Maharashtra

Kolhapur

CC/12/330

Smt. Anantmati Bhupal Agare - Complainant(s)

Versus

Shree Dharmnath District Nagari Bigar Sheti Sahakari Pat Santha Ltd., Jaysingpur Main Branch - Opp.Party(s)

Adv.D.P. Nawab

26 Nov 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/12/330
 
1. Smt. Anantmati Bhupal Agare
At post S.T.Stand, Sadlaga, Tal.Chikkodi,
Belgaon
...........Complainant(s)
Versus
1. Shree Dharmnath District Nagari Bigar Sheti Sahakari Pat Santha Ltd., Jaysingpur Main Branch
Near Municipalty, Jaysingpur, Tal.Shirol,
Kolhapur
2. Mr. Ashok Adgonda Patil
as above
3. Mr.Ashok Aappa Chougule
as above
4. Mr.Bharat B. Upadhye
as above
5. Mrs. Vijaydevi Dadgonda Patil
as above
6. Mr. Shyamukrao Govindrao Ghorapade
as above
7. Mr.Suresh Jinnappa Chougule
as above
8. Mr. Sagar Aappaso Magdum
as above
9. Mr. Sukumar Dada Khot
as above
10. Mr. Chougonda Balgonda Patil
as above
11. Mr. Aappa Soma Gavade
as above
12. Mr. Pandurang Tatoba Kamble
as above
13. Mr. Neminath Baburao Biniwale
as above
14. Mr. Aanna Guru Pakole
as above
15. Mr.Sudarshan Bharmma Upadhye
as above
16. Shree Dharmnath District Nagari Bigar Sheti Sahakari Pat Santha Ltd., Jaysingpur Branch Abbullat
Near Grampanchayat, Abbullat, Tal.Shirol,
Kolhapur
17. Mr. Bahubali Alase, Branch Manager
c/o. Shree Dharmnath District Nagari Bigar Sheti Sahakari Pat Santha Ltd., Jaysingpur Branch, near Municipalty, Abbullat, Tal.Shirol,
Kolhapur
18. Mr. Raosaheb Balgonda Patil
as above
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

 

 

 

 

 

निकालपत्र : (दिनांक: 26-11-2013 ) (व्‍दाराः- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष)  

1.     तक्रारदार यांनी सामनेवाले श्री धर्मनाथ जिल्‍हा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर अ.लाट या पतसंस्‍थेत कॉल डिपॉझिट स्‍वरुपात गुंतवलेल्‍या रक्‍कमांची मागणी करुनही परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.

2.          तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,  तक्रारदार यांनी  सामनेवाले  श्री धर्मनाथ जिल्‍हा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर अ.लाट (यापुढे संक्षिप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत  कॉल डिपॉझिट स्‍वरुपात रक्‍कमा गुंतविल्‍या होत्‍या त्‍याचा तपशील खालीलप्रमाणेः-

अ.क्र.

ठेव पावती

 क्र.

ठेव रक्‍कम

रुपये

ठेव ठेवलेची

 दिनांक

ठेवीची मुदत

व ठेवीचा व्‍याज

दर %

 

1

000385

15,000/-

05-10-2002

91 दिवस,

16 टक्‍के

2

000394

15,000/-

05-10-2002

91 दिवस,

16 टक्‍के

3.           तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1-पतसंस्‍थेकडे कॉल डिपॉझिट ठेव पावत्‍यांची  मुदत संपलेनंतर रक्‍कमेची मागणी व्‍याजासह केली असता पतसंस्‍थेने रक्‍कमा दिल्‍या नाहीत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणुक केली. तक्रारदारांना ठेवींच्‍या रक्‍कमांची निकड होती तेव्‍हा तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मुदत संपलेनंतर रक्‍कमांची मागणी केली असता, सामनेवाले पतसंस्‍था यांनी तक्रारदार यांना ठेवीच्‍या रक्‍कमा  दिल्‍या नाहीत. तथापि तक्रारदारांनी  दि. 26-04-2012 रोजी वकिलामार्फत रजि.ए.डी. ने नोटीस पाठवून देखील सामनेवाले यांनी वर नमूद ठेवीची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.  सामनेवाले पतसंस्‍था यांनी वर नमूद ठेवीच्‍या रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून ठेव पावत्‍याच्‍या रक्‍कमा तसेच त्‍यावरील व्‍याजाची मागणी केली. तक्रारदारांनी त्‍यांचे वर नमूद परिच्‍छेद कलम-2 नुसार आज अखेर होणारी एकूण ठेव रक्‍कम रु. 30,000/- + व्‍याज तसेच त्‍यांना झालेल्‍या आर्थिक नुकसानीपोटी व रु. 25,000/-  व या तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- अशा रक्‍कमा तक्रारदारांना वसुल होऊन मिळाव्‍यात अशी मागणी केलेली आहे.

