::: नि का ल प ञ:::
( मंचाचेनिर्णयान्वये,मा.सौ.कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या )
(पारीत दिनांक :-24/01/2020 )
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ही पंजीबद्ध सहकारी को-ऑप. क्रेडिट सोसायटी असून सतीश पोपटराव काळे हे अध्यक्ष आहे. सदर संस्थेचा कारभार हा निर्वाचित अध्यक्ष व अध्यक्षाच्या अधिपत्याखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विरुद्ध पक्ष क्र.2 यांचे नियंत्रणात आहे. विरुद्ध पक्ष क्रं. 3 हे विरुद्ध पक्ष क्रमांक 1 संस्थेचे वरोरा शाखेचे व्यवस्थापक असून ते वि.प. क्र.1 यांचे सूचनेनुसार शाखा चालवीत होते. तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष क्रमांक 3 या को-ऑप. क्रेडिट सोसायटी मध्ये दिनांक 23/6/2017 रोजी मुदत ठेव पावती खाते उघडून रू. 1,00,000/-जमा केले. सदर मुदत ठेवी खात्याची परीपक्वता दिनांक 23/6/2018 व परीपक्वता रक्कम रु.1,12,000/-होती. विरुध्द पक्ष क्रं.4 यांचेकडे दिनांक 10.07.2017 रोजी रु.1,00,000/- जमा केली. सदर मुदत ठेवी खात्याची परीपक्वता दिनांक 11/07/2018 व परीपक्वता रक्कम रु. रु.1,12,000/-होती वत्यानंतर परत विरुद्धपक्षांच्या विनंतीवरून दिनांक 12.07.2017 रोजी रु.1,00,000/- जमा केली. सदर मुदत ठेवी खात्याची परीपक्वता दिनांक 11/07/2018 व परीपक्वता रक्कम रु. रु.1,12,000/-होती.
सदर तिन्ही मुदती ठेवींचा परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष क्र.3 यांचेकडे मागणी केली असता संस्था आर्थिक अडचणीत आहे व लवकरच परिस्थिती मधे सुधारणा होणार असून संस्थेच्या खात्यात जरी पैसे असले तरी नोटबंदीमुळे रक्कम उपलब्ध होत नाही मात्र जमा रक्कम व्याजासह परत मिळेल असे त्यांनी आश्वासीत केले. परंतु वारंवार मागणी करूनही रक्कम परत केली नाही, मात्र विरूध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याकडून तिनही मुदत ठेवीच्या मुळ पावत्या जमा करून घेऊन नंतरच तक्रारकर्त्याला दिनांक 2.10.2017 रोजी आयडीबीआय बॅंक, वरोरा चा रू.1,01,470/- चा धनादेश स्वाक्षरी करून तक्रारकर्त्यास दिला. व दुस-या दोनमुदतठेव खातेच्या रकमेचा विरुध्द पक्ष् क्रं. 4 यांनी दिनांक 5/10/2017 रोजीचा रू.1,00,000/- तसेच दिनांक 9/10/2017 रोजीचा रू.1,00,000/- विदर्भ कोकण बॅंक, शाखा भद्रावतीचे दोन धनादेश दिले. मात्र तक्रारकर्त्याने सदर तिनही धनादेश बॅंकेत जमा केले असता ते अनादरीत झाले. सबब तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून विरुद्ध पक्ष क्र.1 ते 4 यांनी अनुक्रमे तक्रारकर्त्याची मुदती खात्यांची परिपक्वता रक्कम रूपये 1,12,000 /- व त्यावर दिनांक 23.06.2018 पासून दर साल दर शेकडा 12% दराने व्याजासह आणि तक्रारकर्त्याच्या तिसऱ्या मुदती ठेव खात्याची परिपक्वता रक्कम रूपये 1,12,000 /- व त्यावर दिनांक 10.07.2018 पासून दर साल दर शेकडा 12% दराने व्याजासह तसेच तक्रारकर्त्याचे तिसरी मुदती ठेव खात्याची परिपक्वता रक्कम रूपये 1,12,000 /- व त्यावर दिनांक 11.07.2018 पासून दर साल दर शेकडा 12% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास देण्याचे तसेच त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रू. 1,00,000/- व तक्रारीचा खर्च रू. 25,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी मंचास प्रार्थना केली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 4यांना नोटीस पाठविण्यात आला. नोटीस प्राप्त होऊनही विरुद्ध पक्ष क्रमांक 1 हे मंचासमक्ष उपस्थित झाले नाहीत त्यामुळे विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांचे विरुद्ध नि.क्र1 वर दिनांक 25.2.2019 रोजी एकतर्फा आदेश पारित आणि विरुद्ध पक्ष क्रमांक 2ते 4यांचे विरुद्ध ‘’दैनिक पुण्यनगरी’’ या वर्तमानपत्रामध्ये मध्ये दि.04/04/2019 रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करूनसुद्धा वि.प.क्र. 2 ते4 मंचासमक्ष उपस्थित झाले नाहीत त्यामुळे दिनांक 18.6.2019 रोजी विरुद्ध पक्ष क्र. 2ते 4 यांचे विरुद्ध एकतर्फा कारवाईचा आदेश पारित केला.
4. विरुद्ध क्र.1यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील मजकूर अमान्य करून पुढे नमूद केले कि तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्षांचा ग्राहक नाही.वि. प. हे श्री ढोकेश्वर मल्टी स्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. लासलगांव चे संचालक /चेअरमन /कार्यकारी संचालक नसल्याने दैनंदिन कारभारास जबाबदार व्यक्ती नाही. सदर संस्थेवर सेन्ट्रल रजी. नवी दिल्ली यांनी दि. 26/12/2017 रोजी मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटीज अॅक्ट, 2002 चे कलम 89 अंतर्गत अवसायकाची नियुक्ती केली आहे व दिनांक 26/12/2017 रोजी सहा. निबंधक श्री.दिपक पराये यांनी संस्थेचा आणि संस्थेच्या मालमत्तेचा चार्ज घेतला असून संस्थेचा संपूर्ण कारभार, न्यायालयीन केसेस, वसूली इत्यादि तेच बघत आहेत. त्यामुळे वि.प.हे संस्थेच्या कोणत्याही कारभारास जबाबदार नाही व अवसायकाविरूध्द तक्रारदाखल करता येत नाही व सबब तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. वि.प. श्री.सतिश काळे यांचेविरूध्द सदर संस्थेच्या कारभारासंबंधाने लासलगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्याअंतर्गत वि.प.श्री.काळे यांना अटक करण्यांत आलेली असून ते कारागृहात बंदीस्त आहेत. सबब सदर तक्रार खारीज करण्यांत यावी.
5. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र , तोंडी युक्तीवाद व विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी उत्तर तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणि निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : विवेचनावरुन
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. तक्रारकर्त्याने, विरुद्ध पक्ष क्रमांक 3 क्रेडीट सोसायटीकडे अनुक्रमे दिनांक 23/06/2017रोजी 48136 या क्रमांकांचे मुदतीठेव खात्यामध्ये एकूण रक्कम रू.1,00,000/- दिनांक 23/06/2018 पर्यंत 1वर्षाच्या कालावधीकरीता तसेच दिनांक 10/07/2017रोजी 40556 या क्रमांकांचे मुदतीठेव खात्यामध्ये एकूण रू.1,00,000/- दिनांक 10/07/2018 पर्यंत 1वर्षाच्या कालावधीकरीता विरुद्ध पक्ष क्रमांक 3यांचे कडे आणि विरुध्द पक्ष क्रं.4 यांच्याकडे दिनांक 12/07/2017 रोजी 45851 या क्रमांकांचे मुदतीठेव खात्यामध्ये एकूण रक्कम रू.1,00,000/- दिनांक 11/07/2018 पर्यंत 1वर्षाच्या कालावधीकरीता जमा /गुंतवले असता विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्यास त्याबाबत तिन मुदत ठेव पावत्या दिल्या आहेत. तक्रारकर्त्याने सदर मुदती ठेव खात्यांची नक्कल प्रती निशाणी क्रं.4वर दस्त क्रं. अ-1 ते अ-3 वर दाखल केलेल्या आहेत. सदर पावत्यांवर विरुद्ध पक्षांचा शिक्का तसेच व्यवस्थापक यांची सही आहे. सदर दस्तावेजांवरून तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्षांचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. तक्रार अर्जात दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ही पंजीबद्ध को-ऑप. क्रेडिट सोसायटी असुन विरुध्द पक्ष क्रं 2 ते 4 हया त्यांच्या शाखा आहेत. विरुद्ध पक्ष क्रमांक 3 क्रेडिट सोसायटीकडे तक्रारकर्त्याने उपरोक्त दोन्ही मुदतठेवी खात्यामध्ये अनुक्रमे दिनांक 23/06/2017रोजी व दिनांक 10/07/2017 रोजी, रक्कम रू.1,00,000/- व रू.1,00,000/- जमा केले असून सदर मुदत ठेवी खात्यांची परीपक्वता दिनांक 23/6/2018 व दिनांक 10/07/2018, परीपक्वता रक्कम रु.1,12,000/- व रु. 1,12,000/- होती. तसेच विरुद्ध पक्ष क्रेडिट सोसायटीकडे तक्रारकर्त्याने तिस-या मुदतठेवी खात्यामध्ये अनुक्रमे दिनांक 12/07/2017रोजी रक्कम रू.1,00,000/- जमा केले असून सदर मुदत ठेवी खात्याची परीपक्वता दिनांक 11/7/2018 परीपक्वता रक्कम रु.1,12,000/- होती. यावरून तक्रारकर्त्याची विरुध्द पक्षांकडे रक्कम जमा आहे व तक्रारकर्त्याने मुदतठेवी खात्याच्या परिपक्वता तारखेला मागणी करूनहि व तसेच त्यानंतर विरूध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी तक्रारकर्त्याकडून तिन्ही मुदत ठेवींच्या मुळ पावत्या जमा करून घेऊनही विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याला उपरोक्त मुदतठेविंची परिपक्वता रक्कम परत केली नाही. त्यामुळे विरुद्ध पक्ष तक्रारकर्त्याला सदर रक्कम देणे लागतात हे सिद्ध होते. विरुद्ध पक्ष क्रंमाक 1ही क्रेडिट सोसायटी असून त्यांच्याकडे तक्रारकर्त्याची उपरोक्त मुदतठेवींची परिपक्वता रक्कम जमा असल्याने ते सदर रक्कम देणे लागतात. परंतु तक्रारकर्त्यानी परिपक्वता तिथीला व त्यानंतरही मागणी करूनही विरुद्ध पक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्याला रक्कम परत न करुन तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्यूनता दर्शविली आहे हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर त्याअनुषंगाने नोंदविण्यात येते. तक्रारकर्त्यास उपरोक्त रक्कम ही श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी देण्यास जबाबदार आहे आणि सदर तक्रार विरुध्द पक्ष क्रं.2 ते 4 यांचे विरुध्द वैयक्तिकरित्या दाखल केली असल्याने ते वैयक्तिरित्या तक्रारकर्त्यास सदर रक्कम देण्यास जबाबदार नाहीत. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 144/2018 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटीने तक्रारकर्त्याचे मुदतीठेव पावती खाते क्रमांक 48136 मधील परिपक्वता रक्कम रू.1,12,000/-, मुदतीठेव पावती खाते क्रमांक 40556 मधील परिपक्वता रक्कम रू.1,12,000/- तसेच
मुदतीठेव पावती खाते क्रमांक 45851 मधील परिपक्वता रक्कम रू.1,1े2,000/- तक्रारकर्त्याला परत करावी.
3. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटीने यांनी तक्रारकर्त्याला मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रू. 5,000/- व तक्रारखर्च रू. 5,000/- द्यावे.
4. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 ते 4 यांच्या विरुध्द कोणताही आदेश नाही.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामूल्य पाठविण्यांत यावी.
(श्रीमतीकल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.