल केले आहे व सर्वांकरीता केस चालविण्याचा अधिकार असल्याचा ठराव क्र.1582 दि.11/06/2010 नि.22/1 येथे दाखल केला आहे. विरुध्द पक्ष यांनी आपले लेखी म्हणणे शपथपत्रासह दाखल केले असून त्यामध्ये तक्रारीबाबत आक्षेप नोंदविले आहेत. त्यांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हे संस्थेचे सभासद असल्याने त्यांना ग्राहक मंचामध्ये सदर प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही, तसेच विरुध्द पक्ष क्र.7 यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला असल्याने त्यांचे विरुध्द तक्रार चालण्यास पात्र नाही असेही विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे.
3) तक्रारदाराने सदर तक्रार प्रकरणात नि.27/1 वर तक्रारदार क्र.2 व 3 चे वतीने प्रकरण चालवणेकरीता कुलमुखत्यारपत्र दाखल केलेले असून नि.28 वर सरतपासाचे शपथपत्र दाखल केलले आहे. विरुध्द पक्षाने लेखी म्हणण्याव्यतिरिक्त आणखी पुरावा दिलेला नाही. तक्रारदारतर्फे दिलेला पुरावा, तोंडी युक्तीवाद तसेच विरुध्द पक्षाने दिलेले लेखी म्हणणे विचारात घेता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ‘ग्राहक’ आहेत काय ? सदर प्रकरण चालविण्याचे ग्राहक मंचाला अधिकार आहेत काय ? | होय |
2 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्षाने त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदारांची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ? | होय; अंशतः |
-का र ण मि मां सा-
4) मुद्दा क्रमांक 1 - I) तक्रारदार यांनी खाली नमूद परिशिष्टात दर्शविल्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांच्या पतसंस्थेमध्ये रक्कमा गुंतविलेल्या होत्या ही वस्तुस्थिती दाखल पावत्या (नि.3/1, 3/2 व 3/3) वरुन सिध्द होते.
परिशिष्ट ‘अ’
तक्रारदार श्री चंद्रकांत वामन गवस/रुक्मीणी चंद्रकांत गवस यांनी दामदुप्पट ठेव पावती क्र.869 दि.2/9/2003 प्रमाणे गुंतवलेली रक्कम रु.50,000/- तिचीच दामदुप्पट रक्कम रु.1,00,000/- मात्र – परत देण्याचा दि.2/9/2009
परिशिष्ट ‘ब’
तक्रारदार पूजा चंद्रकांत गवस/ चंद्रकांत वामन गवस यांनी दामदुप्पट ठेव पावती क्र.868 दि.2/9/2003 प्रमाणे गुंतवलेली रक्कम रु.50,000/- तिचीच दामदुप्पट रक्कम रु.1,00,000/- मात्र – परत देण्याचा दि.2/9/2009.
परिशिष्ट ‘क’
तक्रारदार पूजा चंद्रकांत गवस यांनी मुदत ठेव पावती क्र.1374 दि.16/1/2004 प्रमाणे गुंतवलेली रक्कम रु.1,00,000/- मात्र – रक्कम परत देण्याचा दि.16/01/2010 –
II) तक्रारदार क्र.1 ते 3 यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेमध्ये वरीलप्रमाणे रक्कमांची गुंतवणूक करुन संस्थेकडून आर्थिक सेवा घेतलेली असल्याने तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ‘ग्राहक’ ठरतात ही बाब निश्चित आहे. तक्रारदार हे विरुध्द पक्ष पतसंस्थेचे ग्राहक असल्याने व त्यांनी मुदतीत ठेवी परत न केल्याने; तसेच सदर प्रकरण हे सेवा त्रुटी संबंधाने असल्याने हे प्रकरण चालविण्याचे अधिकार या मंचाला आहेत.
