सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्रमांक 27/08
श्री नारायण विठोबा सावंत
वय सु.69 वर्षे धंदा – शेती व सेवानिवृत्त
राहाणार मु.पो.कासरल, ता.कणकवली,
जि.सिंधुदुर्ग
सध्या राहाणार 316, अंधेरी जम्बो दर्शन,
कोळ डोंगरी, रोड नं.2
अंधेरी (पुर्व) मुंबई – 69 ... तक्रारदार
विरुध्द
1) शेणगाव अर्बन नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित शेणगाव
(सहकार कायद्यानरे स्थापित पतसंस्था)
शेणगाव अर्बन नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित, मु.पो. शेणगाव,
ता.भुदरगड, जि.कोल्हापूर
2) प्रशासक,
शेणगाव अर्बन नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित शेणगाव, शाखा कणकवली,
ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
आदेश नि.1 वर
1) मुळ तक्रार क्र.02/2007 मध्ये पारीत आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाच्या बँकेने न केल्यामुळे सदरचे दरखास्त प्रकरण ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत दाखल करण्यात आले आहे.
2) सदर प्रकरणातील शेणगाव अर्बन नागरी सहकारी पतसंस्थेचा कारभार प्रशासकाच्या हाती असून संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्य प्रशासकाने नि.29 वरील दस्तऐवजासोबत दिली आहे.
3) सदर प्रकरणातील तक्रारदार ब-याच तारखापासून मंचासमोर गैरहजर असून त्यांनी विरुध्द पक्षाच्या बँकेविरुध्द स्टेप्स घेतलेल्या नाहीत व पूढील कारवाईसाठी तजवीज केली नाही. सदरचे प्रकरण हे कलम 27 अंतर्गत असल्यामुळे व सदर प्रकरणात प्रशासक हे विरुध्द पक्षकार असल्यामुळे प्रशासकाच्या विरुध्द कलम 27 अंतर्गत शिक्षेची कारवाई करता येत नाही. त्यामुळे आम्ही तक्रारदाराची दरखास्त फेटाळत असून त्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची दरखास्त फेटाळण्यात येते.
2) विरुध्द पक्षाचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात.
3) तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25(3) अंतर्गत नव्याने दरखास्त दाखल करण्याची सूचना करण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/09/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग