Maharashtra

Chandrapur

CC/15/69

Dhiraj Gajadhar Shrma Ballarpur - Complainant(s)

Versus

Sau Shilpa Abhishek Kantsiya At Chandrapur - Opp.Party(s)

Adv. Bhasarkar

23 Jan 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/69
( Date of Filing : 11 May 2015 )
 
1. Dhiraj Gajadhar Shrma Ballarpur
kalamandir Ward Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sau Shilpa Abhishek Kantsiya At Chandrapur
Principol Global Indradtrial Trening Institute President Nakoda Maliperpaes Socity Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Jan 2019
Final Order / Judgement

::: नि का :::

   (मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. कल्‍पना जांगडे (कुटे) मा.सदस्‍या)

(पारीत दिनांक :- 23/01/2019)

 

1.   तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.  सदर तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे.

 

2.   तक्रारकर्ता क्र.1 ते 11 हे विद्यार्थी आहेत. विरूध्‍द पक्ष क्र.1 व 2 हे  ग्‍लोबल इंडस्ट्रीयल ट्रेनींग इन्‍स्‍टीटयुट आणी नकोडा मल्टिपरपज एज्‍युकेशन सोसायटी,चंद्रपूर ही संस्‍था चालवतात. वि.पक्षा यांनी 2013-14 या सत्राकरीता उपरोक्‍त संस्‍थेमध्‍ये इलेक्ट्रीशियन, फिटर, वायरमन आणि वेल्‍डर ट्रेडकरीता जाहिरातीद्वारे विद्यार्थ्‍यांकडून आवेदने मागवून घेतले. तक्रारकर्त्‍यांनी व इतर विद्यार्थ्‍यांनी सदर जाहिरातीवर विश्‍वास ठेवून सदर संस्‍थेमध्‍ये वेल्‍डर या ट्रेडकरीता प्रवेश फी भरून प्रवेश घेतला. वि.पक्षांनी तक्रारकर्ता क्र.1,2,5,7,8,9 व 11 यांचेकडून प्रत्‍येकी रू.18,000/- व तक्रारकर्ता क्र.3 यांचेकडून रू.10,000/-, तक्रारकर्ता क्र.4 व 10 यांचेकडून प्रत्‍येकी रू.20,000/- व तक्रारकर्ता क्र.6 याचेकडून रू.11,000/- प्रवेश फी घेतली, परंतु वि.पक्षांनी तक्रारकर्त्‍यांना सदर प्रवेश फी भरल्‍याची पावती वारंवार मागणी करूनही दिली नाही.

3.   वि.पक्षांनी 2013-14 च्‍या शैक्षणीक सत्रात वेल्‍डर या ट्रेडचे नियमीत वर्ग सुरू करून संस्‍थेच्‍या हजेरीपटावर रोज उपस्‍थीतीची नोंद घेत होते. शिवाय सदर ट्रेडशी संबंधीत पुस्‍तके आणी स्‍टेशनरीसुध्‍दा तक्रारकर्त्‍यास घ्‍यावयास लावली. शिवाय ज्‍यांना बोनाफाईड सर्टिफिकेट हवे होते त्‍यांना संस्‍थेने बोनाफाईड सर्टिफिकेटसुध्‍दा दिले. त्‍यावर वेल्‍डर या ट्रेडकरीता प्रवेश असे नमूद आहे. वि.पक्षांनी तक्रारकर्त्‍यांकडून इंडस्ट्रीयल ट्रेनींग इन्‍स्‍टीटयुटच्‍या परिक्षेकरीता फॉर्म भरून घेतले. फेब्रुवारी,2014 मध्‍ये उपरोक्‍त परिक्षेची घोषणा करण्‍यांत आली परंतु वि.पक्षांनी तक्रारकर्त्‍यांना व इतर विद्यार्थ्‍यांनासुध्‍दा त्‍याबाबत काहीही माहिती दिली  नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांनी दि.3/2/2014 रोजी वि.पक्षांना इंडस्ट्रीयल ट्रेनींग इन्‍स्‍टीटयुट मधील वेल्‍डर या परिक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) देण्‍याची विनंती केली. तेंव्‍हा वि.पक्षांनी आयटीआय मधील वेल्‍डर या ट्रेडऐवजी एम ई एसचे सर्टिफिकेट देऊ असे सांगितले तेंव्‍हा वि.पक्षाच्‍या संस्‍थेविषयी शंका निर्माण झाल्‍याने डिस्‍ट्रीक्‍ट व्‍होकेशनल एज्‍युकेशन अॅंड ट्रेनिंग ऑफीसर, चंद्रपूर यांचेकडे वि.पक्षाच्‍या संस्‍थेविषयी आणि एम ई एस च्‍या सर्टिफिकेटविषयी चौकशी केली तेंव्‍हा वि.पक्ष संस्‍थेला आय टी आय मध्‍ये वेल्‍डर आणि वायरमन या ट्रेडकरिता विद्यार्थ्‍यांना प्रवेश देवून प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्‍याचे अधिकार दिलेले नाहीत तसेच एम ई एस च्‍या योजनेअंतर्गत व्‍होकेशनल ट्रेनिंग प्रोव्‍हाईडर ही पंजीबध्‍द असणे बंधनकारक आहे परंतु वि.पक्षाच्‍या संस्‍थेला पंजीबध्‍द करण्‍याची परवानगी देण्‍यांत आलेली नाही असे कळले. वि.पक्षांनी तक्रारकर्त्‍यांचे मुळ शैक्षणीक प्रमाणपत्र घेतले होते व वि.पक्षाची संस्‍था ही महा. काम्प्युटर आणि टेक्निकल बोर्ड, नागपूर या संस्‍थेची वेल्‍डर या ट्रेडकरीता प्रशिक्षण देण्‍याकरिता संलग्‍न असल्‍याचे सांगितले परंतु महा. काम्प्युटर आणि टेक्निकल बोर्ड, नागपूर हे स्‍वतःच व्‍होकेशनल ट्रेनिंग प्रोव्‍हायडर पंजीबध्‍द नाही. वि.पक्षांनी तक्रारकर्त्‍यांकडून वेल्‍डर या ट्रेडकरीता भरून घेतलेले परीक्षा फॉर्मसुध्‍दा खोटे होते. वि.पक्षांचे बेकायदेशीर वागण्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांनी वि.पक्षाकडे त्‍यांचेमुळ शैक्षणीक प्रमाणपत्र व परिक्षा तसेच प्रवेश शुल्‍क परत देण्‍याची मागणी केली परंतु वि.पक्षांनी देण्‍यांस नकार दिला.  तक्रारकर्त्‍यांनी वि.पक्षांविरूध्द तक्रार नोंदविली असता रामनगर पोलीस स्टेशन,चंद्रपूर यांनी वि.पक्षांकडून मुळ दस्‍तावेज जप्‍त करून तक्रारकर्त्‍यांना दिले. वि.पक्ष यांनी राजकीय शक्‍तीचा वापर करून तसेच पोलीसांसोबत संगनमत करून प्रदीप क्षिरसागर, सुनील मौर्य, वैभव बाविस्‍कर, धिरज शर्मा इत्‍यादिंविरूध्‍द खोटा गुन्‍हा नोंदवून त्‍यांना अटक करवली. तक्रारकर्त्‍यांनी उपरोक्‍त बाबीबद्दल डिस्‍ट़ीक्‍ट व्‍होकेशनल एज्‍युकेशन अॅंड ट्रेनींग ऑफीसर,चंद्रपूर यांना माहिती दिली असता त्‍यांनी चौकशी करून रामनगर पोलीस स्टेशन,चंद्रपूर यांना पत्र दिल्‍यानंतर वि.पक्षांविरूध्‍द भा.द.वी.अंतर्गत गुन्‍हा  नोंदविला.