4.    तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीसोबत कॉल ठेवींच्‍या पावत्‍या व   वकिलामार्फत पाठविलेली नोटीस दि. 26-04-2012  व पोस्‍टाचे नोटीसीचे नॉट क्‍लेम्‍ड अशा शे-यानिशी परत आलेले लखोटे व  तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे. 

 5.   वि.पक्ष क्र. 5, 6 व 13 यांनी म्‍हणणे दाखल  केले.  वि.प. यांचे  म्‍हणणेनुसार तक्रारीतील मजकूर खोटा असून मान्‍य नाही.  वि.प. 13 रावसाहेब पाटील हे ठेवीच्‍या वेळेस संस्‍थेमध्‍ये संचालक नव्‍हते.  त्‍यांची निवड दि. 22-12-2005 रोजी झालेली असून सध्‍या ते संचालक नाहीत.   प्रस्‍तुत वि.प. यांचा संस्‍थेच्‍या दैनंदीन कारभाराशी काहीही संबंध नाही.  तक्रारदारांनी तक्रार अर्जात नवीन संचालकांना पक्षकार करणे आवश्‍यक आहे. सन 2008 पासून 2010 पर्यंत संस्‍थेवर प्रशासक होते व तदनंतर आजअखेर नवीन संचालक मंडळ कार्यरत आहे.  वि.प. 13 यांना विनाकारण  तक्रार अर्जात पार्टी केले आहे. तक्रारदाराचे काही येणे देणेस असल्‍यास त्‍यांनी कायद्यानुसार नवीन संचालक मंडळाकडून वसुल करणे आवश्‍यक आहे.  सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द व्‍हावा अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.       

6.     वि. पक्ष क्र. 4, 10 व 14 यांनी म्‍हणणे दाखल  केले.  वि.प. यांचे  म्‍हणणेनुसार तक्रारीतील मजकूर खोटा असून मान्‍य नाही.    प्रस्‍तुत वि. प. हे संस्‍थेचे संचालक नाहीत.  तक्रारदारांची तक्रार चालणेस पात्र नाही.   तक्रारदारांनी तक्रार दाखल करतेवेळी कायद्यानुसार सहकार खात्‍याची परवानगी घेतली नाही.  प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत नाही.   वि.प. संस्‍थेचे संचालक मंडळ निवडून आलेनंतर महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 60 मधील तरतुदीनुसार 60 दिवसाच्‍या आत बंधपत्र लिहून देणे आवश्‍यक असते तसे संचालकांनी दिलेले नाही. वि.प.  यांची संचालक म्‍हणून कोणतीही जबाबदारी येत नाही. वि.प. 4 व 10 यांना सहनिबंधक, सहकारी संस्‍था, पुणे विभागीय कार्यालय कोल्‍हापूर यांनी दि. 07-09-2007 चे आदेशाने संचालक म्‍हणून नाव वगळून दि. 01-09-2007 रोजी संचालक पदाचा राजिनामा दिलेला आहे. तक्रारदार यांची रक्‍कम देणेस वि.प. पतसंस्‍थेबरोबर जबाबदार नाहीत.  ना. उच्‍च न्‍यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ रिट पिटीशन नं. 5223/2009 सौ. वर्षा ईसाई वि. राजश्री चौधरी  मध्‍ये संचालकांना जबाबदारीतून वगळले आहे. सहकार कायद्यातील  कलम 88 अन्‍वये चौकशी होऊन  सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत तक्रार अर्जात पुरावा नाही. त्‍यामुळे वि.प. यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्तिकरित्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा देणेस जबाबदार धरता येणार नाही.  सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द व्‍हावा अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.  वि.प. 4,10 व 14 यांनी आपले म्‍हणणेसोबत संस्‍थेवर प्रशासक नेमलेबाबत दि. 07-09-2007 रोजीच्‍या आदेशाची प्रत दाखल केली आहे.         

