| Final Order / Judgement | न्या य नि र्ण य (व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या) 1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे— वि.प. बँक ही सहकारी बँक असून तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 बँकेच्या वि.प.क्र.2 ते 5 शाखेत खालीलप्रमाणे ठेवी ठेवलेल्या आहेत. श्रीमती मंगल बाबासाहेब काटकर यांनी ठेवलेल्या ठेवी - अ.क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेली तारीख | ठेवीची मुदत संपणारी तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु. | 1 | 36,040/- शाखा सहकारनगर, पावती क्र. 10185 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,281/- | 2 | 36,040/- शाखा तीनबत्ती, पावती क्र. 24587 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,281/- | 3 | 36,040/- शाखा मेन ब्रँच, पावती क्र. 10185 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,281/- | 4 | 36,040/- शाखा हुपरी, पावती क्र. 109 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,281/- | 5 | 35,549/- शाखा तीनबत्ती, पावती क्र. 21404 | 20/07/2020 | 20/10/2021 | 39,732/- | 6 | 84,339/- शाखा मेन ब्रँच, पावती क्र. 1587 | 29/01/2021 | 29/07/2021 | 84,339/- | 7 | 38,498/- शाखा मेन ब्रँच, पावती क्र. 1588 | 22/01/2021 | 21/06/2021 | 38,498/- | | | | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | 3,23,693/- |
श्री शिवम बाबासाहेब काटकर यांनी ठेवलेल्या ठेवी अ.क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेली तारीख | ठेवीची मुदत संपणारी तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु. | 1 | 35,801/- शाखा हुपरी, पावती क्र. 168 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,014/- | 2 | 35,801/- शाखा सहकारनगर पावती क्र. 10185 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,014/- | 3 | 35,801/- शाखा तीनबत्ती पावती क्र. 24588 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,014/- | 4 | 35,801/- शाखा मेन ब्रॅंच पावती क्र. 10185 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,014/- | | | | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | 1,60,056/- |
सदर ठेवींची मुदत संपल्यानंतर व्याजासह होणा-या रकमेची मागणी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे केली असता त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 12/12/2021 रोजी पत्र देवून ठेवपावतींची रक्कम व्याजासहीत मागणी केली परंतु तरीही वि.प यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. अशा प्रकारे तक्रारदाराच्या ठेव रकमा परत न करुन वि.प. यांनी सदोष सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे. सबब, तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वर नमूद केलेल्या ठेवींची व्याजासह होणारी रक्कम रु. 4,83,749/- तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व अर्जाचा खर्च रु.25,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. 2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत ठेवपावत्यांच्या प्रती, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले पत्र, तक्रारदार यांचे वटमुखत्यारपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 3. वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी हजर होवून म्हणणे दाखल करण्यासाठी मुदत मागितली परंतु त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द दि. 25/2/2022 रोजी नो से आदेश करण्यात आला. वि.प.क्र.3, 4 व 5 यांना नोटीस बजावणी होवून देखील ते याकामी हजर झाले नाहीत. सबब, वि.प.क्र.3, 4 व 5 यांचेविरुध्द दि. 09/03/2022 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला. वि.प.क्र.1 ते 5 यांना नोटीस पोहोच झालेचा ट्रॅक रिपोर्ट याकामी तक्रारदाराने दाखल केला आहे. 4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. अ. क्र. | मुद्दा | उत्तरे | 1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. | 2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. | 3 | तक्रारदार हे ठेवपावत्यांवरील रक्कम व्याजासह मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. | 4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. | 5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा – मुद्दा क्र. 1 – 5. तक्रारदार हे वि.प. बँकेचे ठेवीदार सभासद आहेत. प्रस्तुतकामी तक्रारदार क्र.1 व 2 यांनी श्री हरिभाई ज्ञानोबा काटकर यांचे लाभात ता. 04/08/2021 रोजी वटमुखत्यारपत्र करुन दिलेल आहे. सदरचे वटमुखत्यारपत्र तक्रारीसोबत दाखल आहे. तक्रारदारांनी वि.प.क्र.1 बँकेचे वि.प.क्र.2 ते 5 शाखेमध्ये खालीलप्रमाणे ठेवी ठेवलेल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे - श्रीमती मंगल बाबासाहेब काटकर यांनी ठेवलेल्या ठेवी - अ.क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेली तारीख | ठेवीची मुदत संपणारी तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु. | 1 | 36,040/- शाखा सहकारनगर, पावती क्र. 10185 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,281/- | 2 | 36,040/- शाखा तीनबत्ती, पावती क्र. 24587 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,281/- | 3 | 36,040/- शाखा मेन ब्रँच, पावती क्र. 10185 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,281/- | 4 | 36,040/- शाखा हुपरी, पावती क्र. 109 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,281/- | 5 | 35,549/- शाखा तीनबत्ती, पावती क्र. 21404 | 20/07/2020 | 20/10/2021 | 39,732/- | 6 | 84,339/- शाखा मेन ब्रँच, पावती क्र. 1587 | 29/01/2021 | 29/07/2021 | 84,339/- | 7 | 38,498/- शाखा मेन ब्रँच, पावती क्र. 1588 | 22/01/2021 | 21/06/2021 | 38,498/- | | | | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | 3,23,693/- |