4.   वि.पक्षांनी त्‍यांच्‍या संस्‍थेला वेल्‍डर या ट्रेडकरीता शिकविण्‍याची मान्‍यता नसतांनासुध्‍दा तक्रारकर्त्‍यांकडून सदर ट्रेडकरीता प्रवेश शुल्‍क घेवून तक्रारकर्त्‍यांची फसवणुक केली तसेच त्‍यांचे शैक्षणीक वर्षाचेदेखील नुकसान केले जे पैश्‍याच्‍या  मोबदल्‍यात कधीही भरून निघू शकत नाही. ही वि.पक्षांनी तक्रारकर्त्यांप्रती अवलंबिलेली अनुचीत व्‍यापार पध्‍दती असून सेवेत दिलेली न्‍युनता आहे. तक्रारकर्त्‍यांनी अनुक्रमे दिनांक 22/8/2014 व दिनांक 4/2/2015रोजी वि.पक्षांना अधिवक्‍त्‍यामार्फत नोटीस पाठविली होती परंतु वि.पक्षांनी पहिल्‍या नोटीसची दखल घेतली नाही व दुस-या नोटीसवर अबसेंट सुचना दिली अशा पोस्‍टाच्‍या शे-यासहीत तक्रारकर्त्‍यांना दिनांक 13/2/2015 रोजी परत आला. सबब तक्रारकर्त्‍यांनी मंचासमक्ष गैरअर्जदारांविरूध्‍द तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली आहे की, वि.पक्षांनी तक्रारकर्त्‍यांकडून घेतलेले प्रवेश शुल्‍क व्‍याजासह गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यांना द्यावे तसेच तक्रारकर्त्‍यांच्‍या झालेल्‍या शैक्षणीक नुकसानापोटी नुकसान-भरपाई प्रत्‍येकी रू.1,50,000/- व तक्रारीचा खर्च गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यांना द्यावा असे आदेश पारीत करण्‍यांत यावेत अशी विनंती केली.

 

5. तक्रारकर्त्यांची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांना मंचा तर्फे नोटीस काढण्यात आली. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 हजर होऊन त्यांनी आपले संयुक्त लेखी कथन दाखल केले असून त्यामध्ये विरुद्ध पक्षांनी 2013-14 या शैक्षणिक सत्रात वेल्डर या ट्रेडचे वर्ग सुरू करून रोज संस्थेच्या हजेरीपटावर उपस्थितांची नोंद घेत होते याबाबत वाद नाही असे नमूद केले असून तक्रारकर्त्याची तक्रारीतील उर्वरित कथन नाकबूल करून नमूद केले की ग्लोबल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व ग्लोबल टेक्निकल इन्स्टिट्यूट या दोन वेगवेगळ्या संस्था असून इन्स्टिट्यूट च्या पालक संस्था मुंबई न्यास कायद्यांतर्गत पंजीबद्ध असलेल्या दोन वेगवेगळ्या न्यास आहेत. ग्लोबल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ला आयटीआय 2 ट्रेड शिकविण्यास मान्यता मिळालेली आहे. ग्लोबल टेक्निकल इन्स्टिट्यूट ही एक कायदेशीर व्यक्ती असून गणराज मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर ही पंजीबद्ध न्यास ही संस्था चालवीत आहे व सदर संस्थेने दिनांक 7/3/2013 रोजी महाराष्ट्र कम्प्युटर अॅंड टेक्निकल एज्युकेशन बोर्ड नागपुर यांच्याकडे शैक्षणिक कोर्सेस चालू करण्याकरिता संलग्न करून घेण्याकरिता अर्ज केल्यानंतर सदर बोर्डाने ग्लोबल टेक्निकल इन्स्टिट्यूट चंद्रपूर ला महाराष्ट्र संगणक आणि तांत्रिक शिक्षण मंडळ नागपुर सोबत समाविष्ट करून तसे दिनांक 1/4/2013 रोजी प्रमाणपत्र दिले. सदर महाराष्ट्र संगणक आणि तांत्रिक शिक्षण मंडळ नागपुरला भारत सरकारचे कामगार व रोजगार मंत्रालयाकडून दिनांक 1/1/2013 रोजी प्रमाणित टेस्टिंग सेंटर म्हणून मान्यता दिली तसेच दिनांक 9/9/2012 रोजी एकूण वेगवेगळे 122 शैक्षणिक कोर्सेस चालविण्याची मान्यता दिली.
महाराष्ट्र संगणक आणि तांत्रिक शिक्षण मंडळ नागपूर यांच्याकडून मान्यता मिळाल्यामुळे ग्लोबल टेक्निकल इन्स्टिट्यूट ने वेल्डरचा कोर्स सुरू केला व त्यामध्ये तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश/दाखला घेतला व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍यांनी रु.3000/- प्रवेश फीचा भरणा विरुद्ध पक्षाच्या संस्थेकडे केला. एका विद्यार्थ्याने वायरमन च्या कोर्स करिता प्रवेश घेतला. सदर माहिती ग्लोबल टेक्निकल इन्स्टिट्यूट ने महाराष्ट्र संगणक  आणि तांत्रिक शिक्षण मंडळ नागपुर यांच्याकडे पाठविली. त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन सीट नंबर सुद्धा दिले. सप्टेंबर 2013 पासून विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेऊन त्यांना सर्व प्रशिक्षण दोन्ही दिले. फेब्रुवारी 2014 मध्ये सर्व विद्यार्थ्यांची 25 व 26 फेब्रुवारीला परीक्षा होती व सदर परीक्षेचे महाराष्ट्र संगणक आणि तांत्रिक शिक्षण मंडळ नागपुर यांच्याकडून संगणीकृत अॅडमिशन कार्ड सुद्धा आले व ते सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी देण्यात आले. दिनांक 25/2/2014 रोजी परीक्षा होती. त्याकरिता 31 विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेकरिता आलेल्या विद्यार्थ्यांनी पेपर वाटप झाल्यानंतर तक्रारकर्त्यांनी परीक्षा वर्गात गोंधळ करून सर्व विद्यार्थ्यांचे पेपर हिसकावून घेऊन त्यांना हाकलून दिले. त्यामुळे त्याच दिवशी विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्यांविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला. परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. स्वतः कोर्स पूर्ण केल्यानंतर परीक्षा न दिल्यामुळे त्यांचे तसेच त्यांच्या या कृत्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे सुद्धा नुकसान झाले. व झालेल्या नुकसानी करिता विरुद्ध पक्ष जबाबदार नसून तक्रारकर्ता स्वतः जबाबदार आहेत. सबब सदर तक्रार खोटी असल्याने खर्चासह खरिज होण्यास पात्र आहे. 
 

