न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोटतुकडी व तहसिल करवीर, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा करवीर, ए वॉर्ड, राजोपाध्ये नगर येथील रि.स.नं. 1068 या जमीनीतील मंजूर नकाशाप्रमाणे प्लॉट नं.29 क्षेत्र 302.04 चौ.मी. पैकी निम्म्या हिश्श्याचे क्षेत्र 151.02 चौ.मी.(1625 चौ.फूट) या बिगरशेती प्लॉट मिळकतीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधणेत आलेल्या बहुमजली अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील उत्तरेकडील बाजूचा पूर्वाभिमुख रहिवासी फ्लॅट क्षेत्र 729.95 चौ.फूट (948.729 चौ.फूट) व 1 ओपन कार पार्कींग ही मिळकत या तक्रारअर्जाचा विषय आहे. सदरची मिळकत ही तक्रारदार यांचे मालकीची मिळकत आहे. सदरची मिळकत तक्रारदार यांनी वि.प. यांना विकसनास देण्याचे ठरविले. याबाबत तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये विकसन करारपत्र झाले. सदर विकसन करारपत्रातील कलम 4अ प्रमाणे मोबदल्यापोटी रक्कम रु.4,17,300/- रोख स्वरुपात वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे ठरले आहे. तसेच कलम 4ब प्रमाणे मोबदल्यापोटी नवीन निर्माण होणा-या इमारतीतील दुस-या मजल्यावरील एक रहिवासी फ्लॅट क्षेत्र 729.95 चौ.फूट (948.729 चौ.फूट) लाईट पाणी कनेक्शनसह व 1 ओपन कार पार्कींग असे विकसन करारपत्राचे तारखेपासून 2 वर्षाचे आत तक्रारदार यांचे नांवे खरेदीपत्र करुन देवून 7/12 पत्रकी नांव दाखल करुन देणेचे ठरले आहे. वि.प. यांनी सदर मिळकतीवर बांधावयाच्या इमारतीचा बांधकाम नकाशा कोल्हापूर महानगरपालिकेकडून स्वखर्चाने मंजूर करुन घेणेचा असून बांधकामानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कोल्हापूर महानगरपालिकेकडून घेणे या महत्वाच्या अटींची पूर्तता करणे वि.प. वर बंधनकारक होते. परंतु वि.प. यांनी कोणत्याही अटींचे पालन केलेले नाही. विकसन करारपत्रातील अटीप्रमाणे रोख रक्कम वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेली आहे. परंतु फ्लॅट मिळकतीचा कब्जा व खरेदीपत्र अद्याप तक्ररदाराचे नावे करुन दिलेले नाही. तक्रारदार यांचा लॉंड्री व्यवसाय आहे. सदर व्यवसायाची भरपूर वाढ व्हावी तसेच व्यवसायवाढीसाठी पैशाची गरज असलेने व रहायचीही सोय व्हावी म्हणून तक्रारदारांनी सदर मिळकत वि.प. यांना विकसनासाठी दिलेली होती. परंतु वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विकसन करारपत्रात नमूद मोबदल्यापोटी फ्लॅट व कार पार्कींग मिळकतीचा सामाईक सेवा सुविधांसह, लाईट कनेक्शन व भोगवटा प्रमाणपत्रासह कब्जा व खरेदीपत्र करुन मिळावे, फ्लॅट मुदतीत ताब्यात न दिल्याने मासिक भाडयाची रक्कम रु. 1,92,000/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, नोटीसचा खर्च रु. 2,000/-, तक्रारीचा खर्च रु. 25,000/- वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत विकसन करारपत्राची प्रत, दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून फ्लॅटचा कब्जा व खरेदीपत्र व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोटतुकडी व तहसिल करवीर, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा करवीर, ए वॉर्ड, राजोपाध्ये नगर येथील रि.स.नं. 1068 या जमीनीतील मंजूर नकाशाप्रमाणे प्लॉट नं.29 क्षेत्र 302.04 चौ.मी. पैकी निम्म्या हिश्श्याचे क्षेत्र 151.02 चौ.मी.(1625 चौ.फूट) या बिगरशेती प्लॉट मिळकतीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधणेत आलेल्या बहुमजली अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील उत्तरेकडील बाजूचा पूर्वाभिमुख रहिवासी फ्लॅट क्षेत्र 729.95 चौ.फूट (948.729 चौ.फूट) व 1 ओपन कार पार्कींग ही मिळकत तक्रारदार यांचे मालकीची आहे. सदरची मिळकत तक्रारदार यांनी वि.प. यांना विकसनास देण्याचे ठरविले. याबाबत तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये विकसन करारपत्र झाले. सदर विकसन करारपत्रातील कलम 4ब प्रमाणे मोबदल्यापोटी नवीन निर्माण होणा-या इमारतीतील दुस-या मजल्यावरील एक रहिवासी फ्लॅट क्षेत्र 729.95 चौ.फूट (948.729 चौ.