| Complaint Case No. CC/138/2017 | | ( Date of Filing : 06 Mar 2017 ) |
| | | | 1. Tanmaya Subhash Waghmare | | R/o. Bhagyashri Nagar, Ramna Maroti Road, Nagpur | | Nagpur | | Maharashtra | | 2. DSubhash Ramkrushna Waghmare | | R/o. Bhagyashri Nagar, Ramna Maroti Road, Nagpur | | Nagpur | | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
| Versus | | 1. S.B.Jain Institute of Technology, Management & Research, Through its Chairman/Director | | Near Jain International School, Behind Aasaram Bapu Ashram, At Village- Yerla, Katol Road, Nagpur 441501 | | Nagpur | | Maharashtra | | 2. Deputy Director, Technical Education, Divisional Office, | | Office at Government Polytechnic Campus, Sadar, Nagpur | | Nagpur | | Maharashtra | | 3. The Commissioner of State Common Entrance Test Cell, Maharashtra State | | Office at 305, Government Polytechnic Campus, 49, Kherwadi, Ali Yawar jung Marg, Bandra (East), Mumbai 400 051 | | Mumbai | | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
| Final Order / Judgement | (आदेश पारित व्दारा- मा. सुभाष रा. आजने, मा. सदस्य) - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १२ अंतर्गत दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्ता क्रमांक १ यांनी मार्च २०१६ यावर्षी महाराष्ट राज्य सेकेंडरी स्कुल सर्टीफीकेट परिक्षा उर्त्तीर्ण केली आणि विरुध्द पक्षाचे कॉलेजमध्ये प्रथम वर्ष अभियांञीक सन २०१६-२०१७ या अॅकेडमीक वर्षाला त्याला प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश हा कॅप राऊंडवर आधारीत होता. तक्रारकर्ता कॅप राऊंड ला रॅन्क मध्ये आला होता. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाचे कॉलेज ला प्रवेशाच्यावेळी रुपये ५३,५००/- दिनांक २/८/२०१६ ला विरुध्द पक्ष क्रमांक ३ कडे जमा केले. विरुध्द पक्ष क्रमांक २ ही अॅथॉरिटी असुन ती प्रोफेशनल इंजिनीअंरीग कॉलेजमधील कोर्स करीता प्रवेश अंमलात आणते. सदरचे प्रवेश शुल्क तक्रारकर्ता क्रमांक 1 चे वडील श्री सुभाष रामकृष्ण वाघमारे (तक्रारकर्ता क्रमांक २) यांनी तक्रारकर्ता क्रमांक १ च्या वतीने जमा केले त्याचप्रमाणे तक्रारकर्ता यांनी माहे मे २०१६ ला प्रोसेसिंग फी रुपये ५,०००/- जमा केले होते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ही संस्था सर शांतीलाल बडजाते चॅरीटेबल ट्रस्ट नागपूर यांच्याकडुन चालविली जाते. ग्रॅज्युएट टेक्नीकल कोर्स चे प्रवेश महाराष्ट्र अनअॅडेड प्रोफेशन एज्युकेशन इंन्स्टीटयुशन अॅक्ट २००५ अंतर्गत अंमलात आणल्या जाते. सदर कायदा २००५ च्या कलम २३ अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने ग्रज्युएट टेक्नीकल कोर्स चे प्रवेश रेग्युलेट करण्याकरीता नियम २०१६ बनविले. ब्राऊचर मध्ये ग्रॅज्युएट डिग्री कोर्स अंतर्गत महाराष्ट्र राज्य वेगवेगळया तांञिक उद्योगाची (कोर्सची) माहिती दिली आहे आणि कॅप, जागेचे आरक्षण, फी परतीबाबत इत्यादी माहिती दिली आहे तसेच ब्राऊचर मध्ये कॅटेगेरीवाईज कोर्स च्या प्रवेशासंबंधी प्रक्रिया व माहिती नमुद केली आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक ३ ही सदर कायदा २००५ च्या कलम २ (g) अंतर्गत सक्षम अधिकारी असुन त्यांना कॅप मधुन विद्यार्थ्यांना संबंधीत कॉलेज ला वाटणी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे आणि विद्यार्थ्याकडुन वाटप व प्रवेशासंबंधी काही निवेदन प्राप्त झाल्यास तक्रारीचे निराकरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
- दिनांक १२/०८/२०१६ ला तक्रारकर्ता क्रमांक १ श्री तन्मय वाघमारे याची नॅशनल पॉवर ट्रेनिंग इॅन्स्टीटयुट येथे प्रवेशाकरीता निवड झाली होती. तक्रारकर्ता क्रमांक १ ला त्याचे शिक्षण सदर कॉलेजमध्ये पूर्ण करायचे होते आणि त्यामुळे त्याने विरुध्द पक्षाचे कॉलेजमधुन प्रवेश रद्द करण्याचे ठरविले. महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रंन्स टेस्ट चे नियमाप्रमाणे प्रवेश रद्द करणे मान्य होते. तक्रारकर्ता हा दिनांक १३/८/२०१६ ला विरुध्द पक्षाकडे गेला व त्याने प्रवेश रद्द करण्याकरीता अर्ज केला आणि नियमाप्रमाणे फी परत मिळण्याची मागणी केली तसेच तक्रारकर्त्याने प्रवेशाच्या वेळी दिलेले सर्व दस्ताऐवजाची त्याच्या निवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकरीता मागणी केली. ज्यावेळी तक्रारकर्त्याने विरुध्द कॉलेजच्या सि.ई.ओ. यांचेशी संपर्क केला त्यावेळी त्याने सुरवातीला दस्ताऐवज देण्यास नकार दिला व उर्वरीत रक्कम रुपये ३९,१५०/- इतकी रक्कम भरण्याच्या अटीवर मुळ दस्ताऐवज परत देण्यात येईल असे सांगितले व नियमाप्रमाणे रक्कम परत करण्यात येईल असे सांगितले. तक्रारकर्त्याला रुपये ३९,१५०/- दिनांक १४/०८/२०१६ ला जमा करण्याबाबत जबरदस्ती करण्यात आली. तक्रारकर्त्याला बळजबरी भरण्याकरीता सांगण्यात आले परंतू तक्रारकर्त्याला रक्कम भरुन मुळ दस्ताऐवज दुस-या कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याकरीता या व्यतीरीक्त दुसरा पर्याय नव्हता. विरुध्द पक्ष क्रमांक १ चे निर्देशानूसार तक्रारकर्त्याने प्रवेशाकरीता रुपये ९७,६५०/- विरुध्द पक्षाकडे जमा केले.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे दिनांक १४/८/२०१६ ला संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर विरुध्द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्त्याला त्याच दिवशी संपूर्ण मुळ दस्ताऐवज परत केले. परंतू त्या दिवशी रविवार असल्यामुळे पैसे मिळाल्याची पावती दिली नाही. तक्रारकर्त्याने दिनांक १३/८/२०१६ ला नॅशनल पॉवर ट्रेनिंग इंन्स्टीटयुट नागपूर यांच्याकडे पावती क्रमांक ४१७३३३९ अन्वये पूढील तारखेला मुळ दस्ताऐवज सादर करण्याच्या अटीवर प्रवेश घेतला. तक्रारकर्ता क्रमांक २ ला संपूर्ण मुळ दस्ताऐवज हस्तांतरीत करण्यापूर्वी विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या संबंधीत अधिका-याने चार बिनतारीख पञावर तक्रारकर्ता क्रमांक २ च्या स्वाक्ष-या घेतल्या आणि तक्रारकर्ता क्रमांक १ ला दिनांक १६/८/२०१६ ला फी परत घेण्याकरीता बोलाविले.
- दिनांक १६/८/२०१६ ला तक्रारकर्ता क्रमांक १ रक्कम घेण्याकरीता विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे गेला परंतू विरुध्द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्त्यास रक्कम परत देण्यास नकार दिला. विरुध्द पक्षाच्या सि.ई.ओ. ने तक्रारकर्त्याला रक्कम मिळाल्याची पावती दिनांक १६/८/२०१६ ला दिली परंतू रक्कम परत करण्यास नकार दिला. विरुध्द पक्षाचे सि.ई.ओ. ने कोणत्याही परिस्थीतीत रक्कम परत करणार नाही असे तक्रारकर्त्याला बजाविले त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक १६/८/२०१६ ला संबंधीत पोलिस स्टेशन कळमेश्वर ला विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार नोंदविली परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नाही व त्यांनी संबंधीत विभाग उपसंचालक तांञिक शिक्षण कार्यालय नागपूर/ विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडे तक्रार करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडे तक्रार करण्यास भाग पाडले. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना प्रवेश फी. पान क्रमांक ३० नियम १६ (c) प्रमाणे परत करण्याबाबत निर्देश दिले. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडुन निर्देश असतांना सुद्धा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याला फी परत केली नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानूसार तक्रारकर्ता ९७,६५०/- मधुन रुपये १,०००/- कमी करुन उर्वरीत रक्कम रुपये ९६,६५०/- मिळण्यास पाञ आहे. विरुध्द पक्षाच्या वागण्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक ३०/०९/२०१६ ला विरुध्द पक्ष क्रमांक १ ला कायदेशीर नोटीस पाठवुन नियमाअंतर्गत फी परत करण्याची विनंती केली. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याला फी परत न करता वकीलामार्फत चुकीची व खोडकरपणे तक्रारकर्त्याच्या नोटीस ला दिनांक १७/१०/२०१६ अन्वये उत्तर पाठविले. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्रमांक ३ ला दिनांक १/१/२०१७ अन्वये नोटीस पाठविण्यास भाग पाडले. परंतू तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला मा. मंचासमोर तक्रार करण्यास भाग पाडले. तक्रारकर्त्याने तक्रारीत खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
- तक्रारकर्त्याला रक्कम रुपये ९६,६५०/- विरुध्द पक्ष क्रमांक १ कडुन १८ टक्के व्याजासह मिळण्याचे आदेशीत करावे. तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- देण्याचे आदेशीत करावे.