 

6. तक्रारकर्त्‍यांची तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद तसेच  गैरअर्जदारांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र, उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्‍द पक्षांचे यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍याबाबतची कारणमिमांसा आणी निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.

 

 

मुद्दे                                             निष्‍कर्ष

 

1) तक्रारकर्ता क्र.1 ते 12 विरूध्‍द पक्षांचे ग्राहक आहेत काय ?      :  होय 

2) विरूध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यांप्रती अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा            : होय

   अवलंब केला आहे काय ? 

3) विरूध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यांप्रति न्‍युनता पूर्ण सेवा दिली आहे

   काय ?                                             : होय

4) तक्रारकर्ता क्र.1 ते 12 मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पाञ

   आहे काय ?                                :  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1 बाबत ः- 

7.  तक्रारकर्ता क्र.1 ते 11 हे विद्यार्थी असून त्‍यांनी विरूध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांच्‍या ग्‍लोबल इंडस्ट्रीयल ट्रेनींग इन्‍स्‍टीटयुट या संस्‍थेमध्‍ये 2013-14 या सत्राकरीता वेल्‍डर या ट्रेडकरीता प्रवेश फी भरून प्रवेश घेतला. तक्रारकर्त्‍यांनी फी भरून उपरोक्‍त अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेतला ही बाब विरूध्‍द पक्षांसदेखील मान्‍य असल्‍याने तक्रारकर्ता हा विरूध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 

मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः- 

8.     विरूध्‍द पक्ष संस्‍थेला आय.टी.आय.मध्‍ये वेल्‍डर या अभ्‍यासक्रमाकरीता (ट्रेड) मान्‍यता नसतांनासुध्‍दा  जास्‍त प्रवेश फी घेवून तक्रारकर्त्‍यांना वेल्‍डर या ट्रेडकरीता प्रवेश दिला याबाबत उभय पक्षांमध्‍ये वाद आहे.  सदर बाब ही तक्रारकर्त्‍यांना परिक्षेच्‍या वेळी माहिती झाली. त्‍यामुळे त्‍यांनी जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, चंद्रपूर यांचेकडे विरूध्‍द पक्षांच्‍या संस्‍थेबाबत आणि एम.ई.एस.च्‍या प्रमाणपत्राबाबत चौकशी केली.

9.     तक्रारीत तक्रारकर्त्‍यांनी नि.क्र.4 वर दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस आले की जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, चंद्रपूर यांनी विरूध्‍द पक्षांकडे चौकशी केली असता विरूध्‍द पक्षांना महाराष्‍ट्र शासनाने उच्‍च व तंत्रशिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.आय.टी.आय.2011/प्र.क्र.11/व्‍यशि-दि.25 मार्च,2011 च्‍या अटी व शर्तींच्‍या अधीन राहून विजतंत्री व जोडारी या दोन तुकडयांकरीता परवानगी/मान्‍यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाची प्रत दस्‍त क्र.62 ते 64 व 67 वर ट्रेड परवानगीकरीता दिलेले दस्‍त दाखल आहे.

10.  तरीसुध्‍दा वि.प.नी आय.टी.आय.मध्‍ये वेल्‍डर या अभ्‍यासक्रमात मोडयुलर एम्‍प्‍लॉयेबल स्‍कील्‍स (एम.ई.एस) अंतर्गत एकूण 30 प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रवेश दिले आहेत. एम.ई.एस योजने अंतर्गत प्रशिक्षण देण्‍याकरीता संस्‍था ही व्‍होकेशनल ट्रेनींग प्रोव्‍हायडर (व्‍ही.टी.पी.) नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. परंतु सदर संस्‍था ही व्‍ही.टी.पी.नोंदणीकृत नाही. विरूध्‍द पक्ष यांनी सदर वेल्‍डरचे प्रशिक्षण देण्‍याकरीता महा.कॉम्‍प्‍युटर अॅन्‍ड टेक्‍नीकल एज्‍युकेशन बोर्ड, नागपूर यांचेशी संलग्‍न होवून वेल्‍डर या अभ्‍यासक्रमाचे (एम.ई.एस) योजने अंतर्गत प्रशिक्षण सुरू केले. परंतु सदर बोर्ड हे स्‍वतःच नोंदणीकृत नसल्‍याचे दिसून आल्‍याने दिनांक 15/2/2014 रोजी सदर बोर्डवर विभागीय स्‍तरावर चौकशी करण्‍यांत यावी याकरिता सहसंचालक, व्‍य.शि.व प्र.प्रादेशीक कार्यालय, नागपूर यांना पत्र दिले. सदर पत्र दस्‍त क्र.43 वर दाखल आहे. उपरोक्‍त्‍ महा.कॉम्‍प्‍युटर अॅन्‍ड टेक्‍नीकल एज्‍युकेशन बोर्ड, नागपूर ही संस्‍था दिनांक 9.9.2012 रोजी डायरेक्‍टर, जनरल एम्‍प्‍लॉयमेंट अॅन्‍ड ट्रेनींग, रिजनल डायरेक्‍टोरेट ऑफ अप्रेंटीशिप, ट्रेनींग, मुंबई यांचे पत्रान्‍वये टेस्‍टींग सेंटर म्‍हणून नोंदणीकृत आहे व त्‍यांना इतर कोणत्‍याही संस्‍थेला, विद्यार्थ्‍यांना प्रवेश देवून प्रशिक्षण चालविल्‍याबाबतचे प्रमाणपत्र देता येत नाही. वेल्‍डर या ट्रेडकरीता शासनाकडून मान्‍यता नसल्‍याने सदर अभ्‍यासक्रमाकरीता दिलेले प्रवेश व प्रशिक्षण नियमबाहय आहेत. उपरोक्‍त दोन्‍ही संस्‍थांनी मिळून विद्यार्थ्‍यांची फसवणूक केल्‍याचे स्‍पष्‍ट होते असे  जि.व्‍य.शि.व प्र.अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी दोन्‍ही संस्‍थांविरूध्‍द कार्यवाही करण्‍याकरीता ठाणेदार, पोलीस स्‍टेशन चंद्रपूर व पोलीसनिरिक्षक  चंद्रपूर यांच्‍याकडे दिलेल्‍या तक्रारीमध्‍ये उल्‍लेख आहे. सदर दोन्‍ही तक्रारींची प्रत दस्‍त क्र.49 व50 वर दाखल आहेत. याशिवाय उपरोक्‍त संस्‍थेला टेस्‍टींग सेंटर म्‍हणून मान्‍यता असल्‍याचे जॉईंट डायरेक्‍टर ऑफ ट्रेनिंग प्रोजेक्‍ट कोऑर्डीनेटर यांनी दिनांक 9/9/2012 व भारत सरकारने मिनीस्‍ट्री ऑफ लेबर अॅन्‍ड एम्‍प्‍लॉयमेंट दिनांक 1/1/2013 रोजी दिलेल्‍या मान्‍यतेचे प्रमाणपत्र दस्‍त क्र.73 व 74 वर दाखल आहेत. महाराष्‍ट्र कॉम्‍प्‍युटर संस्‍थ्‍ेाला टेस्‍टींग सेंटर म्‍हणून मान्‍यता असल्‍याचे विरूध्‍द पक्ष यांनी लेखी उत्‍तरातील परिच्‍छेद क्र.10 मध्‍ये मान्‍य केलेले आहे व विरूध्‍द पक्ष यांनी सदर संस्‍थेच्‍या मान्‍यतेने ग्‍लोबल टेक्निकल इंस्‍टीटयूटमध्‍ये वेल्‍डर कोर्स सुरू करून तक्रारकर्त्‍यांना प्रवेश दिला असे कथन केले आहे. परंतु विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यांना दिलेल्‍या बोनाफाईड प्रमाणपत्रामध्‍ये ग्‍लोबल इंडस्‍ट्रीयल इन्‍स्‍टीटयूट आय.टी.आय. वेल्‍डर या ट्रेडकरीता असा उल्‍लेख आहे याशिवाय अॅडमिशन ओपन ग्‍लोबल आय.टी.आय. असे विरूध्‍दपक्ष यांच्‍या संस्‍थेच्‍या बोर्डवर लिहिलेले आहे. सदर बोनाफाईड सर्टिफिकेटच्‍या प्रती दस्‍त क्र.1 ते 9 तसेच बोर्डची फोटोकॉपी तक्रारीत दाखल आहे. विरूध्‍द पक्ष यांनी सदर संस्‍था ही व्‍ही.टी.पी.नोंदणीकृत आहे हे दस्‍तावेजांसह सिध्‍द केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याकडून प्रत्‍येकी रक्‍कम रू.3000/- प्रवेश शुल्‍काचे घेतले होते हे विरूध्‍द पक्षांचे कथन त्‍यांनी दस्‍तावेजांसह सिध्‍द केलेले नाही. त्‍यामुळे वि.पक्षांनी तक्रारकर्ता क्र.1,2,5,7,8,9 व 11 यांचेकडून प्रत्‍येकी रू.18,000/-, तक्रारकर्ता क्र.3 यांनी रू.10,000/-, तक्रारकर्ता क्र.4 व 10 यांनी प्रत्‍येकी रू.20,000/- व तक्रारकर्ता क्र.6 यांनी रू.11,000/- प्रवेश फी भरून विरूध्‍द पक्षांच्‍या संस्‍थेत वेल्‍डर या ट्रेडकरीता प्रवेश  घेतला होता हे तक्रारकर्त्‍यांचे कथन ग्राहय धरण्‍यायोग्‍य आहे. विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यांप्रती अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करून सेवेत त्रुटी दिली हे उपरोक्‍त दस्‍तावेजांवरून सिध्‍द होते. विरूध्‍द पक्षांच्‍या या कृतीमुळे तक्रारकर्त्‍योंचे नुकसान होवून त्‍यांना शारिरीक व मानसीक त्रास झाला. त्‍यामुळे तक्रारकर्ता हे विरूध्‍द पक्षांकडून प्रवेश फीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यांस व नुकसान भरपाई मिळण्‍यांस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 

मुद्दा क्रं. 4 बाबत ः- 

 

11.  मुद्दा क्रं. 1 ते 3 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

अंतीम आदेश

 

 

        (1) तक्रारकर्त्‍यांची तक्रार क्र.69/2015 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

        (2) वि.पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्ता क्र.1,2,5,7,8,9 व 11 यांना प्रत्‍येकी रू.18,000/- व तक्रारकर्ता क्र.3 यांना रू.10,000/-, तक्रारकर्ता क्र.4 व 10 यांना प्रत्‍येकी रू.20,000/- व तक्रारकर्ता क्र.6 यांना रू.11,000/- प्रवेश फीची रक्‍कम आदेशाच्‍या दिनांकापासून रक्‍कम प्राप्‍त होईतो द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह  परत करावी.

        (3) वि.पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्ता क्र.1 ते 11 यांना शारिरीक व मानसीक त्रास तसेच तक्रारीच्‍या खर्चापोटी एकत्रीत नुकसान भरपाई प्रत्‍येकी रू.5000/- द्यावेत.

        (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

चंद्रपूर

दिनांक – 23/01/2019

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.