फूट) लाईट पाणी कनेक्शनसह व 1 ओपन कार पार्कींग असे विकसन करारपत्राचे तारखेपासून 2 वर्षाचे आत तक्रारदार यांचे नांवे खरेदीपत्र करुन देवून 7/12 पत्रकी नांव दाखल करुन देणेचे ठरले आहे. सदरचे विकसन करारपत्र तक्रारदार यांनी याकामी दाखल केले आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेल्या विकसन करारपत्रातील कलम 4ब प्रमाणे मोबदल्यापोटी नवीन निर्माण होणा-या इमारतीतील दुस-या मजल्यावरील एक रहिवासी फ्लॅट क्षेत्र 729.95 चौ.फूट (948.729 चौ.फूट) लाईट पाणी कनेक्शनसह व 1 ओपन कार पार्कींग असे विकसन करारपत्राचे तारखेपासून 2 वर्षाचे आत तक्रारदार यांचे नांवे खरेदीपत्र करुन देवून 7/12 पत्रकी नांव दाखल करुन देणेचे ठरले आहे. वि.प. यांनी सदर मिळकतीवर बांधावयाच्या इमारतीचा बांधकाम नकाशा कोल्हापूर महानगरपालिकेकडून स्वखर्चाने मंजूर करुन घेणेचा असून बांधकामानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कोल्हापूर महानगरपालिकेकडून घेणे या महत्वाच्या अटींची पूर्तता करणे वि.प. वर बंधनकारक होते. परंतु वि.प. यांनी कोणत्याही अटींचे पालन केलेले नाही. विकसन करारपत्रातील अटीप्रमाणे रोख रक्कम वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेली आहे. परंतु फ्लॅट मिळकतीचा कब्जा व खरेदीपत्र अद्याप तक्ररदाराचे नावे करुन दिलेले नाही. तक्रारदार यांचा लॉंड्री व्यवसाय आहे. सदर व्यवसायाची भरपूर वाढ व्हावी तसेच व्यवसायवाढीसाठी पैशाची गरज असलेने व रहायचीही सोय व्हावी म्हणून तक्रारदारांनी सदर मिळकत वि.प. यांना विकसनासाठी दिलेली होती. परंतु वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे असे तक्रारदार यांचे कथन आहे. सदर कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदारांनी विकसन करारपत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारअर्जातील कथनांचे पुष्ठयर्थ पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. सबब, सदरची सर्व कथने कागदपत्रे विचारात घेता, वि.प. यांनी वर नमूद मिळकतीतील तक्रारदारास द्यावयाच्या फ्लॅटचा कब्जा व नोंद खरेदीपत्र करुन दिले नाही ही बाब स्पष्ट होते. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी आयोगात हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प. यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सदरची बाब विचारात घेता, वि.प. यांनी तक्रारदार यांना वादमिळकतीचा कब्जा व नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही ही बाब शाबीत होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे विकसन करारपत्रात नमूद मोबदल्यापोटी नमूद मिळकतीतील फ्लॅट व कार पार्कींग सामाईक सेवा सुविधांसह, लाईट कनेक्शन व भोगवटा प्रमाणपत्रासह कब्जा व खरेदीपत्र करुन मिळणेस मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अशी रक्कम वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे. तक्रारदार यांनी भाडयाच्या रकमेची मागणी केली आहे. परंतु सदर मागणीचे पुष्ठयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, सदरचे मागणीबाबत कोणतेही आदेश करण्यात येत नाही.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना विकसन करारपत्रात नमूद तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोटतुकडी व तहसिल करवीर, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा करवीर, ए वॉर्ड, राजोपाध्ये नगर येथील रि.स.नं. 1068 या जमीनीतील मंजूर नकाशाप्रमाणे प्लॉट नं.29 क्षेत्र 302.04 चौ.मी. पैकी निम्म्या हिश्श्याचे क्षेत्र 151.02 चौ.मी.(1625 चौ.फूट) या बिगरशेती प्लॉट मिळकतीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधणेत आलेल्या बहुमजली अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील उत्तरेकडील बाजूचा पूर्वाभिमुख रहिवासी फ्लॅट क्षेत्र 729.95 चौ.फूट (948.729 चौ.फूट) व 1 ओपन कार पार्कींग व सामाईक सेवा सुविधांसह तसेच लाईट, पाणी कनेक्शन व भोगवटा प्रमाणपत्रासह कब्जा व नोंद खरेदीपत्र करुन द्यावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीं अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.