7.           तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच अनुषांगिक कागदपत्रे व तक्रारदार यांचा युक्‍तीवादचा विचार करता, तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

    उत्‍तर

 1

तक्रारदार हे ग्राहक आहे‍त काय ?

    होय

 2

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?

    होय

 3

तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

 4

आदेश काय ?

तक्रार अंशतः मंजूर

विवेचन-

 मुद्दा क्र. 1 -   तक्रारदार यांनी कॉल डिपॉझिट स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमांच्‍या पावत्‍याच्‍या छायांकित प्रतीं सादर केलेल्‍या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची ठेव स्‍वरुपात भरलेल्‍या रक्‍कमा नाकारलेल्‍या नाहीत.  ठेव स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमांचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्‍हणुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

 मुद्दा क्र. 2 -  प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार यांनी पतसंस्‍थेत कॉल डिपॉझिट स्‍वरुपात रक्‍कमा गुंतविलेल्‍या आहेत ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे कॉल डिपॉझिटच्‍या स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमा परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे,  म्‍हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

 मुद्दा क्र. 3तक्रारदार यांनी दाखल केलेली कॉल डिपॉझिट रक्‍कमेवर व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले क्र.1 ते सामनेवाले क्र. 18 यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे.  या संदर्भात मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी  या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढीलप्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.

“As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies”.

      वरील न्‍यायिक निवाडयामध्‍ये संचालकांना ठेवीच्‍या रक्‍कमा देण्‍यासाठी वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सामनेवाले क्र. 2 ते 18 यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे सामनेवाले  श्री धर्मनाथ जिल्‍हा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर शाखा- अ. लाट यांच्‍याकडून वर  परि. क्र. 2 मध्‍ये नमूद कॉल डिपॉझिटमध्‍ये गुंतविलेल्‍या रक्‍कमा मुदत संपेपर्यंत ठरलेल्‍या व्‍याज दरानुसार द्यावेत व त्‍यानंतर द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच कॉल झिपॉझिटच्‍या रक्‍कमा परत देण्‍यास सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍था हे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. 

      तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी  कॉल डिपॉझिट  खात्‍यातील रक्‍कमा न दिल्‍याने सेवेत त्रुटी केली आहे, त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्‍यामुळे सामनेवाले पतसंस्‍था यांच्‍याकडून मानसिक त्रासापोटी व नुकसानभरपाईपोटी रु. 2,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु. 1,000/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

  मुद्दा क्र.4 -   सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

                                         आदेश

 

1 .       तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2 .       सामनेवाले  श्री धर्मनाथ जिल्‍हा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर शाखा-अ.लाट यांनी तक्रारदार यांना न्‍यायनिर्णयातील परिच्‍छेद कलम- 2 मध्‍ये नमुद असलेल्‍या  कॉल डिपॉझिटमध्‍ये गुंतविलेल्‍या रक्‍कमा  मुदत संपेपर्यंत ठरलेल्‍या व्‍याज दरानुसार द्यावेत व त्‍यानंतर द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो  अदा करावेत.

3.      सामनेवाले  श्री धर्मनाथ जिल्‍हा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर, शाखा- अ.लाट यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) अदा करावेत.

4.   सामनेवाले क्र. 1- श्री धर्मनाथ जिल्‍हा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर, शाखा- अ.लाट यांनी  तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवींच्‍या व्‍याजापोटी काही रक्‍कमा अदा केल्‍या असलेस त्‍या व्‍याजाच्‍या रक्‍कमा ठेवींच्‍या रक्‍कमेतून वजा करण्‍याची मुभा सामनेवाले यांना राहील.  

5.     आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.