Maharashtra

Gondia

CC/14/38

RAMNARAYAN RAMGULAM GUPTA - Complainant(s)

Versus

SAMSUNG INDIA ELECTRONICS PVT.LTD., - Opp.Party(s)

S.B.RAJANKAR

31 Jan 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/14/38
 
1. RAMNARAYAN RAMGULAM GUPTA
R/O.SATGURU NIWAS, RAMNAGER, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAMSUNG INDIA ELECTRONICS PVT.LTD.,
R/O.BLOCK NO.3, BHASKAR APARTMENT, NEAR MLA HOSTEL, CIVIL LINES, CHITNIS MARG, NAGPUR.
NAGPUR
MAHARASHTRA
2. PRAKASH TRADERS
R/O,CHANDNI CHOWK, PRAKASH GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

( आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)

 

- आदेश -

(पारित दि. 31 जानेवारी, 2015)

 

तक्रारकर्ता रामनारायण रामगुलाम गुप्‍ता यांच्‍या सॅमसंग कंपनीच्या रेफ्रीजरेटरमध्ये उत्‍पादन दोष असल्‍यामुळे तो बदलून द्यावा ही तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे केलेली मागणी विरूध्‍द पक्ष यांनी फेटाळल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरहू तक्रार न्‍याय मंचात दाखल केली आहे.  तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

 

2.    तक्रारकर्ता व विरूध्‍द पक्ष हे न्‍याय मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात कार्यरत असून विरूध्‍द पक्ष 2 हे विरूध्‍द पक्ष 1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत. 

 

3.    तक्रारकर्त्‍याने दिनांक 28/02/2012 रोजी विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून विरूध्‍द पक्ष 1 कंपनीद्वारे उत्‍पादित सॅमसंग रेफ्रीजरेटर RT26FCES, RO554PABA62262 रू. 16,100/- इतक्‍या किमतीत खरेदी केला.  विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी सदर रेफ्रीजरेटरवर 12 महिन्‍याची Comprehensive Warranty व 5 वर्षाची Compressor Warranty  दिलेली होती.          

 

4.    दिनांक 3 नोव्‍हेंबर 2013 रोजी तक्रारकर्त्‍याचा रेफ्रीजरेटर बंद पडला. तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष 2 यांचे Local Technician श्री. बाबा खान यांच्‍याकडे तक्रार केली व तो दिनांक 06/11/2013 रोजी दुरूस्‍त करण्‍यात आला.  परंतु रेफ्रीजरेटर cooling होत नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा दिनांक 09/12/2013 रोजी त्‍याबाबतची तक्रार केली.  विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास कळविले की, रेफ्रीजरेटरमध्‍ये उत्‍पादन दोष असल्‍यामुळे तो दुरूस्‍त होऊ शकत नाही. 

 

5.    तक्रारकर्त्‍याचा रेफ्रीजरेटर cooling होत नव्‍हता त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा दिनांक 27/03/2014 रोजी तक्रार नोंदविली.  विरूध्‍द पक्ष यांचे Expert श्री. अतुल भावे यांनी त्‍यात दुरूस्‍ती केली.  परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या रेफ्रीजरेटरमध्‍ये काहीही सुधारणा झालेली नव्‍हती.  तक्रारकर्त्‍याच्‍या रेफ्रीजरेटरने दिनांक 20/05/2014 पासून संपूर्णपणे काम करणे बंद केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष यांच्‍या concerned technician कडे तक्रार केली.  परंतु विरूध्‍द पक्ष हे तक्रारकर्त्‍याकडून रू. 1,300/- service charge घेऊनही रेफ्रीजरेटरमधील दोष दूर करून देऊ शकले नाहीत.  करिता तक्रारकर्त्‍याने रेफ्रीजरेटर बदलून देण्‍यात यावा अशी विनंती विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे केली.  शेवटी तक्रारकर्त्‍याने दिनांक 24/05/2014 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली.  परंतु नोटीसची देखील पूर्तता न झाल्‍यामुळे सदरहू तक्रार न्‍याय मंचात दाखल करण्‍यात आलेली आहे.                 

