::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-10/05/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
विरुद्ध पक्ष क 1 व 2हे दोघे पती पत्नि असून साई ज्वेलर्स या नावाने सोने चांदीचे दागिने विकण्याचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने दि.22/3/2012 ते दि. 11/4/2013 या कालावधीत वि.प. यांचेकडून एकूण रु. 6,41,000/- चे सोन्याचे दागिने वेळोवेळी खरेदी केले तक्रारकर्तीला औक्टो.2013 मध्ये पैशाची आवश्यकता असल्याने वि.प.यांचेकडून विकत घेतलेले दागिने श्री कन्यका नागरी सह. बँक शाखा , भद्रावती यांचेकडे गहाण ठेवून कर्ज घेण्याकरिता गेली असता तिला सदर दागिने हे नकली असल्याने कर्ज मिळू शकले नाही व हि बाब तक्रारकर्तीला तेव्हा प्रथमच दि. 23.10.2013 रोजी माहिती झाली तेव्हा तक्रारकर्तीने वि.प. सोबत संपर्क करून त्यांनी केलेली फसवणूक त्यांचे निदर्शनास आणून दिली व त्यांना पैशाची मागणी केली व पैसे परत केले नाही तर पोलीस स्टेशन ला रिपोर्ट देतो म्हणून सांगितल्यामुळे वि.प हे दि.24.10.2013 रोजी तक्रारकर्तीकडे आले व त्यांनी तक्रारकर्तीला मार्च 2014पर्यंत रक्कम परत करण्याची मुदत मागितली व तक्रारकर्तीकडून सदर नकली दागिने परत घेतले व तक्रारकर्तीस दि. 24.10.2013 रोजी रक्कम परत करण्याकरिता दोन साक्षीदारांसमक्ष कबुली जबाब लिहून दिला व तक्रारकर्तीस रक्कम परत करण्याकरिता वि.प. यांनी दि.10.11.2014 चा युको बँक ,माजरी कौलारीचा रु.6,41,000/- चा धनादेश दिला परंतु सदर धनादेश सुद्धा अनादर झाला वि .प. यांनी तक्रारकर्तीस सोन्याचे दागिने म्हणून नकली दागिने विकून अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करून न्युनतापूर्ण सेवा दिली
सबब तक्रारकर्तीने मंचासमक्ष विररुद्धपक्षांविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, वि . प. यांनी तक्रारकर्त्याकडून नकली परत घेतलेले दागिने तथा दि. 15.03.2013 दि.15.03.2013,दि.22.3.2012 ,दि.30.03.2012 ,दि. 5.4.2013 , दि. 7.4.2013 व दि.11.4.2013 च्या बिलामध्ये नमूद वजनाच्या इतकेच सोन्याचे दागिने तक्रारकर्तीस बनवून द्यावे अथवा सदर दागिन्यांची किमत रु.6,41,000 /- व त्यावर दि.1.4.2012 पासून रक्कम तक्रारकर्तीस प्राप्त होईपर्यंत त्यावर 18% व्याज द्यावे
तसेच विरुद्ध पक्षांनी शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.50,000./- व तक्रार खर्च रू.25,000/- तक्रारकर्तीस द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
2.तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरुध्द पक्षांविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्षांना नोटीस प्राप्त होऊनसुद्धा ते मंचासमक्ष हजर न झाल्याने त्यांचेविरुद्ध नि.क्र.1 वर दि.11.09.2018 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला
3. तक्रारकर्तिची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्ति व साक्षीदाराचे रिजॉईंडर शपथपत्र, तक्रारकर्तिची तक्रार दस्तावेज शपथपत्र यालाच तक्रारकर्तिचा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी नि.क्र.21 वर पुर्सीस दाखल ,तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्तीचे कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांची ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा :
अवलंब केला आहे काय ? होय
3) विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीप्रती न्युनता पूर्ण सेवा दिली आहे होय
काय ? :
4) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत
4. तक्रारकर्तीने दि. 22.3.2012, दि 30.3.2012 ,दि.15.03.2013, दि.15.03.2013,दि.5.4.2013,दि.7.4.2013 व दि.11.4.2013 रोजी अनुक्रमे रु. 1,38,000/-,1,34,400/-,रु..77,000/- रु.90,200/- रु. 81,900/- रु. 66,200/- व रु. 1,07,000/-चे दागिने साई ज्वेलर्स कडून खरेदी केले त्यासंदर्भातल्या पावत्या नि. क्र.6 वर दस्त क्र.अ-1 ते अ-7 वर दाखल असून त्यावर प्रो.प्रा. म्हणून वि.प. क्र.1 यांची सही आहे तसेच दस्त क्र.अ-8 कबुलीनाम्यामध्ये वि . प. क्र2 यांनी तक्रारकर्तीस दागिन्यांची रक्कम परत देण्याची हमी दिली आहे यावरून तक्रारकर्ती हि वि.प. क्र. 1 व 2यांची ग्राहक आहे हे सिद्ध होते
. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
5. तक्रारर्तीची तक्रार,तक्रारकर्तिचे व साक्षीदाराचे रिजॉईंडर शपथपत्र तसेच नि.क्र. 6 वर दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते कि तक्रारर्तीने वि.प.यांचेकडून वर नमूद वेगवेगळ्या दि.च्या पावत्यांमध्ये नमूद वजन व एकत्रित एकूण रक्कमेचे विकत घेतलेले दागिने श्री कन्यका नागरी सह. बँक शाखा , भद्रावती यांचेकडे दि. 23.10.2013 रोजी गहाण ठेवून कर्ज घेण्याकरिता गेली असता तिला सदर दागिने हे नकली असल्याने कर्ज मिळू शकले नाही व हि बाब तक्रारकर्तीला तेव्हा प्रथमच दि. 23.10.2013 रोजी माहिती झाली तेव्हा तक्रारकर्तीने वि.प. सोबत संपर्क करून त्यांनी केलेली फसवणूक त्यांचे निदर्शनास आणून दिली व त्यांना पैशाची मागणी केली व पैसे परत केले नाही तर पोलीस स्टेशन ला रिपोर्ट देतो म्हणून सांगितल्यामुळे वि.प हे दि.24.10.2013 रोजी तक्रारकर्तीकडे आले व त्यांनी तक्रारकर्तीला मार्च 2014 पर्यंत रक्कम परत करण्याची मुदत मागितली व तक्रारकर्तीकडून सदर नकली दागिने परत घेतले व तक्रारकर्तीस दि. 24.10.2013 रोजी रक्कम परत करण्याकरिता दोन साक्षीदारांसमक्ष कबुली जबाब लिहून दिला सदर जबाबामध्ये वि .प.क्र2 यांनी सुद्धा तक्रारकर्तीस सदर दागिन्यांची रक्कम परत करण्याची हमी दिली आहे सदर कबुलीनामा दस्त क्र.8 वर दाखल आहे .तक्रारकर्तीने आपले कथनापपुष्ठर्थ स्वत:चे तसेच कबुली जबाब लिहून देण्याऱ्या बकलम श्री ज. दे .चटपल्लीवार यांचे सुद्धा साक्षीदार म्हणून शपथपत्र दाखल केले यावरून विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्तीस नकली दागिने दिले होते व नंतर तक्रारकर्तीकडून परत घेऊन तिला उपरोक्त नमूद पावत्यांप्रमाणे रक्कम परत देण्याचे लेखीस्वरूपात मान्य केले हे सिद्ध होते. विरुद्ध पक्षांनी प्रकरणात उपस्थीत राहून तक्रारकर्तीचे कथन खोडून काढले नाही त्यामुळे विरुद्धपक्षांनी तक्रारकर्तीस सदर दागिने परत घेऊन त्याची रक्कम परत केली नाही हे तक्रारकर्तीचे कथन ग्राह्य धरण्या योग्य आहे.तसेच तक्रारकर्तीने आपले तक्रारअर्जामध्ये कथन केले आहे कि तक्रारकर्तीस रक्कम परत करण्याकरिता वि.प. यांनी दि.10.11.2014 चा युको बँक ,माजरी कौलरीचा रु.6,41,000/- चा क्र.293961चा धनादेश दिला परंतु सदर धनादेश सुद्धा अनादर झाला त्यामुळे तिने फौजदारी प्रकरण दाखल केले व तोंडी युक्तीवादा मध्ये तक्रारकर्तीचे अधिवक्ता यांनी सदर प्रकरण प्रलंबीत असल्याचे सांगितले.
वरील बाबींवरून विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्तीस नकली दागिने देऊन नंतर ते परत घेऊन रक्कम परत करण्याचे लेखीमान्य करूनही ति परत न देऊन तक्रारकर्तीची फसवणूक केली व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करून तक्रारकर्तीप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीस शारिरीक व मानसिक त्रास झाल्याने ति विरुद्ध पक्षांकडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच आले आहे सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 38/2017 अंशत:मंजूर
करण्यात येते.
(2) विरुद्ध पक्ष क्र. 1व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्तीस शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाईदाखल रू.10,000/- तसेच तक्रार खर्चापोटी रू 5,000/-द्यावेत.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 10/05/2019
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.