श्री शिवम बाबासाहेब काटकर यांनी ठेवलेल्या ठेवी अ.क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेली तारीख | ठेवीची मुदत संपणारी तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु. | 1 | 35,801/- शाखा हुपरी, पावती क्र. 168 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,014/- | 2 | 35,801/- शाखा सहकारनगर पावती क्र. 10185 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,014/- | 3 | 35,801/- शाखा तीनबत्ती पावती क्र. 24588 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,014/- | 4 | 35,801/- शाखा मेन ब्रॅंच पावती क्र. 10185 | 14/04/2020 | 14/07/2021 | 40,014/- | | | | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | 1,60,056/- |
सदरचे पावतींचे अवलोकन करता, सदर पावतीवर वि.प. बँकेचे नांव नमूद आहे. तसेच वि.प. बँक तर्फे अधिकारी मॅनेजर यांची सही व शिक्का आहे. वि.प. यांनी सदरचे ठेवपावत्या नाकारलेल्या नाहीत. सबब, ठेव पावतींवरील रकमांचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. मुद्दा क्र.2 6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. याचे ग्राहक आहेत. तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सदरची ठेव रक्कम काटकसर करुन अडीअडचणीचे वेळी उपयोगी यावी या उद्देशासाठी वि.प. यांचेकडे ठेवलेली होती. सदरची ठेवीची मुदत संपलेवर तक्रारदार यांनी सदर शाखांमध्ये रकमेची मागणी वारंवार केली. तथापि वि.प. यांनी सदरची रक्कम आजअखेर तक्रारदार यांना अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने तक्रारीतील दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदारांनी ठेवपावत्यांच्या झेरॉक्सप्रती दाखल केलेल्या आहेत. सदरच्या पावत्या वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. ता. 12/12/2021 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. सदरची प्रत वि.प. यांनी स्वीकारलेची नोटीसीवर वि.प. यांची सही व शिक्का आहे. सदरचे नोटीसींचे अवलोकन करता तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 12/3/2021, 13/09/2021 व 20/11/2021 प्रमाणे रक्कम मागणीसाठी पत्रे पाठविलेली असून ता. 12/3/2021 ते 12/12/2021 अखेर तक्रारदार हे ठेव मागणी रकमेसाठी वि.प. बँकेत 21 वेळा येवून गेलेले आहेत. ठेव रक्कम वटमुखत्यार नात्याने क्रॉस चेकने मिळावी अशी तक्रारदारांनी सदर वि.प. बँकेस विनंती केलेची दिसून येते. सबब, दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे सदरचे ठेवपावतीसहीत व्याजाची मागणी वेळोवेळी करुन देखील वि.प. यांनी तक्रारदारास ठेव पावती परत दिलेली नसलेने वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. मुद्दा क्र.3 7. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विवेचनाचा विचार करता, वि.प.क्र.1 ते 5 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. प्रस्तुतकामी वि.प. बँक सहकारी बँक असून तक्रारदार यांनी वि.प.क.1 बँकेच्या वि.प.क्र.2 ते 5 शाखेत न्यायनिर्णय कलम 5 मध्ये नमूद केलेल्या रकमा ठेवलेल्या होत्या हे पुराव्याचे शपथपत्रावर कथन केले आहे. सदरची बाब प्रस्तुत वि.प. यांनी नाकारलेली नाही. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी वि.प.क्र.2, 3, 4, 5 तर्फे शाखाधिकारी यांना पक्षकार केलेले आहे. तथापि शाखाधिकारी हे कर्मचारी असलेन त्यांना सदरकामी वैयक्तिक जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 5 यांचेकडून संयुक्तिकरित्या न्यायनिर्णय कलम 5 मधील मुदतबंद ठेवपावत्या व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे ठेव मुदत पावतीवरील ठेव मुदत संपले तारखेपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. मुद्दा क्र.4 8. उपरोक्त मुद्दा क्र.2 व 3 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 5 यांचेकडून संयुक्तिकरित्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र. 4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. मुद्दा क्र.5 - सबब आदेश. - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 ते 5 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना न्यायनिर्णय कलम 5 मधील नमूद ठेवपावत्यांवरील रक्कम व्याजासह अदा करावी. तसेच सदर रकमेवर ठेवींची मुदत संपले तारखेपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदार यांना अदा करावे.
- वि.प.क्र.1 ते 5 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 ते 5 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तदतुदींनुसार वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
| |