5) मुद्दा क्रमांक 2- तक्रारदार यांनी ठेवलेल्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेकडे तोंडी तसेच लेखी मागणी केली. रक्कमांची लेखी मागणी केल्याचे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.3/4(1), 3/4(2), 3/4(3) या नोटीशीचे स्थळ प्रतींवरुन दिसून येते. त्याबाबतची पोस्टाची पोहोचपावती नि.3/5 वर आहे. परंतु सदर नोटीशीची विरुध्द पक्ष यांनी कोणतीही दखल घेतली नसून तक्रारदार क्र.1 ते 3 यांना सदर रक्कम परत केली नाही. ठेवींची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांच्या रक्कमा परत देण्याचे कायदेशीर कर्तव्य विरुध्द पक्षाच्या पतसंस्थेचे होते. तक्रारदारांनी पतसंस्थेकडे ठेवलेल्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर मागणी करुनही रक्कमा परत केलेल्या नाहीत, त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
6) मुद्दा क्रमांक 3 - I) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेच्या साटेली – भेटली शाखेमध्ये ठेवी ठेवल्याचे नि.3/1 ते नि.3/3 वरुन सिध्द होते. विरुध्द पक्ष क्र.1 हे सदर पतसंस्थेचे जनरल मॅनेजर असून विरुध्द पक्ष 2 हे तक्रारदार यांनी गुंतविलेल्या पतसंस्थेच्या शाखा साटेली – भेडशीचे शाखा व्यवस्थापक आहेत. विरुध्द पक्ष क्र.3 हे पतसंस्थेचे चेअरमन असून विरुध्द पक्ष क्र.4 ते 15 हे संचालक आहेत. त्यामुळे सदर पतसंस्थेच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारास विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 याच कायदेशीररित्या जबाबदार व्यक्ती आहेत. त्यामुळे ठेवींच्या रक्कमा परत करण्याची सर्वस्वी कायदेशीर जबाबदारी सदर पतसंस्था व विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांचीच आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्द पक्षाने आपल्या लेखी म्हणण्यामध्ये (नि.24) विरुध्द पक्ष क्र.7 यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला असल्यामुळे त्यांचेविरुध्द तक्रार चालण्यास पात्र नाही असा आक्षेप नोंदविला आहे परंतु त्यासंबंधाने कोणतेही कागदपत्र प्रकरणी दाखल केलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.7 यांना नोटीस बजावणी होऊन देखील त्यांनी त्यासंबंधाने कोणताही पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही.
II) तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.3/3 या मुदतठेव पावती क्र.1374 च्या रक्कमेवर दि.16/1/2004 ते दि.16/1/2006 पर्यंतचे व्याज रक्कम रु.22,004/- (रुपये बावीस हजार चार मात्र) एवढी रक्कम प्राप्त झाल्याचे तक्रारदारने तक्रार अर्जात मान्य केले आहे. त्यामुळे सदर पावतीमधील नोंदीचा विचार करता तक्रारदार दि.17/1/2006 पासूनची व्याजाची रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
अं ति म आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) श्री सातेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित साटेली – भेडशी, ता. दोडामार्ग व विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी संयुक्तपणे वा विभक्तपणे परिशिष्ट ‘अ’ व ‘ब’ मध्ये नमुद केलेल्या मुदत पूर्ण रक्कमा व त्यावर दि.2/9/2009 पासून सदर रक्कमांची पूर्ण फेड होईपर्यंत 6 टक्के व्याजदराने रक्कम संबंधित तक्रारदारांना देण्याचे आदेश पारीत करण्यात येतात.
3) विरुध्द पक्ष पतसंस्था व विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी संयुक्तपणे वा विभक्तपणे परिशिष्ट ‘क’ मध्ये नमूद रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) व त्यावर दि.17/1/2006 पासून सदर रक्कमेची पूर्ण फेड होईपर्यंत 6 टक्के व्याजदराने रक्कम तक्रारदार क्र.3 यांना देणेचे आदेश पारीत करणेत येतात.
4) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याबद्दल, मानसिक त्रासाबद्दल व तक्रार खर्च मिळून रक्कम रु.4,000/-(रुपये चार हजार मात्र) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावेत.
5) तक्रारदाराच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
6) या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या प्राप्तीपासून 45 दिवसांच्या आत करणेत यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 30/07/2010.
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-