 

6.    तक्रारकर्त्‍याची तक्रार दिनांक 25/07/2014 रोजी मंचात दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना मंचामार्फत दिनांक 28/07/2014 रोजी नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.

 

7.    विरूध्‍द पक्ष 1, 2 यांना नोटीस मिळाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष 1 हे मंचासमक्ष हजर झाले.  परंतु विरूध्‍द पक्ष 2 यांना दिनांक 30/07/2014 रोजी मंचाची नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्‍यांनी त्‍यांचा लेखी जबाब सुध्‍दा दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याविरूध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 22/01/2015 रोजी मंचाद्वारे पारित करण्‍यात आला. 

 

8.    विरूध्‍द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा लेखी जबाब दिनांक 26/11/2014 रोजी दाखल केला असून विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्यांच्‍या लेखी जबाबामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचे खंडन केले आहे.   विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबाच्‍या परिच्‍छेद 3 मध्‍ये असे म्‍हटले आहे की, as per terms and conditions of warranty if any dispute arise between the complainant and the O. P. No. 1 then the Court at Delhi only, has jurisdiction to entertain the complaint, thus for this reason only the instant complaint is not maintainable before this Hon’ble Forum and is liable to be dismissed. 

 

9.    विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबाच्‍या परिच्‍छेद 4 मध्‍ये असेही म्‍हटले आहे की, It is pertinent to mentioned that the O. P. No. 1 provides warranty upon their various products available in the market.  Further the said warranty is being provided upon certain terms and conditions, which are not only binding upon the O. P. No. 1 but also upon the complainant.  Thus the warranty is a reciprocal obligation.  It is pertinent to mentioned that the warranty does not applies to any product if it is found that the said product is not used according to the instructions given in the instructions manual, this can be seen from the condition of the copy of conditions of warranty and also from the copy of instructions manual.  It is submitted that there is comprehensive warranty of 12 months and 5 years warranty of compressor only.  It is pertinent to mention here that the refrigerator was purchased on 28.02.2012 and till 3rd Nov. 2013 i.e. 19 months there was no problem in its functioning, thus there is no manufacturing defect even complainant has not made any complaint in that respect.  It is further pertinent to mention here that as per complainant, the refrigerator was purchased on 28.2.2012 and till 3.11.2013 there was no problem in the refrigerator thus from this it can be apparently seen that there is no manufacturing defect.  It is further submitted that as per the terms and conditions of warranty after warranty period is over any repairs to the product will be done on chargeable basis.  In the present case the alleged problem if any in the refrigerator is caused because of the complainant and after the expiry of warranty period and hence any repairs to the product will be done on chargeable basis.

 

10.   विरूध्‍द पक्ष 1 यांचे लेखी जबाबातील परिच्‍छेद 5 मध्ये असे म्‍हणणे आहे की, It is pertinent to mention here that the complainant has not filed a single document on record to support the baseless allegation.  It is submitted that there is no document on record filed by the complainant to show that there is manufacturing defect, no expert opinion is brought on record by the complainant.  It is further submitted that the O. P. No. 1 is still ready to pay the requisite charges.

 

11.   लेखी जबाबाच्‍या परिच्‍छेद क्र. 6 व 7 मध्‍ये विरूध्‍द पक्ष 1 यांचे असे म्‍हणणे आहे की, It is submitted that no cause of action has accrued in favour of complainant to file the instant complaint against the opposite party no. 1 and therefore the instant complaint is liable to be dismissed with cost.   It is further submitted that if any dispute arise between the complainant and O. P. No. 1 then the Court at Delhi, only has jurisdiction to entertain the complaint, thus for this reason the instant complaint is not maintainable before this Hon’ble Forum and is liable to be dismissed.       

 

12.   तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत विरूध्‍द पक्ष 2 यांनी दिलेले रेफ्रीजरेटर खरेदीचे बिल पृष्‍ठ क्र. 11 वर दाखल केले असून Customer Service Record Card पृष्‍ठ क्र. 12 वर दाखल केले आहे.  तसेच Customer Details cum warranty Card पृष्‍ठ क्र. 13 वर,  वकिलामार्फत पाठविलेली दिनांक 24/05/2014 रोजीची कायदेशीर नोटीस पृष्‍ठ क्र. 14 वर, पोस्‍टल विभागाच्‍या पोचपावत्‍या प्रत पृष्‍ठ क्र. 16 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.     

 

13.   तक्रारकर्त्‍यातर्फे ऍड. एस. बी. राजनकर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्‍याने रेफ्रीजरेटरबाबत दिनांक 06/11/2013, 09/12/2013, 27/03/2014 व 20/05/2014 रोजी विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे तक्रार करून सुध्‍दा तक्रारकर्त्‍याचा रेफ्रीजरेटर दुरूस्‍त होऊ शकला नाही.  विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची एक वर्षाची Comprehensive Warranty तसेच 5 वर्षाची    Extended Warranty  दिली होती.  Extended Warranty कालावधीत विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या रेफ्रीजरेटरमध्‍ये सतत येणारा दोष दूर न करणे तसेच रेफ्रीजरेटर बदलून न देणे ही विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेमधील त्रुटी दर्शविते

 

14.   विरूध्‍द पक्षाचे वकील ऍड. श्रीकांत सावजी यांनी लेखी जबाब हाच युक्तिवाद समजण्‍यात यावा अशा आशयाची पुरसिस दिनांक 28/01/2015 रोजी दाखल केली. 

 

15.   तक्रारकर्त्‍याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्‍द पक्ष 1 यांचा लेखी जबाब व दोन्‍ही पक्षाच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.

तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे काय?

होय

2.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

 

- कारणमिमांसा

16.   तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष 2 यांचेकडून विरूध्‍द पक्ष 1 द्वारा उत्‍पादित सॅमसंग रेफ्रीजरेटर RT26FCES, RO554PABA62262 रू. 16,100/- किमतीत दिनांक 28/02/2012 रोजी खरेदी केला होता ही बाब तक्रारकर्त्‍याने सदरहू प्रकरणात पृष्‍ठ क्र. 11 वर दाखल केलेल्‍या विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍या बिलावरून सिध्‍द होते.  तसेच सदरहू बिल हे विरूध्‍द पक्ष 2 यांनी दिल्‍याचे विरूध्‍द पक्ष 1 यांनी लेखी जबाबात कबूल केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष 2 यांचेकडून रेफ्रीजरेटर विकत घेतला होता हे म्‍हणणे सिध्‍द होते.

 

17.   विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला सदरहू रेफ्रीजरेटरवर 1 वर्षाची Comprehensive Warranty तसेच पुढील 5 वर्षाकरिता Extended Warranty दिली होती हे विरूध्‍द पक्ष 1 यांनी लेखी जबाबात कबूल केलेले आहे.  तक्रारकर्त्‍याने पृष्‍ठ क्र. 12 वर दाखल केलेल्‍या Customer Service Record Card मध्‍ये तसेच पृष्‍ठ क्र. 11 वर दाखल केलेल्‍या Invoice Bill No. PA-3800 नुसार रेफ्रीजरेटर विकत घेतल्‍याचा दिनांक 28/02/2012 दर्शविलेला आहे.  तसेच दिनांक 02/11/2013 ला 1st complaint ही Cooling problem, Gas problem व Gas recharging  बद्दल दिलेली असल्‍याचे आढळते.  तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे दिनांक 02/11/2013, 06/11/2013, 07/12/2013, 27/03/2014, 28/03/2014 रोजी रेफ्रीजरेटर दुरूस्‍तीसंबंधी तक्रारी केल्‍या होत्‍या व विरूध्‍द पक्ष यांचे Technician श्री. बाबा खान यांना सदरहू तक्रारी मिळाल्‍या याबद्दलची माहिती मिळते.  दिनांक 28/03/2014 रोजी श्री. अतुल भावे यांनी तक्रारकर्त्‍याची तक्रार attend केल्‍याबद्दल देखील उपरोक्‍त दस्‍तऐवजावरून निदर्शनास येते.  तक्रारकर्त्‍याने रेफ्रीजरेटरच्‍या Cooling problem बद्दल वेळोवेळी व सतत एकाच मुद्दयावर तक्रारी केल्‍याचे त्‍यावरून आढळून येते.  तक्रारकर्त्‍याची तक्रार ही सतत एकाच बाबीसंबंधी असून ती विरूध्‍द पक्ष यांना वेळोवेळी दूर करता न येऊ शकल्‍यामुळे ती निश्चितच उत्‍पादन देष या व्‍याख्‍येखाली समाविष्‍ट होते.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास रेफ्रीजरेटर बदलून न देणे म्‍हणजेच सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.    

 

18.   तक्रारकर्त्‍याने पृष्‍ठ क्र. 13 वर दाखल केलेल्‍या विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍या Customer Details cum warranty Card मध्‍ये Extended Warranty ही Warranty Clause 10 मध्‍ये दिलेली आहे.  त्‍यानुसार तक्रारकर्ता हा 1 वर्षाच्‍या Comprehensive Warranty नंतर पुढील 5 वर्षाकरिता Extended Warranty अंतर्गत Warranty Benefit मिळण्‍याकरिता पात्र आहे.  तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष क्र. 2 ह्यांचे Customer Service Record Card नुसार तक्रारकर्त्‍याच्‍या रेफ्रीजरेटरला continuous same problem होता व तो दूर करण्‍यास विरूध्‍द पक्ष सतत अपयशी झाल्‍यामुळे तो दूर न होणारा problem हा manufacturing defect आहे.  तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले Customer Service Record Card हा एकमेव पुरावा manufacturing defect सिध्‍द करण्‍यास समर्थ आहे असे मंचाचे मत आहे.  विरूध्‍द पक्ष हे तक्रारकर्त्‍याला Warranty applicable नसल्‍याबद्दल तसेच Breach of Warranty Condition बद्दलचा कुठलाही पुरावा तक्रारकर्त्‍याविरूध्‍द सिध्‍द करू न शकल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष हे तक्रारकर्त्‍याला Contract of Indemnity & Guaranty नुसार Extended Warranty Benefit   देण्‍यास बंधनकारक आहेत असे मंचाचे मत आहे.

            Hindustan Motors Ltd. versus N. Shiva Kumar (2000) 10 SCC 654 चे Para 5 मध्‍ये असे म्‍हटले आहे की, “An apprehension has been expressed by the dealer that the burden of this may ultimately fall upon the dealer.  We make it clear that for the manufacturing defects in the vehicle the dealer can not be held liable.  The liability must be borne by the manufacturer” are also maintained.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 1 हे तक्रारकर्त्‍यास नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार आहेत. 

 

19.   विरूध्‍द पक्ष 1 त्‍यांच्‍या वस्‍तुसंबंधी कुठलाही वाद निर्माण झाल्‍यास तो दिल्‍ली येथील न्‍यायालयाच्‍या अधिकारक्षेत्रातच सोडविल्‍या जाऊ शकतो या विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍या युक्तिवादास मंच सहमत नाही.  कारण कुठल्‍याही Agreement नुसार न्‍याय मागणीसंबंधीचे कायद्याद्वारे संसदेने दिलेले अधिकारक्षेत्र बदलण्‍याचा अधिकार Agreement करणा-या पक्षांना नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार चालविण्‍याचा मंचाला अधिकार आहे असे मंचाचे मत आहे.    

 

      करिता खालील आदेश.             

-// अंतिम आदेश //-

1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडील    उत्‍पादन दोष असलेला सॅमसंग रेफ्रीजरेटर RT26FCES,      RO554PABA62262 परत घेऊन त्‍याच किंमतीचा दुसरा नवीन    रेफ्रीजरेटर तक्रारकर्त्‍याला द्यावा. 

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला      झालेल्‍या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू. 5,000/- द्यावे.

 

4.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारीच्‍या   खर्चापोटी तक्रारकर्त्‍याला रू. 5,000/- द्यावे.

 

5.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्‍यांनी उपरोक्‍त     आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्या दिनांकापासून 30       दिवसांचे आंत करावे.

 

6.    विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍या विरूध्‍द कुठलाही आदेश नाही.   

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.