- विरुध्द पक्षाचे कथनानूसार विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी सेंट्रल अॅडमीशन कमिटी यांनी निर्धारीत केलेली फी स्विकारलेली आहे. विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी लादुन दिलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन जास्त फी स्विकारलेली नाही आहे. तक्रारकर्ता तन्मय वाघमारे हा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे दिनांक १६/०८/२०१६ ला सिस्टीम जनरेटेड अर्ज घेऊन प्रवेश रद्द करण्याकरीता आला होता आणि प्रवेश रद्द करण्याकरीता विनंती केली होती. तक्रारकर्त्याला मुळ दस्ताऐवज दिनांक १६/८/२०१६ ला परत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे स्टेट एंन्ट्रन्स टेस्ट सेंटर च्या अधिकृत अधिका-याने प्रवेश रद्द करण्याची कट ऑफ तारीख १४/०८/२०१६ घोषित केली होती. नियमाप्रमाणे अर्जदाराला प्रवेश रद्द करण्याबाबतचा सिस्टीम जनरेटेड स्वाक्षरी केलेला अर्ज १४ किंवा १४/०८/२०१६ पूर्वी सादर करावयाचा होता. रेकॉर्डवरुन असे दिसते की सदरचा अर्ज १३/०८/२०१६ पूर्वी सादर करण्यात आला नाही. अधिकृत अधिका-याने दिलेल्या नियमाप्रमाणे अर्ज तक्रारकर्त्याने सादर न करता मॅन्युअली अर्ज सादर केला. माहिती पुस्तकामध्ये दिलेल्या नियमानूसार तक्रारकर्त्याने सिस्टीम जनरेटेड अर्ज स्वाक्षरीसह दिनांक १४ किंवा १४/०८/२०१६ पूर्वी सादर करावयास पाहिजे होता. परंतू तक्रारकर्ता तसे करण्यास चुकला व त्याने अर्ज दिनांक १६/०८/२०१६ ला सादर केला.
- सुरवातीला असे दिसते की, तक्रारकर्त्याने प्रवेश रद्द करण्याबाबतचा अर्ज दिनांक १३/०८/२०१६ ला केला. परंतू तो अर्ज घेऊन तक्रारकर्ता कॉलेज ला दिनांक १६/०८/२०१६ ला आला. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ ने त्याचा प्रवेश रद्द अर्ज त्याच दिवशी म्हणजे दिनांक १६/०८/२०१६ ला रद्द केला. तक्रारकर्त्याने ओ.बी.सी. प्रवर्गातुन प्रवेश घेतला होता व त्याने आरक्ष्ाण जागेतील प्रवेश रद्द केल्यामुळे सदर जागा खुल्या प्रवर्गात गणल्या जाईल व त्या रिक्त खुल्या प्रवर्गातील फी रुपये ९७,६५०/- असल्यामुळे ती त्याला भरावी लागली. तक्रारकर्त्याने कट ऑफ दिनांकानंतर प्रवेश रद्द करीता अर्ज केला. त्यापैकी त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे रुपये ५३,५००/- जमा केले आणि रुपये ५,०००/- महाराष्ट्र शासनाकडे जमा केले. त्यापैकी विरुध्द पक्षाला रुपये १,०००/- प्रोसेसिंग फी कपात केल्यानंतर रुपये ४,०००/- मिळाले जे एकूण रुपये ५७,५००/- आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी दिनांक २३/०८/२०१६ ला विरुध्द पक्ष क्रमांक १ ला पञ पाठवुन रुपये १,०००/- वजा करता उर्वरीत रक्कम तक्रारकर्त्याला परत करण्याबाबत कळविले आहे.
- तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्ताऐवज व प्रतिउत्तर, लेखी युक्तीवाद तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे लेखी जबाब आणि विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचा लेखी जबाब तसेच तक्रारकर्त्याच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकूण निकालीकामी खालिल मुद्द विचारात घेण्यात आले.
अ.क्र. मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ चे कॉलेज ला प्रथम वर्ष अभियांञीक ला प्रवेश घेतेवेळी रुपये ५३,५००/- दिनांक २/८/२०१६ ला विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे जमा केले. तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या मागणीप्रमाणे रुपये ३९,१५०/- दिनांक १४/०८/२०१६ ला विरुध्द पक्षाकडे जमा केले तसेच तक्रारकर्ता यांनी माहे मे २०१६ ला रुपये ५,०००/- प्रोसेसिंग फी जमा केली असे एकूण रुपये ९७,६५०/- विरुध्द पक्षाकडे जमा केले. तक्रारकर्त्याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन केल्यावर असे निर्दशनास येते की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ ने निशानी क्रमांक ११ वर दाखल दस्तऐवजासोबत दाखल दस्ताऐवज क्रमांक ११(१) अॅनेक्सचर A मध्ये १६ Refund of Fees After Cancellation of Admission by Institution या मथळ्याखाली खालिलप्रमाणे नमुद केले आहे.
- The Candidate shall apply online for cancellation and submit signed copy of system generated application for cancellation of admission to the institution.
- After receiving admission cancellation request from the Candidate, the institution shall cancel the admission immediately and generate online acknowledgment of cancellation of admission through institution login and issue a signed copy to the Candidate.
- The refund of fees before cut-off date of admission shall be made within two days i.e. total fee minus the processing charges of Rs. 1000/- or refund rule shall be as per the guidelines of the appropriate authorities or the State Government, as the case may be.
If the admission is cancelled after the cut-off date of admission declared by the Competent Authority, there shall be no refund except the Security Deposit and Caution Money Deposit - विरुध्द पक्ष यांनी त्यांचे निशानी क्रमांक १० वर दाखल लेखी जबाबामध्ये प्रवेश रद्द करण्याबाबतची कट ऑफ डेट दिनांक १४/०८/२०१६ ही होती असे नमुद केले आहे. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक १३/०८/२०१६ ला १२:४८:१७ PM ला विरुध्द पक्षाकडे बी.ई. प्रथम वर्षाला घेतलेला प्रवेश रद्द करण्याबाबतचा ऑनलाईन अर्ज केला. विरुध्द पक्ष यांनी लेखी जबाबासोबत निशानी क्रमांक ११ वर अॅनेक्सचर C दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, विरुध्द पक्षाने निर्धारीत केलेल्या कट ऑफ डेट दिनांक १४/०८/२०१६ या तारेखपूर्वी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाचे कॉलेजमधील घेतलेला प्रवेश रद्द करण्याबाबतचा ऑनलाईन अर्ज दिनांक १३/०८/२०१६ ला केला होता. त्यामुळे तक्रारकर्ता नियमाप्रमाणे प्रवेश फी मिळण्यास पाञ आहे. तसेच विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांनीसुद्धा विरुध्द पक्ष क्रमांक १ ला तक्रारकर्त्याची घेतलेली फी नियमाप्रमाणे आवश्यक शुल्क वजा करुन परत करण्याबाबत कळविले असतांनाही विरुध्द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्त्याला प्रवेश शुल्क परत केले नाही. ही विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याप्रती दोषपूर्ण सेवा दिली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्ता विरुध्द पक्ष यांचेकडुन रुपये १,०००/- वजा करता उर्वरीत रक्कम रुपये ९६,५००/- मिळण्यास पाञ आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करीता आहोत.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ला निर्देश देण्यात येते की, विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याला त्याने प्रवेशापोटी विरुध्द पक्ष यांचेकडे जमा केलेली फी रुपये ९७,५००/- मधुन नियमाप्रमाणे रुपये १,०००/- वजा करुन उर्वरीत रक्कम रुपये ९६,५००/- तक्रारकर्त्याला दिनांक १५/०८/२०१६ पासुन ७ टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला रक्कम प्रत्यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे विरुध्द दाखल तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |