| Complaint Case No. CC/440/2021 | | ( Date of Filing : 11 Aug 2021 ) |
| | | | 1. HERDEVI BHAGVANDAS MADAAN THROUGH ITS POWER OF ATTORNEY HOLDER NISHANT MADAAN | | R/O. 301, POONAM VIHAR-2, OPPOSITE SANCHAYANI SWAOLAMBI NAGAR, NAGPUR-44022 | | NAGPUR | | MAHARASHTRA | | 2. MRS. JYOTI MANCHANDA THROUGH ITS POWER OF ATTORNEY HOLDER NISHANT MADAAN | | R/O. 501, POONAM VIHAR-2, OPPOSITE SANCHAYANI SWAOLAMBI NAGAR, NAGPUR-440022 | | NAGPUR | | MAHARASHTRA | | 3. MRS. PREETI CHARDE THROUGH ITS POWER OF ATTORNEY HOLDER NISHANT MADAAN | | R/O. SNEH NIWAS, DARSHAN COLONY, NANDANVAN, NAGPUR-440024 | | NAGPUR | | MAHARASHTRA | | 4. NISHANT BHAGWANDAS MADAAN | | R/O. 301, POONAM VIHAR-2, OPPOSITE SANCHAYANI SWAOLAMBI NAGAR, NAGPUR-440022 | | NAGPUR | | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. SAHARA PRIME CITY LIMITED | | SAHARA INDIA CENTRE 2 KAPOORTHALA COMPLEX LUCKNOW 226024 | | LUCKNOW | | UTTAR PRADESH |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्षाने चिंचभवन जवळ, वर्धा रोड नागपूर येथे सहारा सिटी होम नागपूर या नावाने बहुमजली इमारती आवास योजना व स्वतंत्र गृहनिर्माण आवास योजना सुरु केली व सदरची फ्लॅट स्किम मार्च 2011 पासून 38 महिन्यात तयार करुन त्याचे हस्तांतरण करणार होते. म्हणून तक्रारकर्तीचे पती स्व. भगवानदास तखतराम मदान यांनी विरुध्द पक्ष सहारा प्राईम सिटी लिमिटेड यांच्याकडून 6 व्या मजल्यावरील युनिट क्रं. बी 5-601, टाईप - 2 बेडरुम, एकूण क्षेत्रफळ 88.73 चौ.मी. एकूण रक्कम रुपये 27,03,000/- मध्ये खरेदी करण्याकरिता दि. 03.12.2007 रोजी आरक्षित केला होता व त्याचदिवशी अग्रिम राशी म्हणून रुपये 2,70,300/- चा धनादेश क्रं. 749476 दिला होता.
- तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तक्रारकर्ती क्रं. 1 हरदेवी भगवानदास मदान ही स्व. भगवानदास तखतराम मदान यांची पत्नी असून तक्रारकर्ती क्रं. 2 , 3 व 4 ही त्यांची मुले आहेत या नात्याने ते वारसदार आहेत. तक्रारकर्तीचे पती स्व. भगवानदास तखतराम मदान यांचा दि. 11.07.2016 रोजी मृत्यु झालेला असून तक्रारकर्ती क्रं. 1 ते 3 यांनी तक्रारकर्ता क्रं. 4 निशांत भगवानदास मदान यांना प्रकरण चालविण्याचे आममुख्यत्यार पत्र करुन दिले आहे. तक्रारकर्तीच्या पतीने स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुख्य शाखा – नागपूर यांच्याकडे रक्कम रुपये 20,00,000/- गृहकर्ज 10.50% दराने व्याजाने मिळण्याकरिता अर्ज केला होता.
- तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, वि.प.ने त.क.कडे रुपये 1,35,150/- ची जानेवारी 2008 मध्ये अतिरिक्त रक्कमेची मागणी केली असता त्याने धनादेश क्रं. 329249 द्वारे रक्कम अदा केली व त्यानंतर दि. 20.01.2008 रोजी वि.प. ने सदरच्या सदनिकेचे ताबापत्र दिले होते आणि लवकरच सदरच्या सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा देणार असे आश्वासनासह पुन्हा दि.10.10.2008 रोजी सदनिकेचे ताबापत्र दिले. तक्रारकर्तीच्या पतीने दि. 10.04.2008 ते 15.11.2011 पर्यंत एकूण रक्कम रुपये 17,56,119/- चे revised schedule प्रमाणे एकूण 14 धनादेश दिले होते. वि.प.ने त.क.कडून अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्याप्रमाणे दि. 01.02.2012 ते दि. 14.06.2013 पर्यंत रुपये 3,53,479/- धनादेशाद्वारे अदा केले होते. अशा प्रकारे तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्द पक्षाकडे एकूण रक्कम रुपये 25,15,048/- अदा केली आहे. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी अनेक वेळा वि.प.ला सदरच्या सदनिकेचे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्याकरिता विनंती करुन देखील विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही व प्रत्यक्ष सदनिकेचा ताबा सुध्दा दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून सदनिका पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 23,67,548/- द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याजासह देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन सुध्दा ते आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 12.01.2022 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्तीचे पती स्व. भगवानदास तखतराम मदान यांनी विरुध्द पक्ष सहारा प्राईम सिटी लिमिटेड यांच्याकडून 6 व्या मजल्यावरील युनिट क्रं. बी 5-601, टाईप - 2 बेडरुम, एकूण क्षेत्रफळ 88.73 चौ.मी. एकूण रक्कम रुपये 27,03,000/- मध्ये खरेदी करण्याकरिता दि. 03.12.2007 रोजी आरक्षित केला होता व अग्रिम राशी म्हणून रुपये 2,70,300/- चा धनादेश क्रं. 749476 दिला होता. तक्रारकर्तीचे पती स्व. भगवानदास तखतराम मदान यांचा दि. 11.07.2016 रोजी मृत्यु झाला असल्याने तक्रारकर्ती क्रं. 1 ते 4 हे मृतकाचे वारसदार या नात्याने विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत हे नि.क्रं. 2(2 व 3) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्द पक्षाकडे दि. 03.12.2007 ते दि. 14.06.2013 पर्यंत एकूण रक्कम रुपये 23,67,548/- भरले असल्याचे दाखल दस्तावेज पावत्यांवरुन दिसून येते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सदनिकेचे ताबापत्र दि. 29.01.2008 व दि. 10.10.2008 रोजी दिले असल्याचे दस्तावेज नि.क्रं. 2 (6 व 7) वरुन दिसून येते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून मोठया स्वरुपात रक्कम स्वीकारुन सुध्दा तक्रारकर्तीच्या पतीच्या नांवे सदनिकेचे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा तक्रारकर्तीच्या पतीकडून स्वीकारलेली रक्कम सुध्दा परत केली नाही, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी असल्याचे दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्ष तक्रारकर्तीच्या पतीकडून सदनिका पोटी स्वीकारलेली रक्कम परत करण्यास जबाबदार आहे असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या पतीने सदनिका खरेदीपोटी गुंतविलेली रक्कम रुपये 23,67,548/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 20,000/- द्यावे.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |